Thursday 3 October 2019

पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात तारखांचा घोळ व विसंगती

कर्जत-जामखेड मतदारसंघातून अर्ज वादाच्या भोवऱ्यात



पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातून मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केले होते यामध्ये दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात तारखांचा घोळ व विसंगती समोर आलेली आहे. संबंधित नोटरी यांनी देखील प्रतिज्ञापत्रात तारखांच्या शिक्क्यांचा मारा केला आहे. भाजप उमेदवार व मंत्री राम शिंदे यांनी नामनिर्देशनपत्रा सोबत मालमत्तेचे दाखल प्रतिज्ञापत्रात सत्यापन मध्ये दिनांक ३०/९/२०१४ अशी चुकीची तारीख नमूद केलेली आहे. तसेच सदरील प्रतिज्ञापत्र नोटरी यांनी नोंदविलेल्या प्रमाणे तारखांनचे 3 शिक्के एकावर एक असे उमटवले आहेत. प्रतिज्ञापत्रात तारखांचा घोळ व विसंगती समोर आलेने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झालेला आहे. राम शिंदे यांच्या प्रतिज्ञापत्रातील चूक प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच प्रतिज्ञापत्रात कोणताही मुद्दा/रकाना रिकामा ठेवणे व चुकीची माहिती नमूद करणे अवैध ठरविण्याचे आदेश निर्गमित केलेले आहेत. तसेच भाजप उमेदवार व मंत्री राम शिंदे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत दाखल गुन्ह्यांचा तपशील दिलेला होता यावेळी मात्र सर्व तपशील टाळण्यात आलेला आहे. कोणताही गुन्हा दाखल नाही व कोणत्याही न्यायालयात खटला प्रलंबित नसल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हंटले आहे. मात्र त्यांच्या वर दाखल खटले व गुन्हे असल्याचा दावा प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून केला जात आहे. उद्या उमेदवारी भरण्याचा अखेरचा दिवस असून परवा म्हणजेच 5 ऑक्टोबर 2019 रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. यावेळी कोणत्याही उमेदवाराने हरकत घेतल्यास काय होणार आहे याकडे राजकीय वर्तुळात लक्ष लागून राहिले आहे. तसेच राम शिंदे यांना चूक सुधारण्याची संधी उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत असल्याने ही बाब गंभीर असल्याचे मनावर घेतल्यास नवीन प्रतिज्ञापत्र दाखल करून पुढील संकट देखील ते टाळू शकतात. मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुन्हे लपविल्याबाबतचे प्रकरण ताजे असताना भाजपच्या मंत्रिमंडळातील सदस्याचे प्रकरण समोर आल्याने कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधान आले आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातून प्रा.राम शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाकडून दोन अर्ज दाखल केले होते. कर्जत-जामखेड मतदारसंघातून सुमित कन्हैय्या पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज देणे व स्वीकारण्यास बुधवारी (२ ऑक्टोबर) महात्मा गांधी जयंतीची सार्वजनिक सुट्टी आहे. त्यामुळे आता गुरुवारी (३ ऑक्टोबर) व शुक्रवारी (४ ऑक्टोबर) असे शेवटचे दोन दिवस या प्रक्रियेसाठी राहिले आहेत. दरम्यान नगर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी जन्मगावी चौंडी (ता. जामखेड) येथे सुमारे सहा कोटी रुपये खर्चून बांधलेला आलिशान बंगला दक्षिण व पूर्व बाजूला रस्त्यात अतिक्रमण करून बांधला असल्याचा दावा कर्जत येथील माजी जिल्हा परिषद सदस्य अॅड. कैलास शेवाळे यांनी यापूर्वी केला होता तर २००९ च्या विधानसभा निवडणूक शपथपत्रात प्रा. शिंदेंनी पाच लाख ८६ हजार व २०१४ च्या निवडणुकीत ५६ लाख १६ हजाराची स्वतःची संपत्ती दाखवली असताना बंगल्यासाठी एवढे पैसे कोठून आले, याची चौकशी करण्याची मागणी सक्तवसुली संचालनालयाकडे (ईडी) कडे अॅड. शेवाळे यांनी केली होती. तसेच प्रा. राम शिंदे यांचे खरे नाव रामदास शिंदे असून, त्यांनी 'रामदास'ऐवजी 'राम' नाव लावणे सुरू केले आहे. सेट-नेट परीक्षा उत्तीर्ण न होता वा पीएचडी न मिळवता ते स्वतःपुढे 'प्रा.' अशी उपाधी लावतात, त्यांचे शिक्षण एम.ए. बी.एड आहे, त्यामुळे त्यांनी नावात व पदवीतही खोटेपणा केला आहे असाही दावा अॅड. शेवाळे यांनी केला होता यामुळे अशा स्वरूपाच्या वादात शिंदे आहेत. दरम्यान राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी कर्जत जामखेड मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला. रोहित पवार यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती 27 कोटी 44 लाख 29 हजार 200 रुपये एवढी असल्याचे जाहीर केली . त्यांच्याकडे वारसा हक्काने आलेली 3 कोटी 45 लाखांची संपत्ती आहे. त्यांच्या बँक खात्यात 2 कोटी 75 लाख 31 हजार रुपये आहेत. बॉन्ड आणि शेअर्समध्ये त्यांनी 9, 65, 11,071 एवढी गुंतवणूक केलीय. रोहित पवार यांच्याकडे लॉगीनेस, ओमेगा, रोलेक्स, कार्टर, टॅग ह्युअर, या कंपन्यांची घड्याळं असल्याचे रोहित पवार यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात सांगितले आहे. शरद पवारांचे नातू असलेले रोहित हे पवार घराण्याच्या तिसऱ्या पिढी म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. रोहित यांची लढत भाजपचे नेते आणि मंत्री राम शिंदे यांच्याशी होणार आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

===============================

Maharashtra Assembly Election 2019 Opinion Poll PRAB; प्राब संस्थेचा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकपूर्व जनमत चाचणी सर्वेक्षण (ओपिनियन पोल) अहवाल उपलब्ध

VIDHAN SABHA 2019 ; महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मतदानपूर्व अंदाज

भाजप व शिवसेना युती न झाल्यास मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण व विश्लेषण

युती झाल्यावर संभाव्य जागा; आघाडीला मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण  व विधानसभा मतदारसंघनिहाय  कल

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेचा सर्वेक्षण अहवाल खालील लिंकवर उपलब्ध - 

(A survey report of the Political Research and Analysis Bureau (PREB) organization is available at the following link)
https://www.instamojo.com/bhujbalchandrakant/maharashtra-assembly-election-2019-opinion-p/?ref=store

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.