Thursday 31 October 2019

पुणे कँटोन्मेंट बोर्ड निवडणूक-2020 अंतिम मतदारयादी प्रसिद्ध

मतदार यादीतून दोन हजार नावे वगळली 

पुढील वर्षी होणाऱ्या कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पुणे कँटोन्मेंट बोर्डाने अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली असून, या यादीतून सुमारे दोन हजार मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामध्ये घोरपडी भागातील सुमारे एक हजार ४६९ मतदारांची नावे यादीतून काढून टाकण्यात आली आहेत. बोर्डाने प्रसिद्ध केलेल्या अंतिम मतदार यादीनुसार, कँटोन्मेंटच्या आठ वॉर्डातील निवडणुकीत एकूण ३८ हजार ५४३ मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. गेल्या वर्षी बोर्डाच्या प्रसिद्ध झालेल्या अंतिम यादीत मतदारांची संख्या ४० हजार ५६७ इतकी होती. बोर्डाच्या हद्दीत अतिक्रमण केलेल्या नागरिकांची नावे मतदार यादीतून वगळण्यात यावीत, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दोन वर्षांपूर्वी दिले होते. त्यानुसार, सरकारी जमिनीवर अतिक्रमण केलेल्या वस्त्यांमधील मतदारांची नावे अंतिम मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. कँटोन्मेंट निवडणूक कायद्याच्या कलम १० (१) आणि १२ नुसार, पुणे कँटोन्मेंट बोर्डाने एक जुलैला प्रारूप यादी प्रसिद्ध केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, अतिक्रमणधारक मतदारांची नावे या यादीतून वगळण्यात आली होती. याशिवाय नागरिकांनी कँटोन्मेंटमधून केलेले स्थलांतर, सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या, सेवानिवृत्तीमुळेही काही मतदारांची नावे वगळण्यात आली होती. या प्रारूप यादीवर बोर्डाने हरकती-सूचना मागविल्या होत्या. त्यावर मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी ४१८ जणांनी दावे दाखल केले होते. या दाव्यांवर बोर्डाच्या अध्यक्षांनी सुनावणी घेतली होती. त्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, संरक्षण मालमत्ता विभागाच्या जागेवर अतिक्रमण केलेल्या अथवा अनधिकृत बांधकाम केल्याने 'कलम २४८'नुसार नोटीस बजावलेल्या नागरिकांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आल्याचा दावा बोर्डातर्फे केला जात आहे. त्यानुसार, 'जनरल लँड रजिस्टर'ची प्रत, मिळकत कराची पावती, भाडेकरार किंवा भाडेपावतीची पाहणी करूनच मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यात आले आहे. मात्र, बोर्डाच्या हद्दीत अनेक जुन्या इमारती असून, तेथे पिढ्यान् पिढ्या राहणाऱ्या भाडेकरूंना या कागदपत्रांची पूर्तता करण्यात अडचणी येत आहेत. काही ठिकाणी कुटुंबातील काहींची नावे गायब झाली आहेत, तर नवमतदारही मोठ्या प्रमाणात वगळण्यात आले आहेत. 'कँटोन्मेंट निवडणूक कायदा २००७'च्या कलम १०(१) आणि १२ अन्वये देशभरातील सर्व ६२ कँटोन्मेंट बोर्डात दर वर्षी मतदार यादी तयार करण्यात येते. त्यानुसार पुणे कँटोन्मेंट बोर्डाने अंतिम मतदार यादी तयार केली आहे. सध्या भाजपचे बहुमत असलेले सदस्य कार्यरत आहेत. श्री. विवेक महादेव यादव, उपाध्यक्ष, श्रीमती. रुपाली शैलेंद्र बिडकर (सदस्य),  श्री. अशोक ज्ञानेश्वर पवार (सदस्य), श्री. दिलीप मधुकर गिरमकर (सदस्य), श्री. अतुल विनायक गायकवाड (सदस्य), श्रीमती. प्रियंका राजेश श्रीगिरी (सदस्य), श्री. विनोद मोतीलाल मथुरावाला (सदस्य), डॉ. किरण तुषार मंत्री (सदस्य) हे कँटोन्मेंट बोर्डाच्या 2015 निवडणुकीत निवडून आलेले आहेत.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
=================================================================================================================

===================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
==========================
======================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.