Monday 7 October 2019

विधानसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्हयातील 246 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात

सर्वाधिक पुणे कॅन्टोमेंटमध्ये 28 तर आंबेगाव मतदारसंघात कमी उमेदवार 


पुणे शहर जिल्ह्यातील मतदारसंख्या व उमेदवार संख्या
अ.क्र.
संघक्र.
मतदारसंघ
एकूण संख्या
उमेदवार संख्या
1
195
 जुन्नर
299648
11
2
196
 आंबेगाव
283531
6
3
197
 खेड आळंदी
327262
9
4
198
 शिरुर
383886
10
5
199
 दौंड
309168
13
6
200
 इंदापूर
305579
15
7
201
 बारामती
341657
10
8
202
 पुरंदर
361480
11
9
203
 भोर
361415
7
10
204
 मावळ
348462
7
11
205
 चिंचवड
518309
11
12
206
 पिंपरी
353545
18
13
207
 भोसरी
441125
12
14
208
 वडगाव शेरी
456487
12
15
209
 शिवाजीनगर
305587
13
16
210
 कोथरुड
404765
11
17
211
 खडकवासला
486948
7
18
212
 पर्वती
354292
11
19
213
 हडपसर
504044
14
20
214
 पुणे कॅन्टोन्मेंट
291344
28
21
215
 कसबा पेठ
290683
10
एकूण
7729217
246
विधानसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्हयातील 246 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात राहिले असून सर्वाधिक पुणे कॅन्टोमेंटमध्ये 28 तर आंबेगाव मतदारसंघात सर्वाधिक कमी 6 उमेदवार निवडणुकीत आपले नशीब आजमावणार आहेत. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 मध्ये पुणे जिल्हयातील 21 विधानसभा मतदार संघात 246 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकूण 373 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली होती, त्यापैकी 127 उमेदवारांनी माघार घेतली असून 246 उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. विधानसभा मतदार संघ निहाय निवडणूकीच्या रिंगणातील उमेदवारांची संख्या (कंसात माघार घेतलेल्या उमेदवारांची संख्या) खालीलप्रमाणे आहे. जुन्नर -11 (1), आंबेगाव 6 (3),  खेड-आळंदी -9 (4),  शिरुर -10 (5), दौंड-13 (4), इंदापूर-15 (15),  बारामती-10 (2), पुरंदर – 11 (5), भोर-7 (4), मावळ-7 (3), चिंचवड-11 (3), पिंपरी-18 (13),  भोसरी-12 (6), वडगावशेरी-12 (5), शिवाजीनगर 13 (0), कोथरुड-11 (10),  खडकवासला-7 (2), पर्वती-11 (4), हडपसर-14 (5), पुणे कॅन्टोमेंट-28 (30), कसबा पेठ-10 (3) अशी माहिती पुणे जिल्ह्यात एकूण २१ विधानसभा मतदारसंघ असून या जागांसाठी ३७३ जणांनी अर्ज दाखल केले गेले होते. तर, त्यातील १२७ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. यामुळे २१ जागांसाठी जिल्ह्यात आता २४६ उमेदवार रिंगणात असणार आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले की, यंदाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करणार्‍या व्यक्तींची संख्या अधिक होती. त्यामध्ये जिल्ह्यातील पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ५८ जणांनी अर्ज दाखल केला होता, त्यापैकी ३० जणांनी माघार घेतली आहे. यामुळे आता या मतदारसंघात २८ उमेदवार रिंगणात असणार आहेत. सर्वात कमी आंबेगाव विधानसभा मतदारसंघात ९ जणांनी अर्ज दाखल केला आहे. तर तिघांनी अर्ज मागे घेतल्याने, या मतदारसंघात केवळ ६ उमेदवार निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच ते पुढे म्हणाले की, उमेदवाराची संख्या आज निश्चित झाली असून आता या संपूर्ण जिल्ह्यात ७७ लाख २९ हजार २१७ नागरिक मतदान करणार आहेत. तर मतदान आणि मतमोजणी दरम्यान ४१ हजार अधिकारी आणि कर्मचारी काम पाहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. निवडणुकीच्या