Thursday 31 August 2017

१९ नोव्हेंबर २०१७ ला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभेसाठी निवडणूक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा निवडणूक २०१७ कार्यक्रम जाहीर 

१९ नोव्हेंबर २०१७ ला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभेसाठी निवडणूक


नवीन विद्यापीठ कायद्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीचा बिगुल अखेर मंगळवारी वाजला. विद्यापीठ प्रशासनाने पदवीधर व संस्थाचालकांच्या निवडणुकींच्या संभाव्य तारखा जाहीर केल्या असून दि. १९ नोव्हेंबर रोजी निवडणुक होणार आहे. त्यासाठी बुधवार (दि. २५)पासून उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहे.
राज्यात सर्व सार्वजनिक विद्यापीठांच्या अधिसभेच्या निवडणुक प्रक्रियेचे काम नवीन कायद्यानुसार सुरू आहे. अमरावती विद्यापीठाच्या निवडणुकांची संपुर्ण प्रक्रिया नुकतीच पार पडली. तर इतर विद्यापीठांमधील प्रक्रियाही वेगाने सुरू आहे. मात्र, राज्यात शैक्षणिक गुणवत्तेसह सर्वच बाबतीत आघाडीवर असलेल्या पुणे विद्यापीठाची प्रक्रिया मात्र रेंगाळली आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातून मागील काही दिवसांपासून नाराजी व्यक्त केली होती. संस्थाचालक, पदवीधर, प्राचार्य आणि प्राध्यापक या चारही मतदारसंघातील इच्छुक निवडणुक वेळापत्रकाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी विविध घटकांकडून सातत्याने पाठपुरावा केला जात होता. त्यामुळे काही दिवसांपासून निवडणुक घेण्यासाठी प्रशासनाकडून वेगाने हालचारी सुरू होत्या. त्यानुसार मंगळवारी पदवीधर व संस्थाचालकांच्या निवडणुकीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मात्र, प्राध्यापक व प्राचार्य मतदारसंघाच्या निवडणुकांचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.
विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांच्या संस्थाचालकांचे ६ आणि पदवीधर मतदारसंघातून १० प्रतिनिधी निवडून दिले जाणार आहेत. संभाव्य वेळापत्रकानुसार, रविवार दि. १९ नोव्हेंबर रोजी पदवीधर व संस्थाचालक मतदारसंघासाठी मतदान होईल. त्यासाठी दि. २५ आॅक्टोबरपासून अर्ज सादर करता येणार आहे. तर दि. २ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करता येईल. दि. ३ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंबंधी दि. ६ नोव्हेंबर रोजी लेखी कळवावे लागेल. त्यानुसार निवडणुक होऊन दि. २७ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून मतपत्रिकांची छाननी व मतमोजणीचे काम सुरू होईल. 

निवडणुकीचे संभाव्य वेळापत्रक 

दि. २५ आॅक्टोबर ते दि. २ नोव्हेंबर - उमेदवारी अर्ज सादर करणे
दि. ३ नोव्हेंबर - उमेदवारी अर्जाची छाननी
दि. ६ नोव्हेंबर - उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत लेखी कळविणे
दि. १९ नोव्हेंबर - मतदान
दि. २७ नोव्हेंबर - मतपत्रिकांची छाननी व मतमोजणी
प्राचार्य, प्राध्यापक निवडणुकीची प्रतीक्षा

पदवीधर व संस्थाचालक मतदारसंघाचे निवडणुक वेळापत्रक जाहीर झाले असले तरी प्राचार्य व प्राध्यापक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे. विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव अरविंद शाळीग्राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राचार्य व प्राध्यापकांना आॅनलाईन मतदार नोंदणीसाठी २० आॅक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. आता नोंदणी केलेल्यांना २७ तारखेपर्यंत कागदपत्रे सादर करावी लागतील. त्यानंतर अर्जांची छानणी होवून मतदार यादी जाहीर केली जाईल. यादीवर हरकती मागवून नंतर अंतिम यादी प्रसिध्द केली जाईल. त्यानंतर निवडणुक होईल. पदवीधर व संस्थाचालक निवडणुकीसाठीची ही प्रक्रिया मागील महिन्यात पुर्ण झाली होती.
सिनेटसाठी होणार तिरंगी लढत
सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर (सिनेट) पदवीधरांमधून निवडून येणाऱ्या दहा, तर कॉलेज, शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींमधून सहा अशा एकूण १६ जागांसाठी ऑक्टोबरमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी तिरंगी लढत होणार आहे.
विद्यापीठ विकास मंच, एकता पॅनेल यांच्याबरोबरच जयकर ग्रुप परिवर्तन पॅनेल देखील निवडणुकीत उतरले आहे. गुरुवारी त्यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. विद्यापीठाकडून देखील अधिसभा निवडणूकीसाठी पदवीधर मतदारांची अंतिम यादी विद्यापीठाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली आहे. एकूण १६ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. लोकप्रतिनिधी, विद्यार्थी संघटनांच्या मागणीनुसार विद्यापीठाने नोंदणीसाठी मुदतवाढ दिली होती. साधारण साठ हजारांच्या आसपास मतदार नोंदणी झाली आहे. आजपर्यंत दोन पॅनेलमध्ये होणारी लढत यंदा मात्र तिरंगी होणार आहे.

अधिक माहितीसाठी- चंद्रकांत भुजबळ - 9422323533

अध्यक्ष, पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो

Political Research and Analysis Bureau (PRAB)

निवडणूक कार्यक्रम




पुणे जिल्ह्यातील मतदान केंद्रे 



मतदारयादी करिता लिंक -

This is New voter list of 2017 Election link

http://election.unipune.ac.in/voter_list.html







Wednesday 30 August 2017

अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमधून बाहेर; राजू शेट्टींची घोषणा

अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमधून बाहेर


स्वाभिमानी शेतकरी संघटना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी आज पुण्यात केली. यापूर्वीच त्यांनी याबाबत सुतोवाच केले होते. पुण्यातील अल्पबचत भवन येथे संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.
दरम्यान, स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर येत्या ४ सप्टेंबर रोजी वस्त्रोद्योग महामंडळाचा राजीनामा देणार आहेत. मात्र, वस्त्रोद्योग महामंडळाचे सरकारी वाहन ते आजच महामंडाळकडे जमा करणार आहेत.
राजू शेट्टी यांनी ‘रालोआ’मध्ये राहण्याचा निर्णय घेतला, तर त्यांना आणखी एक मंत्रिपद देण्यात येईल, असे विधान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दहा दिवसांपूर्वीच कोल्हापूर येथे बोलताना केले होते. मात्र, त्यांची ही ऑफर शेट्टी यांनी धुडकावून लावत आज अखेर रालोआतून बाहेर पडल्याची घोषणा केली.
दरम्यान, शेट्टी-खोत यांच्यातील वाद चांगलाच चिघळत चालला आहे. खोत यांची संघटनेतून हकालपट्टी करून न थांबता शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन खोत आणि स्वाभिमानी शेतकरी  संघटनेचा संबंध तुटला असल्याचे सांगून टाकले होते. खोत हे स्वाभिमानीचे प्रतिनिधी नसल्याने सरकारमधून त्यांची हकालपट्टी व्हावी अशी भूमिका शेट्टी यांनी घेतली होती. सत्ताधाऱ्यांवर दबाव वाढवत शेट्टी यांनी ‘रालोआ’तून बाहेर पडण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे शेट्टी-खोत यांच्या वादातून सरकारला अडचण होऊ नये अशी भूमिका भाजपने घेतली होती.
तसेच स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचा उल्लेख करुन राजू शेट्टी पुढे म्हणाले की, ”व्यवस्थेविरोधात लढताना ताकद कमी पडत होती, त्यामुळे भाकरी बदलणं गरजेचं होतं. म्हणून तत्कालिन तळागाळातील जाणते नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मध्यस्थीने एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सर्वांची टीकाही सहन करुन तीन वर्ष थांबलो. पण सत्तेचा आमच्या आंदोलनाला काहीही फायदा मिळाला नाही. आमच्या वरच्या साध्या केसेस मागे घेतल्या नाहीत.”
विशेष म्हणजे, सदाभाऊ खोत यांच्यावरुन खा. शेट्टी यांनी यावेळी राज्य सरकारवर निशाणा साधला. ”ज्याला आम्ही सत्तेत पाठवलं, तो आम्हाला आमचा म्हणतच नाही,” अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.तसेच शेतकऱ्यांचं आंदोलन आता दिल्लीत नेणार असल्याचं सांगून, राजू शेट्टी पुढे म्हणाले की, ”संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 10 लाख शेतकऱ्यांचा मोर्चा जतंरमंतरवर काढणार आहोत.”
दरम्यान, सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी केल्यानंतर खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं होतं. या पत्रामध्ये स्वभिमानी शेतकरी संघटनेचं सत्तेतील स्थान काय, याबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी शेट्टींनी पत्राद्वारे केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी शेट्टींच्या पत्राला अद्याप उत्तर दिले नाही.

Monday 28 August 2017

लोकसभा व विधानसभा निवडणूक २०१९ करिता निवडणूक पूर्वतयारी

लोकसभा व विधानसभा निवडणूक २०१९ करिता निवडणूक पूर्वतयारी


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

 

लोकसभा व विधानसभा निवडणूका एकाच वेळी होण्याची शक्यता असल्याने याचा लाभ घेऊन जिकण्यासाठी सर्व काही..... पूर्वतयारी ............

लोकसभा व विधानसभा निवडणूक २०१९ करिता निवडणूक पूर्वतयारी करिता देखील मार्गदर्शन केले जाते. योग्य मार्गदर्शन व सल्ला करिता संपर्क-

Political Research and Analysis Bureau (PRAB)
Address: 823/824, Punyai Apartment, 
Sadashiv Peth, Gadgil Street, 
Pune, Maharashtra 411030
Phone: 020 2448 1671
चंद्रकांत भुजबळ- 9422323533
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
---------------------------------------------------------------------------------------------------------------


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 



=====================================================================

निवडणूकविषयक अचूक सर्वेक्षण, प्रक्रियेचे व नियमांचे जनप्रबोधन व प्रशिक्षण, शिक्षण देणारी राजकीय क्षेत्रातील नामवंत संस्था असलेली ‘पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)’ च्या वतीने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उपयुक्त अशी विश्लेषणात्मक माहिती असलेले ‘महाराष्ट्रातील राजकारण - लोकप्रतिनिधी निवडणूक मार्गदर्शक- लोकसभा व विधानसभा लक्ष्य-2019’ हे पुस्तक प्रकाशित करीत आहोत.


