Saturday, 5 October 2019

राज्यात शिवसेना आणि भाजप महायुती व काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये या ठिकाणी बंडखोरी

राज्यात या ठिकाणी बंडखोरी

राज्यात शिवसेना आणि भाजप युतीला बंडखोरीची प्रमुख पक्षांमध्ये लागण झालेली आहे. येत्या दोन दिवसात या बंडखोरांचे मन वळवण्यात यश न आल्यास दोन्ही पक्षांची डोकेदुखी वाढणार आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीने युतीच्या बंडखोरांना अनेक ठिकाणी उमेदवारी देऊन नवी राजकीय चाल केली आहे. त्यामुळे युती आणि आघाडीच्या उमेदवारांविरोधात उभे ठाकलेले बंडखोर त्यांचा अर्ज मागे घेतात का ते सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे.

या मतदारसंघात भाजप उमेदवारांविरोधात झालेली बंडखोरी-

यवतमाळ – भाजपचे विद्यमान आमदार पालकमंत्री मदन येरावारांविरोधात शिवसेनेच्या संतोष ढवळेंची बंडखोरी
रामटेक – भाजपच्या मल्लिकार्जुन रेड्डींविरोधात शिवसेनेच्या आशिष जैस्वालांची बंडखोरी
वाशिम – भाजप उमेदवार लखन मलिकांविरोधात शिवसेनेच्या निलेश पेंढारकर यांची बंडखोरी
जत – भाजप उमेदवार आमदार विलासराव जगतापांविरोधात डॉ. रवींद्र आरळींची सर्वपक्षीय आघाडीतर्फे बंडखोरी
मिरज – भाजप उमेदवार सुरेश खाडेंविरोधात भाजपच्या माजी नगरसेविका शुभांगी आनंदा देवमानेंची बंडखोरी
शिराळा – भाजप उमेदवार आमदार शिवाजीराव नाईकांविरोधात भाजपच्या सम्राट महाडिकांची बंडखोरी
सांगली – भाजप उमेदवार आमदार सुधीर गाडगीळ यांच्याविरोधात भाजपाचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांची बंडखोरी
वाई – भाजप उमेदवार मदन भोसलेंविरोधात शिवसेनेच्या पुरुषोत्तम जाधवांची बंडखोरी
अहमदपूर – भाजपच्या विनायक जाधव पाटील यांच्या विरोधात भाजपच्या दिलीप देशमुखांची बंडखोरी
आष्टी-पाटोदा-शिरुर – भाजपच्या भीमराव धोंडेंविरोधात भाजपच्या जयदत्त धस यांची बंडखोरी (अर्ज मागे घेण्याची शक्यता)
कणकवली – भाजप उमेदवार नितेश राणेंच्या विरोधात बंडखोर सतिश सावंतांना शिवसेनेचा पाठिंबा
कणकवली – भाजप उमेदवार नितेश राणेंच्या विरोधात भाजपच्या संदेश पारकरांची बंडखोरी
पेण भाजपच्या रवीशेठ पाटील यांच्याविरोधात शिवसेनेच्या नरेश गावंडांची बंडखोरी
कल्याण पूर्व – भाजप उमेदवार आमदार गणपत पाटलांच्या विरोधात शिवसेनेचे नगरसेवक धनंजय बोडारेंची बंडखोरी
नाशिक पश्चिम – भाजपच्या सीमा हिरेंच्या विरोधात शिवसेनेच्या विलास शिंदे, सुधाकर बडगुजर, मामा ठाकरेंची बंडखोरी
नाशिक पूर्व – भाजप उमेदवार राहुल ढिकलेंच्या विरोधात भाजपाचे माजी शहराध्यक्ष आणि माजी आमदार बाळासाहेब सानप यांची राष्ट्रवादीच्या तिकिटावर बंडखोरी
मुक्ताईनगर – भाजपच्या रोहिणी खडसेंच्या विरोधात शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटलांची बंडखोरी
नंदुरबारला – भाजपच्या विजयकुमार गावितांच्या विरोधात भाजप आमदार उदयसिंग पाडवींची बंडखोरी
मावळ – भाजपच्या बाळा भेगडेंच्या विरोधात रवींद्र भेगडेंचं बंड
मावळ – भाजपच्या बाळा भेगडेंच्या विरोधात भाजपच्या सुनिल शेळके यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी
खडकवासला – भाजपच्या भिमराव तापकिरांच्या विरोधात शिवसेनेच्या रमेश कोंडेंची बंडखोरी
कसबा – भाजपच्या मुक्ता टिळकांच्या विरोधात शिवसेनेच्या विशाल धनवडेंची बंडखोरी
माण – भाजपचे उमेदवार जयकुमार गोरेंविरोधात सख्खे भाऊ शेखर गोरेंची शिवसेनेतून उमेदवारी
वर्सोवा – भाजप-शिवसंग्राम उमेदवार भारती लव्हेकरांच्या विरोधात राजुल पटेलांची बंडखोरी
मीरा भाईंदर – भाजप उमेदवार नरेंद्र मेहतांविरोधात माजी महापौर आणि भाजप नगरसेविका गीता जैन यांची बंडखोरी
ऐरोली – भाजप उमेदवार गणेश नाईकांविरोधात शिवसेनेच्या विजय नाहटांची बंडखोरी (अर्ज मागे घेण्याची शक्यता)