मतदान करतेवेळी, आवश्यक असणारी कागदपत्रे जवळ नसल्यास अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागते. या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आता कसबा विधानसभा मतदारसंघात असणार्‍या मतदारांसाठी मतदानच्या स्लीपवर असलेल्या कोडवर मतदान केंद्रावरील अधिकार्‍यांनी बूथ अॅपच्या सहाय्याने स्कॅन केल्यास, सबंधित व्यक्तिची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. अशा प्रकाराच्या अॅपमधून मतदारांना सुविधा पुरवणारा कसबा मतदार संघ राज्यातील पहिला मतदारसंघ ठरला असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे. 
आज अर्ज माघारी घेण्याचा दिवस असल्याने पक्षश्रेष्ठीं, पक्षप्रमुख आदींच्या आदेशानुसार तसेच काहींनी आपले अर्ज मागे घेतल्याने होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या पुणे शहरातील आठ मतदारसंघाचे निवडणूक चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे काहीठिकाणी दुरंगी, तिरंगी लढती पाहायला मिळणार आहेत.  कसबा मतदारसंघात भाजपकडून मुक्ता टिळक विरोधात काँग्रेसचे अरविंद शिंदे निवडणूक लढवणार असून शिवसेनेचे विशाल धनवडे यांनी केली बंडखोरी केली आहे. शिवाजीनगर मतदारसंघात भाजपकडून माजी खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र सिद्धार्थ शिरोळे याच्या विरोधात काँग्रेसकडून दत्ता बहिरट निवडणूक लढवत आहेत. कोथरुडमध्ये यावेळी रंगत निर्माण होईल असे वाटत असताना अनेक उमेदवारांनी घेतली माघार घेतली आहे. येथे चंद्रकांतदादा पाटील यांच्या विरोधात मनसेच्या किशोर शिंदे यांच्यात लढत असेल तर खडकवासला मतदारसंघात भाजपकडून भीमराव तापकीर याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून सचिन दोडके निवडणूक रिंगणात आहेत. हडपसर मतदारसंघात भाजपकडून योगेश टिळेकर तर राष्ट्रवादीकडून चेतन तुपे यांच्यात लढत तर मनसेकडून वसंत मोरे निवडणूक लढत आहे. कॅन्टोमेन्ट विधानसभा मतदारसंघात काँग्रेस रमेश बागवे यांच्या विरोधात भाजपकडून सुनील कांबळे यांच्यात थेट लढत होणार आहे.  पर्वती मतदारसंघात काँग्रेस बंडखोर आबा बागुल यांनी माघार घेतल्याने भाजपच्या माधुरी मिसाळ व राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम यांच्यात सरळ लढत होईल. वडगावशेरी मतदारसंघात भाजप व राष्ट्रवादी यांच्यात सरळ लढत होईल. भाजपकडून जगदीश मुळीक तर राष्ट्रवादीकडून सुनील टिंगरे निवडणूक लढवत आहेत. पुणे ग्रामीण विधानसभा चित्र स्पष्ट झाले असून इंदापूरमध्ये यावेळी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले हर्षवर्धन पाटील यांची लढत दत्ता मामा भरणे यांच्यात सरळ लढत होणार आहे. तर बारामतीत राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या विरोधात भाजपकडून गोपीचंद पडळकर निवडणूक लढवत आहेत. दौंडमध्ये भाजपकडून राहुल कुल निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून रमेश थोरात निवडणूक रिंगणात आहेत. यावेळी पुरंदरमध्ये लक्षवेधी लढत होणार आहे. शिवसेनेकडून विजय शिवतारे यांच्या विरोधात काँग्रेसकडून संजय जगताप निवडणूक लढवत आहेत. भोर वेल्हा मुळशी मतदारसंघात काँग्रेसकडून संग्राम थोपटे यांच्या विरोधात शिवसेनेकडून कुलदीप कोंडे निवडणूक रिंगणात आहेत. तर  मावळ मतदारसंघात यावेळी चुरशीची लढत होणार आहे. ऐनवेळी राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या सुनील शेळके यांची लढत भाजप राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांच्यात लढत होणार आहे. तसेच खेड आळंदी राष्ट्रवादीकडून दिलीप मोहिते याच्या विरोधात शिवसेनेकडून सुरेश गोरे निवडणूक लढवत आहेत. जुन्नर मतदारसंघात लढत होते राष्ट्रवादीकडून अतुल बेनके निवडणूक लढवत आहेत.