Saturday 19 October 2019

विधानसभा निवडणूक-2019; 'हे' आहेत सर्वात श्रीमंत उमेदवार

विधानसभा निवडणुकीतील 'हे' आहेत सर्वात श्रीमंत उमेदवार

विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा आज थंडावतील. प्रत्येक निवडणुकीत उमेदवारांच्या श्रीमंतीची चर्चा होते. यंदाची निवडणूकदेखील त्याला अपवाद नाही. निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले १००७ उमेदवार कोट्यधीश आहेत. यामध्ये सर्वाधिक उमेदवार सत्ताधारी भाजपाचे आहेत. यंदाच्या निवडणुकीत भाजपा सर्वाधिक १६४ जागा लढवत आहे. यापैकी १५५ उमेदवारांच्या संपत्तीचा आकडा एक कोटीहून अधिक आहे. घाटकोपर पूर्व मतदारसंघातून लढणारे पराग शहा राज्यातले सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांच्याकडे तब्बल ५०० कोटींची संपत्ती आहे. भाजपानं प्रकाश मेहता यांचं तिकीट कापून शहांना संधी दिली आहे. राज्यातले दुसऱ्या क्रमाकांचे श्रीमंत उमेदवारदेखील भाजपाचेच आहेत. मलबार हिल मतदारसंघातून लढणाऱ्या मंगलप्रभात लोढा यांची संपत्ती ४४१ कोटी रुपये आहे. श्रीमंत उमेदवारांच्या यादीत काँग्रेसचे संजय जगताप तिसऱ्या स्थानी आहे. त्यांची संपत्ती २४५ कोटी आहे. ते पुरंदरमधून निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. जगताप यांच्यासह  काँग्रेसचे १२६ उमेदवार कोट्यधीश आहेत. काँग्रेस यंदा १४७ जागांवर लढत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्या तुलनेत अधिक जागा लढवत असलेल्या भाजपाचे १५५ म्हणजेच ९६ टक्के उमेदवार कोट्यधीश आहेत. यंदा भाजपा १६४ जागा लढवत आहे. शिवसेनेचे ९४ टक्के म्हणजेच ११६ उमेदवार कोट्यधीश आहेत. शिवसेना यंदा १२४ जागा लढवत आहेत. राष्ट्रवादीच्या वाट्याला १२४ जागा आल्या आहेत. मात्र त्यांनी तीन जागांवरील उमेदवार मागे घेतले. राष्ट्रवादीचे १०१ उमेदवार कोट्यधीश आहेत. 

तब्बल १ हजारहून अधिक उमेदवार करोडपती

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा अखेरचा दिवस आहे. आज संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावतील. सोमवारी संपूर्ण राज्य आपला आमदार, नवं सरकार निवडण्यासाठी मतदान करेल. प्रचारादरम्यान, मतदानावेळी उमेदवारांच्या कार्यक्षमतेइतकीच त्यांच्या संपत्तीचीदेखील चर्चा होते. उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे दिलेल्या मालमत्तेचा तपशील पाहिल्यास तब्बल ३२ टक्के उमेदवार कोट्यधीश आहेत.विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या १००७ उमेदवारांची संपत्ती १ कोटीपेक्षा अधिक आहे. ५ कोटी किंवा त्याहून अधिक संपत्ती असलेल्या उमेदवारांची संख्या ४५३ इतकी आहे. म्हणजेच यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या १५ टक्के उमेदवारांची संपत्ती ५ कोटीहून अधिक आहे. आमदार होण्यासाठी निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या १० टक्के म्हणजेच ३०४ उमेदवारांची संपत्ती २ ते ५ कोटींच्या दरम्यान आहे. तर ५० लाख ते २ कोटी संपत्ती असलेल्या उमेदवारांची संख्या ५४० इतकी आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीचा आकडा १० ते ५० लाखांदरम्यान असल्याचं सांगणाऱ्या उमेदवारांचं प्रमाण ६८० इतकं आहे. म्हणजेच एकूण उमेदवारांपैकी २२ टक्के उमेदवारांची संपत्ती १० ते ५० लाखांदरम्यान आहे. तर १० लाखांहून कमी मालमत्ता असलेल्या उमेदवारांची संख्या ११३५ इतकी आहे. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या ३६ टक्के उमेदवारांची संपत्ती १० लाखांपेक्षा कमी आहे. सर्वाधिक कोट्यधीश उमेदवार सत्ताधारी भाजपाचे आहेत. भाजपा यंदा १६४ जागा लढवत आहेत. त्यापैकी १५५ म्हणजेच ९६ टक्के उमेदवार कोट्यधीश आहेत. त्याखालोखाल शिवसेनेचे ९४ टक्के म्हणजेच ११६ उमेदवार कोट्यधीश आहेत. शिवसेना यंदा १२४ जागा लढवत आहेत. महाआघाडीतील काँग्रेस १४७ जागांवर लढत आहे. त्यांचे १२६ उमेदवार कोट्यधीश आहेत. राष्ट्रवादीच्या वाट्याला १२४ जागा आल्या होत्या. मात्र त्यांनी तीन जागांवरील उमेदवार मागे घेतले. राष्ट्रवादीचे १०१ उमेदवार कोट्यधीश आहेत. 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

===================================================================================================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.