Monday 14 October 2019

अशी आहे मुख्यमंत्र्यांची प्रचार यंत्रणा!

अशी आहे मुख्यमंत्र्यांची प्रचार यंत्रणा! 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर दक्षिण-पश्‍चिम या मतदारसंघात हायटेक प्रचार सुरु असून नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा कार्यरत असल्याने सहकाऱ्यांवर जबाबदारी सोपवून मुख्यमंत्री बिधास्तपणे संपूर्ण राज्यात प्रचारात व्यस्त आहेत. असा होत आहे मुख्यमंत्र्यांचा प्रचार
* वाॅर रूममध्ये 12 जणांची कोअर टीम
* ३७८ बूथ प्रमुखांना प्रशिक्षण देऊन त्यांना थर्मल प्रिंट असलेल्या मशिन्स दिल्या
* मुख्यमंत्र्यांचा हायटेक प्रचार रणजित आडे यांच्या नेतृत्वात २० जणांची आयटी टीम कार्यरत
* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तब्बल ५०१ फेसबुक पेजेस
* मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात झालेल्या कामांची माहिती दिली जाते.
* इन्स्टाग्राम, ट्विटरवर संदेश दिले जातात
* थर्मल प्रिंट असलेल्या मशिन्स जीपीएसने जोडण्यात आल्या आहेत
* कोणत्या बूथवर किती प्रती निघाल्या, किती घरी संपर्क झाला याची इत्थंभूत माहिती वाॅररूममधील नियंत्रण कक्षात कळते.
* प्रभागातील कामांनुसार पोस्टर्स प्रभागानुसार कामे वाटून देण्यात आली आहेत.
* कार्यकर्त्यांचे प्रभागानुसार व्हाॅट‌्सअॅप ग्रुप आहेत.
* प्रत्येक दोन ते तीन बूथमागे एक आयटी निरीक्षक नेमला आहे.
* प्रभागातील कामकाजावर लक्ष राहील. कोणता कार्यकर्ता कोणत्या वेळी कुठे राहील याचे वेळापत्रक ठरलेले आहे. 
* काम होत आहे की नाही यावर  आयटी निरीक्षकाची देखरेख. 
* सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत आयटी सेलचे काम सुरू असते.
*  मुख्यमंत्र्यांचे विश्वासू आणि महापालिकेतील सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांच्यावर मतदारसंघाच्या प्रचाराची जबाबदारी आहे.
* घरोघरी संपर्क साधणे, पत्रके आणि मुख्यमंत्र्यांच्या कामांची माहितीपुस्तिका वितरित केली जाते.
* पदयात्रा, कोपरा सभांद्वारे जनसंपर्क सुरू आहे.
* रोज सकाळी दोन तास व सायंकाळी दोन तास पदयात्रेद्वारे जनसंपर्क केला जातो. दहा किमी पदयात्रा होते.
* कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ७० टक्के घरी संपर्क करण्यात आला.
* ९ जणांची कोअर कमिटी संपूर्ण कार्यक्रमांचे नियाेजन करते.
* ७ प्रभागाला सात प्रभारी निवडणूक प्रमुख व संयोजक नेमण्यात आले आहेत.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

=============================================================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.