तर त्याच्या विरोधात शिवसेनेकडून शरद सोनवणे उभे आहेत. शिरूर हवेली मतदारसंघात भाजपचे आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून अशोक पवार निवडणूक लढवत आहेत. येथे राष्ट्रवादीच्या माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप कंद यांनी भाजपला पाठींबा दिल्याने रंगत निर्माण झाली आहे. आंबेगाव मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात शिवसेनेचे राजाराम बाणखेले निवडणूक रिंगणात आहेत.
पिंपरी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे अण्णा बनसोडे यांचे घड्याळ, शिवसेना-भाजप महायुतीचे गौतम चाबुकस्वार धनुष्यबाण तर बहुजन समाज पार्टीचे धनराज गायकवाड यांचे हत्ती चिन्ह आहे. निवडणूक विभागाने आज (सोमवारी) अर्ज माघे घेण्याच्या मुदतीत अपक्ष उमेदवारांना चिन्हाचे वाटप केले आहे. त्यामध्ये बहुजन मुक्ती पार्टीचे गोविंद हेरोडे यांना खाट, वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण गायकवाड यांना गॅस सिलेंडर, भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टीचे संदीप कांबळे यांना ब्रेड, अपक्ष अजय गायकवाड यांना हिरा, अजय लोंढे यांना शिट्टी, मुकुंदा ओव्हाळ यांना फुटबॉल चिन्ह मिळाले आहे. चंद्रकांत माने यांना पेनाची नीब सात किरणांसह, दिपक जगताप यांना शिवणयंत्र, दिपक ताटे यांना रोड रोलर, नरेश लोट सफरचंद, भाजपचे बंडखोर नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांना अंगठी, मिना यादव प्रेशर कुकर, युवराज दाखले यांना ऑटो रिक्षा, डॉ. राजेश नागोसे यांना कोट आणि हेमंत मोरे यांना कपबशी चिन्ह मिळाले आहे. 18 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भोसरी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविणारे विलास लांडे यांना कपबशी चिन्ह मिळाले आहे. निवडणूक विभागाने अपक्ष निवडणूक लढविणा-या उमेदवारांना आज (सोमवारी) चिन्हांचे वाटप केले. भाजपचे महेश लांडगे यांचे कमळ आणि बहुजन मुक्ती पार्टीचे विजय आराख यांचे हत्ती चिन्ह आहे. राजकीय पक्षाच्या उमेदवारांची चिन्हे आधीच निश्चित असतात. पण, अपक्ष उमेदवारांना अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी चिन्हाचे वाटप होते. त्यामुळे त्यांना कमीत कमी कालावधीत आपले चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे कठीण काम यशस्वीपणे करावे लागते. त्यामुळे रोजच्या वापरातील आणखी ओळखीच्या चिन्हांला अपक्ष उमेदवारांची मागणी असते. त्यामुळे यंदा निवडणूक आयोगाने लोकप्रिय गोष्टींचा चिन्ह म्हणून समावेश केला आहे. भोसरीतून दुस-यावेळी अपक्ष निवडणूक लढणारे विलास लांडे यांना पुन्हा कपबशी चिन्ह मिळाले आहे. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत देखील लांडे यांचे कपबशी चिन्ह होते. लांडे यांना कपबशी साथ देईल का? याबाबत भोसरीत चर्चा सुरु झाली आहे. जनहित लोकशाही पार्टीचे विश्वास गजरमल यांना ऑटो रिक्षा, समाजवादी पार्टीच्या वहिदा शेख यांना सायकल, बहुजन मुक्ती पार्टीचे विजय आराख यांना खाट, वंचित बहुजन आघाडीचे शहानवाज शेख यांना गॅस सिलेंडर, छाया जगदाळे यांना शिट्टी, हरेश डोळस यांना चावी, भाऊ अडागळे यांना शिवणयंत्र, मारुती पवार  कपाट आणि ज्ञानेश्वर बो-हाटे यांना तुतारी वाजविणारा माणूस चिन्ह मिळाले आहे.

