Friday 4 October 2019

पुणे जिल्ह्यातील निवडणूक खर्च निरीक्षक जाहीर

पुणे जिल्ह्यातील निवडणूक खर्च निरीक्षक संपर्क

भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 करीता जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रांसाठी निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. हे निरीक्षक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. विधानसभा मतदारसंघनिहाय खर्च निरीक्षकांची नावे व त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक अनुक्रमे असे आहेत. या सर्व निरीक्षकांची निवास व्यवस्था व्हीव्हीआयपी सर्कीट हाऊस, पुणे येथे करण्यात आली आहे. जुन्नर, आंबेगाव व खेड आळंदीसाठी पिजूष मुखर्जी, भ्रमणध्वनी-9404541959, निवास व्यवस्था – बी-105 येथे आहे. शिरूर, दौंड व इंदापुरसाठी रोशन लाल, भ्रमणध्वनी-9404542504, निवास व्यवस्था- बी-201 येथे आहे. बारामती, पुरंदर व भोरसाठी अमलेंदू नाथ मिश्रा, भ्रमणध्वनी-9404540280, निवास व्यवस्था- बी-202 येथे आहे. मावळ व चिंचवडसाठी रोहित मेहरा, भ्रमणध्वनी-9404542546, निवास व्यवस्था-बी-103 येथे आहे. पिंपरी व भोसरीसाठी अमरसिंग नेहरा, भ्रमणध्वनी-9404541239, निवास व्यवस्था- बी-101 येथे आहे. वडगाव शेरी, पुणे कॅन्टोन्मेंटसाठी किरण कटटा, भ्रमणध्वनी-9404541610, निवास व्यवस्था-बी-203 येथे आहे. शिवाजीनगर,कोथरूड व खडकवासलासाठी विजय चौधरी, भ्रमणध्वनी-9404541631, निवास व्यवस्था-बी-205 येथे आहे. पर्वती, हडपसर व कसबापेठसाठी सैलेन समादर भ्रमणध्वनी 9404539878, निवास व्यवस्था-बी-102 येथे आहे. मतदारांना निवडणूकी संदर्भात काही तक्रारी अथवा अडचण मांडावयाची असल्यास निवडणूक खर्च निरीक्षकांशी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी नवल किशोर राम व उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी कळविले आहे. विधानसभा निवडणुकीत प्रत्येक उमेदवार जास्तीत जास्त २८ लाख रुपये खर्च करू शकणार आहे. राजकीय पक्षांनी मात्र निवडणुकीवर किती खर्च करावा यास मर्यादा नाहीत. उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर खर्च संनियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी लेखा व वत वित्त विभागाचे वर्ग एकचे अधिकारी सहायक खर्च निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

आयुष मणी तिवारी यांची पोलीस ऑब्झर्व्हर म्हणून नियुक्ती

महाराष्ट्र विधानसभा 2019 करीता  पुणे जिल्हयातील 21 मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत  आयुष मणी तिवारी यांची पोलीस ऑब्झर्व्हर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. तिवारी यांना भेटण्याची वेळ- सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत (स्थळ :व्हीव्हीआयपी (हरित इमारत) सर्कीट हाऊस,पुणे01, सुट क्रमांक ए 301)  अशी असून मोबाईल क्रमांक 9404541847 तर त्यांचा ई–मेल ayushmani.tiwari@ips.gov.in  असा आहे.

बी.मुरली कुमार यांची व्ही व्हीआयपी सर्किट हाऊस येथे निवास व्यवस्था

महाराष्ट्र विधानसभा 2019 करीता  पुणे जिल्हयातील 21 मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत  बी. मुरली कुमार  यांची  विशेष खर्च निरीक्षक म्हणून  नियुक्ती करण्यात आली आहे. बी. मुरलीकुमार  यांची निवास व्यवस्था व्हीव्हीआयपी  सर्किट हाऊस, क्रमांक 2, राजगड, 27, व्किन्स गार्डन,पुणे 01  येथे करण्यात आली असून त्यांचा मोबाईल क्रमांक 9404542409 असा आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

===================================================================================================================

Maharashtra Assembly Election 2019 Opinion Poll PRAB; प्राब संस्थेचा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकपूर्व जनमत चाचणी सर्वेक्षण (ओपिनियन पोल) अहवाल उपलब्ध

VIDHAN SABHA 2019 ; महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मतदानपूर्व अंदाज

भाजप व शिवसेना युती न झाल्यास मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण व विश्लेषण

युती झाल्यावर संभाव्य जागा; आघाडीला मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण  व विधानसभा मतदारसंघनिहाय  कल

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेचा सर्वेक्षण अहवाल खालील लिंकवर उपलब्ध - 

(A survey report of the Political Research and Analysis Bureau (PREB) organization is available at the following link)
https://www.instamojo.com/bhujbalchandrakant/maharashtra-assembly-election-2019-opinion-p/?ref=store

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.