Saturday, 26 October 2019

महाराष्ट्र विधानसभेत 24 महिला आमदारांचा विजय

288 जागांच्या विधानसभेत  24 महिला आमदार

288 सदस्य असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत यंदा 24 महिला आमदार दिसणार आहेत. यंदाच्या एकूण 235 महिला उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. त्यापैकी 24 महिला आमदारांचा विजय झाला आहे. 24 पैकी सर्वाधिक म्हणजे 12 महिला आमदार भाजपच्या आहेत. तर काँग्रेसच्या पाच आमदार निवडून आल्या आहेत. शिवसेनेच्या दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन महिला आमदार विधानसभेत निवडून आल्या आहेत. 288 जागांच्या महाराष्ट्र विधानसभेत 33 टक्के आरक्षणाचा विचार केल्यास 95 महिला आमदार असणे अपेक्षित आहे.  2014 च्या निवडणुकीत फक्त 20 महिला आमदार निवडून होत्या. त्यामुळे 2014 च्या तुलनेत यंदा त्यात चार महिला आमदारांची भर पडली असून हा आकडा 24 वर पोहोचला आहे. विधानसभेच्या आजवरच्या इतिहासातील ही सर्वाधिक संख्या आहे. विशेष म्हणजे 1962 च्या विधानसभा निवडणुकीत तब्बल 13 महिला आमदार निवडून आल्या होत्या. मात्र 2019 च्या निवडणुकीपर्यंत महिला आमदारांची संख्या 20 च्या पुढे जाऊ शकलेली नव्हती. यंदा 24 महिला आमदार निवडून आल्या असल्या तरी 33 टक्के आरक्षणानुसार बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे. महाराष्ट्रात एकूण 8.97 मतदार आहेत. त्यापैकी 4.38 कोटी महिला आहेत. या हिशेबाने जवळपास 50 टक्के महिला मतदारांच्या तुलनेत महिला उमेदवारांची संख्या अजिबातच उत्साहजनक नाही. राजकीय पक्ष समाज आणि देशातील महिलांची स्थिती बदलण्याचा दावा करतात परंतु, राजकारणात, विशेषत: निवडणुकीत हा बदल दिसत नाही. यंदाच्या निवडणुकीत 12 विद्यमान महिला आमदार पुन्हा विजयी झाल्या आहेत. यापैकी आठ आमदार भाजपच्या तर तीन काँग्रेस आणि एक राष्ट्रवादीच्या आहेत. यात मंदा म्हात्रे, मनीषा चौधरी, विद्या ठाकूर, देवयानी फरांदे, सीमा हिरे, माधुरी मिसाळ, मोनिका राजळे, भारती लव्हेकर, प्रणिती शिंदे, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड आणि सुमनताई पाटील यांचा समावेश आहे. विधानसभेत पहिल्यांदाच निवडून जाणाऱ्या महिला आमदारांमध्ये सरोज अहिरे, अदिती तटकरे, लता सोनावणे, यामिनी जाधव, मुक्ता टिळक, श्वेता महाले, मेघना बोर्डीकर, नमिता मुंदडा, प्रतिभा धानोरकर, सुलभा खोडके, गीता जैन आणि मंजुळा गावित यांचा समावेश आहे.

विधानसभेतील 24 महिला आमदार

भाजपच्या महिला आमदार

1. मंदा म्हात्रे - बेलापूर
2. मनिषा चौधरी - दहिसर
3. विद्या ठाकूर - गोरेगाव
4. भारती लव्हेकर - वर्सोवा
5. माधुरी मिसाळ - पर्वती
6. मुक्ता टिळक - कसबापेठ
7. देवयानी फरांदे - नाशिक मध्य
8. सीमा हिरे - नाशिक पश्चिम
9. श्वेता महाले - चिखली
10. मेघना बोर्डीकर - जिंतूर
11. नमिता मुंदडा - केज
12. मोनिका राजळे - शेवगाव

शिवसेनेच्या महिला आमदार

1. यामिनी जाधव - भायखळा
2. लता सोनवणे - चोपडा

काँग्रेसच्या महिला आमदार

1. वर्षा गायकवाड - धारावी
2. प्रणिती शिंदे - सोलापूर मध्य
3. प्रतिभा धानोरकर - वरोरा
4. सुलभा खोडके - अमरावती
5. यशोमती ठाकूर - तिवसा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आमदार

1. सरोज अहिरे - देवळाली
2. सुमनताई पाटील - तासगाव-कवठेमहंकाळ*
3. अदिती तटकरे - श्रीवर्धन

अपक्ष महिला आमदार

1. गीता जैन, भाजप बंडखोर - मीरा-भाईंदर
2. मंजुळा गावित - साक्री
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
===================================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
==========================
====================
==

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.