Tuesday, 15 October 2019

राजकीय पक्षांची महिलांच्या मतांवर मदार मात्र राजकारणातील सहभागावर उदासीनता; विधानसभा निवडणुकीत महिला उमेदवारांचे प्रमाण नगण्य

विधानसभा निवडणुकीत महिलांचा सहभाग अत्यल्प 

विधानसभा निवडणूक- 2019
निवडणूक
एकूण
महीला उमेदवार
वर्ष
उमेदवार
उमेदवार
विजयी
2019
3237
235
?
2014
4119
277
20
2009
3559
211
11
2004
2678
157
12
1999
2006
86
12
1995
4714
247
11
1990
3772
147
6
वयोगट
उमेदवार संख्या
25 ते 30
15
31 ते 40
86
41 ते 50
67
51 ते 60
36
61 अधिक
10
विश्लेषण न केलेले
21
एकूण महीला
235
विधानसभा निवडणूक 2019 साठी विविध राजकीय पक्ष व अपक्ष मिळून 235 महिला उमेदवार आहेत.या निवडणुकीत एकूण 3 हजार 237 उमेदवार असून यामध्ये 3,001 पुरुष उमेदवारांचा समावेश आहे.चिंचवड मतदारसंघात जनहित लोकशाही पक्षामार्फत नितीश दगडू लोखंडे हे तृतीयपंथी उमेदवार निवडणूक लढवित आहेत. राजकीय पक्षांची महिलांच्या मतांवर मदार आहे मात्र राजकारणातील त्यांच्या सहभागावर उदासीनता असल्याचे दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीत महिला उमेदवारांचे प्रमाण नगण्य असून उमेदवारीची समान संधी देण्याची कोणत्याही राजकीय पक्षांची इच्छा नसल्याचे या निवडणुकीतील उमेदवारी यादीवरून दिसून येत आहे. राजकीय पक्षांना महिलांची फक्त मते पाहिजेत मात्र त्यांचा सहभाग नको आहे. राजकीय पक्षांकडून महिलांना उमेदवारीची समान संधी दिली जात नाही. ३३% महिला आरक्षण विधेयक अनेक वर्ष प्रलंबित आहे त्यावर कोणताही पक्ष चकार शब्द काढत नाही. महिलांना 50 टक्के आरक्षण तर सोडाच ३३ टक्के देखील राजकारणात आरक्षण तुलनेत उमेदवारीची संधी दिली जात नाही यावरून राजकीय पक्षांची महिलांबाबत किती उदासीनता आहे हे निदर्शनास येते. महिलांना समान हक्क देण्याबाबत मिळकतीत 50 टक्के वाटा/हक्क कायद्याने प्रधान केले आहेत. त्याप्रमाणे राजकारणात 33 टक्के का? राजकारणातही महिलांना 50 टक्के जागा मिळाल्या पाहिजे. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजेच महापालिका/नगरपरिषद/पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतमध्ये 50 टक्के जागा महिलांना राखीव आहेतच. त्याप्रमाणे विधानसभा व लोकसभा निवडणुकीत देखील पाहिजे. महिलांच्या 33 टक्के आरक्षणाचे विधेयक कित्येक वर्ष प्रलंबित आहे. या आरक्षणाचे विधेयकाबाबत सर्वच राजकीय पक्ष उदासीन आहेत. महिलांचा केवळ मतदानातील सहभाग व सहानुभूतीने मतदान घेतले जाते मात्र त्यांचा उमेदवारीचा वाटा व राजकारणातील सहभाग करून घेण्यास राजकीय पक्ष अजूनही पुरुषांच्या तुलनेत महिलांचा दुजाभाव करीत आहेत.कायदा झाल्याशिवाय महिलांना राजकारणात पुरुषांच्या तुलनेत स्थान मिळू शकत नाही. एकूण उमेदवारांच्या तुलनेत राज्यात जेमतेम १० टक्के महिला रिंगणात आहेत. विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात यावेळी भाजप- शिवसेना, काँग्रेस- राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या प्रमुख पक्षांसह आघाडी आणि अपक्ष असे १३१ पक्षांचे ३,२३७ आपले राजकीय भाग्य आजमावत आहेत. यामध्ये एकूण २३५ महिला उमेदवारांचा समावेश आहे. चिंचवड मधून एक तृतीयपंथी उमेदवार रिंगणात आहे. देशात आणि राज्यातही सर्वात मोठा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि विधिमंडळ, संसदेत महिलांना आरक्षण देण्याची ग्वाही देणाऱ्या भारतीय जनता पार्टीने राज्यात १६४ उमेदवार विधानसभेच्या आखाडय़ात उतरविले असून त्यापैकी केवळ १०.३६ टक्के म्हणजेच १७ महिलांना उमेदवारी दिली  आहे. तर काँग्रेसच्या अध्यक्षा महिला असताना १४७ उमेदवारांपैकी १०.२० टक्के म्हणजेच १५ महिलांना उमेदवारी दिली आहे. देशात सर्वप्रथम स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना राजकीय आरक्षण देणाऱ्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १२१ मतदार संघातून आपले उमेदवार उभे करताना केवळ सात टक्के म्हणजेच नऊ महिलांना तिकीट दिले आहे. तर १२६ जागा लढविणाऱ्या शिवसेनेने आठ जागांवर म्हणजेच सहा टक्के  जागांवर महिलांना उमेदवारी दिली आहे. २३५ जागा लढविणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने  चार टक्के जागांवर म्हणजेच १० महिलानां उमेदवारी दिली आहे राज ठाकरे यांच्या मनसेने पाच महिलांना उमेदवारी दिली आहे. मायावती यांची बहुजन समाज पार्टी राज्यात सर्वाधिक २६२ जागा लढवत असून त्यांनीही केवळ सहा टक्के महिलांना उमेदवारी दिली आहे.राज्यात एकूण ३२३९ उमेदवार रिंगणात असले, तरी त्यात फक्त 235 महिलांनाच आमदारकी लढविण्याची संधी मिळाली आहे. भाजप आणि काँग्रेसने प्रत्येकी पावणेपाच टक्के महिलांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीने पावणेतीन टक्के आणि शिवसेनेने अडीच टक्के महिला उमेदवारांना संधी दिली आहे. विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत २७७ महिलांनी निवडणूक लढविली होती. राज्याच्या इतिहासात प्रथमच सर्वाधिक 20 महिलांना निवडणुकीत यश मिळाले होते. 