राजकीय सभांसाठी पालिकेकडून १३६ ठिकाणे निश्चित

विधानसभेच्या रणधुमाळीमध्ये राजकीय सभा घेण्यासाठी जागा आणि मोकळ्या मैदानांची उपलब्धता हा मोठा प्रश्न राजकीय पक्षांसमोर आहे. मध्यवर्ती पेठांमध्ये होणारी वाहतूक कोंडी आणि गैरसोय पाहता प्रशासनाने उपनगर व शहरातील १३६ ठिकाणांची यादी तयार केली आहे. यामध्ये सदाशिव पेठेतील केवळ एका जागेचा समावेश असून सर्वाधिक जागा या बालेवाडी भागातील आहेत. यामध्ये अ‍ॅमेनिटी स्पेससह, शाळा, खेळाच्या मैदानांसह मोकळ्या जागांचा समावेश आहे. निवडणुकांच्या काळामध्ये राजकीय सभांसाठी मैदाने उपलब्ध होण्यामध्ये विविध पक्षांसमोर अडचणी उभ्या राहात असून नेमक्या कुठे सभा घ्यायच्या असा प्रश्न निर्माण होतो. विधानसभा निवडणूकीच्या प्रचारसभा, मेळावे आणि कोपरासभा घेण्यासाठी उमेदवारांसह कार्यकर्त्यांपुढे जागांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. निवडणुकांच्या काळात यावरुन प्रशासन आणि राजकीय कार्यकर्त्यांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवतात. त्यामुळे महापालिकेने राजकीय प्रचारसभांसह मेळावे आणि कोपरा सभांसाठी तब्बल १३६ जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने उपनगरांमधील जागांचा समावेश आहे. मात्र, शहराच्या मध्यवस्तीतील शिवाजीनगर आणि सदाशिव पेठ वगळता अन्य कोणत्याही भागाचा यादीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही.   उपलब्ध करुन देण्यात आलेल्या जागा पालिकेच्या ताब्यात आलेल्या आहेत. या जागांमध्ये सर्वात छोटे मैदान बालेवाडी येथील २५० चौरस मीटरचे आहे. तर सर्वात मोठे मैदान खराडी येथील असून त्याचे क्षेत्रफळ २४ हजार ३९६ चौरस मीटरचे आहे. त्यामुळे या मैदानांवर काही हजारांच्याच सभा होऊ शकतील. मोठ्या नेत्यांच्या भव्य सभा घेण्यासाठी आणखी मोठ्या मैदानाची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे. अशा वेळी विविध शिक्षण संस्था आणि महाविद्यालयांच्या मैदानांचा विचार होऊ शकतो. पालिकेच्या मालकीच्या जागा सभेसाठी देताना रेडीरेकरनरच्या दरानुसार भाडे आकारणी केली जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.  पालिकेने जी मैदाने उपलब्ध करुन दिलेली आहेत त्यामध्ये प्रामुख्याने पालिकेच्या शाळांच्या मैदानांचा समावेश आहे. यासोबतच अ‍ॅमेनिटी स्पेस तसेच वेगवेगळया आरक्षणापोटी पालिकेच्या ताब्यात आलेल्या रिकाम्या जागांचा समावेश आहे. या सर्व जागा पालिकेच्या जागा वाटप नियमावली २००९ नुसारच भाडे तत्वावर देण्यात येणार असल्याचे भूसंपादन विभागाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. एकूण उपलब्ध जागा-आंबेगाव बु - 11,बावधन खु - 03, बालेवाडी- 33,बाणेर- 07,धायरी- 06, हडपसर- 27, कोंढवा- 13,खराडी- 01, महंमदवाडी- 10, पाषण- 06,वडगाव शेरी- 01, वारजे- 04  येरवडा- 01, कात्रज- 02, धनकवडी - 01, खराडी - 01, शिवाजीनगर - 02, वडगाव बु. - 06 एकूण - 136.

