Friday 25 October 2019

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीची दमदार कामगिरी

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या जागांमध्ये वाढ; शिवसेना शून्यावर

195 – जुन्नर – शरद सोनवणे (मनसे – सध्या शिवसेना)
196 – आंबेगाव – दिलीप वळसे-पाटील- (राष्ट्रवादी काँग्रेस)
197 – खेड आळंदी – सुरेश गोरे (शिवसेना)
198 – शिरुर – बाबुराव पाचर्डे (भाजपा)
199 – दौंड – राहुल कूल- (रासप)
200 – इंदापूर – दत्ता भरणे (राष्ट्रवादी)
201 – बारामती – अजित पवार- राष्ट्रवादी
202 – पुरंदर – विजय शिवतारे (शिवसेना)
203 – भोर – संग्राम थोपटे (काँग्रेस)
204 – मावळ – बाळा भेगडे (भाजप)
205 – चिंचवड – लक्ष्मण जगताप (भाजप)
206 – पिंपरी – गौतम चाबुकस्वार (शिवसेना)
207 – भोसरी – महेश लांडगे (अपक्ष)
208 – वडगाव शेरी – जगदीश मुळक (भाजप)
209 – शिवाजीनगर – विजय काळे (भाजपा)
210 – कोथरुड – मेधा कुलकर्णी  (भाजप)
211 – खडकवासला – भीमराव तपकीर (भाजप)
212 – पर्वती – माधुरी  मिसाळ  (भाजप)
213 – हडपसर – योगेश टिळेकर (भाजप)
214 – पुणे कॅन्टोन्मेंट – दिलीप कांबळे- (भाजप)
215 – कसबा पेठ – गिरीष बापट (भाजप)
पुणे ग्रामीणमध्ये शिवसेना-भाजपा युतीला मतदारांनी जोरदार दणका दिला आहे. १० पैकी ९ विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजपा युतीच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. विद्यमान सरकारमधील दोन मंत्री भाजपाचे बाळा भेगडे आणि शिवसेनेचे विजय शिवतारे या दोघांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी पराभव केला. काँग्रेसमधून भाजपात आलेले हर्षवर्धन पाटील यांचाही इंदापूरमध्ये राष्ट्रवादीच्या दत्ता भारणे यांनी पराभव केला. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला फक्त दौेडमध्ये भाजपाकडून पराभव स्वीकारावा लागला. दौंडचे भाजपा आमदार राहुल कूल २०१४ साली राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकीटावर जिंकले होते. अवघ्या ७४६ निसटत्या मतांनी त्यांनी यावेळी विजय मिळवला. पुरंदरची जागा शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची होती. दोन वेळा आमदार आणि राज्यमंत्री असलेले विजय शिवतारे यांचा काँग्रेसच्या संजय जगताप यांनी पराभव केला. मावळमध्ये सुद्धा दोन वेळा आमदार आणि राज्यमंत्री असलेले बाळा भेगडे यांचा राष्ट्रवादीच्या सुनील शेळके यांनी पराभव केला. शेळके यांनी भाजपातून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. शेळके तब्बल ९३ हजार ९४२ मतांनी विजयी झाले. राष्ट्रवादीचे दुसरे प्रमुख नेते अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांनी बारामती आणि इंदापूरची जागा कायम राखली. इंदापूरमध्ये मोठया प्रमाणावर मतदान झाले होते. भारणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात चुरशीचा सामना झाला. भारणेंनी अवघ्या ३,११० मतांनी पाटील यांचा पराभव केला. काँग्रेसने भोरची जागा कायम राखली व पुरंदरमध्ये शिवसेनेचा पराभव केला. भोरमध्ये काँग्रेसचे संग्राम थोपटे आणि शिवसेनेच्या कुलदीप कोंडे यांच्यात सामना होता. थोपटे ९,२०६ मतांनी जिंकले. खेड-आळंदी आणि जुन्नरमध्ये राष्ट्रवादीला तिरंगी लढतीचा फायदा झाला. माजी आमदार दिलीप मोहिते यांनी शिवसेनेच्या सुरेश गोरे यांचा पराभव केला. शिवसेनेचे बंडखोर अतुल देशमुख यांनी ५० हजारे मते मिळवून गोरे यांचे गणित बिघडवले. जुन्नरमध्ये अतुल बेनके यांनी विद्ममान आमदार शरद सोनावणे यांचा पराभव केला. २०१४ ला सोनावणे मनसेच्या तिकीटावर आमदार झाले होते. पण नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेच्या आशा बुचके यांच्या बंडखोरीचा अतुल बेनके यांना फायदा झाला. बुचके यांनी अपक्ष लढून ५० हजारपेक्षा जास्त मते मिळवली. शिरुरमध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक पवार यांनी भाजपाच्या बाबूराव पाचारणे यांचा १५ हजार