Saturday 19 October 2019

विधानसभा निवडणूक-2019; मतदानासाठी ११ कागदपत्रे मतदाराची ओळख म्हणून ग्राह्य धरणार

मतदार ओळखपत्र हरवले असेल तर 'ही' ११ कागदपत्रे ठरतील ओळखीचा पुरावा 


मतदानासाठी मतदान केंद्रावर गेल्यावर सगळ्यात अगोदर मतदारांचे छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र मागितले जाते. पण काही कारणामुळे जर मतदार ओळखपत्र उपलब्ध नसेल तर केवळ एवढ्याच कारणासाठी मतदान करणे टाळू नका. कारण जे मतदार ओळखपत्र सादर करू शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त खालील ११ कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याची परवानगी निवडणूक आयोगाने दिली आहेत. भारत निवडणूक आयोगाद्वारे यापूर्वी छायाचित्रासह मतदार चिठ्ठी (फोटो व्होटर्स स्लिप) मतदाराची ओळख कागदपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येत होते. मतदार ओळखपत्राचे वाटप सर्वदूर न झाल्यामुळे त्याऐवजी ही चिठ्ठी वापरली जात होती. परंतु आता मतदारांना मोठ्या प्रमाणावर छायाचित्रांसह मतदार ओळखपत्र वाटप करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता मतदार चिठ्ठी मतदाराचे ओळख कागदपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येणार नाही. प्रवासी भारतीय मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट सोबत आणणे आवश्यक आहे.मतदार ओळखपत्रावरील विसंगत छायाचित्रामुळे मतदाराची ओळख पटणे शक्य नसल्यास मतदारांनी या पर्यायी कागदपत्रांपैकी एक ओळख कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे.
खालील कागदपत्रांपैक्की एक दाखवून मतदान करता येऊ शकते-
१. पासपोर्ट 
२. वाहनचालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) 
३. केंद्र, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपनी याठिकाणचे कर्मचारी असल्यास तेथील ओळखपत्र. 
४. बँक किंवा पोस्ट कार्यालयातून वितरित करण्यात आलेले छायाचित्र असलेले पासबुक. 
५. पॅनकार्ड. 
६. रजिस्ट्रार जनरल आॅफ इंडिया यांच्यातर्फे  नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित केलेले स्मार्ट कार्ड.
७. मनरेगांतर्गत निर्गमित जॉब कार्ड. 
८. भारत सरकारच्या श्रम मंत्रालयाच्या योजनेंतर्गत निर्गमित हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड. 
९. छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन कागदपत्र. 
१०. खासदार, आमदारांचे अधिकृत ओळखपत्र. 
११. आधारकार्ड.

मतदानादिवशी सुट्टी न मिळाल्यास येथे करा तक्रार…

मतदानादिवशी भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक आहे.

विधानसभा निवडणूकीसाठी सोमवार, २१ ऑक्‍टोबर रोजी मतदान होत आहे. निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, मतदान प्रक्रियेत अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, मतदानाचा हक्क बजावावा आदींसाठी निवडणूक आयोगाकडून विविध उपक्रम, योजना राबवण्यात येत आहेत. यातील एक महत्वाचा उपक्रम म्हणजे निवडणूकीच्या दिवशी सर्व दुकाने, आस्थापने, निवासी हॉटेल, नाट्यगृहे, खानावळी, व्यापार, औद्योगिक उपक्रम, निमशासकीय कार्यालये, मंडळे, महामंडळे आदी ठिकाणच्या कामगारांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कामगारांना मतदानाच्या दिवशी देण्यात येणारी सुट्टी भरपगारी असणार आहे. कामगारांना सुट्टी न देणाऱ्या कार्यालयांवर दंडाची कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने सांगितले आहे. त्यासंदर्भात शासनाने २५ सप्टेंबर रोजी परिपत्रक काढले गेले होते. एखाद्या अपवादात्मक परिस्थितीत जर कुठल्याही कंपनीला पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्‍य नसल्यास संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने मतदान क्षेत्रातील कामगारांना सुट्टीऐवजी दोन ते तीन तासांची भरपगारी सवलत देणे आवश्‍यक राहील. परंतु कर्मचाऱ्यांना जर मतदानासाठी सुट्टी मिळत नसेल, किंवा दोन ते तीन तासांची भरपगारी सवलत मिळत नसेल तर मतदारांना जिल्हा कामगार अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदविता येणार आहे. प्रमुख सुविधाकार, बृहन्मुंबई महानगरपालिका व त्यांच्या अधिपत्याखालील महानगरपालिकेतील प्रभागनिहाय कार्यालयामध्ये तक्रार नोंदविता येईल. तसेच राज्याचे कामगार आयुक्त यांचे कार्यालय, कामगार भवन, सी-२०, ई-ब्लॉक, वांद्रे- कुर्ला संकुल, वांद्रे, मुंबई येथे तक्रार नोंदविता येईल असे कामगार आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

Mr. Chandrakant Bhujbal 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

===================================================================================================================

Maharashtra Assembly Election 2019 Opinion Poll PRAB; प्राब संस्थेचा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकपूर्व जनमत चाचणी सर्वेक्षण (ओपिनियन पोल) अहवाल उपलब्ध

VIDHAN SABHA 2019 ; महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मतदानपूर्व अंदाज

भाजप व शिवसेना युती न झाल्यास मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण व विश्लेषण

युती झाल्यावर संभाव्य जागा; आघाडीला मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण  व विधानसभा मतदारसंघनिहाय  कल

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेचा सर्वेक्षण अहवाल खालील लिंकवर उपलब्ध - 

(A survey report of the Political Research and Analysis Bureau (PREB) organization is available at the following link)
https://www.instamojo.com/bhujbalchandrakant/maharashtra-assembly-election-2019-opinion-p/?ref=store

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

====================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
==========================
======================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.