Tuesday 22 October 2019

कुठलंही बटण दाबलं तरी मत कमळालाच!, खर काय पहा, साताऱ्यातील वास्तविकता

ईव्हीएम तांत्रिक बिघाड; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील नवलेवाडी गावातील मतदान केंद्रातील ईव्हीएममध्ये घोळ झाल्याचे वृत्त झळकल्यानंतर सोशल मिडीयावर अफवांचे पीक आले. मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान दिल्यानंतरही व्हीव्हीपॅटमध्ये कमळ चिन्ह असलेल्या भाजपच्या उमेदवाराला मत जात असल्याचे काही गावकऱ्यांच्या लक्षात आल्याचे गावकऱ्यांनी तक्रार केली होती. तांत्रिकदृष्ट्या बिघाड झाल्याच्या घटनेचे राजकीयदृष्ट्या भांडवल करून मतदारांमध्ये संशयास्पद वातावरण निर्माण करण्यात आले असल्याचे उघडकीस आले आहे. घड्याळाला दिलेले मत कमळाला जाते हे वृत्त खोडसाळपणाचे व असत्य पाहणीत आढळून आलेले आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात सोमवारी मतदान पार पडले, मात्र साताऱ्यातील खटाव तालुक्यातील नवलेवाडी या मतदारसंघात घड्याळाला दिलेलं मतदान कमळाला होत असल्याचा प्रकार घडल्याची माहिती समोर आली. मात्र या संपूर्ण प्रकरणात काही तथ्य नाही अशी कोणतीही घटना घडली नाही असे स्पष्टीकरण निवडणूक निर्णय अधिकारी किर्ती नलावडे यांनी दिले आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणूक आणि कोरेगाव विधानसभा निवडणुकीसाठी नवलेवाडीत मतदान सुरु होते. यावेळी सकाळी साडेपाच वाजता राष्ट्रवादी उमेदवारांचे प्रतिनिधी दिपक पवार आणि दिलीप वाघ यांनी हे मतदानापूर्वी उपस्थित होते. अभिरुप मतदानावेळी व्हीव्हीपॅट मतदान चिठ्ठीच्या मुद्रणाबाबत दोन्ही प्रतिनिधींनी आक्षेप घेतला नाही. इतकचं नाही तर सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु होती त्यावेळीही कोणत्याही मतदारांनी आक्षेप घेतला नाही. मात्र त्यानंतर दिपक पवार यांनी आक्षेप घेतल्यानंतर त्यांना संबंधित केंद्राध्यक्ष यांनी चाचणी मतदानांसाठी जोडपत्र १५ भरुन देण्याची सूचना केली मात्र त्यांनी तसे करण्यास नकार दिला असं निवडणूक आयोगाने सांगितले आहे. कोरेगाव मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. मॉक ड्रीलवेळी ईव्हीएम चांगले होते. मात्र, सकाळी 10-11 वाजण्याच्या सुमारास ईव्हीएममध्ये घडाळ्याचे बटन दाबले असता कमळाचे म्हणजेच भाजपाच्या उमेदवाराला मत जात असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, यामागची माहिती जाणून घेतली असता खरे सत्य समोर आले.सकाळी 10 च्या सुमारास या मशीनमध्ये तांत्रिक बिघाड आला. यामुळे मतदान करताना एरर दाखवू लागले. वरचे किंवा खालच्या बाजुचे कुठलेही बटन दाबले जात असता ते दाबलेच जात नव्हते. याबाबतची तक्रार जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. या प्रकाराची माहिती राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना लागली. ईव्हीएममध्ये बिघाड की कमळाला मतदान होते याची चाचपणीही त्यांनी केली आणि खरा प्रकार समोर आला.योगायोगाने शिंदे यांच्या मुलाच्या कारचा चालक नवलेवाडीचा रहिवासी होता. यामुळे शिंदे यांच्या मुलाने मतदान केंद्रावर जाऊन मशीनची पाहणी केली. यावेळी कोणतेच बटन दाबले जात नसल्याचे दिसून आले. शेवटी हे मशीन त्यांच्यासमोरच रिस्टार्ट करण्यात आले आणि मतदान पुन्हा सुरळीत सुरू झाले. यामुळे या मशीनच्या बिघाडाची किंवा तक्रारीची कोणतीच नोंद झाली नाही. मात्र, सकाळपर्यंत घड्याळाचे बटण दाबले तरी मत कमळाला जात असल्याची अफवा राज्यभरात पसरली होती.
Mr. Chandrakant Bhujbal 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

===================================================================================================================

Maharashtra Assembly Election 2019 Opinion Poll PRAB; प्राब संस्थेचा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकपूर्व जनमत चाचणी सर्वेक्षण (ओपिनियन पोल) अहवाल उपलब्ध

VIDHAN SABHA 2019 ; महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मतदानपूर्व अंदाज

भाजप व शिवसेना युती न झाल्यास मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण व विश्लेषण

युती झाल्यावर संभाव्य जागा; आघाडीला मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण  व विधानसभा मतदारसंघनिहाय  कल

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेचा सर्वेक्षण अहवाल खालील लिंकवर उपलब्ध - 

(A survey report of the Political Research and Analysis Bureau (PREB) organization is available at the following link)
https://www.instamojo.com/bhujbalchandrakant/maharashtra-assembly-election-2019-opinion-p/?ref=store

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
==========================
======================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.