Wednesday 16 October 2019

विधानसभा निवडणुक-पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार मदत केंद्राचे उद्घाटन

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते जिल्हा मतदार मदत केंद्राचे उद्घाटन 

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकी अंतर्गत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर सुरु करण्यात आलेल्या मतदार मदत केंद्राचे (डिस्ट्रिक्ट कॉल सेंटर) उद्घाटन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, अजित रेळेकर, सुरेश जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत, उपजिल्हाधिकारी वर्षा पवार, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग आदी उपस्थित होते. मतदार मदत केंद्रामध्ये एकूण 15 दूरध्वनी संच जोडण्यात आलेले आहेत. मतदान करण्यामध्ये येणाऱ्या अडचणींबाबत तसेच मतदानाच्या अनुषंगाने असणाऱ्या मतदारांच्या प्रश्नांचे निराकरण जिल्हा मतदार मदत केंद्राद्वारे केले जाईल. विधानसभेसाठी दिनांक 21 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार असून पुणे जिल्ह्यातील अधिकाधिक मतदारांनी मतदान करावे, असे आवाहनही या कक्षातील दूरध्वनी वरुन मतदारांना करण्यात येणार आहे.  मदत केंद्रातून माहिती देणाऱ्या कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी राम यांनी मतदारांचे संभाव्य प्रश्न विचारले तसेच हे कर्मचारी समर्पक उत्तरे देत असल्याची खात्री केली. याबरोबरच दूरध्वनीवरुन माहिती देतांना अभ्यासपूर्ण माहिती देण्याबाबत यावेळी त्यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यातील सर्व मतदारांनी लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानांचा हक्क बजावावा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. कार्यक्रमास महसूल तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
  जिल्हा मतदार मदत केंद्राचे (जिल्हा कॉल सेंटर) संपर्क क्रमांक खालील प्रमाणे आहेत.
   020-26121231, 020-26121259, 020-26121263, 020-26121264, 
020-26121267, 020-26121268, 020-26121269, 020-26121271,
020-26121272, 020-26121273, 020-26121274, 020-26121275,
020-26121279, 020-26121281, 020-26121291

माहिती पत्रके वाटून हडपसर येथे जनजागृती




पुणे- विधानसभा निवडणुकीसाठी अधिकाधिक नागरिकांनी आपला मतदानाचा अधिकार वापरावा आणि मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत प्रबोधनात्मक उपक्रम शहरातील विविध भागात राबविण्यात येत आहेत. निवडणूक आयोगाची माहिती पत्रके वाटून हडपसर येथील आदित्यनगर गृहनिर्माण सोसायटीच्या महिलांनी मतदान जनजागृती केली. याप्रसंगी आदित्यनगर सोसायटीचे महिलामंडळातील सर्व सदस्यांनी सहभाग घेतला. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत, जिल्हा स्वीप समन्वयक अनिल पवार, यशवंत मानखेडकर, आशाराणी पाटील आणि आदित्यनगर गृहनिर्माण सोसायटीचे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही जनजागृती केली जात आहे. प्राब संस्थेकडून  बसथांबे, भाजी मंडई, मोठे चौक, शैक्षणिक संस्था, गर्दीच्या ठिकाणी ही माहिती पत्रके देऊन जनजागृती केली जात आहे.
https://www.esakal.com/pune/enlightenment-voters-under-sweep-initiative-hadapsar-maharashtra-vidhan-sabha-2019-225293
=======================================

महिलांसाठी जिल्ह्यात उभारणार एकवीस सखी मतदान केंद्र

मतदान प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक याप्रमाणे महिला (सखी) मतदान केंद्र असणार आहेत. जिल्हा निवडणूक शाखेने ही केंद्रे निश्चित केली असून, मतदानाच्या दिवशी या केंद्रांचा कारभार महिलांकडून पाहिला जाणार आहे. शहरातील आठ, पिंपरी चिंचवडमधील तीन आणि ग्रामीण भागातील दहा विधानसभा मतदारसंघनिहाय २१ महिला मतदान केंद्रे असणार आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही केंद्रे निवडण्यात आली आहेत. ही केंद्रे संवेदनशील ठिकाणांपासून दूर अंतरावरील आहेत. तहसील कार्यालय आणि पोलिस ठाण्यांपासून जवळ असलेली मतदान केंद्रे महिला मतदान केंद्रांसाठी निवडण्यात आली आहेत. मतदानाच्या दिवशी या केंद्रांचे कामकाज महिला अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून पाहिले जाणार आहे. या केंद्रांच्या ठिकाणी रांगोळ्या काढल्या जाणार आहे. मतदारांनी मतदान प्रक्रियेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून महिला मतदारांसाठी प्रत्येक मतदारसंघात सखी मतदान केंद्र राहणार आहे. २१ मतदारसंघांत २३ सखी मतदान केंद्रे असतील. सखी मतदान केंद्रांवर महिलांसाठी आवश्‍यक सुविधा देण्यात येणार आहेत. तसेच, केंद्रांवर सुविधा कशा असाव्यात, यासाठी सात ठिकाणी आदर्श मतदान केंद्रेही स्थापन करण्यात येणार आहेत.