---------------------------------------------------------------------------------------------------------------

“पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो’’ ही अचूक सर्वेक्षण अंदाज वर्तविणारी एकमेव विश्वसनीय संस्था आहे

==============================================================



====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 



=====================================================================



------------------------------------------------------------------------------------




====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

निवडणूक काळातील होणारी फसवणूक टाळा ! 

Election fraud फसवणूक करणार्‍या पासून सावधान !

निवडणूक काळातील होणारी फसवणूक !


आपल्या लोकशाही प्रधान देशामध्ये नेहमी विविध स्वरूपाच्या निवडणूका होत असतात. लोकशाही प्रक्रियेत निवडणूकांना महत्व असल्याने दिवसेंदिवस निवडणूक प्रचारामध्ये बदल होत असल्याचे दिसून येते. पाश्‍चात्य देशांमध्ये निवडणूक व्यवस्थापन करणार्‍या कंपन्या सर्व जबाबदारी स्विकारून इव्हेंट राबवत आहेत. भारतामध्ये अशा स्वरूपाच्या कंपन्या अलिकडील काळात दाखल झाले आहेत. तसेच देशांतर्गत विविध राज्यांमध्ये अशा संस्था निर्माण झाल्या आहेत. देशामध्ये मान्यवर संस्थांबरोबरच काही बनावट संस्थादेखील कार्यरत आहेत. अशा संस्थांकडून निवडणूक काळात हमखास उमेदवारांची तसेच राजकीय पक्षाची देखील फसवणूक होते. तसे प्रकार अलीकडच्या निवडणूकांमध्ये उघडकीस आले आहे. त्यामुळे निवडणूक काळामध्ये होणारी फसवणूक टाळण्यासाठी इलेक्शन इव्हेंटचे मॅनेजमेंटची विश्‍वासार्हता जाणून घेणे आवश्यक आहे. अशा कंपन्यांना काम देताना काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
निवडणूक काळामध्ये गैरप्रकार विविध स्वरूपाचे होत असतात. या गैरप्रकारामध्ये फसवणूकीची शक्यता असल्याने काळजी घेण्याची गरज आहे. निवडणूक म्हटले की, आर्थिक समीकरण येते. आर्थिक लाभासाठी अनेक प्रकारच्या प्रवृत्तीचा समाजात वावर असतो. आर्थिक लाभ मिळविण्यासाठी कार्यकर्ते म्हणून घेणारे तसेच सामाजिक संस्था, राजकीय संघटना, राजकीय नेते, गुन्हेगारी क्षेत्रातील व्यक्ती, स्थानिक नेतृत्व करणार्‍या तथाकथित पदाधिकार्‍यांचा यामध्ये समावेश होतो. सर्वच पदाधिकारी अथवा सामाजिक संस्था अशा स्वरूपाचा लाभ घेत नसल्या तरी काही घटक मात्र गैरफायदा निश्‍चित घेत असतात. निवडणूकीमध्ये उमेदवाराची होणारी फसवणूक ही नित्याची बाब होऊ पाहत आहे. प्रचाराच्या कार्यपद्धतीमध्ये दिवसेंदिवस बदल होत आहे. सोशल मिडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून इलेक्ट्रॉनिक मिडियाला निवडणूकीत महत्व प्राप्त झाले आहे. मतदारांशी जनसंवाद साधण्यासाठी तसेच लोकप्रियता मिळविण्यासाठी राजकीय पक्ष व पदाधिकारी व उमेदवार अशा माध्यमांचा वापर करतात. माध्यमांचा वापर करताना योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. पाश्‍चात्य देशांच्या प्रमाणे भारतात निवडणूक व्यवस्थापन करणार्‍या कंपन्या व संस्था अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्या आहेत. मात्र मान्यवर व विश्‍वासार्हता प्राप्त केलेल्या संस्था नगन्य आहेत. नावाजलेल्या संस्थांच्या नावाने अथवा नावात सामर्थ्य असलेल्या संस्था स्थापित करून गैरफायदा घेण्याचा प्रयत्न अशा कंपन्यांकडून केला जात असल्याने निश्‍चित फसवणूकीला उमेदवारांना व राजकीय पक्ष पदाधिकार्‍यांना सामोरे जावे लागते. अशा स्वरूपाच्या अपप्रवृत्तींवर प्रकाश टाकण्यासाठी या लेखाचे लेखण ‘प्राब’कडून केले आहे. निवडणूकीत फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी यामध्ये देत आहोत. आर्थिक स्वावलंबनाशिवाय राजकारणात यश मिळविणे अशक्य असते. दिवसेंदिवस आर्थिकतेचा वापर निवडणूकीमध्ये होत आहे. त्यामुळे आर्थिकतेवरच निवडणूकीतील यशाचे गणित अवलंबून असले तरी योग्य पद्धतीने निवडणूकीचे नियोजन व व्यवस्थापन केल्यास कमीत कमी खर्चामध्ये निवडणूकीत यश मिळू शकते. याकरीता निवडणूकीमध्ये विविध सुविधा व सेवा देणार्‍या संस्था व कंपन्यांची मदत घेणे क्रमप्राप्त ठरते. यामुळे योग्य संस्था निवडणे ही देखील महत्वपूर्ण जबाबदारी आहे. सहकारी तसेच कार्यकर्त्यांवर अशा स्वरूपाची जबाबदारी सोपवणे म्हणजेच निष्काळजीपणाचे लक्षण असल्याचे झालेल्या गैरप्रकार व फसवणूकीतून स्पष्ट झाले आहे. सहकारी व कार्यकर्त्यांवर जबाबदारी देऊच नये असे नाही. परंतू विश्‍वासार्हता असली तरी संस्थांची व कंपन्यांची पारख, पडताळणी करणे काही प्रसंगी अशक्य असते.
निवडणूकीमध्ये विविध स्वरूपांच्या कामांसाठी उमेदवाराला कार्यकर्ते तसेच सहकारी पदाधिकार्‍यांवर आणि राजकीय पक्षावर अवलंबून राहावे लागते. बहुतांश निवडणूकीत यश मिळविण्यासाठी इतरांवर अवलंबून न राहता स्वतंत्र यंत्रणा राबविणे उपयुक्त असते. निवडणूक विषयक सेवा देणार्‍या तसेच विविध प्रचार साहित्य, संगणक प्रणाली तसेच विविध प्रचारासाठी उपयुक्त साधने, सुविधा पुरविणार्‍या संस्था कार्यरत आहेत. मात्र त्यांच्या विश्‍वासार्हतेची तपासणी केल्याशिवाय जबाबदारी सोपवण्यात येवू नये. अन्यथा तात्पूरत्या स्वरूपाच्या स्थापित झालेल्या संस्था, कंपन्या गैरफायदा घेऊन फसवणूक करण्याची शक्यता निर्माण होते. या संदर्भात निवडणूक लढविणार्‍या उमेदवाराने जाणीव ठेवणे आवश्यक आहे.  

“पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो’’ ही अचूक सर्वेक्षण अंदाज वर्तविणारी एकमेव विश्वसनीय संस्था आहे

चंद्रकांत भुजबळ
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो ‘प्राब’



संगणक प्रणाली विक्रीतील फसवणूक

संगणकीय युगामध्ये निवडणूक विषयक विविध सुविधा पूरविणार्‍या संगणकप्रणाली उपलब्ध आहेत. निवडणूकीसाठी तात्काळ माहिती संगणक प्रणालीतून उपलब्ध होत असल्यामुळे याचे महत्व वाढले आहे. निश्‍चितच उपयुक्त असलेली संगणक प्रणालीने राजकीय क्षेत्रात नावलौकिकता प्राप्त केली आहे. निवडणूकीचे व्यवस्थापन व मतदारांच्या माहितीचे तात्काळ होणारे वर्गीकरण हे या प्रणालीचे वैशिष्ट्ये आहेत. मात्र विविध कंपन्यांकडून निवडणूक विषयक वेगवेगळ्या संगणक प्रणाली विकसीत करण्यात आल्या आहेत. अनेक व्यवसायिक कंपन्यांच्या स्पर्धेमुळे विश्‍वासार्हतेला महत्व प्राप्त झाले आहे. निवडणूक काळापूरत्या निर्माण होणार्‍या संगणक प्रणाली पूरवठादार कंपन्या निर्माण होतात. त्यांचे अधिकृत मालकीचे कार्यालय नसते. संपर्क क्रमांक देखील तात्पूरत्या स्वरूपाचे असतात. मार्केटिंग करीता नेहमी बदलणार्‍या व्यक्तींचा उपयोग करणारे असल्याने त्यांना उमेदवाराची फसवणूक करणे सहज शक्य होते. निवडणूक विषयक संगणक प्रणालीमध्ये मतदारांची अद्यावत माहिती, मतदार यादीचा डेटाबेस असणे आवश्यक असते. निवडणूक आयोगाकडून अंतीम मतदार यादी प्रसिद्ध केल्यानंतर ती संगणक प्रणाली तात्काळ अद्यावत करणार्‍या कमी कंपन्या सेवा देतात. तसेच आयोगाकडून अधिकृत उपलब्ध झालेला मतदार यादीचा सॉफ्ट डेटाबेसचे सहजपणे रुपांतर करणे अशक्य असते. परिपूर्ण रूपांतरीत डेटाबेस संगणक प्रणालीमध्ये उपलब्ध करून दिला जात नाही. यामध्येच मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते. अनेक स्वरूपाच्या संगणक प्रणाली विकसीत करून निवडणूक काळापूरत्याच विक्री करणार्‍या कंपन्या असतात. यामध्ये रुपांतरीत डेटाबेस अर्धवट स्वरूपात देऊन बहुतांश कंपन्या उमेदवारांची फसवणूक करतात. महाराष्ट्रामध्ये इतर राज्यांच्या तुलनेत निवडणूक आयोगाच्या काही हितसंबंधीत अधिकार्‍यांच्या निगडीत व्यक्तीच खासगी निवडणूक विषयक संगणक प्रणाली अद्यावत डेटाबेस विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले आहे. ज्या कंपन्यांना मतदार यादी अद्यावत करणे, मतदार यादी छपाई करणे, मतदार यादी विषयी विविध स्वरूपाची कामे दिली जातात. अशा कंपन्यांना सहज डेटाबेस उपलब्ध होतो. त्यामुळे या कंपन्या व्यवसायामध्ये आज अग्रस्थानी आहेत. अशा कंपन्यांबरोबर स्पर्धा करण्यासाठी अनेक कंपन्या निर्माण झाल्या आहेत. मात्र अद्यावत रूपांतरीत डेटाबेस उपलब्ध होऊ शकत नसल्याने अनेक भूलथापा देऊन उमेदवारांना संगणक प्रणाली देऊन फसवणूक केली जाते. आश्‍चर्याची बाब अशी आहे की निवडणूक आयोगाने मतदार यादीचा सॉफ्ट डेटाबेस सर्व प्रकारच्या फॉर्म्युल्यामध्ये उमेदवारांना व राजकीय पक्षांना उपलब्ध करून दिला पाहिजे मात्र तो दिला जात नाही.  राजकीय पक्ष व उमेदवार या उपयुक्त असलेल्या प्रश्‍नाकडे सोईस्कर रित्या दुर्लक्ष करीत आहेत ही शोकांतिका आहे. निवडणूक काळापूरता उपयोग होईल अशा स्वरूपाच्या संगणक प्रणाली विक्री केल्या जातात. निवडणूकीनंतर अशा प्रणालीचा उपयोग उमेदवाराला होत नाही. त्यामुळे उमेदवारानेच कायमस्वरूपी वापर होईल अशा प्रणालीचा कंपन्यांकडे आग्रह धरावा तसेच अद्यावत मतदारांचा डेटा त्यांनी उपलब्ध करून द्यावा. तरच संगणक प्रणाली विकत घ्यावी अन्यथा घेऊ नये. यामुळे फसवणूक टाळता येऊ शकते.