मतांनी पराभव केला. पुणे जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याचे दाखवून दिले असून पुण्यावर वरचष्मा राखण्यासाठी भाजपने प्रयत्न केले पण समाधानकारक यश मिळाले नाही. काँग्रेसने शहर व जिल्ह्यात चांगली लढत देत आपली आणखी एक जागा वाढविली. तर, शिवसेनेचे विजय शिवतारे, सुरेश गोरे आणि गौतम चाबुकस्वार हे विद्यमान आमदार पराभूत झाले. विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला बारामती, आंबेगाव आणि इंदापूरमध्ये विजय मिळाला होता. मात्र, या वेळी पक्षाने १० जागांवर विजय मिळविला. पक्षाने हडपसर आणि वडगाव शेरी हे बालेकिल्ले पुन्हा हिसकावून घेतले. गेल्या वेळी जिंकलेल्या ११ पैकी शिरूर, खेड-आळंदी, मावळ या जागा भाजपने गमावल्या, तर दौंडची जागा कायम राखली. राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी बारामतीमध्ये राज्यातील सर्वाधिक १ लाख ६३ हजारांचे मताधिक्‍य मिळाले. मावळमध्ये भाजपचे राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा राष्ट्रवादीचे सुनील शेळके यांनी ९३ हजार मतांनी पराभव केला. आंबेगावात राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील सातव्यांदा विजयी झाले. इंदापूरच्या लढतीमध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दत्तात्रेय भरणे यांनी भाजपचे हर्षवर्धन पाटील यांचा दुसऱ्यांदा पराभव केला. पुरंदरमध्ये राज्यमंत्री शिवतारे यांचा काँग्रेसचे संजय जगताप यांनी पराभव करून मागच्या पराभवाचा वचपा काढला. भोरमध्ये काँग्रेसचे संग्राम थोपटे यांनी ‘हॅट्ट्रिक’ केली. जुन्नरमध्ये विद्यमान आमदार शरद सोनवणे यांचा राष्ट्रवादीचे अतुल बेनके यांनी पराभव केला. शिरूरमध्ये आमदार बाबूराव पाचर्णे यांना त्यांचे परंपरागत विरोधक राष्ट्रवादीचे अशोक पवार यांनी, तर खेड-आळंदीमध्ये आमदार सुरेश गोरे यांना राष्ट्रवादीचे त्यांचे परंपरागत विरोधक दिलीप मोहिते यांनी पराभवाची धूळ चारली. दौंडमध्ये भाजपचे राहुल कुल आपली जागा राखण्यात यशस्वी झाले. कोथरूडमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनसेचे किशोर शिंदे यांचा पराभव केला. भाजपच्या बालेकिल्ल्यात त्यांना फक्त २५ हजारांचे मताधिक्‍य मिळाले. खडकवासल्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन दोडके यांनी भाजपचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांना चांगली लढत दिली. मात्र, अवघ्या २६०० मतांनी तापकीर विजयी झाले. हडपसरमध्ये राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचा पराभव केला. वडगाव शेरीत राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे विजयी झाले. भाजपच्या शहराध्यक्षा माधुरी मिसाळ यांनी पर्वतीमध्ये ३० हजारांच्या मताधिक्‍याने विजयाची ‘हॅट्ट्रिक’ साधली. कसब्यात महापौर मुक्ता टिळक, शिवाजीनगरमध्ये सिद्धार्थ शिरोळे आणि पुणे कॅंटोन्मेंटमध्ये सुनील कांबळे या भाजपच्या नगरसेवकांनी विधानसभेत मजल मारली. पिंपरीमध्ये राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांनी शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार यांचा पराभव केला; तर चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांचीही ‘हॅट्ट्रिक’ झाली. भोसरीमध्ये महेश लांडगे सलग दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत.यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पुणे शहरातील ६ जागांवर भाजप आणि २ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहे. मात्र, या आठ निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये पाच उमेदवार हे पुणे महापालिकेत प्रतिनिधित्व करीत होते. यंदा प्रथमच विधानसभेच्या निवडणुकीत पाच नगरसेवकांना विधानसभेच्या सभागृहात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. यंदाची विधानसभा निवडणूक प्रचारापासून ते उमेदवार निवडून येईपर्यंत प्रत्येक पक्षाने प्रतिष्ठेची केली होती. भाजप १०७, शिवसेना ५६, राष्ट्रवादी ५४, काँग्रेस ५२, मनसे १ आणि इतर १८ सध्याचे पक्षीय बलाबल आहे. २०१४ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीपेक्षा यंदा अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले. यामध्ये २०१४ च्या निवडणुकीत पुणे शहरातील आठ ही विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार निवडून आले होते. तर यंदा ८ पैकी २ जागी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत. तर इतर ५ ठिकाणी भाजपचे उमेदवार काहीशा फरकानं निवडून आले आहे. यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये निकालानंतर, मागील निवडणुकीसारखा जल्लोष पाहण्यास मिळाला नाही. पण, या पुणे शहरातील आठ विधानसभा मतदार संघातून निवडून आलेल्या, उमेदवारांमध्ये ५ उमेदवार हे, पुणे महापालिकेत विद्यमान नगरसेवक आहेत.त्यामध्ये महापौर मुक्ता टिळक या कसबा विधानसभा मतदार संघातून, स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आणि नगरसेवक चेतन तुपे हडपसर विधानसभा मतदारसंघ, पीएमपीएमएलचे अध्यक्ष नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे शिवाजीनगर विधानसभा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक सुनील टिंगरे वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. कसबा, कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर, वडगांवशेरी, पुणे कॅन्टोन्मेंट आणि हडपसर या आठ मतदारसंघातील मतमोजणी गुरुवारी झाली. यामध्ये कसब्यातून महापौर मुक्ता टिळक, कोथरूडमधून चंद्रकांत पाटील, पर्वतीमधून माधुरी मिसाळ, पुणे कॅन्टोन्मेंटमधून सुनील कांबळे आणि खडकवासल्यातून भीमराव तापकीर हे भाजपचे उमेदवार विजयी झाले. यातील माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर यांनी विजयाची हॅटट्रीक नोंदविली. तर मुक्ता टिळक आणि चंद्रकांत पाटील हे प्रथमच विधानसभेवर निवडून गेले. हडपसरमधून चेतन तुपे यांनी विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांना, तर वडगांवशेरीतून सुनील टिंगरे यांनी जगदीश मुळीक यांना पराभवाचा धक्का दिला.राज्यात प्रतिष्ठेची ठरलेली कोथरूडची निवडणूक चंद्रकांत पाटील जिंकले असले तरी अपेक्षित मतदान त्यांना झाले नाही. त्यामुळे मताधिक्यावरही त्याचा थेट परिणाम दिसून आला. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कोथरूडमधून जेमतेम २५ हजार ४९५ मतांनी चंद्रकांत पाटील विजयी झाले. त्या तुलनेत कसब्यातून मुक्ता टिळक यांना २८ हजार २९६ एवढे मताधिक्य मिळाले. तर पर्वतीमधून माधुरी मिसाळ यांनी ३६ हजार ७६७ मतांनी विजयी संपादन केला. शिवाजीनगरमध्ये शिरोळे यांना ५ हजार १२४ एवढे मताधिक्य मिळाले. खडकवासल्यात तापकीर यांनी २ हजार ५९५ मतांनी, तर पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये सुनील कांबळे यांनी ५ हजार १२ मतांनी विजय मिळविला. राष्ट्रवादी काँग्रेसचे बालेकिल्ला असलेल्या हडपसर आणि वडगांवशेरी मतदार संघात भाजपने गेल्या निवडणुकीत विजय मिळविला होता. मात्र या दोन्ही मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे हडपसरमधील उमेदवार चेतन तुपे आणि वडगांवशेरीतून सुनील टिंगरे यांनी विद्यमान आमदार जगदीश मुळीक आणि योगेश टिळेकर यांना जोरदार धक्का दिला. विद्यमान आमदारांची कामाबाबतची निष्क्रियता आणि आघाडीचे मजबूत संघटन पराभवाला कारणीभूत ठरले. चेतन तुपे २ हजार ८२०, तर सुनील टिंगरे ४ हजार ९७५ मतांनी विजयी झाले.


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
===================================================================================================================
=========================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
==========================
======================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.