मुंबईत केवळ नऊ टक्के महिला उमेदवार

निवडणुकीच्या वेळी व निवडणुकीच्या आधीदेखील राजकीय पक्ष महिला सुरक्षेची आश्वासने देत असतात. महिला आरक्षणाचा विषय तर राजकीय पक्षांनी कधीच सोडला आहे. पण महिलांना राजकीय पटलावर समान संधी मिळण्यातही पक्षांचा हात काहीसा आखडता असल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीत मुंबईभरातील एकूण उमेदवारांमध्ये फक्त नऊ टक्के महिलांना प्रतिनिधीत्व मिळाले आहे. मुंबई शहर व उपनगर मिळून ३६ मतदारसंघांत एकूण ३३३ उमेदवार रिंगणात आहेत. शहरातील दहा मतदारसंघांत ८९ तर उपनगरातील २६ मतदारसंघांत २४४ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. पण या ३३३ पैकी महिला उमेदवारांचा आकडा फक्त ३० आहे. शहर जिल्ह्यात तर केवळ सात तर, उपनगर जिल्ह्यात २३ महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शहर आणि उपनगर मिळून ३६ पैकी १६ मतदारसंघांमध्ये एकही महिला उमेदवार नाही. या १६ पैकी सात मतदारसंघ शहर जिल्ह्यातील आहेत. याचाच अर्थ शहर जिल्ह्यातील फक्त तीन मतदारसंघात महिलांना निवडणूक लढण्याची संधी मिळाली आहे. शहरातील वडाळा, माहीम, वरळी, शिवडी, मलबार हिल, मुंबादेवी व कुलाबा आणि उपनगरातील बोरिवली, मागाठाणे, जोगेश्वरी पूर्व, चारकोप, अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, मानखुर्द, कुर्ला आणि वांद्रे पश्चिम या मतदारसंघांमध्ये एकही महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नाही.
Maharashtra Candidates (Election 2019)
All
7537
Accepted
4601
Rejected
1302
Withdrawn
1634
Contesting
3237