संगणक प्रणाली विकत घेताना घ्यावयाची काळजी 

नामवंत कंपनीकडून संगणक प्रणाली विकत घ्यावी., कंपनीची विश्‍वासार्हता तपासून घ्यावी. त्यांचे कार्यालय तात्पुरते स्वरूपात असेल तर सत्यतेची खात्री करावी, अद्यावत मतदार यादीत रुपांतरीत डेटाबेस परिपूर्ण आहे का? याची सत्यता पडताळावी., निवडणूक आयोगाचा डेटाबेस विक्री करण्याची परवानगी आहे का याची खात्री करावी. संगणक प्रणालीतील दर्शविलेल्या वर्गिकरणाप्रमाणे रिपोर्ट तयार होत आहेत का याची खात्री करावी. विविध स्वरूपाचे रिर्पोट मिळतात. अशी बतावणी बहुतांश कंपन्यांकडून केली जाते. मात्र संबंधीत वर्गीकरणाचा डेटाबेस त्यामध्ये दिला जात नाही. तसेच डेटाबेस सामावेश करण्याची जबाबदारी उमेदवारांवरच देतात त्यामुळे होणारी फसवणूक टाळावी. जात निहाय तसेच वय, शिक्षण, कुटुंब आदी प्रकारे मतदारांचे होणारे वर्गीकरण आपोआप डेटाबेस उपलब्ध असल्याशिवाय होऊ शकत नाही. त्याची सत्यता पडताळून पहाण्याची आवश्यकता आहे. संगणक प्रणालीमध्ये डेटाबेस अद्यावत करण्याकरीता प्रादेशिक भाषेतून फॉन्ट सूविधा तसेच सर्व कि-बोर्ड वापरण्याची सुविधा असावी जेणेकरून उमेदवाराच्या कार्यालयातील व्यक्ती ही प्रणाली सहज हाताळु शकतो. अशा विविध स्वरूपांची दक्षता संगणक प्रणाली विकत घेताना घेतली पाहिजे.

जनमत सर्वेक्षणाच्या नावे होणारी फसवणूक

निवडणूकीमध्ये जनमत सर्वेक्षणाला महत्व प्राप्त झाले आहे. मतदारांचा अचूक कल जाणून घेण्यासाठी उमेदवार व राजकीय पक्ष जनमत सर्वेक्षण करून घेतात. जनमत सर्वेक्षण करणार्‍या बहुतांश संस्था व कंपन्या आपल्या देशामध्ये कार्यरत आहेत. नामवंत सर्वेक्षण करणार्‍या संस्था स्थानिक पातळीवरील संस्थांना व कंपन्यांकडून सर्वेक्षणाचे काम करून घेत असतात. काही कंपन्यांनी व संस्थांनी या व्यवसायामध्ये नावलौकिकता व विश्‍वासार्हता मिळविली आहे. मात्र काही कंपन्या व संस्था उमेदवारांची व राजकीय पक्षांची फसवणूक करीत असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. जनमत सर्वेक्षण म्हणजे काय याविषयी उमेदवारांमधील अज्ञानाचा लाभ संबंधीत कंपन्या घेत असतात. सर्वेक्षणामध्ये विविध स्वरूपाचे कार्य असतात. ते ‘प्राब’ने विश्‍लेषित केले आहे. ते जाणून घ्यावेत. काही कंपन्या केवळ मागील निवडणूकांच्या निकालांचे तसेच मतदान केंद्र निहाय मतदारांचा एकत्रित कल दर्शविणारे सर्वेक्षण अहवाल उमेदवारांना देऊन फसवणूक करीत आहेत. इंटरनेटवरील विविध वेबसाईटच्या माध्यमातून मिळविलेल्या माहितीच्या आधारे सर्वेक्षण अहवाल बनवून देत आहेत. याचा प्रत्यक्ष निवडणूकीत उमेदवाराला काहीही लाभ होत नाही. सर्वेक्षण करून घेणार्‍या नामवंत कंपन्यांच्या नावात सामर्ध्य असलेली नावे धारण करून जनमत सर्वेक्षणाचे काम करून उमेदवारांची फसगत करीत आहेत. त्यामुळे अशा संस्था व कंपन्यांपासून उमेदवारांनी सावधानता बाळगली पाहिजे. जनमत सर्वेक्षण काम देताना नामवंत संस्थांना द्यावे व त्या संस्थेची विश्‍वासार्हता तपासून पहावी. संबंधीत संस्था व कंपनीचे स्व. मालकीचे कार्यालय आहे काय? याची खात्री करावी. तसेच नामवंत कंपन्यांच्या नावातील मागील किंवा पुढील शब्दप्रयोग घेऊन कंपनीचे नाव असणार्‍यांचा उद्देश फसवणूकीचा असतो. त्यामुळे अशा स्वरूपाच्या काम सोपवण्यात येऊ नयेत. उदा. चाणक्य नावाची दिल्लीत मुख्य कार्यालय असलेली संस्था/कंपन्या आहेत. या कंपनीच्या नावाने देशभरात तसेच महाराष्ट्रात अनेक कंपन्या, फर्म स्वतंत्र रित्या स्थापित केल्या आहेत. मुंबई, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, नागपूर या शहरांमध्ये स्थानिक व्यक्तींनी चाणक्य नाव धारण करून जनमत सर्वेक्षण व अनुषंगिक काम करणारे कार्यरत आहेत. बहुतांश उमेदवारांना अशा स्वरूपाच्या कंपन्यांकडून फसवणूक झाल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. मूळ कंपनीच्या विश्‍वासार्हतेचा गैरफायदा घेणार्‍या संस्था व कंपन्यांबाबत सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे. जनमत सर्वेक्षणामध्ये मतदारांचा अचूक कल दर्शविणारी पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) च्या नावलौकिकता व विश्‍वासार्हतेचा देखील गैरफायदा घेणार्‍या संस्था व कंपन्या स्थापित झाल्या आहेत. त्या कंपन्यांच्या प्रथम अथवा अखेरचे शब्द बदलून नामसामर्ध्य असलेले नाव धारण करून उमेदवारांची फसगत करीत आहेत. सुरवातीला श्री. अथवा अखेर इलेक्शन सर्विस अशा नावांचा वापर करून ‘प्राब’चे नावाच्या मागे व पुढे धारण करून फसविण्याचा व्यवसाय करीत आहेत. अशा संस्थांना उमेदवाराने जनमत सर्वेक्षणाचे काम देताना सावधानता बाळगण्याची गरज आहे. सर्वेक्षणाचे काम देताना संबंधित कंपनी व संस्थेची विश्‍वासार्हता तपासून घेणे योग्य ठरेल. जनमत सर्वेक्षणातील अहवालात अपेक्षित असणारे रिपोर्टची मागणी करावी. फसवणूक टाळण्यासाठी उमेदवाराने वरीलप्रमाणे दक्षता घेण्याची आवश्यकता आहे.
जनमत सर्वेक्षणातील नामवंत संस्था खालील प्रमाणे.
1. सी व्होटर 2. नेल्सन    3. प्राब (पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो)
4. सिसरो     5. चाणक्य  

“पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो’’ ही अचूक सर्वेक्षण अंदाज वर्तविणारी एकमेव विश्वसनीय संस्था आहे

चंद्रकांत भुजबळ
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो ‘प्राब’