‘क्यूआर कोड’द्वारे मतदारांची पडताळणी

मतदान केंद्रांवरील मोठमोठ्या रांगा, दुबार मतदार आणि मतदानासाठी जाणारा वेळ लक्षात घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदारासाठी स्वतंत्र 'क्यूआर कोड' निर्माण केला आहे. 'बूथ अॅप'च्या माध्यमातून यंदाच्या विधानसभेत प्रथमच त्याचा वापर केला जाणार असून, प्रायोगिक स्तरावर संपूर्ण राज्यात फक्त कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील मतदारांना 'क्यूआर कोड'द्वारे मतदान करता येणार आहे. मतदान केंद्राध्यक्षांकडील स्मार्ट फोनमध्ये 'क्यूआर कोड' स्कॅन करून मतदारांच्या माहितीची पडताळणी झाल्यावर त्यांना मतदान करता येणार आहे. 'केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी 'बूथ अॅप' ही संकल्पना विकसित केली आहे. पंजाब, हरियाणा, बिहार आणि महाराष्ट्र या चार राज्यांमधील सहा मतदारसंघांमध्ये प्रायोगिक स्वरूपात आगामी निवडणुकीत त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यासाठी, राज्यातून कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची निवड करण्यात आली आहे,' अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संतोषकुमार देशमुख आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तृप्ती कोलते-पाटील यांनी दिली. कसबा पेठेतील सर्व मतदान केंद्राध्यक्षांना निवडणूक आयोगाकडून येत्या बुधवारी हे अॅप दिले जाणार आहे. तर, कसबा पेठेतील मतदारांना निवडणूक आयोगाच्या 'व्होटर हेल्पलाइन' या मोबाइल अॅपच्या माध्यमातून 'क्यूआर कोड' तयार करून घेता येणार आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदारांच्या मोबाइलमधील हा 'क्यूआर कोड' मतदान केंद्राध्यक्ष त्यांच्याकडील मोबाइलद्वारे स्कॅन करतील. त्यावर, संबंधित मतदाराची माहिती, त्याचा मतदार यादीतील क्रमांक, त्याचे छायाचित्र उपलब्ध होणार आहे. त्याची खात्री करून संबंधित मतदारांना मतदान करता येणार आहे. 'कसबा पेठ मतदारसंघातील सर्व मतदारांनी 'व्होटर हेल्पलाइन' अॅप डाउनलोड करून 'क्यूआर कोड' तयार करून घ्यावे,' असे आवाहन तृप्ती कोलते-पाटील यांनी केले. स्मार्ट फोन उपलब्ध नसल्यास संबंधित मतदान केंद्राध्यक्षांकडूनत मतदारांसाठी 'क्यूआर कोड' तयार करून दिला जाणार आहे. संपूर्ण कसबा मतदारसंघात येत्या निवडणुकीत ही प्रक्रिया राबविण्यात येणार असून, आशिष महादळकर यांना 'नोडल ऑफिसर' म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. अनेक मतदारसंघांमध्ये दुबार मतदारांची संख्या मोठी असते. निवडणूक आयोगाकडून दुबार नावे कमी करण्यासाठी वारंवार मोहीम घेण्यात येत असली, तरी अनेक नावे मतदार यादीमध्ये कायम असतात. त्यामुळे प्रत्येक मतदारासाठी स्वतंत्र 'क्यूआर कोड' तयार केला जात आहे. निवडणूक आयोगाने तयार केलेल्या अॅपमुळे मतदान केंद्राध्यक्षांनी एखाद्या मतदाराचा 'क्यूआर कोड' स्कॅन केल्यावर त्याला मतदानाची मंजुरी दिली, की पुन्हा संबंधित मतदाराला मतदान करता येणार नाही. या बूथ अॅपमुळे दुसऱ्या मतदारसंघात मतदान करणेही शक्य होणार नाही.
असा करा 'क्यूआर कोड' तयार-
* निवडणूक आयोगाचे व्होटर हेल्पलाइन अॅप डाउनलोड करून घेणे
* अॅपमधील इलेक्टर व्हेरिफिकेशन प्रोग्रॅमवर क्लिक करावे
* तुमच्या मोबाइल क्रमांकाची नोंदणी करावी
* मोबाइल क्रमांकावर आलेल्या 'ओटीपी'द्वारे पडताळणी पूर्ण करावी
* त्यानंतर, तुमचा 'क्यूआर कोड' तयार होईल
* हा 'क्यूआर कोड' मतदान केंद्राध्यक्ष त्यांच्या मोबाइलमध्ये स्कॅन करतील
* दुबार मतदार रोखता येणार