Maharashtra  Assembly Election-2019
अ.क्र.
राजकीय पक्ष
महिला उमेदवार
प्रमाण
1
Independent
109
30.56
2
Bharatiya Janata Party
14
4.86
3
Indian National Congress
14
4.86
4
Bahujan Samaj Party
13
4.51
5
Nationalist Congress Party
8
2.78
6
Vanchit Bahujan Aaghadi
8
2.78
7
Shiv Sena
7
2.43
8
Bahujan Mukti Party
5
1.74
9
Maharashtra Navnirman Sena
5
1.74
10
Bahujan Maha Party
4
1.39
11
Peoples Party of India(Democratic)
4
1.39
12
Peasants And Workers Party ofIndia
3
1.04
13
Rashtriya Jansambhavna Party
3
1.04
14
Sambhaji Brigade Party
3
1.04
15
Aam Aadmi Party
2
0.69
16
Akhil Bharat Hindu Mahasabha
2
0.69
17
All India Majlis-E-Ittehadul Muslimeen
2
0.69
18
Ambedkarite Party of India
2
0.69
19
Bahujan Vikas Aaghadi
2
0.69
20
Baliraja Party
2
0.69
21
Communist Party of India(Marxist)
2
0.69
22
Hindustan Janta Party
2
0.69
23
Samajwadi Party
2
0.69
24
Akhil Bharatiya Manavata Paksha
1
0.35
25
Akhil Bharatiya Sena
1
0.35
26
Ambedkarite Party of India
1
0.35
27
Bharat Prabhat Party
1
0.35
28
Gondvana Gantantra Party
1
0.35
29
Indian Union Muslim League
1
0.35
30
Janata Congress
1
0.35
31
Janata Dal (Secular)
1
0.35
32
Janhit Lokshahi Party
1
0.35
33
Maharashtra Kranti Sena
1
0.35
34
National Socialist Party (U)
1
0.35
35
Prabuddha Bharat Prajasattak Party
1
0.35
36
Prahar Janshakti Party
1
0.35
37
Rashtriya Kisan Bahujan Party
1
0.35
38
Republican Bahujan Sena
1
0.35
39
Republican Party of India (Social)
1
0.35
40
Socialist Unity Centre of India(communist)
1
0.35
Total
235


Mr. Chandrakant Bhujbal 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

=========================================

वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले वृत्त लिंकhttps://www.esakal.com/maharashtra/maharashtra-vidhansabha-2019-mla-women-percentage-increase-politics-224533

Of nearly 3,300 candidates in the fray this time, less than 10% are women

Push For Parties To Give Equal Share
Women represent just 7% of the current Vidhan Sabha strength in the state.
Of the 288 seats in the Maharashtra assembly, only 20 are occupied by women. In the upcoming elections, too, around 200 women candidates are contesting the election, either on party tickets or as independents, out of the approximately 3,000 candidates in the fray for the October 21 polls.
Women politicians pointed out that while the gender ratio in voter registration has improved, parties still shy away from fielding women candidates. They said that political parties should give more opportunities to women. Only if there is 50 per cent reservation for women in elections, as is done in panchayats, will the women be adequately represented, they said.
Poll analyst Chandrakant Bhujbal told TOI that only 235 women candidates are in the fray out of the total 3,237 candidates in the 2019 assembly elections. Among them, 3,001 are male candidates, while Chinchwad assembly constituency has a transgender candidate. ‘When there is pressure for equal representation of women and men in every field, why should it not be applicable in politics,’’ asked Bhujbal. Even the 33 per cent reservation for women in general elections is pending and no party is willing to take up or implement it, he pointed out.
Women candidates in the fray said that it is injustice on the part of the party and even the government not to have equal representation. ‘While the participation of female voters is encouraged, why there is less than 10% representation of women candidates in the elections,” asked a women candidate from a party. Pune’s Gokhale Institute of Economics and Politics had come out with a study which said that most women contest polls only because there is reservation and not because they are given a chance to contest polls.
Altogether 668 women contested the 2014 Lok Sabha elections as against 45 in 1957. However, 65 women entered the Lok Sabha in 2014 as against 22 in 1957, according to the Election Commission figures. The success rate of women Lok Sabha candidates has declined from nearly 50 per cent in 1957 to nearly 12 per cent in 2014. A 2017 report on the number of women parliamentarians by Inter-Parliamentary Union (IPU) and UN Women placed India at148 in the ranking of 193 United Nations member countries.