प्रसिद्धी सेवेतील होणारी फसवणूक

राजकारणात यश मिळविण्यासाठी मतदारांमध्ये चांगली प्रतिमा निर्माण करण्यासाठी योग्य प्रसिद्धीची आवश्यकता असते. प्रसिद्धी करण्यासाठी विविध जनसंपर्क (पीआर एजन्सी), संस्था कार्यरत आहेत. विशेषत: या संस्था व्यवसायिक कंपन्यांना सेवा देत असतात. मात्र काही कंपन्या निवडणूक काळामध्ये राजकीय पक्ष व उमेदवारांना सुविधा देत असतात. निवडणूक जिंकण्यासाठी प्रसिद्धी करीता नियोजन व व्यवस्थापन तसेच प्रसिद्धी संबंधित कार्य करण्याची जबाबदारी अशा या संस्थांवरती सोपवली जाते. काही नामवंत संस्था वगळल्या तर बहुतांश उमेदवारांची फसगत करणार्‍या निवडणूक काळात निर्माण होणार्‍या संस्था कार्यरत असतात. प्रसिद्धी माध्यमांमध्ये कार्य केलेली बहुतांश व्यक्ती अशा स्वरूपाचे व्यवसाय करत असतात. संबंधित प्रसार माध्यमे वृत्तपत्र, विविध वृत्तवाहिन्या, रेडिओ, इंटरनेट, ऑनलाईन वृत्तसेवा अशा संस्थांकडून प्रसिद्धी करून घेतो. अशी बतावणी करून उमेदवारांची फसवणूक केली जाते. अशा घटना उघडकीस आल्या आहेत. प्रसिद्धी सेवा देणार्‍या संस्थांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी उमेदवाराने काळजी घेण्याची आवश्यकता आहे. बहुतांश अ‍ॅडर्व्हटाईज एजन्सीज तसेच इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या देखील निवडणूकीतील प्रसिद्धीचे काम करीत असतात. निवडणूकीतील जाहीरात तयार करणे, प्रसारित करणे, कार्यक्रमांचे आयोजन व नियोजन करणे तत्सम् स्वरूपाचे कार्य या कंपन्या करीत असतात. या कामाकरीता मोठ्याप्रमाणात आर्थिक मोबदला स्विकारला जातो. प्रत्यक्षात अशा कंपन्यांना संबंधित कामांसाठी जास्त खर्च येत नसतो. मात्र उमेदवारांकडून जास्तीत जास्त आर्थिक फायदा घेण्याचा प्रयत्न काही कंपन्या करीत असतात. संबंधित पी.आर. ऐजन्सीची विश्‍वासार्हता तपासून घ्यावी. तसेच तात्पुरत्या स्वरूपाची संस्था स्थापन झाली आहे काय? याची खात्री करावी. संबंधीत संस्थेची वृत्तपत्र माध्यमांमध्ये चांगली प्रतिमा असेल तरच योग्य ठरते. बहुतांश प्रसार माध्यमांमध्ये काम करणारे पत्रकार निवडणूक काळात उमेदवाराच्या प्रसिद्धीची जबाबदारी घेत असतात. मात्र ज्या वृत्तसंस्थेत काम करतात त्या ठिकाणी यांनी घेतलेली जबाबदारीची माहिती नसते. त्यामुळे त्यांची कामाबद्दलची विश्‍वासार्हता संपुष्टात येते. उमेदवारांना काही स्थानिक पत्रकार स्वतंत्र रित्या परस्पर वृत्तसंस्थेतून प्रसिद्धी देण्याच्या बदल्यात आर्थिक मोबदला स्विकारतात. मात्र गोपनीय पद्धतीने प्रसिद्धी करू अशी बतावणी करीत असतात. यामधूनच उमेदवाराची व राजकीय पक्षांची निश्‍चितच फसवणूक होत असते. वृत्तसंस्थांचे निवडणूकीमध्ये स्वतंत्र प्रसिद्धी पॅकेज असते. त्यामुळे उमेदवारांनी अशा फसवणूक करणार्‍या तथाकथित पत्रकार, वार्ताहर आणि पी.आर. एजन्सींना काम देताना दक्षता बाळगावी. उमेदवारांच्या परिचित असलेले तथाकथित पत्रकारांना निवडणूकीत आर्थिक मोबदला दिला नाही तर ते इतर नामवंत पी.आर. एजन्सीची बदनामी करत असल्याच्या घटना देखील निदर्शनास आल्या आहेत. त्यामुळे विश्‍वासार्हता तपासून तथाकथिंच्या भूलथापांना बळी न पडता प्रसिद्धी माध्यम जनसंपर्क सुविधा देणार्‍या पी. आर. एजन्सीची नियुक्ती करणे उपयुक्त ठरेल.

कार्यकर्ते, सामाजिक व राजकीय संस्था, संघटनांकडून होणारी फसवणूक

निवडणूक म्हटले की कार्यकर्ते आणि राजकीय व सामाजिक संस्थांचे योगदान महत्वपूर्ण ठरते. उमेदवाराला निवडणूक काळात कार्यकर्त्यांची व अशा संस्थांच्या पदाधिकार्‍यांची निश्‍चितच मदतीची अपेक्षा असते. जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी कार्यकर्त्यांच्या मदतीने तसेच सामाजिक व राजकीय संस्था/संघटनांच्या पदाधिकार्‍यांच्या माध्यमातून उमेदवार प्रयत्न करीत असतात. मात्र निवडणूक जिंकण्यासाठी बेरजेचे राजकारण करताना निवडणूक काळात फसवणूक करणारे महाभाग भेटतात. संबंधित उमेदवाराकडे आपल्याच पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे सांगून आर्थिक मोबदला व निवडणूकीत अनुषंगिक लाभ घेण्याचा प्रयत्न काही संधी साधू कार्यकर्ते करीत असतात. अमूक-अमूक मतदार माझ्या पाठीशी असल्याची बतावणी करून गैरफायदा घेतला जातो. यामध्ये संधीसाधू कायकर्ते व सामाजिक व राजकीय संस्था/संघटना, मंडळांचे पदाधिकारी यांचा सामावेश असतो. संस्था, संघटना, मंडळाचा स्थानिक पातळीवरील ठराविक भागामध्ये प्रभाव असल्याचे उमेदवारांना दर्शवून आर्थिक मोबदला प्राप्त करण्याचा गैरहेतू असतो. यामधून उमेदवाराची फसवणूक होण्याची शक्यता असते. संबंधीत संस्था, संघटना, मंडळे, बचतगट यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची विश्‍वासार्हता तपासून संबंधीत संस्था, संघटनांचे कार्य निवडणूक काळापूरतेच आहे काय हे तपासून पाहणे आवश्यक ठरते. संबंधीत संस्था व संघटना नोंदणीकृत आहेत काय याची देखील खात्री करून घेणे क्रमप्राप्त ठरते. काही जात निहाय, जात समुह गटाच्या संस्था व संघटना असल्याचे सांगून आर्थिक मोबदला उमेदवाराकडून घेण्याचा प्रयत्न करीत असतात. प्रत्यक्षात अशा संस्थांकडून मतदानात प्रत्यक्ष लाभ उमेदवाराला होत नसतो. कारण संबंधित संस्था व संघटना संबंधित जाती व समुह गटाचे नेतृत्व करीत असतातच असे नाही. त्यामुळे उमेदवारांची संबंधितांकडून फसवणूक होण्याची शक्यता असते. याबाबत दक्षता घेऊन निवडणूक काळात फसवणूक टाळता येऊ शकते.

बल्क एस.एम.एस.(संदेशवहन)द्वारे होणारी फसवणूक

निवडणूकीमध्ये प्रचाराच्या अल्प काळात सर्व मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधणे शक्य होत नाही. बहुसंख्य मतदारांना एकाच वेळी व अल्पावधीत संवाद साधणे शक्य व्हावे म्हणून नवीन तंत्रज्ञानाचा वापर उमेदवार व राजकीय पक्षांकडून केला जातो. मात्र अशा बल्क एस.एम.एस व सोशल मिडिया वरील मेसेज पाठविणार्‍या काही कंपन्यांनी सुविधा उपलब्ध केली आहे. तसेच अशा स्वरूपाच्या सुविधा उपलब्ध करणार्‍या संगणक प्रणाली देखील निवडणूक काळात विक्रीसाठी उपलब्ध असतात. काही कंपन्यांकडून अशा स्वरूपाचे बल्क एस.एम.एस. मेसेज पाठविण्याच्या नावावर उमेदवाराकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक मोबदला स्विकारला जातो. मात्र प्रत्यक्षात कंपन्यांनी सांगितले प्रमाणे मतदारांना संबंधीत मेसेज जात नसल्याने उमेदवाराची फसवणूक होते. बल्क मेसेज पाठविण्यावर ट्रायने बंधने लादली आहेत. बल्क मेसेज पाठविण्यावर मर्यादा घालून दिल्याने यामधून संबंधित कंपन्या पळवाट शोधून अथवा विविध नावाने सीम अथवा रजिस्ट्रेशनचा उपयोग करतात. मात्र ही शुद्ध फसवणूक संबंधित कंपन्यांकडून उमेदवारांची केली जाते. मतदारांचा संपर्क क्रमांक डेटाबेस चुकीचा असल्याने उमेदवारांची फसवणूक होते. विविध इंन्शूरन्स, इव्हेंट कंपन्या, मॉल, आय टी कंपन्या, तसेच विविध मोबाईल कंपन्यांकडून मोबाईल डेटाबेस बेकायदेशीर रित्या हस्तांतरण करून निवडणूक काळात विक्री केला जातो. त्याची सत्यता पडताळण्याची कोणतीही अधिकृत यंत्रणा अस्तित्वात नाही. संबंधित फोन क्रमांक चूकीचे असतात. काही कंपन्या डेटाबेस उमेदवाराला देत नाहीत. त्या स्वत: मॅसेज पाठविण्याची सेवा देतात. संबंधित डेटाबेस फक्त संगणकावर एकदाच दाखवला जातो. मात्र खात्री करण्यासाठी उमेदवाराकडे वेळ नसल्याने या परिस्थितीचा संबंधित कंपन्या फायदा घेत असतात. बहुतांश गैरफायदा घेणार्‍या कंपन्या संबंधित उमेदवाराकडून त्यांच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे फोन नंबर तसेच उमेदवाराकडे मतदारांचे असलेले नंबर स्विकारून त्यांनाच केवळ मॅसेज जाईल याची काळजी घेतात. जेणेकरून उमेदवाराची खात्री पटेल अशी संबंधित कंपन्या दक्षता घेतात. मात्र इतर मतदारांना मॅसेज न पाठवता त्याचा आर्थिक मोबदला उमेदवाराकडून स्विकारून फसवणूक केली जाते. वास्तविकपणे बल्क मेसेज म्हणजेच एका वेळी अनेकांना संदेश पाठविणार्‍या प्रणाली असल्या तरी भारतामध्ये ट्रायने निर्बंध लादल्यामुळे मर्यादित संदेश पाठवणे शक्य होते. हे उमेदवारांनी व राजकीय पक्षांनी समजून घेतले पाहिजे. बल्क मेसेज पाठविण्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपाचे मॅसेज पाठविण्याच्या संख्येवर सीमकार्ड असणे आवश्यक असते. त्याशिवाय एकावेळी अनेक संदेश पाठविणे शक्य होत नाही. संगणक प्रणालीमध्ये देखील मेसेज पाठविताना मर्यादित संख्येचे बंधन आहे याची जाणीव उमेदवार व राजकीय पक्षांनी ठेवणे आवश्यक आहे. मतदार व कार्यकर्ते पदाधिकार्‍यांचे फोन क्रमांक योग्य आहेत किंवा नाहीत याची खात्री उमेदवाराने व राजकीय पक्षाने करणे गरजेचे आहे. डेटाबेसची खात्री केल्याशिवाय संबंधित कंपन्यांना संदेश वहनाचे काम देऊ नये यामुळे फसवणूक टाळता येऊ शकते.