या मतदारसंघात शिवसेना उमेदवारांविरोधात बंडखोरी-

अंधेरी – मतदारसंघात शिवसेना उमेदवार रमेश लटकेंविरोधात भाजपचे नगरसेवक मुरजी पटेलांची बंडखोरी
वांद्रे मतदारसंघात शिवसेना उमेदवार विश्वनाथ महाडेश्वरां विरोधात शिवसेनेच्या विद्यमान आमदार तृप्ती सावंतांची बंडखोरी
भिवंडी पूर्व – शिवसेना उमेदवार विरोधात भाजपा शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांची बंडखोरी
कल्याण पश्चिम – शिवसेना उमेदवार विश्वनाथ भोईरांच्या विरोधात भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र पवारांची बंडखोरी
खेड दापोली – शिवसेनेच्या योगेश कदमांच्या विरोधात भाजपच्या केदार साठेंची बंडखोरी
सावंतवाडी – शिवसेना उमेदवार गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांच्या विरोधात भाजपच्या राजन तेलींची बंडखोरी
गुहागर – शिवसेनेच्या भास्कर जाधवांच्या विरोधात भाजपच्या विनय नातूंची बंडखोरी
गुहागर – शिवसेनेच्या भास्कर जाधवांविरोधात शिवसेनेच्या सहदेव बेटकर यांची राष्ट्रवादीत प्रवेश करत महाआघाडीतर्फे उमेदवारी
गुहागर – शिवसेनेच्या भास्कर जाधवांच्या विरोधात भाजपचे जिल्हाध्यक्ष रामदास राणेंचं बंड
चिपळूण – शिवसेनेच्या विरोधात भाजपच्या तुषार खेतल यांची बंडखोरी
देवळाली – शिवसेनेच्या योगेश घोलप यांच्या विरोधात भाजप नगरसेविका सरोज अहिरेंची राष्ट्रवादीत प्रवेश करून उमेदवारी
चोपडा – शिवसेनेच्या उमेदवार लताबाई सोनवणेंच्या विरोधात भाजपच्या मगन सैंदाणे आणि शामकांत सोनवणेंची बंडखोरी
अक्कलकुवा – शिवसेनेच्या आमशा पाडवी यांच्या विरोधात भाजपच्या नागेश पाडवींची बंडखोरी
बुलडाणा – शिवसेना उमेदवार विरोधात माजी आमदार विजयराज शिंदे यांची वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर बंडखोरी
सिल्लोड – शिवसेना उमेदवार अब्दुल सत्तारांविरोधात अपक्ष उमेदवार प्रभाकर पलोदकर यांना भाजप नाराजांचा पाठिंबा
वैजापूर – शिवसेनेच्या रमेश बारणारेंविरोधात भाजपच्या एकनाथ जाधव आणि दिनेश परदेशींची बंडखोरी
पालघर – शिवसेना उमेदवाराविरोधात शिवसेना आमदार अमित घोडा यांचा राष्ट्रवादीत प्रवेश, ती जागा काँग्रेसला दिली असूनही त्यांनी काँग्रेस उमेदवार योगेश नमविरोधात बंडखोरी केली.
बोईसर – शिवसेनेच्या विलास तरेंविरोधात भाजपच्या संतोष जनाठें यांची बंडखोरी
शहापूर – शिवसेनेचे उमेदवार आमदार पांडुरंग बरोरांविरोधात माजी शिवसेना आमदार दौलत दरोडा यांची राष्ट्रवादीत प्रवेश करून उमेदवारी
उरण – शिवसेनेचे आमदार आणि जिल्हा प्रमुख मनोहर भोईरांच्या विरोधात भाजपाचे जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांची बंडखोरी
पिंपरी – शिवसेनेच्या आमदार गौतम चाबुकस्वारांच्या विरोधात भाजपच्या अमित गोरखेंची बंडखोरी
कागल – शिवसेनेच्या संजय घाटगेंच्या विरोधात भाजपच्या समरजीत घाटगेंची बंडखोरी
माढा – शिवसेनेच्या संजय कोकाटेंच्या विरोधात भाजपच्या मिनलताई साठेंची बंडखोरी
करमाळा – शिवसेनेच्या रश्मी बागलांच्या विरोधात शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांची बंडखोरी
इस्लामपूर – शिवसेनेच्या गौरव नायकवाडींच्या विरोधात नगराध्यक्ष भाजप नेते निशीकांत पाटील यांची भाजपविरोधात बंडखोरी
श्रीरामपूर – शिवसेनेच्या भाऊसाहेब कांबळेंच्या विरोधात खासदार सदाशिव लोखंडेंचे चिरंजीव डॉ. चेतन लोखंडेंची बंडखोरी

