Saturday 26 October 2019

नवनिर्वाचित १७६ आमदार कलंकित

चाळीस टक्के आमदारांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद


राज्यातील नवनिर्वाचित आमदारांमध्ये निम्म्याहून अधिकांची पार्श्वभूमी गुन्हेगारी असून, २८८ पैकी १७६ जणांवर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यातील ४० टक्के आमदारांवर गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांची नोंद असून, दोघांवर खुनाचा गुन्हा असल्याची माहिती समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या १४ व्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. गेल्या पंचवार्षिकच्या तुलनेत चालू कालावधीत गुन्हे दाखल असणाऱ्यांच्या संख्येत पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. निवडून आलेल्या १७६ आमदारांवर गुन्हे दाखल असून, ११३ आमदारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, अपहरणासारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. तुलनात्मक विचार करता भारतीय जनता पक्षाच्या १०५ आमदारांपैकी ६५ आमदारांवर गुन्हे दाखल आहेत; तर शिवसेनेच्या ५५ पैकी ३१, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५३ पैकी ३२, काँग्रेसच्या ४४ पैकी २६ आणि १२ अपक्षांपैकी ९ अपक्ष आमदारांवर गुन्हे दाखल आहेत. 'महाराष्ट्र इलेक्शन वॉच' आणि 'असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स' (एडीआर) या संस्थांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या २८८ आमदारांपैकी २८५ उमेदवारांनी सादर केलेल्या संपत्ती आणि गुन्हेविषयक प्रतिज्ञापत्राचे विश्लेषण करून अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यामधून आमदारांच्या 'गुन्हे'विषयक पार्श्वभूमीचा तपशील समोर आला आहे. या तपशीलानुसार, भाजपच्या ४० आमदारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत, तर शिवसेनेच्या २६, राष्ट्रवादीच्या १७, काँग्रेसच्या १५ आणि सहा अपक्ष आमदारांवर दाखल झालेले गुन्हेही गंभीर स्वरुपाचे आहेत. मावळत्या विधानसभेत १६५ आमदारांवर (५७ टक्के) गुन्हे दाखल होते, तर ११५ आमदारांवर (४० टक्के) गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होते. नव्या विधानसभेत १७६ आमदारांवर (६२ टक्के) गुन्हे दाखल असून, ११३ आमदारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत. दोन आमदारांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल असल्याचा उल्लेख आहे, तर ११ आमदारांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल असल्याचे नमूद आहे. चार आमदारांवर अपहरणाशी संबंधित गुन्ह्याचे खटले दाखल आहेत. यंदाच्या विधानसभेत ५५ टक्के आमदार पदवीधर आणि उच्चशिक्षित असून, सहा लोकप्रतिनिधींकडे 'डॉक्टरेट'ची पदवी आहे. मात्र, ४१ टक्के आमदारांची शैक्षणिक पात्रता पाचवी ते बारावीदरम्यान असून, चार जण साक्षर, तर सहा जण जेमतेम पाचवी उत्तीर्ण आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील विजयी २८८ पैकी २८५ आमदारांच्या स्वयंघोषित प्रतिज्ञापत्राचे विश्लेषण करून अहवाल सादर केला आहे. या अहवालात आमदारांच्या शिक्षणाचे प्रगतिपुस्तक मांडण्यात आले आहे. त्यानुसार, नवनिर्वाचित २८८ आमदारांपैकी ११७ आमदारांची शैक्षणिक पात्रता पाचवी ते बारावीदरम्यान असून, १५७ आमदारांनी त्यांची शैक्षणिक पात्रता पदवी आणि त्यापेक्षा जास्त असल्याचे नमूद केले आहे. आमदारांचे शैक्षणिक प्रगतिपुस्तक- साक्षर-४, पाचवी पास-६, आठवी पास-१३, दहावी पास-४४, बारावी पास-५४, पदवीधर-७२, व्यावसायिक पदवीधर-४४, पदव्युत्तर पदवी-३५, डॉक्टरेट-६, अन्य-७, नव्या विधानसभेत ६७ टक्के आमदार मध्यमवयीन असून, त्यांचे वय ४१ ते ६०च्या दरम्यान आहे. पन्नाशी ते साठीदरम्यानचे १०१ आमदार निवडून आले आहेत. १५ टक्के आमदारांचे वय २५ ते ४० वर्षांदरम्यान आहे. ५१ आमदार ६१ ते ८० या वयोगटातील आहेत. त्यामुळे विधानसभेच्या बाकांवरून तरुण आणि ज्येष्ठ आमदार काम करताना दिसणार आहेत. वयोगट आमदारांची संख्या- २५ ते ३०=६ आमदार, ३१ ते ४०=३६४१ ते ५०=९१ आमदार, ५१ ते ६०=१०१ आमदार, ६१ ते ७०=४८ आमदार, ७१ ते ८०=३ आमदार, एकूण (विश्लेषित)=२८५ आमदार आहेत.'धनाढ्य' आमदारांची संख्या मा‌वळत्या विधानसभेच्या तुलनेत पाच टक्क्यांनी वाढली आहे. नव्या विधानसभेत २८८ पैकी २६४ आमदार (९३ टक्के) कोट्यधीश असून, गेल्या विधानसभेत २५३ आमदारांची (८८ टक्के) संपत्ती कोटींच्या घरात होती. विधानसभेवर निवडून आलेल्या आमदारांपैकी भाजपचे ९५ टक्के आमदार कोट्यधीश आहेत, तर शिवसेनेच्या ९३ टक्के, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ८९ टक्के आणि काँग्रेसच्या तब्बल ९६ टक्के आमदार कोट्यवधींची संपत्ती बाळगून आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या २८८ आमदारांपैकी २८५ आमदारांच्या स्वयंघोषित प्रतिज्ञापत्राचे विश्लेषण करून महाराष्ट्र इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने आमदारांच्या संपत्तीचा सविस्तर अहवाल सादर केला आहे. त्यानुसार, यंदाच्या विधानसभेत तब्बल १८० आमदारांची संपत्ती ५ कोटी रुपये किंवा त्यापेक्षा अधिक असून, ६५ आमदारांची संपत्ती २ कोटी ते ५ कोटी रुपये, ३४ आमदारांची संपत्ती ५० लाख ते २ कोटी रुपये, ५ आमदारांची संपत्ती १० लाख ते ५० लाख रुपयांच्या घरात आहे, तर एका आमदाराच्या संपत्तीचे मूल्य १० लाखांपेक्षा कमी आहे. पक्षनिहाय विश्लेषणानुसार, भाजपच्या १०५ आमदारांपैकी १०० आमदार कोट्यधीश आहेत, तर शिवसेनेच्या ५५ पैकी ५१, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५३ पैकी ४७ आणि काँग्रेसच्या ४४ पैकी ४२ आमदारांकडे कोट्यवधीची संपत्ती आहे. गेल्या पंचवार्षिकीला एका आमदाराकडे सरासरी संपत्ती १०.८७ कोटी रुपये इतकी होती. त्यामध्ये वाढ झाली असून, नव्या विधानसभेत एका आमदाराकडे सरासरी २२.४२ कोटी रुपयांची संपत्ती आहे. सरासरी संपत्तीच्या पक्षनिहाय विश्लेषणानुसार, भाजपच्या एका आमदाराची सरासरी संपत्ती २७.४६ कोटी, शिवसेनेच्या आमदारांची १३.७४ कोटी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराची सरासरी संपत्ती १५.०१ कोटी आणि काँग्रेसच्या एका आमदाराची सरासरी संपत्ती २४.४६ कोटी रुपये इतकी आहे.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
===================================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
==========================
======================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.