सकाळ वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले वृत्त-

आमदारकीचा टक्का वाढण्याची महिलांना आस

महिला सक्षमीकरणाच्या घोषणा करणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांकडूनच महिलांना विधानसभेच्या उमेदवारीसाठी डावलले जात असल्याचे यंदाच्या निवडणुकीतून दिसून आले आहे. राज्यात एकूण ३२३९ उमेदवार रिंगणात असले, तरी त्यात फक्त 235 महिलांनाच आमदारकी लढविण्याची संधी मिळाली आहे. भाजप आणि काँग्रेसने प्रत्येकी पावणेपाच टक्के महिलांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीने पावणेतीन टक्के आणि शिवसेनेने अडीच टक्के महिला उमेदवारांना संधी दिली आहे. विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत २७७ महिलांनी निवडणूक लढविली होती. त्या वेळी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस स्वतंत्रपणे लढले होते. त्यामुळे स्वाभाविकच उमेदवारांची संख्या जास्त होती. त्यातून २० महिला आमदारकीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या. मात्र, या पूर्वीच्या निवडणुकांचा आढावा घेतला, तर १९७२ मध्ये सर्वाधिक म्हणजे २८ महिला आमदार झाल्या होत्या. त्यापाठोपाठ १९८० आणि २०१४ मध्ये प्रत्येकी २० महिला आमदार झाल्या. सर्वांत कमी म्हणजे अवघ्या सहा महिला १९९० च्या निवडणुकीत विजयी झाल्या होत्या.  यंदाच्या निवडणुकीत 235 पैकी 109 महिला अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजप आणि काँग्रेसने प्रत्येकी १४ महिलांना उमेदवारी दिली आहे. तर, बहुजन समाज पक्षाने १३, राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने प्रत्येकी ८, तर शिवसेनेने ८ महिलांना संधी दिली आहे. पुणे शहरातून भाजपच्या शहराध्यक्षा माधुरी मिसाळ पर्वती मतदारसंघातून तिसऱ्यांदा, तर महापौर मुक्ता टिळक पहिल्यांदाच कसब्यातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने पर्वतीमध्ये शहरात अश्‍विनी कदम यांना संधी दिली आहे, तर जिल्ह्यात जुन्नर मतदारसंघात शिवसेनेच्या बंडखोर आशा बुचके रिंगणात आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीच्या महिला उमेदवारांमध्ये लढत होणारा पर्वती हा राज्यातील एकमेव मतदारसंघ आहे.

रजनी पाटील (माजी खासदार) -

स्थानिक स्वराज्य संस्थांतील महिलांचे आरक्षण ३३ वरून ५० टक्‍क्‍यांपर्यंत पोचले, ही चांगली बाब आहे. त्यामुळे नवे नेतृत्व निर्माण होऊ लागले आहे. परंतु, लोकसभा-विधानसभेत अद्याप महिलांना आरक्षण मिळालेले नाही. उमेदवारीच्या वेळी मनी पॉवर, मसल पॉवर, इलेक्‍ट्रोल मेरिटला महत्त्व दिले जाते. त्यामुळे महिलांना संधी मिळत नाही. म्हणून, सर्वपक्षीय महिलांनी एकत्र येऊन किमान ३३ टक्के आरक्षणासाठी आग्रह धरला पाहिजे. 

चंद्रकांत भुजबळ (पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) -

राजकारणात सक्रिय असलेल्या घराण्यांशी संबंधितच महिलांना प्रमुख राजकीय पक्षांकडून संधी मिळत आहे. सर्वसामान्य कुटुंबांतील महिलांना अजूनही डावलले जात आहे, असेच उमेदवारीच्या यादीवरून दिसून येते.
=========================================

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

===================================================================================================================

Maharashtra Assembly Election 2019 Opinion Poll PRAB; प्राब संस्थेचा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकपूर्व जनमत चाचणी सर्वेक्षण (ओपिनियन पोल) अहवाल उपलब्ध

VIDHAN SABHA 2019 ; महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मतदानपूर्व अंदाज

भाजप व शिवसेना युती न झाल्यास मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण व विश्लेषण

युती झाल्यावर संभाव्य जागा; आघाडीला मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण  व विधानसभा मतदारसंघनिहाय  कल

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेचा सर्वेक्षण अहवाल खालील लिंकवर उपलब्ध - 

(A survey report of the Political Research and Analysis Bureau (PREB) organization is available at the following link)
https://www.instamojo.com/bhujbalchandrakant/maharashtra-assembly-election-2019-opinion-p/?ref=store

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

====================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
==========================
======================


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.