Tuesday 22 October 2019

पुणे कॅंटोमेंटमध्ये सर्वांत कमी मतदान

पुणे कॅंटोमेंटमध्ये सर्वांत कमी मतदान


पुणे कॅंटोन्मेंट मतदारसंघात शहरात सर्वांत कमी म्हणजे 43.29 टक्के मतदान झाले आहे. मतदारांची संख्या 2.91 लाख एवढी कमी असतानाही या वेळी केवळ 1.26 लाख मतदारांनी मतदान केले आहे. पुणे जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातील दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये सरासरी ६५.२४ टक्के मतदान झाले. त्यामध्ये सर्वाधिक मतदान ७५.९२ टक्के इंदापूर मतदारसंघात, तर सर्वात कमी ६२.९३ टक्के भोर मतदारसंघात झाले. सन २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत ग्रामीण भागात सरासरी ७१.९८ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे या निवडणुकीत ६.७४ टक्के एवढे मतदान घटल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्रामीण भागातील दहा मतदारसंघांतील मतदारांची संख्या २९ लाख ५३ हजार ३१४ आहे. त्यापैकी २२ लाख ५९ हजार ६९६ मतदारांनी मतदान केले. गेल्या विधानसभा निवडणुकीत ग्रामीण भागातील दहा मतदारसंघांमध्ये सर्वाधिक ७८.७७ टक्के मतदान इंदापुरातच झाले होते. या मतदारसंघात दोन लाख १८ हजार १३२ मतदारांनी मतदान केले होते, तर सर्वात कमी ६८.७१ टक्के मतदान भोरमध्येच झाले होते. या मतदारसंघात दोन लाख १८ हजार ६०२ मतदारांनी मतदान केले होते. सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भोर आणि शिरूर वगळता सर्व मतदारसंघात ७० टक्क्य़ांपेक्षा जास्त मतदान झाले होते. दरम्यान, यंदा इंदापूर पाठोपाठ मावळात ७१.१६ टक्के मतदान झाले आहे. उर्वरित सर्व मतदारसंघात ६० टक्क्य़ांपेक्षा जास्त मतदान झाले आहे. ग्रामीण भागात १७ लाख ३० हजार ४९८ पुरुष मतदारांपैकी १२ लाख २२ हजार ७६२ जणांनी मतदान केले. त्याची टक्केवारी ७०.७८ आहे.  १५ लाख ९१ हजार ५३६ महिला मतदारांपैकी दहा लाख ३६ हजार ९२९ महिलांनी मतदान केले. त्याची टक्केवारी ६५.२४ आहे, तर ५४ तृतीयपंथी मतदारांपैकी केवळ पाच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पुणे शहरातील आठ मतदारसंघात सरासरी 48 टक्केच मतदान झाले. पुणे कॅंटोन्मेंट मतदारसंघात सर्वांत कमी म्हणजे केवळ 1 लाख 26 हजार (43.29 टक्के) मतदारांनी मतदान केले आहे. तर कसबा मतदारसंघात सर्वाधिक 51.72 टक्के आणि त्याखालोखाल खडकवासला मतदारसंघात 51.35 टक्के मतदान झाले आहे. मात्र या वेळी लोकसभा निवडणुकीपेक्षाही कमी मतांची नोंद झाली आहे. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदानाची आज अंतिम आकडेवारी प्रसिद्ध केली. त्यात जिल्ह्यातील 21 मतदारसंघांत 77.27 लाख मतदारांपैकी 44.13 लाख (57.10 टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे स्पष्ट होत आहे. पुण्यात वडगावशेरी मतदारसंघात लोकसभा निवडणुकीपेक्षा सहा हजारांनी जादा मतदान झाले आहे. या ठिकाणी लोकसभेपेक्षा मतदारांची संख्याही 12 हजारांनी वाढली होती. 4.56 लाख मतदारांपैकी 2.14 लाख मतदारांनी (46.92 टक्के) मतदानाचा हक्क बजावला. या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात थेट लढत आहे. 2014 मध्ये विधानसभेसाठी येथे 54 टक्के मतदान झाले होते. शिवाजीनगर मतदारसंघातही लोकसभा निवडणुकीपेक्षा सुमारे दहा हजार मतदान कमीच झाले आहे. 3.05 लाख मतदारांपैकी केवळ 1.33 लाख (43.78 टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत येथे 52 टक्के मतदान झाले होते. कमी झालेल्या मतदानामुळे या मतदारसंघातही निकालाविषयी प्रचंड उत्सुकता आहे.मध्यमवर्गीय आणि उच्चशिक्षितांची संख्या जास्त असणाऱ्या कोथरूड मतदारसंघातही मतदारांनी या वेळी मतदानाकडे पाठ फिरवली. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात दोन लाख मतदारांनी मतदान केले होते. विधानसभा निवडणुकीत मात्र हा टक्का बराच घसरला आहे. 4.04 लाख मतदारांपैकी केवळ 1.94 लाख (48.17 टक्के) मतदारच घराबाहेर पडले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीने हा मतदारसंघ राज्यात चर्चेला आला आहे. 2014 मध्ये या मतदारसंघात 56 टक्के मतदान झाले होते.ग्रामीण आणि शहरी मतदारांचा समावेश असणाऱ्या खडकवासला मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत 53 टक्के मतदान झाले होते. या वेळी विधानसभेसाठी हा आकडा घटला आहे. येथे 4.86 लाख मतदारांपैकी 2.50 लाख (51.35 टक्के) मतदारांनी मतदान केले आहे. त्यामुळे या मतदारसंघाच्या निकालाचीही उत्सुकता वाढली आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघात 3.54 लाख मतदारांपैकी 1.73 लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, लोकसभा निवडणुकीपेक्षा (52 टक्के) मतदान तीन टक्‍क्‍यांनी (49 टक्के) कमी झाले आहे. 2014 मध्ये या मतदारसंघात 55.81 टक्के मतदान झाले होते. पर्वतीत भाजप युती आणि राष्ट्रवादी आघाडीत थेट लढत होत आहे. हडपसर मतदारसंघात 47.25 टक्के मतदान झाले आहे. या ठिकाणी जिल्ह्यात सर्वाधिक 5 लाख 4 हजार मतदारसंख्या होती. त्यापैकी 2.38 लाख मतदारांनी मतदान केले. लोकसभा निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत मतदान करणाऱ्यांची संख्या थोडी वाढली आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात 2.33 लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता आणि भाजपला पाच हजारांचे मताधिक्‍य मिळाले होते. या वेळी या मतदारसंघात तिरंगी लढत असल्याने धक्कादायक निकालाची शक्‍यता नाकारता येत नाही.पुणे कॅंटोन्मेंट मतदारसंघात शहरात सर्वांत कमी म्हणजे 43.29 टक्के मतदान झाले आहे. मतदारांची संख्या 2.91 लाख एवढी कमी असतानाही या वेळी केवळ 1.26 लाख मतदारांनी मतदान केले आहे. या मतदारसंघातही कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात चुरस होती, त्यामुळे मतदानाचा टक्का वाढेल असे अपेक्षित होते, पण तसे घडले नाही. लोकसभा निवडणुकीत येथे 1.40 लाख तर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 1.38 लाख मतदारांनी मतदान केले होते.कसबा पेठ मतदारसंघात मतदानाचा टक्का पन्नासच्या पुढे गेला आहे. येथे 2.90 लाख मतदारांपैकी दीड लाख (51.72 टक्‍के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. खासदार गिरीश बापट यांच्या या मूळच्या मतदारसंघात लोकसभेसाठी 1.61 लाख मतदारांनी, तर 2014 च्या विधानसभा निवडणुकीसाठी 1.69 लाख मतदारांनी मतदान केले होते. या मतदारसंघात चौरंगी लढत होत असून, बापट यांचा उत्तराधिकारी कोण याचा निर्णय 24 तारखेला होणार आहे.

