रोहित पवार यांच्याकडून कार्यकर्त्यांना केळी; आयोगाला दर्शवलेल्या खर्चातील गंमतीजमती
निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या प्रचारार्थ निवडणूक खर्चाला मर्यादेचे 28 लाख रुपयांचे बंधन घातलेले आहे. या 28 लाख रुपयांमध्ये सर्व निवडणूक खर्च दाखवणे कसरतीचे असल्याने अफलातून युक्ती उमेदवारांकडून लढवली जाते. निवडणूक आयोगाच्या नियमांना सर्वच राजकीय पक्षांकडून हरताळ फासला असून आयोग केवळ कागदोपत्रीच कारवाईचा फार्स करीत असल्याचे दिसून येत आहे. उमेदवारांनी आयोगाला दर्शवलेल्या खर्चातील गंमतीजमती जनतेच्या समोर येत आहेत. राज्याचे अर्थमंत्री मुनगंटीवार यांचा तर खर्च-हिशोब पाहण्यासारखाच आहे. निवडणूक दैनंदिन खर्च नोंदवही पाहिल्यावर राज्याचा हिशोब किती चोख ठेवत असतील याची प्रचीती येईल असा आहे. पिंपरीतील एका उमेदवाराने तर कहरच केला आहे, दैनंदिन खर्च नोंदवहीत दिनांक नमूद करून निरंकार असे फक्त नमूद करून खर्च काहीही झाला नसल्याचे म्हंटले आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. 10 ऑक्टोबर 2019 पर्यंत 1 लाख 62 हजार 771 खर्च केला असल्याचे दैनंदिन खर्च नोंदवहीत नमूद केले असून निवणूक खर्च निरीक्षकांनी खर्चातील तफावत निदर्शनास आणून दिलेली असून ती नोंदवहीत घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. दैनंदिन खर्च नोंदवहीत दिलेला खर्च तपशील सुद्धा अतिशय गंमतीदार आहे. प्रतिस्पर्धी कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांनी दिनांक 9 ऑक्टोबर 2019 पर्यंत 1 लाख 63 हजार 357 रुपये खर्च दर्शवलेला आहे तर निवडणूक खर्च निरीक्षक व खर्च तपासणीस यांनी अभिरूप दैनंदिन खर्च नोंदवहीत 2 लाख 83 हजार 677 इतका असल्याचे म्हंटले असून यामधील तफावत निदर्शनास आणून दिलेली आहे. माजीमंत्री गणेश नाईक केवळ वडापाव कार्यकर्त्यांना देत असून 4 ते 5 महिलांना मानधन दिल्याचे दैनंदिन खर्च नोंदवही नमूद केले आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार नितेश राणे यांनी दैनंदिन खर्च नोंदवहीत 4 लाख 63 हजार 1566 इतका खर्च झाला असल्याचे म्हंटले असून त्यांनी देखील कार्यकर्त्यांवर किरकोळ वडापाववर खर्च केला असल्याचे नमूद केले आहे. पुण्याचे पालकमंत्री व कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार चंद्रकातदादा पाटील यांनी केवळ वाहन खर्च केल्याचे म्हंटले आहे कार्यकर्त्यांवर कोणताही खर्च केला नाही. ना चहा ना पाणी, खर्च नियंत्रणात ठेवण्यात आघाडीवर असून त्यांनी दिनांक 9 ऑक्टोबर 2019 पर्यंत 1 लाख 66 हजार 410 रुपये इतका खर्च दैनंदिन खर्च नोंदवही नमूद केला आहे. तर प्रतिस्पर्धी मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांनी मात्र कार्यकर्त्यावर चहा व पोहे यावर थोडाफार खर्च केल्याचे नमूद केले असून त्यांनी त्यांनी दिनांक 8 ऑक्टोबर 2019 पर्यंत 2 लाख 12 हजार 271 रुपये इतका खर्च दैनंदिन नोंदवही नमूद केला आहे. भोसरीचे राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार विलास लांडे यांनी केवळ चहा व बिस्कीट यावर कार्यकर्त्यांवर रोज खर्च होत असल्याचे दैनंदिन खर्च नोंदवही नमूद केले आहे. तर प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार महेश लांडगे यांनी मिरवणुकीवर रोज खर्च करीत असल्याचे म्हंटले आहे मात्र कार्यकर्त्यांवर रोजचा खर्च अजिबात नसल्याचे खर्च नोंदवही वरून दिसून येत आहे. मावळ विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार व मंत्री संजय बाळा भेगडे यांनी प्रत्यक्ष दर्शवलेल्या खर्चातील तफावत मोठ्याप्रमाणात असल्याचे उघड झाले असून निवडणूक खर्च निरीक्षक व खर्च तपासणीस यांनी अभिरूप दैनंदिन खर्च नोंदवहीत 9 लाख 46 हजार 498 रुपयांची खर्चातील तफावत निदर्शनास आणून दिलेली असून ती नोंदवहीत घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके यांना निवडणूक खर्च निरीक्षक व खर्च तपासणीस यांनी अभिरूप दैनंदिन खर्च नोंदवहीत 5 लाख 98 हजार 474 रुपये असल्याचे निदर्शनास आणून दिलेले आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन दोडके यांचा खर्च प्रतिनिधी म्हणून काका चव्हाण हिशोब ठेवत आहेत त्यांनी कसाबसा आटोक्यातील खर्च नोंदवहीत दिलेला आहे. तर प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार आमदार भीमराव तापकीर यांनी दिनांक 8 ऑक्टोबर 2019 पर्यंत 4 लाख 41 हजार 365 रुपये इतका खर्च दैनंदिन नोंदवही नमूद केला आहे. निवडणूक खर्च निरीक्षक व खर्च तपासणीस यांनी अभिरूप दैनंदिन खर्च नोंदवहीतील नोंदीप्रमाणे 32 हजार 400 रुपयांची तफावत निदर्शनास आणून दिलेली आहे. उमेदवारांच्या हिशाबातील तपशील पाहिल्यावर करमणूक निश्चित होईल.
