Monday, 7 October 2019

नगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघात 116 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

कोपरगाव विधानसभा : आठ उमेदवारांची माघार, 14 उमेदवार रिंगणात


विधानसभेचे निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगर जिल्ह्यामध्ये 66 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे बारा विधानसभा मतदारसंघांमध्ये 116 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. सर्वाधिक उमेदवार नेवासामध्ये 17, तर सर्वात कमी उमेदवार अकोले तालुक्यामध्ये आहेत. नगर जिल्ह्यामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे यांचे मेहुणे राजेश परजने यांनी कोपरगावमधून तर भाजपचे विजय वहाडणे यांनी या मतदारसंघातून बंडखोरी केली आहे. सर्वाधिक उमेदवार नेवासामध्ये असल्याने या मतदारसंघांमध्ये दोन मशीन लावाव्या लागणार आहेत. बारा विधानसभा मतदारसंघांमध्ये छाननीनंतर उमेदवारी अर्ज मागे घेणे करता सोमवारी प्रक्रिया पार पडली. उमेदवारी अर्ज मागे घेण्यामध्ये अकोले 2, संगमनेर 3, शिर्डी 3 ,कोपरगाव 8, श्रीरामपुर 21 ,नेवासा 3, शेवगाव 7, राहुरी 5, पारनेर 3, नगर शहर 2,श्रीगोंदा 5, कर्जत-जामखेड 4 ,असे एकूण जिल्ह्यामध्ये 66 उमेदवारांनी माघार घेतली आहे. पारनेरमध्ये सुजित झावरे ,अजित चेडे, तसेच संदेश कार्ले यांनी पारनेरमधून अर्ज मागे घेतले. पाथर्डी मतदारसंघांमध्ये अपक्ष म्हणून भाजपाच्या हर्षदा काकडे व अमोल गर्जे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. श्रीरामपूर मधून खासदार लोखंडे यांचे सुपुत्र चेतन लोखंडे यांनी माघार घेतली. मात्र कोपरगाव मतदारसंघांमध्ये अपक्ष म्हणून विजय वहाडणे तसेच मंत्री राधाकृष्ण विखे यांचे मेहुणे राजेश मिळवणे राजेश परजणे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, या निवडणुकीतून माघार घेतली नाही. नगर जिल्ह्यामध्ये कोपरगाव मतदारसंघांमध्ये बंडखोरी पाहायला मिळत आहे. उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसानंतर नगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक उमेदवार नेवासे मतदारसंघांमध्ये तर सर्वाधिक कमी उमेदवार हे अकोले मतदारसंघांमध्ये आहेत. अकोल्यामध्ये 4, संगमनेर आठ, शिर्डी 5 ,कोपरगाव 14 ,श्रीरामपूर 11, नेवासा 17, शेवगाव 9, राहुरी 7, पारनेर 6, नगर शहर 12 ,श्रीगोंदा 11, कर्जत-जामखेड 12, असे एकूण 116 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत, सोमवारी उमेदवारांना चिन्हांचे वाटप करुन निवडणुकीची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. नगर जिल्ह्यामध्ये पाच मतदारसंघांमध्ये सरळ लढत होणार आहेत तर उर्वरित ठिकाणी तिरंगी ते दुरंगी लढती होणार आहेत. नगर जिल्ह्यातील 11 मतदारसंघांमध्ये बहुजन वंचित विकास आघाडीने उमेदवार उभे केलेले आहेत. तर नगर शहरामध्ये एमआयएमने उमेदवारी दिली आहे. नगर जिल्ह्यामध्ये भाजपाने पाच विद्यमान आमदारांना उमेदवारी दिली आहे. त्यामध्ये कर्जत जामखेड मधून पालकमंत्री राम शिंदे ,शेवगाव म्हणून मोनिका राजळे ,राहुरी मधून शिवाजी कर्डिले, कोपरगाव मधून स्नेहलता कोल्हे ,नेवासा मधून बाळासाहेब मुरकुटे यांचा समावेश आहे. तर भाजप मध्ये आलेले मंत्री राधाकृष्ण विखे यांना शिर्डी मधून तर राष्ट्रवादी मधून आलेले आमदार वैभव पिचड यांना अकोलामधून तर  बबनराव पाचपुते यांना पुन्हा भाजपाने या जिल्ह्यांमध्ये संधी दिली आहे. शिवसेनेला नगर जिल्ह्यातील चार जागा मिळाल्या  असून नगर शहरातून शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, पारनेर मधून विधानसभेचे उपसभापती विजय औटी, काँग्रेसमधून आलेले श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे तर संगमनेर मधून साहेबराव नवले हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