वॉररूम(सोशल मिडिया) या नावे होणारी फसवणूक

इंटरनेटच्या युगामध्ये निवडणूक वॉर रूम हे नाव उदयास आले आहे. सोशल मिडियाचा निवडणूकीतील वाढता प्रभाव लक्षात घेऊन वॉर रुम स्थापित केली जाते. त्या माध्यमातून सोशल मिडिया द्वारे प्रचार केला जातो. सोशल मिडियामध्ये सर्वसाधारण इंटरनेटच्या माध्यमातून मतदारांसाठी संवाद साधणार्‍या प्रणाली व अ‍ॅप्स्चा वापर केला जातो. यामध्ये ट्विटर, फेसबुक, वॉट्स अ‍ॅप, हाईक, आदी प्रणालीद्वारे मतदारांशी संवाद साधण्यासाठी यंत्रणा राबविली जाते. तसेच इंटरनेरच्या माध्यमातून ऑनलाईन वृत्त सेवा, ब्लॉग्ज्, स्वतंत्र उमेदवाराची वेबसाईट, यु-टूब आदी माध्यमातून मतदारांचा संवाद साधण्याकरीता संगणक व प्रशिक्षित कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाते. अशा स्वरूपाची कामे करण्यासाठी निवडणूक वॉर रूम हा शब्द प्रचलित झाला आहे. प्रत्यक्षात वॉर रुम राबवणार्‍या कंपन्या विविध स्वरूपांच्या कामाची बतावणी करून उमेदवाराची व राजकीय पक्षांची फसगत करीत असतात. वास्तविकपणे सोशल मिडियाचा दैनंदिन वापर उमेदवार व राजकीय पक्ष करीत असतातच. निवडणूकीत या करीता वेगळी यंत्रणा निर्माण करण्याची आवश्यकता नसते. मात्र बहुतांश उमेदवार काही कंपन्यांच्या भूल-थापांना बळी पडून अशा स्वरूपाचे काम सोपवत असतात. सोशल मिडियाचा प्रभावी वापर करण्याच्या संकल्पना निश्‍चित उमेदवारांनी माहिती करून घेतल्या पाहिजेत. यामध्ये दुमत नाही. मात्र निवडणूक वॉर रुमच्या नावे काही कंपन्या उमेदवारांची फसवणूक करतात, ही फसवणूक टाळण्यासाठी उमेदवार व राजकीय पक्षांनी निवडणूक वॉर रुमची सेवा देणार्‍या कंपन्यांकडून संकल्पना व कार्य समजून घेणे आवश्यक आहे. तांत्रिक स्वरूपाची माहितीची खात्री करूनच संबंधित काम दिले तर फसवणूक टाळणे शक्य होते.

प्रचार साहित्य छपाई व वाटपात होणारी फसवणूक

निवडणूकीमध्ये विविध स्वरूपाची प्रचार साहित्य छपाई करावी लागते. छपाई केलेले प्रचार साहित्य मतदारांपर्यंत पोहोचविण्याची यंत्रणा उमेदवारांना विकसित करावी लागते. याकरीता कार्यकर्त्यांवर अवलंबून न राहता अशा स्वरूपाचे कार्य करणार्‍या कंपन्यांवर अथवा संस्था, मंडळे, बचतगट यांच्यावर जबाबदारी सोपवावी लागते. निवडणूक प्रचार साहित्यामध्ये उमेदवार व राजकीय पक्षाचे अहवाल, ब्रोशर, स्टिकर, बॅनर, वोटर स्लिम, प्रचारपत्रक आदी प्रचार साहित्याचे वाटप मतदारांपर्यंत करावे लागते. हे काम करताना बहुतांश कंपन्या व संस्था, मंडळे, बचतगट प्रत्यक्षात मतदारांपर्यंत प्रचार साहित्य पोहोच करीत नाही. त्यामुळे उमेदवार व राजकीय पक्षांची निश्‍चित फसवणूक होते. मतदारांना सरसकट वाटप करणार्‍या प्रचार साहित्य पोहोचविणे शक्य होते. मात्र वोटर स्लिप अर्धवट स्वरूपाच्या माहितीमुळे संबंधित मतदारांपर्यंत पोहोचविणे अशक्य असते. उमेदवार व राजकीय पक्ष अशा स्वरूपांच्या कामासाठी आर्थिक मोबदला देतात. प्रत्यक्षात हे काम कितपत होते हे देखील जाणून घेणे आवश्यक आहे. अशा स्वरूपाचे काम देताना संबंधित कंपन्या व संस्थांची खात्री करावी. जेणेकरून होणारी फसवणूक टाळता येणे शक्य होईल. प्रचार साहित्य छपाई करताना निवडणूक आयोगाच्या नियमानुसार जिल्हाधिकारी यांच्याकडे संबंधित प्रिंटींग प्रेसचे डिक्लेरेशन असणे आवश्यक आहे. छपाईच्या बिलासोबत संबंधित विहित नमुन्यातील ए-बी फॉर्म जोडावे लागतात. ते प्रिंटींग प्रेसने देणे आवश्यक असते. या नियमाचा गैरलाभ प्रिंटींग प्रेस धारक घेत असतात. निवडणूक काळात उमेदवार व राजकीय पक्षांची अडवणूक करून प्रचार साहित्य छपाईकरीता अधिक आर्थिक मोबदला स्विकारत असतात. यामुळे उमेदवाराची फसवणूक होते. ती टाळण्याकरीता प्रचार साहित्य छपाईचे काम देण्यापूर्वीच संबंधित ए-बी फॉर्मची पूर्तता तसेच योग्य आर्थिक मोबदला ठरवूनच काम दिले तर फसवणूक टाळता येऊ शकते.


पेड न्यूज द्वारे होणारी फसवणूक

निवडणूक काळात काही उमेदवार व राजकीय पक्ष प्रसिद्धी माध्यमातून बातम्यांच्या स्वरूपात आपली जाहिरात करत असतात. बातमी सदृष्य मजकूर प्रसिद्ध करून जाहिरात केली जाते. याकरीता मोठ्या प्रमाणात आर्थिक मोबदला संबंधित प्रसार माध्यम्ये स्विकारत असतात. अशा जाहिरात स्वरूपाच्या बातम्यांना पेडन्यूज संबोधले जाते. प्रसार माध्यमांद्वारे विशिष्ट पक्षाची अथवा उमेदवाराची प्रचार सभा, भाषणे, उक्रमांना अवास्तव प्रसिद्धी देण्यात येते. तसेच विशिष्ट स्वरूपाच्या बातम्यांच्या प्रसिद्धीची वारंवारता जास्त असते. याकरीता प्रसिद्धी माध्यमांकडून अवास्तव आर्थिक मोबदला स्विकारला जातो. यामधून उमेदवाराची व राजकीय पक्षांची फसवणूकीला उत्तेजन मिळते. निवडणूक आयोगाने निवडणूक खर्चाच्या मर्यादेचे बंधन घातले असल्यामुळे उमेदवार व राजकीय पक्षांना प्रसार माध्यमातून मोठ्या प्रमाणात जाहिरात करणे अशक्य होते. त्यामुळे प्रसारमाध्यमामध्ये पेडन्यूज ही संकल्पना अस्तित्वात आली आहे. निवडणूक आयोगाने पेड न्यूज संदर्भात मार्गदर्शिका नियम तयार केले असले तरी यामधून सहज पळवाट संबंधितांकडून काढली जाते. विविध प्रसार माध्यमे निवडणूक काळात विविध उपक्रमांद्वारे उमेदवार व राजकीय पक्षांना प्रसिद्धी देत असतात. अंतर्गत आर्थिक मोबदला स्विकारून काही प्रसारमाध्यमे निवडणूक पॅकेज जाहीर करतात. या पॅकेजमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान अनुकूल वृत प्रसिद्धी देण्याच्या मोबदल्यात अवास्तव पैसे स्विकारून उमेदवार व राजकीय पक्षांची फसवणूक केली जाते. ही फसवणूक टाळण्याकरीता पेडन्यूजला उमेदवारांनी व राजकीय पक्षांनी थारा देऊ नये. पेडन्यूजच्या नावाने अनेक प्रसार माध्यमातील व्यक्ती तसेच प्रसार माध्यमातील जाहिरात विभागातील व्यक्ती पेडन्यूज पॅकेजचे मार्केटींग करीत असतात. उमेदवार व राजकीय पक्षांनी संबंधित कृत्याला विरोध करून ही संकल्पना मोडून काढणे आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात निवडणूकीत प्रसिद्धीमुळे मतदारांमध्ये चांगली प्रतिमा व वातावरण निर्माण होईल या आशेने उमेदवार पेडन्यूजच्या फसवणूकीला बळी पडतात. प्रसार माध्यमांमधून काही वृत्तपत्र व वृत्त वाहिन्यांचे अधिकृत निवडणूक पॅकेज असते. मात्र त्याची लेखी हमी दिली जात नाही. सर्व व्यवहार बेकायदेशीर केला जातो. यामुळे या स्थितीचा काही घटक गैरफायदा घेऊन संबंधित वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यांच्या नावे फसवणूक करतात. असे घटक संबंधित प्रसारमाध्यमे व उमेदवारांची देखील दुहेरी फसवणूक करीत असतात. ती टाळण्याकरीता अशा स्वरूपाच्या गैरकृत्यापासून दूर ठेवावे.