रोहित पवार यांच्या निवडणूक खर्चात तफावत
दिनांक 8 ऑक्टोबर 2019 पर्यंत उमेदवारांनी दैनंदिन खर्च निवडणूक आयोगाला सादर केला आहे यामध्ये निवडणूक खर्च निरीक्षक व खर्च तपासणीस यांनी अभिरूप दैनंदिन खर्च नोंद वहीत नमूद केलेला खर्च आणि उमेदवारांनी दैनंदिन खर्च नोंदवहीत दर्शवलेला खर्चात मोठ्याप्रमाणात तफावत आढळून आलेली आहे. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवीत असलेले राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी दैनंदिन खर्च नोंदवहीत कार्यकर्त्यांना केळीवर खर्च केल्याचे नमूद केले आहे. बारामती अग्रो कंपनीची वाहने प्रचारात वापरत असल्याचे म्हंटले आहे तर गावोगावी प्रचार बैठकीत केवळ 2 खुर्ची व ताडपत्री आणि चटई भाडे एवढाच खर्च नमूद केला आहे. निवडणूक आयोगाने प्रचाराचे केलेले छायचित्रण व देखरेखीतून प्रचार खर्चातील तफावत निदर्शनास आणून दिलेली आहे. दिनांक 8 ऑक्टोबर 2019 पर्यंत राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी 3 लाख 16 हजार सत्तर रुपये खर्च झाल्याचे दैनंदिन खर्च नोंद वहीत नमूद केलेले आहे तर निवडणूक खर्च निरीक्षक व खर्च तपासणीस यांनी अभिरूप दैनंदिन खर्च नोंद वहीत 6 लाख 13 हजार 075 इतका खर्च नोंद केली असल्याचे रोहित पवार यांना 2 लाख 97 हजार रुपयांचा खर्च तफावत असल्याचे निवडणूक खर्च निरीक्षक यांनी निदर्शनास आणून सदरील खर्च नोंदवहीत नमूद करण्याची सूचना नोटीस बजावली आहे. निवडणूक आयोगाच्या खर्च ताळमेळ बैठकीत वरीलप्रमाणे खर्च तफावतीची सूचना केली आहे. तर भाजपचे उमेदवार व मंत्री राम शिंदे यांनी प्रचारार्थ कार्यकर्त्यांना शाकाहारी भोजनाचा खर्च केल्याचे दैनंदिन खर्च नोंदवहीत नमूद केले आहे. राम शिंदे यांनी दिनांक 10 ऑक्टोबर 2019 पर्यंत 4 लाख 12 हजार 086 इतका खर्च केल्याचे दर्शवलेले आहे.अमित शाह यांच्या सभेचा खर्च सुभाष देशमुख यांच्या नावे; आयोगाची नोटीस
अमित शहा यांच्या अक्कलकोट व तुळजापूरतील सभांच्या खर्चापोटी चार लाख रुपयांची नोटिस निवडणूक आयोगाने सोलापूर दक्षिणचे भाजप उमेदवार सुभाष देशमुख यांना बजावली आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांच्या सभेचा धडाका सुरू झाला आहे. त्यामुळे ज्या उमेदवाराच्या मतदारसंघात सभा आहे, त्या उमेदवाराच्या नावावर सभेचा खर्च टाकण्यात येतो. मात्र निवडणूक आयोगाकडून सभेला उपस्थित राहिलेल्या पक्षातील इतर उमेदवारांच्या खात्यावरही सभेचा खर्च टाकण्यास सुरुवात करण्यात आली आहे. अशी नोटीस निवडणूक आयोगाने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना पाठवल्याने खळबळ उडाली आहे. नुकतेच भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अक्कलकोट व तुळजापूर येथे सभा झाली होती. पक्षाचे अध्यक्ष यांची सभा असल्याने सोलापूर दक्षिण मतदारसंघाचे भाजप उमेदवार सुभाष देशमुख व जत विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार विलासराव जगताप हे सभेला उपस्थित होते. मात्र या सभेला झालेल्या खर्चाचा काही भाग या दोन्ही उमेदवारांच्या खात्यावर टाकण्यात यावा अशी नोटीस निवडणूक आयोगाने काढली आहे. सर्वच पक्षातील उमेदवारांना हा नियम लागू होणार असल्याची शक्यता आहे. यामुळे उमेदवारांमध्ये प्रचारा व्यतिरिक्त इतर नेत्यांच्या सभांच्या खर्चाचे नियोजन कसे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या सभेहून परतल्यानंतर देशमुख यांना निवडणूक आयोगाची नोटीस आली असून अमित शाह यांच्या सभेचा अर्धा खर्च त्यांच्या नावावर टाकण्यात आला आहे. सभेचा एकूण खर्च सुभाष देशमुख यांच्या नावावर टाकण्यासंदर्भात नोटीस देशमुख यांना आली आहे. निवडणूक आयोगाच्या या नोटीसीनंतर देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली असून उमेदवारांवर हा अन्याय असल्याचे म्हटले. निवडणूक आयोगाने एका उमेदवाराला 28 लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा घातली आहे.==============================
Campaign budget allows mere tea, show candidates
17 Oct. 2019 pune MIRROR(Vijay.Chavan@timesgroup.com TWEET @cvijayMIRROR)