विधानसभा मतदारसंघ आणि सखी मतदान केंद्राचे नाव -

जुन्नर - नगर परिषद शाळा क्रमांक १ जुनी इमारत
आंबेगाव - न्यू इंग्लिश स्कूल घोडेगाव खोली क्रमांक १
खेड आळंदी - महात्मा गांधी विद्यालय, राजगुरूनगर खोली क्रमांक ४
शिरूर - नगर परिषद उर्दू शाळा, घोडनदी खोली क्रमांक २
दौंड - सेंट सोबिस्टन हायस्कूल, खोली क्रमांक १
इंदापूर - श्री. एनआर हायस्कूल, खोली क्रमांक १०
बारामती - जिल्हा परिषद शाळा पहुनेवाडी खोली क्रमांक १
पुरंदर - वीरबाजी पासलकर शाळा, खोली क्रमांक २
भोर - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, विसाखर खोली क्रमांक १
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मातेरेवाडी खोली क्रमांक १ आणि जिजामाता इंग्रजी माध्यम शाळा खोली क्रमांक ३
मावळ-जिल्हा परिषद शाळा कान्हे खोली क्रमांक
चिंचवड-यशवंतराव चव्हाण पीसीएमसी शाळा थेरगाव खोली क्रमांक ४
पिंपरी-मनपाचे विद्यानिकेतन प्रा. विद्यालय पिंपरी, खोली क्रमांक ३
भोसरी-माता अमृतान्मयी विद्यालय निगडी गावठाण, खोली क्रमांक ३
वडगाव शेरी-इऑन ज्ञानांकुर स्कूल खराडी, खोली क्रमांक ५
शिवाजीनगर-विद्या भवन ज्युनिअर कॉलेज, खोली क्रमांक ८
कोथरूड-संत ज्ञानेश्‍वर माध्यमिक विद्यालय, एमआयटी, पौड रस्ता
खडकवासला-स्व. गुलाबराव वांजळे प्राथमिक शाळा
पर्वती-ह्यूम मॅक हेन्‍री स्कूल, महर्षीनगर
हडपसर-रयत शिक्षण संस्थेचे साधना विद्यालय माळवाडी
पुणे कॅंटोन्मेंट-सेंट मीरा इंग्लिश स्कूल
कसबा पेठ-अहिल्यादेवी हायस्कूल

आदर्श मतदान केंद्र -

जुन्नर - नगर परिषद शाळा जुन्नर.
खेड आळंदी - महात्मा गांधी विद्यालय राजगुरूनगर.
दौंड - सेंट सोबिस्टन हायस्कूल.
पिंपरी- कामयानी मतिमंद मुलांची शाळा, सेक्‍टर २४, निगडी.
खडकवासला - सरहद आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेज, कात्रज
हडपसर - पुणे मनपा शाळा क्रमांक ५३, राजर्षी शाहू महाराज प्राथमिक शाळा मुंढवा
पुणे कॅंटोन्मेंट - अल्पबचत भवन, क्‍वीन्स गार्डन पुणे
========================================

दृष्टिहीन मतदारांसाठी ब्रेल लिपीत मतदारचिठ्ठी

पुणे जिल्ह्यात ६७ हजार २७९ दिव्यांग मतदार असून, त्यांना मतदान करणे सोयीचे व्हावे, यासाठी सर्व मतदान केंद्रांवर आवश्‍यक सुविधा देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या आहेत. निवडणूक प्रक्रियेत दिव्यांग व्यक्तींचा सहभाग वाढविण्यासाठी दिव्यांग मतदारांच्या घरी भेटी देऊन नोंदणी केली आहे. त्यांना बस स्थानक, रेल्वे स्थानक, मॉल यांसह सार्वजनिक ठिकाणी मतदान प्रक्रियेची माहिती देण्यात येत आहे. दृष्टिहीन मतदारांसाठी ब्रेल लिपीतील मतदारचिठ्ठी आणि डमी मतपत्रिका, काचेचे भिंग आणि मतदार मार्गदर्शक पुस्तिका देण्यात येणार आहे. दिव्यांग, ज्येष्ठ, शारीरिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींना मतदान केंद्रापर्यंत पोचण्यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात येत आहे. त्यासाठी आयोगाने पीडब्ल्यूडी (PwD) ॲपची निर्मिती केली आहे. टोल फ्री क्रमांक - १९५० किंवा १८००१११९५०.

मतदानाच्या तसेच अगोदरच्या दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिराती पूर्वप्रमाणित करुन घेणे बंधनकारक

राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान दि. 21 ऑक्टोबर रोजी होत असून त्या दिवशी आणि त्याच्या अगोदरच्या (दि. 20 ऑक्टोबर) दिवशी वृत्तपत्रे तसेच सर्व मुद्रित माध्यमांतून प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिराती माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) पूर्व प्रमाणित करून घेणे बंधनकारक असल्याचे भारत निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. अफवा पसरवणाऱ्या आणि आक्षेपार्ह स्वरूपाच्या राजकीय जाहिराती मतदानाच्या दिवशी व त्या अगोदरच्या दिवशी प्रसिद्ध झाल्यास पूर्ण निवडणूक प्रक्रियेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. असे प्रकार यापूर्वी झाल्याचे आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. अशा जाहिराती प्रसिद्ध झाल्यास प्रतिपक्षाच्या उमेदवाराला स्पष्टीकरणाची संधीच मिळत नसून त्यामुळे त्याच्यावर एक प्रकारे अन्याय होऊ शकतो. या बाबींना आळा घालण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने संविधानाच्या कलम 324 नुसार प्राप्त झालेल्या तसेच आयोगाला असलेल्या इतर अधिकारांचा वापर करून हे आदेश काढले आहेत. त्यानुसार कोणताही राजकीय पक्ष, उमेदवार, संघटना किंवा व्यक्तीला मतदानाच्या तसेच त्याच्या अगोदरच्या दिवशी प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती नियमानुसार जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती (एमसीएमसी) करून प्रमाणित करून घेतल्याशिवाय प्रसिद्ध करता येणार नाही.

Mr. Chandrakant Bhujbal 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

===================================================================================================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.