पर्वती मतदारसंघात 13 लाख 73 हजार 610 रुपयांची रोकड जप्त
पर्वती मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाने नेमलेल्या स्थिर पथकाने सहकारनगर येथील अरण्येश्वर येथे वाहन तपासणीदरम्यान 11 लाख 1 हजार 260 रुपयांची रोकड पकडली. ही रोकड एका काळ्या रंगाचा मोटारीत मिळून आली असून मेडिकल वेस्ट चा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याची ही रोकड आहे. दोनच दिवसांपूर्वी स्थिर पथकाने महर्षी नगर येथे पावणे तीन लाखांची रोकड मध्यरात्री पकडली होती. पथक प्रमुख संतोष भाईक, योगेश खरात, सागर सांगरे, सागर गवांदे, किरण साबळे, ज्ञानेश्वर पिंगळे, सुप्रिया शेवाळे, अतुल सुंभकर असे सर्वजण संतनगर येथे वाहन तपासणी करीत होते. सकाळी साडे अकराच्या सुमारास काळ्या रंगाची मोटार पथकाने अडविली. मोटारीची तपासणी करीत असताना डिकीमध्ये एका रेक्झिन बॅगेत 500 रुपयांच्या नोटांचे बंडल आढळून आले. कर्मचाऱ्यांनी ही रोकड मोजली असता एकूण 11 लाख 1 हजार 260 रुपये असल्याचे स्पष्ट झाले. ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. संबंधीत व्यापारी घरून त्याच्या ऑफिसला जात असताना ही रोकड सोबत बाळगून होता. पथकाने पंचनामा केला असून पुढील कार्यवाहीसाठी रक्कम पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे.आचारसंहिता कालावधीत ४३ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत निवडणूक यंत्रणा, पोलीस, आयकर विभाग, उत्पादन शुल्क विभाग आदी विभागांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत रोख रक्कम, दारु, मादक पदार्थ, सोने-चांदी आदी स्वरुपात 43 कोटी 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज दिली. भरारी पथके (एफएस), स्थिर सर्व्हेक्षण पथके (एसएसटी), पोलीस, आयकर आणि सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईत आजपर्यंत 9 कोटी 53 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. भरारी पथके (एफएस), स्थिर सर्व्हेक्षण पथके (एसएसटी), पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत 9 कोटी 71 लाख रुपये किमतीची 11 लाख 88 हजार 400 लिटर दारु जप्त करण्यात आली आहे. निवडणूक यंत्रणा आणि अंमली पदार्थ विरोधी दलाने केलेल्या कारवाईत आतापर्यंत 15 कोटी 7 लाख रुपयांचे मादक पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय 8 कोटी 77 लाख रुपयांचे सोने, चांदी, जवाहिर आदी जप्त करण्यात आले आहेत.निवडणूक आयोगाच्या पथकाकडून पुण्यात तिसरी कारवाई
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुण्यातील पर्वती मतदार संघात चार स्थिर आणि चार भरारी पथके नेमण्यात आली आहेत. यातील स्थिर पथक-१ च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मध्यरात्री बाराच्या सुमारास नाकाबंदी दरम्यान २ लाख ३७ हजार ५०० रुपयांची रोकड जप्त केली. रोकड जप्त करण्यात आल्याची पुण्यातील ही तिसरी घटना असून तीनही कारवाया पर्वती मतदार संघातच करण्यात आल्या आहेत. पथक प्रमुख सचिन पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थिर पथक-१ चे अधिकारी व कर्मचारी यांनी सॅलिसबरी पार्क येथील पुनावाला गार्डनजवळ नाकाबंदी केली होती. आचार संहितेच्या अनुषंगाने मद्य वा रोकड वाहतुकीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. मध्यरात्री बाराच्या सुमारास एक निळ्या रंगाची मर्सिडीज बेंझ संशयास्पदरित्या जाताना दिसली. पथकाचे प्रमुख सचिन पवार, सौरभ कामठे, गणेश सूर्यवंशी, पोलीस कर्मचारी मुल्ला, शिंदे व धोत्रे तसेच भरारी पथकाचे पोलीस उपनिरिक्षक जू पवार व कुंटेवाढ यांनी ही मोटार अडविली. मोटारीची तपासणी करीत असताना डिकीमध्ये २ लाख ३७ हजार ५०० रुपयांची रोकड मिळून आली. ही रक्कम वडगाव शेरी येथे राहणाऱ्या सलून व्यावसायिकाची असून ती जप्त करण्यात आली आहे. ही रक्कम स्वारगेट पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे. पुण्यामध्ये आचारसंहिता लागू झाल्यापासून रोकड जप्त करण्यात आल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. गेल्या आठवड्यात १ ऑक्टोबर रोजी स्थिर पथक क्रमांक एकने कारवाई करीत महर्षीनगर येथे मध्यरात्री २ लाख ७२ हजार ३५० रुपयांची रोकड जप्त केली होती. तर शुक्रवारी ४ ऑक्टोबर रोजी स्थिर पथक क्रमांक दोनने अरण्येश्वर येथील संतनगर येथे नाकाबंदी दरम्यान ११ लाख १ हजार २६० रुपयांची रोकड जप्त केली होती. या तीनही कारवाया पर्वती विधानसभा मतदार संघात करण्यात आल्या आहेत.--------------------------------------