या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या महाआघाडीतील बंडखोरी-

अलिबाग – काँग्रेसच्या उमेदवार श्रद्धा ठाकुरांच्या विरोधात माजी आमदार मधुशेठ ठाकुरांच्या दोन कुटुंबीयांचे अर्ज
सोलापूर शहर मध्य – काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जुबेर बागवान यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला
अहमदनगर – शहर राष्ट्रवादीच्या संग्राम जगतापांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या किरण काळे यांची वंचितमधून उमेदवारी
सांगोला – महाआघाडीतील शेकापचे उमेदवार अनिकेत गणपतराव देशमुखांविरोधात राष्ट्रवादीच्या दीपक साळुंखेंची बंडखोरी
शिवाजीनगर मानखुर्द मतदारसंघात महाआघाडीचे समाजवादी पार्टी उमेदवार अबू आझमींविरोधात काँग्रेस नगरसेवक सुफियान वनूंची बंडखोरी
पंढरपूर राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांच्या विरोधात काँग्रेसचे शिवाजी काळुंगे रिंगणात
हिंगणघाट – राष्ट्रवादीच्या राजू तिमांडेंच्या विरोधात राष्ट्रवादीच्या सुधीर कोठारींचं बंड
शिरोळ – स्वाभिमानीच्या विरोधात राष्ट्रवादीच्या राजेंद्र पाटील-यड्रावकरांची बंडखोरी

या मतदारसंघात भाजप-शिवसेना घटकपक्षांच्या विरोधात बंडखोरी-

पंढरपूर – माजी आमदार सुधाकर परिचारकांना महायुतीत रयत क्रांती संघटनेची उमेदवारी मिळाल्याने भाजपच्या समाधान आवताडे आणि शिवसेनेच्या शैला गोडसेंची बंडखोरी
=======================================

भाजपाने २० विद्यमान आमदारांना उमेदवारी नाकारली

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी तावडे, खडसे आणि प्रकाश मेहता यांच्यासह भाजपाने तब्बल २० आमदारांचा पत्ता कट केला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी बंडखोरी झालेली आहे. त्यामुळे अर्ज मागे घेण्याच्या ७ तारखेपर्यंत बंडोबांची नाराजी दूर करण्यास पक्ष नेतृत्वाला कसरत करावी लागणार आहे. दरम्यान भाजपाच्या उमेदवारांच्या यादीतून विद्यमान मंत्र्यांसह अनेक दिग्गज नेत्यांना डच्चू देण्यात आला आहे. यामध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज पुरोहित, प्रकाश महेता यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. यावर शिवसेनेने आपल्याच मित्रपक्ष भाजपावर जोरदार टीका केली आहे. राजकारणाच्या या बाजाराला शिवसेनेने ‘बिग बाझार’ची उपमा दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी बिग बाजारात फक्त काँग्रेस-राष्ट्रवादीलाच धक्के दिले असे नाही तर स्वकीयांनाही धक्के देऊन धक्क्याला लावले. महासंग्रामचा बिग बाजार झाल्यावर दुसरे काय होणार? अशा शब्दात शिवसेनेने मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

भाजपच्या या आमदारांचा पत्ता कट

१) उदेसिंह पाडवी, शहादा
२) सुधाकर कोहळे, दक्षिण नागपूर
३) राजू तोडसाम, आर्णी
४) मेधा कुलकर्णी, कोथरूड
५) दिलीप कांबळे, पुणे कँटोन्मेंट
६) विजय काळे, शिवाजीनगर
७) आर.टी. देशमुख, माजलगाव
८) सरदार तारासिंग, मुलुंड
९) विष्णू सावरा, विक्रमगड
१०) संगीता ठोंबरे, केज
११) सुधाकर भालेराव, उद्गीर
१२) राजेंद्र नजरधने, उमरखेड
१३) बाळा काशीवार, साकोली
१४) एकनाथ खडसे, मुक्ताईनगर
१५) चंद्रशेखर बावनकुळे, कामठी
१६) चरण वाघमारे, तुमसर
१७) बाळासाहेब सानप, नाशिक पूर्व
१८) विनोद तावडे, बोरीवली
१९) राज पुरोहित, कुलाबा
२०) प्रभुदास भिलावेकर, मेळघाट

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

====================================================================================================

Maharashtra Assembly Election 2019 Opinion Poll PRAB; प्राब संस्थेचा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकपूर्व जनमत चाचणी सर्वेक्षण (ओपिनियन पोल) अहवाल उपलब्ध

VIDHAN SABHA 2019 ; महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मतदानपूर्व अंदाज

भाजप व शिवसेना युती न झाल्यास मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण व विश्लेषण

युती झाल्यावर संभाव्य जागा; आघाडीला मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण  व विधानसभा मतदारसंघनिहाय  कल

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेचा सर्वेक्षण अहवाल खालील लिंकवर उपलब्ध - 

(A survey report of the Political Research and Analysis Bureau (PREB) organization is available at the following link)
https://www.instamojo.com/bhujbalchandrakant/maharashtra-assembly-election-2019-opinion-p/?ref=store

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)



No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.