विविध प्रलोभनातून होणारी फसवणूक

निवडणूकीमध्ये प्रत्येक उमेदवाराला आपण जिंकून यावे असे वाटते. याकरीता उमेदवार सर्वतोपरी प्रयत्न करीत असतात. मतदारांशी संवाद साधण्याबरोबरच निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींचा लाभ घेण्याचा देखील प्रयत्न केला जातो. काही कंपन्या अशा स्वरूपांच्या त्रुटींचा लाभ मिळवून देण्याच्या मोबदल्यात आर्थिक फसवणूक करीत असतात. विविध प्रलोभने दाखवून उमेदवारांची संबंधितांकडून दिशाभूल केली जाते. यामध्ये संबंधित कंपन्यांकडून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र नियंत्रित करण्याची बतावणी करीत असतात. तसेच बोगस मतदान करून देतो अशा स्वरूपाची बतावणी करून फसवणूकीचे प्रकार अनेकदा उघडकीस आले आहेत. अशा विविध प्रलोभनातून उमेदवारांची फसवणूक केली जाते, ती टाळणे शक्य होते. संबंधित बतावणी करणार्‍या कंपन्यांकडून सर्व माहिती घेऊन खात्री करून निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी. जेणेकरून अशा समाज कंठकांवर कारवाई करणे शक्य होईल. वास्तविकपणे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र नियंत्रित करता येत नाही. याची जाणीव उमेदवारांनी ठेवली पाहिजे. अफवा व गैरसमजांवर विश्‍वास ठेवला नाही तर विविध प्रलोभनातून होणारी फसवणूक टाळणे शक्य होते. काही कंपन्या ‘लास्ट डे’ मॅनेजमेंटच्या नावाने उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळून फसवणूक करीत असतात. मतदानाच्या अखेरच्या दिवशी पोलिंग बुथ वर संबंधित कंपन्या मतदार सर्च सेवा देण्यासाठी तसेच तत्सम् स्वरूपाच्या कामाकरीता मोठ्या प्रमाणात आर्थिक मोबदला स्विकारून फसगत करीत असतात. प्रत्यक्षात निवडणूक काळामध्ये संबंधित मतदार संघातील बाहेरच्या व्यक्तींना मतदारसंघात उपस्थित राहता येत नाही. मतदारसंघातीलच व्यक्ती अशा स्वरूपांचे काम करू शकतात. याची जाणीव उमेदवाराने ठेवली पाहिजे. जेणेकरून बाहेरील कंपन्या फसवणूक करू शकणार नाहीत.
“पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो’’ ही अचूक सर्वेक्षण अंदाज वर्तविणारी एकमेव विश्वसनीय संस्था आहे

चंद्रकांत भुजबळ
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो ‘प्राब’

मतदारांची फसवणूक टाळा 

निवडणूकीमध्ये यश मिळविण्यासाठी उमेदवार व राजकीय पक्षांकडून विविध स्वरूपाची आश्‍वासने दिली जातात. सवंग प्रसिद्धी करीता अशक्य असलेल्या कामांची आश्‍वासने व प्रलोभने मतदारांना देवू नयेत. याचा गंभीर परिणाम राजकीय कारकिर्दीत होत असतो. हे उमेदवारांनी जाणून घेतले पाहिजे. काही उमेदवार सवंग प्रसिद्धी मिळविण्याच्या उत्साहामध्ये मतदारांना तसेच कार्यकर्त्यांना फाजिल आश्‍वासने निवडणूक काळात दिली जातात. काही मतदार अशा आश्‍वासनांना व प्रलोभनांना भुलतात मात्र त्यांची फसवणूक झाल्याचे निवडणूकीनंतर लक्षात येते. त्यानंतर संबंधित उमेदवाराबाबत कायमस्वरूपी द्वेश निर्माण करतात. याचा परिणाम निश्‍चितच आगामी उमेदवाराच्या व राजकीय पक्षाच्या  राजकारणावर होतो. राजकारणामध्ये कायम स्वरूपी यश मिळविण्यासाठी मतदारांची फसवणूक टाळणे आवश्यक आहे. त्याचबरोबर निवडणूक काळात होणार्‍या विविध स्वरूपाच्या खर्चाची देयके  देण्याचे बहुतांश उमेदवार निवडणूकीनंतर टाळतात. यामुळे अशा उमेदवारांची विश्‍वासार्हता रहात नाही. याचा देखील परिणाम संबंधित घटकांकडून आगामी निवडणूकीत निश्‍चित होतो. त्यामुळे मतदार, कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांची फसवणूक होणार नाही याची दक्षता उमेदवार व राजकीय पक्षांची घेणे आवश्यक आहे.
निवडणूक काळामध्ये उमेदवारांची व राजकीय पक्षांची तसेच मतदारांची विविध स्वरूपात होणारी फसवणूक वरील लेखामध्ये थोडक्यात विषद करण्यात आली आहे. निवडणूक विषयक काम करणार्‍या काही संबंधित कंपन्या व संस्थांच्या चूकीच्या कृत्यांमुळे इतर चांगल्या संस्था व कंपन्यांची बदनामी होत असते. उमेदवारांची व राजकीय पक्षांना याची माहिती व्हावी या दृष्टीकोनातून सदर लेखन केले आहे. यामध्ये कोणत्याही व्यक्ती, प्रसार माध्यमे, संस्था, संघटना, कंपन्यांना दोष देत नाही. निवडणूकीतील फसवणूकीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न यामध्ये करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी ‘प्राब’शी संपर्क साधावा.“पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो’’ ही अचूक सर्वेक्षण अंदाज वर्तविणारी एकमेव विश्वसनीय संस्था आहे

चंद्रकांत भुजबळ
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो ‘प्राब’

मीरा भाईंदर महापालिका महापौरपदी भाजपाच्या डिंपल मेहता विजयी; तर चंद्रकांत वैती उपमहापौरपदी विजयी

मीरा भाईंदर महापालिका महापौरपदी भाजपाच्या डिंपल मेहता विजयी; तर चंद्रकांत वैती उपमहापौरपदी विजयी




मीरा भाईंदर महापालिका महापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया सोमवारी सकाळी सुरू झाली. या निवडणुकीत              महापौरपदी अपेक्षेप्रमाणे भाजपाच्या डिंपल मेहता विजयी झाल्या आहेत. शिवसेनेच्या अनिता पाटील यांचा पराभव करत डिंपल मेहता यांनी विजय मिळवला. डिंपल मेहता यांना  61 मतं मिळाली तर अनिता पाटील यांना  34  मतं मिळाली. महापौरपदासाठीच्या शिवसेनेच्या उमेदवार अनिता पाटील यांना काँग्रेसच्या 10 नगरसेवकांनी सुद्धा मतदान केलं. काँग्रेस पुरस्कृत 2 अपक्ष नगरसेवकांनीदेखील सेनेच्या अनिता पाटील यांना मतदान केले.
महापौर पदाच्या या निवडणुकीसाठी भाजपाचे 61 नगरसेवक भगवे फेटे घालून सभागृहात उपस्थित झाले होते. तर शिवसेना व काँग्रेसचे नगरसेवक एकत्र सभागृहात दाखल झाले. भाजपाकडून डिंपल मेहता या महापौरपदासाठीच्या उमेदवार होत्या तर शिवसेनेकडून अनिता पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे मीरा भाईंदर महापालिकेत महापौरपदासाठी भाजपा विरूद्ध शिवसेना अशी थेट लढत बघायला मिळली. निवडणूक प्रक्रियेपूर्वी भाजपाकडून वंदना भावसार यांनी उमेदवारी अर्ज भरला होता पण त्यानंतर त्यांनी अर्ज मागे घेतला. तर मीरा भाईंदर महापालिका उपमहापौर पदी अपेक्षे प्रमाणे भाजपचे चंद्रकांत वैती विजयी झाले. काँग्रेसच्या अनिल सावंत यांचा त्यांनी पराभव केला. चंद्रकांत वैती यांना  61   मतं मिळाली तर सावंत यांना  34  मतं मिळाली. सावंत यांना शिवसेनेच्या 22 नगरसेवकांनीसुद्धा मतदान केले. काँग्रेस पुरस्कृत 2 अपक्ष नगरसेवकांन देखील सावंत यांना मतदान केले. वैती हे माजी उपमहापौर तसेच माजी विरोधी पक्षनेते होते.मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपाने एकहाती सत्ता राखली. बहुमताचा आकडा पार करत भाजपने 61 जागांवर विक्रमी आघाडी घेतली आहे.  भाजपाच्या लाटेनं इतर पक्षांचा सुपडा साफ केला   शिवसेना 22, काँग्रेस 10 आणि इतरांना 2 जागांवर विजय मिळवण्यात यश आले आहे.  मीरा-भाईंदरमध्ये पालिका निवडणुकीत भाजपाच सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला तर शिवसेनेला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. काँग्रेसची चांगलीच दमछाक झाली असून तिसऱ्या स्थानावर फेकली गेली. राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आला नाही. 2012 च्या निवडणुकीच्या तुलनेत शिवसेनेला यावर्षी चांगले यश मिळाले आहे. मागील निवडणुकीत शिवसेनाला 15 जागा मिळाल्या होत्या. यावेळी सत्तेचं स्वप्न जरी भंगलं असलं तरी सेनेच्या जागेत वाढ झाली आहे. अतिम निकाल हाती आला असून सेनेच्या वाट्याला 22 जागा मिळाल्या आहेत. गेल्या निवडणुकीत मिरा भाईंदर महापालिकेत राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर होती. राष्ट्रवादीकडे भाजपखालोखाल 27 जागा होत्या. पण यावेळी राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आला नाही. एकही जागा न मिळाल्यामुळे राष्ट्रवादीची मोठा धक्का बसला आहे.  मागील निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत काँग्रेसला 9 जागांच नुकसान झाले आहे.  गेल्यावर्षी काँग्रेसच्या  वाट्याला 19 जागा आल्या होत्या. मात्र, यावेळी काँग्रेसच्या 10 जागांवर समाधान मानावं लागले आहे.  शिवसेनेच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यामुळे काँग्रेसच्या एका जागेवर बिनविरोध जिंकली. अल्पसंख्याक मतांवर मदार असलेल्या काँग्रेसला यावेळी मतदारांनी हात दाखवला.
मीरा भाईंदर महापालिकेच्या 2012च्या निवडणुकीत भाजपानंच सर्वाधिक 32 जागा मिळवल्या होत्या, मात्र त्याच वेळी काँग्रेसनं 18 आणि राष्ट्रवादीनं 26 जागा मिळवून अपक्षांच्या मदतीनं सत्ता स्थापन केली होती. पहिल्या अडीच वर्षात  काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी, अपक्षांची सत्ता होती. मात्र त्यानंतर पुन्हा शिवसेना आणि भाजपानं सत्ता खेचून आणली होती. नंतरच्या अडीच वर्षात भाजपा, शिवसेना एकत्र आले आणि त्यांनी बहुजन विकास आघाडी, अपक्षांची मोट बांधत सत्ता स्थापन केली. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधात बसावे लागले होते. भाईंदर महापालिकेच्या 2012च्या महापालिका निवडणुकीत भाजपा 32, शिवसेना 15, काँग्रेस 18,  राष्ट्रवादी 26, बहुजन विकास आघाडी 3, एका अपक्षाचा विजय झाला होता. 
Political Research and Analysis Bureau (PRAB)



दिल्ली पोटनिवडणूक : बवानामध्ये आपचा विजय

दिल्ली पोटनिवडणूक : बवानामध्ये आपचा विजय


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर दिल्लीकारांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. दिल्लीतील बवाना विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाने बाजी मारली आहे. ‘आप’चे उमेदवार रामचंद्र यांचा विजय झाला आहे.
आम आदमी पक्षाने तब्बल 24 हजार मतांनी विजयाला गवसणी घातली असून, दुसऱ्या क्रमांकावर भाजप तर तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेस आहे. या निवडणुकीत भाजपकडून वेदप्रकाश, आम आदमी पक्षाकडून रामचंद्र आणि काँग्रेसकडून सुरेंद्र कुमार रणांगणात होते भाजपचे उमेदवार वेदप्रकाश हे या मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे आमदार होते. मात्र, त्यांनी ‘आप’ला राम राम करत भाजपप्रवेश केला. त्यामुळे बवानामध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली.
दिल्ली महापालिका निवडणुकीतल्या पराभवानंतर बवाना पोटनिवडणूक म्हणजे आम आदमी पक्षाची एकप्रकारे परीक्षाच होती. तर काँग्रेससाठी भरकटलेली नाव किनाऱ्यावर आणण्याची संधी होती. त्यात राजौरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या विजयानंतर भाजपने बावनामध्ये कंबर कसली होती. मात्र, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने बवानामध्ये बाजी मारली आहे.