मतदान केंद्रांच्या ठिकाणांत बदल

जिल्ह्यात ७९१५ मतदान केंद्र असून, त्यापैकी ११८७ मतदान केंद्रांतील ठिकाणांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामध्ये शहरातील आठ मतदारसंघांतील ७२८ मतदान केंद्रांचा समावेश आहे. सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर आणण्यात आली आहेत. जिल्हा प्रशासनाकडून मतदानासाठी तयारी करण्यात येत आहे. जिल्ह्यात ७६६६ मतदान केंद्रे होती. २४९ सहायकारी मतदान केंद्रांची वाढ करण्यात आल्याने मतदान केंद्रांची संख्या ७९१५ झाली आहे. सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर असणार आहेत. २८३ केंद्रे तात्पुरती असणार आहेत. जिल्ह्यातील ११८७ मतदान केंद्रांच्या ठिकाणांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामध्ये शहरातील वडगाव शेरी मतदार संघामध्ये १७५, शिवाजीनगरमधील १८, कोथरूडमध्ये १४१, खडकवासलातील १४०, पर्वतीतील ९१, हडपसरमधील १३६ आणि कसबा मतदारसंघातील २७ मतदान केंद्रांचा समावेश आहे. पिंपरी चिंचवडमधील चिंचवड विधानसभा मतदारसंघातील १७५, पिंपरीत १४५ आणि भोसरीतील ४१ मतदान केंद्रे आहेत. जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांतील मतदान केंद्रांमध्येही बदल झाला आहे. त्यामध्ये आंबेगावमध्ये दोन, खेड-आळंदीत दहा, दौंडमध्ये दोन, इंदापूरमध्ये तीन, बारामतीत आठ, पुरंदरमध्ये ३३, भोरमध्ये २७, आंबेगावात तीन मतदान केंद्रे आहेत. जुन्नरमध्ये कोणत्याही मतदान केंद्रात बदल झालेला नाही.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

===================================================================================================================

Maharashtra Assembly Election 2019 Opinion Poll PRAB; प्राब संस्थेचा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकपूर्व जनमत चाचणी सर्वेक्षण (ओपिनियन पोल) अहवाल उपलब्ध

VIDHAN SABHA 2019 ; महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मतदानपूर्व अंदाज

भाजप व शिवसेना युती न झाल्यास मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण व विश्लेषण

युती झाल्यावर संभाव्य जागा; आघाडीला मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण  व विधानसभा मतदारसंघनिहाय  कल

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेचा सर्वेक्षण अहवाल खालील लिंकवर उपलब्ध - 

(A survey report of the Political Research and Analysis Bureau (PREB) organization is available at the following link)
https://www.instamojo.com/bhujbalchandrakant/maharashtra-assembly-election-2019-opinion-p/?ref=store

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.