पुणे जिल्ह्यातील २४६ उमेदवारांचे भाग्य उद्या ठरणार

पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघांत विधानसभेची रणधुमाळी सुरू होती. सोमवारी जिल्ह्यात लोकशाहीचा उत्सव साजरा करत नागरिकांनी मतदान करत जवळपास २४६ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम बंद केले. जुन्नर तालुक्यातून ११, आंबेगाव ६, खेड आळंदी ९, दौंड १३, इंदापूर १५, बारामती १०, पुरंदर ११, भोर ७, मावळ ७, चिंचवड ११, पिंपरी १८, भोसरी १२, वडगावशेरी १२, शिवाजीनगर १३, कोथरूड ११, खडकवासला ७, पर्वती ११, हडपसर १४, पुणे कॅन्टोंमेंट २८, तर कसबा मतदारसंघातून १० असे २४६ उमेदवार रिंगणात होते. या सर्वांचे भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद झाले. निवडणूक निकाल उद्या गुरुवारी (दि. २४) लागणार आहे. 

मतमोजणीची ठिकाणे

* पुणे शहरातील आठ मतदारसंघ : भारतीय खाद्य महामंडळाचे (एफसीआय) गोदाम, कोरेगाव पार्क
* चिंचवड, पिंपरी आणि भोसरी : श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बॅडमिंटन हॉल, बालेवाडी
* जुन्नर : भक्ती निवास, गोळेगाव, जुन्नर
* आंबेगाव : शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज, अवसरी खुर्द
* खेड आळंदी : हुतात्मा राजगुरू क्रीडा संकुल, खेड
* शिरुर : कुकडी हॉल, चासकमान वसाहत, शिरूर
* दौंड : शासकीय गोदाम, दौंड
* इंदापूर : शासकीय गोदाम, इंदापूर
* बारामती : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ गोदाम, बारामती
* पुरंदर : आयटीआय, ढुमेवाडी दिवे, पुरंदर
* भोर : औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भोर
* मावळ : नूतन कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड रिसर्च, तळेगाव दाभाडे
Mr. Chandrakant Bhujbal 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

===================================================================================================================

Maharashtra Assembly Election 2019 Opinion Poll PRAB; प्राब संस्थेचा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकपूर्व जनमत चाचणी सर्वेक्षण (ओपिनियन पोल) अहवाल उपलब्ध

VIDHAN SABHA 2019 ; महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मतदानपूर्व अंदाज

भाजप व शिवसेना युती न झाल्यास मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण व विश्लेषण

युती झाल्यावर संभाव्य जागा; आघाडीला मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण  व विधानसभा मतदारसंघनिहाय  कल

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेचा सर्वेक्षण अहवाल खालील लिंकवर उपलब्ध - 

(A survey report of the Political Research and Analysis Bureau (PREB) organization is available at the following link)
https://www.instamojo.com/bhujbalchandrakant/maharashtra-assembly-election-2019-opinion-p/?ref=store

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
==========================
======================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.