मोठ्या रक्कमेच्या व्यवहारावर लक्ष ठेवा - विशेष खर्च निरीक्षक बी. मुरलीकुमार
विधानसभा निवडणुकीत मोठ्या रकमेच्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवा, अशा सूचना निवडणूक विशेष खर्च निरीक्षक बी. मुरलीकुमार यांनी दिल्या. विशेष खर्च निरीक्षक बी. मुरलीकुमार यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक खर्च विषयीचे विविध विभाग प्रमुख व पथक प्रमुख यांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, निवडणूक निरीक्षक चंदरशेखर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, विशेष पोलीस महानिरिक्षक सुहास वारके, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, पिंपरी-चिंचवडचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, निवडणूक खर्च व्यवस्थापन विभागाचे समन्वय अधिकारी अजित रेळेकर, सी-व्हिजीलचे समन्वय अधिकारी सुरेश जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, उप जिल्हाधिकारी सुधीर जोशी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत, माहिती उपसंचालक मोहन राठोड आदी उपस्थित होते. बी. मुरलीकुमार म्हणाले, विधानसभा निवडणूक कामकाजातील सर्व पथकांनी अचूक व काटेकोर कामकाज करावे, तसेच दैनंदिन माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांना सादर करावी. बैठकीमध्ये भरारी पथके, स्थिर संनिरीक्षण पथके (एसएसटी), छायाचित्रण संनियंत्रण पथक, छायाचित्रण निरीक्षण पथक अशा विविध पथकांनी आतापर्यंत आचारसंहिता अंमलबजावणी व निवडणूक खर्च विषयक तक्रारीबाबत केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला. विधानसभा निवडणुकीमध्ये पैशाचा गैरवापर रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे, असे निर्देश बी. मुरलीकुमार यांनी दिले. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी वापरण्यात येणारे पैसे व दारुच्या वापराला आळा घालावा यासाठी बेकायदा दारु आणि रोकड वाहतुकीवर लक्ष ठेवावे, अशा सूचना त्यांनी संबंधित विभागांना दिल्या. पथकांनी संशयित वाहनांची तपासणी करुन अवैधरित्या वाहतूक होत असलेली रोकड, मद्य, मादक पदार्थ व तत्सम बाबी जप्त करुन संबंधितांविरुध्द योग्य ती कारवाई करावी. उमेदवारांचा निवडणूक खर्च आणि बेकायदा पैशाचा वापर याची तपासणी काटेकोरपणे करावी, असेही त्यांनी सांगितले. विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर म्हणाले, आचारसंहितेची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी सर्व विभागांनी सतर्क राहून काम करावे. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी निवडणुकीच्या कामकाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या विविध विभागांची व पथकांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. सर्व विभागप्रमुखांनी आपापल्या विभागांच्या कामकाजाची माहिती यावेळी दिली. निवडणूक आचारसंहिता कालावधीत प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या जाहिरातींना परवानगी देणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीच्या कामकाजाची माहिती जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी दिली.बैठकीला निवडणूक खर्च व्यवस्थापन विभाग, उत्पादन शुल्क विभाग व महसूल व पोलीस प्रशासन, सहकार विभाग, अग्रणी बँकेचे अधिकारी, पेड न्यूज व प्रसार माध्यम विभाग, माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती, आचारसंहिता कक्ष अशा विविध विभागाचे व पथकाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.जप्त रक्कम परत मिळविण्यासाठी काय करावे?
दैनंदिन व्यवहारातील अथवा बॅंकेतून कडून बाळगली असेल तर स्तोत्र कागदोपत्री सिद्ध करून निवडणूक आयोगाने जप्त केलेली रक्कम पुन्हा प्राप्त करण्याची प्रक्रिया आहे. सदरील कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन प्राब संस्थेकडून केले जाते. विहित मुदतीत अपील करणे, अपील कोठे करावे, अपील कसे करावे? जप्त रक्कम पुन्हा कायदेशीररीत्या परत कशी मिळू शकते याबाबत पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेतर्फे सल्ला व मार्गदर्शन करण्यात येते.POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
===================================================================================================================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.