The campaigning budget for every Assembly poll candidate has been capped at Rs 28 lakh, prompting many to manage their spectacles that show their penny-pinching antics. Moreover, they have agreed to compromise fearing a rap from the Election Commission of India (ECI) — with certain leaders going to lengths to put a show that elucidates on humble expenditure. Be it smaller treats comprising tea-time snacks or minimising on furniture during campaigns, the aspirants’ expenditures are putting up a humble presentation that is seen to all — with the reality balmily escaping the election observers’ vigilance. A city-based group, Political Research and Analysis Bureau (PRAB), has studied the daily bills submitted to the election authority, only to find out that candidates are incurring minimum expenses. PRAB director Chandrakant Bhujbal believes that a lot is slipping the election observers’ gaze. “They neglect the malpractices conducted when the expenditures are shown by the candidates. The reality is never registered despite observations. There is a need to take strict action against the violation, but it is not happening in reality,” he told Mirror, adding, “The real figures are shocking when it comes to the expenditure on election campaigns. Such things prevent common people from taking part in active politics.” PRAB found that Chief Minister Devendra Fadnavis had spent Rs 1.62 lakh during his campaigns till October 10. Former minister from Navi Mumbai, Ganesh Naik, who is contesting for Bharatiya Janata Party (BJP) and Nitesh Rane from Kankawali — both have been only treating the workers with vada-pav. There is no sign of full-fledged meals or vehicles for rallies. Similarly, Rohit Pawar, the grandson of Nationalist Congress Party (NCP) leader Sharad Pawar, is contesting from Jamkhed in Ahmednagar district. The young politician has been seen using just two chairs, one mat and one tadpatri (tarpaulin sheet) to conduct his rallies in the villages. Pawar also showed that he is using the vehicles that belong to Baramati Agro limited. And still, the election observers have issued notices to him for showing less expenditure. PRAB also noticed that Pune’s guardian minister and candidate from Kothrud, Chandrakant Patil, has been only spending on vehicles and nothing on the rallies. In the twin towns, NCP-supported candidate from Bhosari constituency, Vilas Lande, allegedly spends only on tea and snacks. His rival Bharatiya Janata Party (BJP) candidate, Mahesh Landge, has been spending on rallies and refrains from offering refreshment to the party workers. They work “voluntarily” for him.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
===========================================================================================================
Maharashtra Assembly Election 2019 Opinion Poll PRAB; प्राब संस्थेचा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकपूर्व जनमत चाचणी सर्वेक्षण (ओपिनियन पोल) अहवाल उपलब्ध
VIDHAN SABHA 2019 ; महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मतदानपूर्व अंदाज
भाजप व शिवसेना युती न झाल्यास मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण व विश्लेषण
युती झाल्यावर संभाव्य जागा; आघाडीला मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण व विधानसभा मतदारसंघनिहाय कल
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेचा सर्वेक्षण अहवाल खालील लिंकवर उपलब्ध -
(A survey report of the Political Research and Analysis Bureau (PREB) organization is available at the following link)https://www.instamojo.com/bhujbalchandrakant/maharashtra-assembly-election-2019-opinion-p/?ref=store
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.