NCT OF Delhi - BAWANA
Result Declared
Scheduled Round:- 28, Entered Round:- 28
Total Electors:- 294589, Total Votes Polled:- 131950
Candidate NameParty NameVotes% of Votes Polled
RAM CHANDERAam Aadmi Party5988645.39
VED PARKASHBharatiya Janata Party3583427.16
SURENDER KUMARIndian National Congress3191924.19
SATPAL SINGHIndependent9610.73
KALUSamajwadi Party8340.63
SUMESHIndependent7860.60
UMESH KUMARIndependent1850.14
BANWARI LALRashtriya Janta Congress1320.10
None of the AboveNone of the Above14131.07
TOTAL131950100.00
=============================================================
Andhra Pradesh - Nandyal
Result Declared
Scheduled Round:- 19, Entered Round:- 19
Total Electors:- 219108, Total Votes Polled:- 173187
Candidate NameParty NameVotes% of Votes Polled
BHUMA. BRAHMANANDA REDDYTelugu Desam9707656.05
SILPA MOHAN REDDYYuvajana Sramika Rythu Congress Party6961040.19
GADDAM ABDUL KHADARIndian National Congress13820.80
B. NARASIMHULU MADIGAIndependent8020.46
MUDDAM NAGA NAVEENIndependent7890.46
S. RAGHUNADHA REDDYIndependent4830.28
S. MAHABOOB BASHAAnna YSR Congress Party4000.23
ABDUL SATTAR. G.B. C. United Front3380.20
BALA SUBBAIAH. A.Independent2890.17
S. L. KANTHA REDDYIndependent2340.14
BHAVANASI PULLAIAHRayalaseema Parirakshana Samithi1540.09
P. GURUVAIAHIndependent1220.07
VALLIGATLA REDDAPPARajyadhikara Party1080.06
RAVU SUBRAHMANYAMNavataram Party940.05
K. RAGHAVENDRASamajwadi Party750.04
None of the AboveNone of the Above12310.71
TOTAL173187100.00

Sunday 27 August 2017

२०२४ पासून एकत्र निवडणुका घेण्यास निती आयोग अनुकूल

२०२४ पासून एकत्र निवडणुका घेण्यास निती आयोग अनुकूल

देशाचे हित लक्षात घेऊन २०२४ सालापासून लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका दोन टप्प्यांत एकत्रितपणे घेण्यास निती आयोगाने अनुकूलता दर्शवली आहे.
देशात निवडणूक प्रचाराचे वातावरण कमीतकमी राहून प्रशासनात अडथळा येणार नाही हे निश्चित करण्यासाठी भारतातील सर्व निवडणुका मुक्त, निष्पक्ष आणि एकाच वेळी व्हायला हव्यात, असे मत आयोगाने अलीकडेच जारी केलेल्या अहवालात व्यक्त केले आहे.
२०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपासून दोन टप्प्यांमध्ये एकत्र निवडणुका घेण्याच्या दृष्टीने आपण काम सुरू करू शकतो. यासाठी फारतर काही राज्य विधानसभांच्या निवडणुका एकदाच आधी घेणे किंवा त्यांना मुदतवाढ देणे एवढेच करावे लागेल, असे आयोगाने नमूद केले आहे.
देशहितार्थ याची अंमबजावणी करण्यासाठी घटनातज्ज्ञ आणि निवडणूक तज्ज्ञ, विचारगट, सरकारी अधिकारी आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांचा समावेश असलेला सर्व संबंधितांचा विशिष्ट गट तयार केला जावा अशी सूचना अहवालात करण्यात आली आहे.या कामासाठी २०१७-१८ ते २०१९-२०२० असा तीन वर्षांचा कृती अ‍ॅजेंडा आखण्यात आला आहे. आपल्या सूचनांवर विचार करण्यासाठी निती आयोगाने निवडणूक आयोगाला ‘नोडल एजन्सी’ बनवले असून, यासाठी मार्च २०१८ ही मुदत निश्चित केली आहे.



गोवा पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर विजयी

गोवा पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर विजयी

पर्रिकरांनी काँग्रेसच्या गिरीश चोडणकर यांचा 4 हजार 800 मतांनी पराभव 


गोवा येथील दोन मतदारसंघांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीतील मतमोजणीला सोमवारी सकाळी सुरुवात झाली. पणजीतून निवडणूक लढवणारे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे विजयी झाले आहेत.तर वालपोई मतदार संघात भाजपचे विश्वजित राणे हे विजयी झाले. राणेंनी १० हजार मतांनी काँग्रेसच्या रॉय नाईक यांचा पराभव केला.
तीन राज्यांमधील विधानसभेतील चार जागांसाठी पोटनिवडणूक पार पडली. गोव्यातील पणजी, वालपोई,  दिल्लीतील बवाना आणि आंध्रप्रदेशमधील नंद्याल या चार जागांसाठी पोटनिवडणूक झाली. सोमवारी कडेकोट बंदोबस्तात मतमोजणीला सुरुवात झाली. गोव्यातील पोटनिवडणुकीकडे देशभराचे लक्ष लागले आहे. पणजीमध्ये मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर निवडणूक लढवत असून त्यांना काँग्रेसचे गिरीश चोडणकर आणि गोवा सुरक्षा मंचचे आनंद शिरोडकर यांनी आव्हान दिले होते. या निवडणुकीत पर्रिकर यांनी चोडणकर यांचा सुमारे ४,८०० मतांनी पराभव केला. पर्रिकर यांच्या विजयामुळे भाजपला दिलासा मिळाला आहे. पणजी हा मनोहर पर्रिकर यांचा बालेकिल्ला मानला जातो. पणजीत ७० टक्के मतदान झाले होते. या भागातील मतदार भाजपवर नाराज असल्याची चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिल्याचे मतमोजणीतून स्पष्ट झाले.
वालपोईमध्ये आरोग्यमंत्री आणि भाजप उमेदवार विश्वजित राणे हे रिंगणात होते. राणे यांना काँग्रेसच्या रॉय नाईक यांनी आव्हान दिले होते. तर वालपोईत ७९.८० टक्के मतदान झाले होते. वालपोईमध्ये विश्वजित राणे विजयी झाले.
दिल्लीतील बवाना येथे आप, भाजप आणि काँग्रेस या पक्षांमध्ये लढत आहे. महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर ‘आप’साठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे. आंध्रप्रदेशमधील नंद्याल येथे सत्ताधारी तेलगू देसम पक्ष आणि वायएसआर काँग्रेस यांच्यात लढत आहे. पोटनिवडणुकीत या मतदारसंघात तब्बल ७९. १३ टक्के मतदान झाले होते.
“मी लढवय्या आहे. पणजीमधील जनतेसाठी यापुढे देखील उपस्थित राहीन.”, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे पराभूत उमेदवार गिरीश चोडणकर यांनी दिली.

Goa - Valpoi
Result Declared
Scheduled Round:- 4, Entered Round:- 4
Total Electors:- 28874, Total Votes Polled:- 23063
Candidate NameParty NameVotes% of Votes Polled
VISHWAJIT PRATAPSINGH RANEBharatiya Janata Party1618870.19
ROY R. NAIKIndian National Congress610126.45
ROHIDAS SADA GAONKARIndependent3161.37
None of the AboveNone of the Above4581.99
TOTAL23063100.00

-----------------------------------------------------------------------------------------
Goa - Panaji
Result Declared
Scheduled Round:- 3, Entered Round:- 3
Total Electors:- 22196, Total Votes Polled:- 15538
Candidate NameParty NameVotes% of Votes Polled
MANOHAR PARRIKARBharatiya Janata Party986263.47
GIRISH RAYA CHODANKARIndian National Congress505932.56
ANAND PANDURANG SHIRODKARGoa Suraksha Manch2201.42
KENNETH IAN STEWART SILVEIRAIndependent960.62
None of the AboveNone of the Above3011.94
TOTAL15538100.00

Thursday 24 August 2017

नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुक- 2017 ; विद्यमान नगरसेवक संपर्क यादी

नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुक- 2017 ; विद्यमान नगरसेवक संपर्क यादी


 नांदेड- वाघाळा महानगरपालिकेची मुदत 30 ऑक्टोबर 2017 रोजी संपत असल्याने निवडणुकीची तयारी सुरू आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने 1 जुलै 2017 रोजी प्रसिद्ध केलेली विधानसभेची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. तिचे प्रभागनिहाय विभाजन करून 19 ऑगस्ट 2017 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्या दिवसापासून 28 ऑगस्ट 2017 पर्यंत या याद्यांवर हरकती व सूचना दाखल करता येतील. अंतिम मतदार याद्या 7 सप्टेंबर 2017 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्याच दिवशी मतदान केंद्रांची यादी; तसेच प्रभागनिहाय व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्याही प्रसिद्ध केल्या जातील.

