Thursday 3 October 2019

आदित्य ठाकरेंच्या संपत्तीची आकडेवारी पहा

ठाकरे कुटुंबातील व्यक्तीची संपत्ती प्रतिज्ञापत्रातून प्रथमच जाहीर

अशी आहे आदित्य यांची संपत्ती -

बँक ठेवी - १० कोटी ३६ लाख
बॉन्ड शेअर्स - २० लाख ३९ हजार
वाहन - BMW कार Mh -०९ Cb -१२३४ किंमत - ६ लाख ५० हजार
दागिने- ६४ लाख ६५ हजार
इतर - १० लाख २२ हजार
एकूण - ११ कोटी ३८ लाख
वैयक्तीक माहिती-
वय - 29
शिक्षण - बीए, कायद्याचा पदवीधर
धंदा - व्यवसाय
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून आज (गुरूवारी) उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या आई रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्या उपस्थितीत आदित्य यांनी अर्ज दाखल केला. या अर्जाबरोबर आदित्य यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये एकूण संपत्ती ११ कोटी ३८ लाख रुपये असल्याचे म्हटले आहे. यामध्ये बँक ठेवी १० कोटी ३६ लाख असल्याचे नमूद करण्यात आले आहे. आदित्य ठाकरेंनी आज वरळीमध्ये आज उमेदवारी अर्ज दाखल केला. या अर्जाबरोबर दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी आपील एकूण संपत्ती ११ कोटी ३८ लाख असल्याचे म्हटले आहे. संपत्तीचे विवरण देताना त्यांनी बँकेमध्ये १० कोटी ३६ लाख रुपये असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर बॉण्ड शेअर्समध्ये २० लाख ३९ हजारांची गुंतवणूक करण्यात आली असून आदित्य यांच्याकडे एक बीएमडब्यू गाडी असल्याचे या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. या गाडीची एकूण किंमत ६ लाख ५० हजार रुपये असल्याचे म्हटले आहे. आदित्य यांनी आपल्याकडे ६४ लाख ६५ हजारांचे दागिने असून इतर संपत्ती एकूण १० लाख २२ हजारांची असल्याचे आदित्य यांनी सांगितले आहे. दरम्यान, अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी वरळीतून पदयात्रेला काढली. या पदयात्रेला हजारोंच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला वंदन करून आदित्य ठाकरे यांनी पदयात्रेला सुरूवात केली. दरम्यान आदित्य यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामधून पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबाच्या संपत्तीची आकडेवारी समोर आली आहे. आदित्य यांच्या रुपाने पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. त्यामुळे आता आदित्य यांच्या प्रतिज्ञापत्रामधून ठाकरे कुटुंबाची एकूण संपत्ती किती यासंदर्भात पहिल्यांदाच माहिती समोर आली आहे. ठाकरे कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने आतापर्यंत कधीच निवडणुक लवढलेली नसल्याने त्यांच्या संपत्तीबद्दल आतापर्यंत केवळ अंदाजच व्यक्त केला जात होता.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

===============================

Maharashtra Assembly Election 2019 Opinion Poll PRAB; प्राब संस्थेचा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकपूर्व जनमत चाचणी सर्वेक्षण (ओपिनियन पोल) अहवाल उपलब्ध

VIDHAN SABHA 2019 ; महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मतदानपूर्व अंदाज

भाजप व शिवसेना युती न झाल्यास मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण व विश्लेषण

युती झाल्यावर संभाव्य जागा; आघाडीला मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण  व विधानसभा मतदारसंघनिहाय  कल

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेचा सर्वेक्षण अहवाल खालील लिंकवर उपलब्ध - 

(A survey report of the Political Research and Analysis Bureau (PREB) organization is available at the following link)
https://www.instamojo.com/bhujbalchandrakant/maharashtra-assembly-election-2019-opinion-p/?ref=store

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.