कोपरगाव विधानसभा : आठ उमेदवारांची माघार, 14 उमेदवार रिंगणात

सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असल्याने कोमपरगाव विधानसभा मतदरासंघात 22 उमेदवारांपैकी आठ उमेदवारांची माघार घेतली. त्यामुळे आता 14 उमेदवार रिंगणात असून यात 9 अपक्ष उमेदवार आहेत. ही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी योगेश चंद्रे यांनी दिली आहे. उमेदवारांमध्ये दोन कोल्हे, दोन काळे, दोन परजणे यांचा समावेश आहे. माघारीनंतर स्नेहलता कोल्हे (कमळ), आशुतोष काळे (घड्याळ), राजेश परजणे (ऑटो रिक्षा), विजय वहाडणे (शिट्टी) यांच्यातच चौरंगी लढत होणार असल्याचे चित्र आहे. उमेदवारी नामांकन अर्ज राहिलेले उमेदवार आणि त्यांची चिन्हे-आशुतोष अशोकराव काळे (चिन्ह-घड्याळ | पक्ष- नँशनँलिस्ट काँग्रेस पार्टी),स्नेहलता बिपीनदादा कोल्हे (चिन्ह -कमळ | पक्ष-भारतीय जनता पार्टी),माधव सखाराम त्रिभुवन (चिन्ह-हत्ती | पक्ष-बहुजन समाज पार्टी),कवडे शिवाजी पोपटराव (चिन्ह-जेवणाचे ताट | पक्ष-बळीराजा पार्टी),कोल्हे शितल दिगंबर (चिन्ह-कपबशी | पक्ष-हिंदूस्थान जनता पार्टी),अशोक विजय गायकवाड (चिन्ह-गँस सिलेंडर | पक्ष-अपक्ष),आहिरे मगन पांडुरंग (चिन्ह-ट्रक | पक्ष-अपक्ष),उकिरडे सुदाम पंढरीनाथ (चिन्ह-बँट | पक्ष -अपक्ष),काळे अशोक नामदेव (चिन्ह-किटली | पक्ष-अपक्ष),परजणे राजेश सखाहरी (चिन्ह-फलंदाज | पक्ष-अपक्ष),राजेश नामदेवराव परजणे (चिन्ह-आँटो रिक्षा | पक्ष-अपक्ष), वहाडणे विजय सूर्यभान (चिन्ह-शिट्टी | पक्ष-अपक्ष),शाह अलिम छोटू (चिन्ह-मुसळ आणि खलबत्ता | पक्ष-अपक्ष),साळुंके दिपक गणपतराव (चिन्ह-ट्रँक्टर चालविणारा शेतकरी | पक्ष-अपक्ष).

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

===================================================================================================================

Maharashtra Assembly Election 2019 Opinion Poll PRAB; प्राब संस्थेचा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकपूर्व जनमत चाचणी सर्वेक्षण (ओपिनियन पोल) अहवाल उपलब्ध

VIDHAN SABHA 2019 ; महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मतदानपूर्व अंदाज

भाजप व शिवसेना युती न झाल्यास मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण व विश्लेषण

युती झाल्यावर संभाव्य जागा; आघाडीला मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण  व विधानसभा मतदारसंघनिहाय  कल

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेचा सर्वेक्षण अहवाल खालील लिंकवर उपलब्ध - 

(A survey report of the Political Research and Analysis Bureau (PREB) organization is available at the following link)
https://www.instamojo.com/bhujbalchandrakant/maharashtra-assembly-election-2019-opinion-p/?ref=store

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.