Sunday, 6 October 2019

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील ४ हजार ७३९ उमेदवारांचे अर्ज वैध

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील ४ हजार ७३९ उमेदवारांचे अर्ज वैध

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची काल (दि.५ ऑक्टोबर) राज्यभरात छाननी करण्यात आली. त्यामध्ये राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण दाखल ५ हजार ५४३ उमेदवारांपैकी ४ हजार ७३९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्रुटी आढळल्याने ७९८ उमेदवारांचे अर्ज नामंजूर झाले आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली. काल छाननीअंती नंदुरबार जिल्ह्यात ४ मतदारसंघात ३६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. धुळे जिल्ह्यात ५ मतदारसंघात ५६ उमेदवार, जळगाव जिल्ह्यात ११ मतदारसंघात १५४ उमेदवार, बुलढाणा जिल्ह्यात ७ मतदारसंघात ७५ उमेदवार, अकोला जिल्ह्यात ५ मतदारसंघात १०१ उमेदवार, वाशिम जिल्ह्यात ३ मतदारसंघात ६० उमेदवार, अमरावती जिल्ह्यात ८ मतदारसंघात १५१ उमेदवार, वर्धा जिल्ह्यात ४ मतदारसंघात ५९ उमेदवार, नागपूर जिल्ह्यात १२ मतदारसंघात १८१ उमेदवार, भंडारा जिल्ह्यात ३ मतदारसंघात ६६ उमेदवार, गोंदीया जिल्ह्यात ४ मतदारसंघात ७१ उमेदवार, गडचिरोली जिल्ह्यात ३ मतदारसंघात ४४ उमेदवार, चंद्रपूर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ९० उमेदवार, यवतमाळ जिल्ह्यात ७ मतदारसंघात १२५ उमेदवार, नांदेड जिल्ह्यात ९ मतदारसंघात ३२७ उमेदवार, हिंगोली जिल्ह्यात ३ मतदारसंघात ५४ उमेदवार, परभणी जिल्ह्यात ४ मतदारसंघात ८१ उमेदवार, जालना जिल्ह्यात ५ मतदारसंघात १३३ उमेदवार, औरंगाबाद जिल्ह्यात ९ मतदारसंघात २०८ उमेदवार, नाशिक जिल्ह्यात १५ मतदारसंघात २१२ उमेदवार, पालघर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ६९ उमेदवार, ठाणे जिल्ह्यात १८ मतदारसंघात २५१ उमेदवार, मुंबई उपनगर जिल्ह्यात २५ मतदारसंघात २७२ उमेदवार (वांद्रे पश्चिम मतदारसंघाची माहिती रात्री उशीरापर्यंत अप्राप्त), मुंबई शहर जिल्ह्यात १० मतदारसंघात ८४ उमेदवार, रायगड जिल्ह्यात ७ मतदारसंघात ११२ उमेदवार, पुणे जिल्ह्यात २१ मतदारसंघात ३७२ उमेदवार, अहमदनगर जिल्ह्यात १२ मतदारसंघात १८२ उमेदवार, बीड जिल्ह्यात ६ मतदारसंघात २०२ उमेदवार, लातूर जिल्ह्यात ६ मतदारसंघात १२० उमेदवार, उस्मानाबाद जिल्ह्यात ४ मतदारसंघात ८२ उमेदवार, सोलापूर जिल्ह्यात ११ मतदारसंघात २३७ उमेदवार, सातारा जिल्ह्यात ८ मतदारसंघात १०८ उमेदवार, रत्नागिरी जिल्ह्यात ५ मतदारसंघात ४० उमेदवार, सिंधुदूर्ग जिल्ह्यात ३ मतदारसंघात २७ उमेदवार, कोल्हापूर जिल्ह्यात १० मतदारसंघात १८६ उमेदवार, सांगली जिल्ह्यात ८ मतदारसंघात १११ उमेदवारांचे नामनिर्देशनपत्रे वैध ठरली आहेत.
पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांतून ७१ अर्ज बाद 

पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघात ७१ अर्ज बाद  

पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज छाननी पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत ७१ अर्ज बाद झाले आहेत, तर ३७३ अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत. अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीनंतर जिल्ह्यातील मतदारसंघात किती उमेदवार रिंगणात राहिले आहेत, याचे चित्र स्पष्ट होणार आहे. एकूण मतदारसंघात सर्वाधिक अर्ज दाखल केलेल्या कँटोन्मेंट मतदारसंघात सर्वाधिक २७ अर्ज अवैध ठरले आहेत, तर शिवाजीनगर, खडकवासला आणि खेड-आळंदी या मतदारसंघात कोणताही अर्ज अवैध ठरला नाही. अवैध ठरलेल्यांपैकी बहुतांश उमेदवार अपक्ष असल्याने कोणत्याही प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांना धक्का बसला नाही. आता पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात सोमवारी दुपारपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. शनिवारी अर्ज छाननीची प्रक्रिया पार पडण्यात आली. त्यात ४४४ उमेदवारांनी ५९५ अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी ३७३ अर्ज वैध ठरविले असून, उर्वरित ७१ अर्ज अवैध ठरले आहेत. पुणे शहरातील कसबा, हडपसर मतदारसंघात प्रत्येकी दोन अर्ज, तर पुणे कँटोन्मेंटमध्ये सर्वाधिक २७ अर्ज बाद झाले आहेत. पर्वतीमध्ये १ अर्ज बाद ठरला आहे. वडगाव शेरीत ६, कोथरूडमध्ये ४ अर्ज अवैध झाले आहेत. भोसरीमध्ये २, पिंपरी ४ आणि चिंचवडमध्ये ५; तसेच मावळमध्ये १ अर्ज बाद झाला आहे. पुणे जिल्ह्यात खेड-आळंदी या मतदारसंघात एकही अर्ज अवैध ठरला नाही. जुन्नर, इंदापूर, बारामती आणि मावळ मतदारसंघात प्रत्येकी १ अर्ज अवैध ठरला आहे. आंबेगाव, शिरूर, दौंड आणि पुरंदर मतदारसंघात प्रत्येकी सर्वाधिक ३ एवढे अर्ज अवैध ठरले आहेत. त्यामुळे ४४४ उमेदवारांनी भरलेल्या अर्जापैकी ७१ अर्ज अवैध ठरल्याने आता ३७३ अर्ज वैध ठरले आहेत, अशी माहिती निवडणूक शाखेकडून देण्यात आली. निवडणूक लढण्यासाठी केलेल्या अर्जात कोणी अर्धवटच माहिती भरली, तर कोणी सूचक-अनुमोदकाचे नावच लिहायला विसरले, अशा विविध कारणांमुळे पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात एकूण ८५ अर्जांपैकी २७ जणांचे अर्ज अपात्र ठरले असून, ५८ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत. पात्र ठरलेल्या अर्जदारांमध्ये सर्वच प्रमुख पक्षाच्या उमेदवारांसह बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांचाही समावेश आहे. कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात एकूण ८५ उमेदवारांनी निवडणूक लढण्यासाठी अर्ज दाखल केले होते. त्यात काँग्रेसचे सुनील कांबळे, भाजपचे रमेश बागवे यांच्यासह आम आदमी पक्षाचे खेमचंद सोनवणे, 'एमआयएम'च्या हीना मोमीन, वंचित बहुजन आघाडीचे लक्ष्मण आरडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनीषा सरोदे आणि बहुजन मुक्ती पार्टीचे हुलगेश चलवादी यांचे अर्ज पात्र ठरले आहेत; याशिवाय बंडखोरी करणारे सदानंद शेट्टी, पल्लवी जावळे आणि डॉ. भरत वैरागे यांच्यासह अन्य अपक्ष उमेदवारांचे अर्जही पात्र ठरले आहेत. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात अर्ज छाननीत दोन उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे कसब्यात १३ उमेदवार रिंगणात राहिले असून, सोमवारी आणखी किती उमेदवार अर्ज मागे घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कसबा पेठ मतदारसंघातून १५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. शनिवारी झालेल्या छाननीत दोन अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद झाले. पावटेकर यांचे वय २५ वर्षांपेक्षा कमी असल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात आला, तर फय्याझ मुश्ताक सय्यद राज यांच्या अर्जावर खाडाखोड असल्याने त्यांचा अर्ज बाद झाला. कसब्यात आता मान्यताप्राप्त पक्षांचे तीन उमेदवार रिंगणात असून, संभाजी ब्रिगेडचा एक उमेदवार लढणार आहे. मुख्य लढत महायुतीच्या उमेदवार महापौर मुक्ता टिळक, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार अरविंद शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अजय शिंदे यांच्यातच होण्याची शक्यता आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

===================================================================================================================

Maharashtra Assembly Election 2019 Opinion Poll PRAB; प्राब संस्थेचा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकपूर्व जनमत चाचणी सर्वेक्षण (ओपिनियन पोल) अहवाल उपलब्ध

VIDHAN SABHA 2019 ; महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मतदानपूर्व अंदाज

भाजप व शिवसेना युती न झाल्यास मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण व विश्लेषण

युती झाल्यावर संभाव्य जागा; आघाडीला मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण  व विधानसभा मतदारसंघनिहाय  कल

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेचा सर्वेक्षण अहवाल खालील लिंकवर उपलब्ध - 

(A survey report of the Political Research and Analysis Bureau (PREB) organization is available at the following link)
https://www.instamojo.com/bhujbalchandrakant/maharashtra-assembly-election-2019-opinion-p/?ref=store

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.