2012 - विद्यमान नगरसेवक संपर्क यादी 

वार्ड नाव पत्ता मोबाईल क्र. पक्ष
2-शोभानगर-ब स्वामी शैलजा किशोर, महापौर घर नं.1-7-1594 शोभानगर, नांदेड. 9422871435 काँग्रेस
30-मंडई-अ कुरेशी शफी अहेमद, उपमहापौर घर क्र.7-4-27,आमेना मंजील, जुना गंज, नांदेड. 9226140791 काँग्रेस
1-तरोडा(बु.)-अ कदम गंगाबाई नारायणराव महसूल कॉलनी, तरोडा (बु.), ब्लॉक नं.20, नांदेड. 9923395004 काँग्रेस
1-तरोडा(बु.)-ब कल्याणकर बालाजी दत्तराव घर क्र.111/2 तरोडा (बू.), नांदेड. 9423411010 शिवसेना
2-शोभानगर-अ सातोलीकर श्रीनिवास आशन्ना 101, यश अपार्टमेंट, कैलासनगर, नांदेड. 9422114041 काँग्रेस
3-सांगवी-अ पवळे उमेश देवराव बापु निवास, पांडुरंग नगर, नांदेड. 9960226362 काँग्रेस
3-सांगवी-ब कोकाटे नागाबाई भुजंगराव 93, दत्त मंदिराजवळ, सांगवी बु., नांदेड. 9422187752 शिवसेना
4-हनुमानगड-अ कंठेवाड सविता मारोतराव श्रद्धा निवास, जानकी नगर, हनुमानगड, नांदेड. 9923888823 राष्ट्रवादी काँग्रेस
4-हनुमानगड-ब बियाणी प्रविण बालाप्रसाद 1-11-511/1, मगनपुरा नवा मोंढा, नांदेड. 9011133777 राष्ट्रवादी काँग्रेस
5-भाग्यनगर-अ पांढरे स्नेहा सुधाकर घर क्र.1-7-514, उदय नगर, नांदेड. 9028078777 काँग्रेस
5-भाग्यनगर-ब चव्हाण आनंद शंकरराव 93, आनंदनगर, नांदेड. 9422171577 काँग्रेस
6-पिरबु-हान नगर-अ फारुख अली खाँ इलियास अली खाँ घर क्र.1-12-1013, पिरबु-हान नगर, नांदेड. 9823882221 काँग्रेस
6-पिरबु-हान नगर-ब अंजुम बेगम शेख अफरोज घर क्र.1-7-1004,पिरबु-हान नगर, नांदेड. 8087307793 एआयएमआयएम
7-तरोडा खु.-अ मुंढे शांता मोतीराम परवानानगर, नांदेड. 9960999444 शिवसेना
7-तरोडा खु.-ब आनेवार गंगासागर संदीप घर क्र.13-बी, कृषी क्रांती सोसायटी, मालेगाव रोड, तरोडा (खु.), नांदेड. 8380084638 काँग्रेस
7-तरोडा खु.-क कल्याणकर बालाजी देविदासराव 10, तरोडा (खु.), नांदेड. 9850975641 शिवसेना
8-जंगमवाडी-अ भवरे किशोर दामोधर घर क्र.1-18-467, दिपनगर, नांदेड. 9422871388 काँग्रेस
8-जंगमवाडी-ब कदम शिला सुनिल 3-1-344, कदम हॉस्पीटल, डॉ.लेन, नांदेड. 9422189273 राष्ट्रवादी काँग्रेस
9-कैलासनगर-अ प्रमोद मुरलीधरराव खेडकर साई अपार्टमेंट, दुसरा मजला, श्रीनगर, नांदेड. 9422174999 शिवसेना
9-कैलासनगर-ब कनकदंडे मोहिनी महेशराव कल्पवृक्ष, पाटनूरकरनगर, नांदेड. 9422170155 काँग्रेस
10-लेबर कॉलणी-अ वाजेदा तब्बसुम अथरअली खान घर क्र.1-5-359, लेबर कॉलनी, नांदेड. 9921028200 काँग्रेस
10-लेबर कॉलणी-ब सयद जानी म.कासीम घर क्र.1-5-174, लेबर कॉलनी, नांदेड. 9881567547 राष्ट्रवादी काँग्रेस
11-नवा मोढा-अ मोकले सोनाबाई रामचंद्र साईदेन, मगनपुरा, नांदेड. 9860869608 काँग्रेस
11-नवा मोढा-ब पोकर्णा नवलकुमार ओमप्रकाश मित्रकृपा निवास, नवामोंढा, नांदेड. 9860033933 काँग्रेस
12-मित्रनगर-अ जाधव जयश्री आनंद मुन्नीबाई सदन, विष्णु नगर, नांदेड. 9404893339 शिवसेना
12-मित्रनगर-ब गुर्रम विनयकुमार जगदिश घर क्र.1-21-212, बालाजीनगर, नांदेड. 9423040001 शिवसेना
13-नंदीग्राम सोसायटी-अ चव्हाण श्रद्धा सुशिल रुपमहल, दशमेश हॉस्पीटलच्या पाठीमागे, चिखलवाडी, नांदेड. 9422185184 राष्ट्रवादी काँग्रेस
13-नंदीग्राम सोसायटी-ब गाडीवाले विरेद्रसिंघ जगतसिंघ विष्णुनगर, नांदेड. 9422170171 काँग्रेस
14-विष्णुनगर-अ जिंदम पार्वती व्यंकटेश कामाक्षी टाऊन मार्केट, नवा मोंढा, नांदेड. 9422141111 काँग्रेस
14-विष्णुनगर-ब उमरेकर अशोक रावण आदिवासी हॉस्टेल रोड, विष्णुनगर, नांदेड. 9890477078 शिवसेना
15-शिवाजीनगर-अ मुदीराज कमलाबाई रामस्वामी घर क्र.1-12-677, गोरक्षण, विष्णुनगर, नांदेड. 9921332446 काँग्रेस
15-शिवाजीनगर-ब उमेशसिंह चौव्हाण प्रेमलता निवास, महावीर नगर, नांदेड. 9011001009 काँग्रेस
16-नई आबादी / डॉ आंबेडकर नगर-अ रजियाबेगम अयुब खान 1-4-312, नवी आबादी, नांदेड. 9096701658 अपक्ष
16-नई आबादी / डॉ.आंबेडकर नगर-ब सलीमाबेगम नुरुल्लाखान घर क्र.1-3-451, नवी आबादी, नांदेड. 9960477678 एआयएमआयएम
17-गणेशनगर-अ गाडगे शंकर जयवंतराव श्रमसाफल्य, विजय नगर, पावडेवाडी रोड, यशवंतनगर, नांदेड. 9763844608 काँग्रेस
17-गणेशनगर-ब देशमुख वैशाली मिलींद फ्लॅट नं.4, ओंकार अपार्टमेंट, पावडेवाडी रोड, नांदेड. 8007775555 शिवसेना
18-जयभिम नगर / महाविर हा.सो.-अ गायकवाड अंजली सुरेशराव पुष्पनगर, नांदेड. 9175900677 संविधान पार्टी
18-जयभिम नगर / महाविर हा.सो.-ब देशमुख बाळासाहेब गंगाधरराव अरविंदनगर, नांदेड. 9421932245 संविधान पार्टी
19-खडकपुरा-अ सयदा इतरत फातेमा मजहर हुसेन घर क्र.2-7-11, खडकपुरा, वजिराबाद, नांदेड. 9890098302 राष्ट्रवादी काँग्रेस
19-खडकपुरा-ब गफार खान गुलाम महंमद खान रिजवान मंजील, मिल गेट पोस्ट ऑफिस, नांदेड. 9421291807 राष्ट्रवादी काँग्रेस
20-देगावचाळ-अ धबाले गणपत गुणाजी गंगाचाल, मिल एरिया, वजिराबाद, नांदेड. 9158841623 काँग्रेस
20-देगावचाळ-ब अनुजा अमितसिंह तेहरा पी-174 बोरबन फॅक्ट्री एरिया, वजिराबाद, नांदेड. 8446746829 काँग्रेस
21-वजिराबाद-अ यादव तुळजाराम गणेशलाल गंगोत्री निवास, दिलीपसिंग कॉलनी, नांदेड. 9766636999 काँग्रेस
21-वजिराबाद-ब शर्मा पुष्पाबाई राजेश 2-9-27, मिलरोड, नांदेड. 9881074574 काँग्रेस
22-गुरुव्दारा-अ ज्योती महेंद्र खेडकर घर क्र. 3-3-160, चिखलवाडी, नांदेड. 9921221000 शिवसेना
22-गुरुव्दारा-ब नवाब गुरमितसिंघ ब-हामसिंघ घर क्र. 3-3-75, गेट नं.2, चिखलवाडी, नांदेड. 9422131313 शिवसेना
23-अबचलनगर-अ राओत्रे संगिता पृथ्वीराज घर क्र. 4-1-501/1, जुना मोंढा, नांदेड. 9404660211 शिवसेना
23-अबचलनगर-ब गिल सरजितसिंघ पंजाबसिंघ पंजाब निवास, दशमेश नगर, नांदेड. 9422871991 काँग्रेस
24-हैदरबाग-अ अ.हबीब अ.रहीम बागवान घर क्र. 9-5-196 उमर कॉलनी, नांदेड. 9822627362 एआयएमआयएम
24-हैदरबाग-ब बिपाशाबेगम स.वलीयोद्दीन घर क्र. 9-5-1239, रहेमत नगर, देगलुर नाका, नांदेड. 8554912424 एआयएमआयएम
25-इदगाह-अ अब्दुल फसिया फिरदोस घर क्र. 9-4-1097, बिलाल नगर, नांदेड. 9511127111 काँग्रेस
25-इदगाह-ब अ.सत्तार अ.गफुर घर क्र. 9-4-1097, बिलाल नगर, नांदेड. 9422174451 काँग्रेस
26-खुदबई नगर-अ असियाबेगम अ.हबीब बागवान घर क्र. 9-5-196, उमर कॉलनी, देगलुरनाका, नांदेड. 9822627362 एआयएमआयएम
26-खुदबई नगर-ब सयद शेरअली महेबुब अली घर क्र. 9-5-513 (9-6-577), उमर कॉलनी, नांदेड. 9272168711 एआयएमआयएम
27-मदिनानगर-अ इशरत फातेमा अ.शमीम घर क्र. 9-4-1171, मदीना नगर, नांदेड. 9011157111 काँग्रेस
27-मदिनानगर-ब कुरेशी चाँदपाशा खाजा 9-4-1162, मदिना नगर, देगलुर नाका, नांदेड. 8007000440 एआयएमआयएम
28-इतवारा बाजार-अ तहसीन अब्दुल समद 9-4-460, खय्युम प्लॉट, मॅफको रोड, नांदेड. 9403004700 काँग्रेस
28-इतवारा बाजार-ब फारुख हुसेन कासीमसाब घर क्र. 9-5-957, केळी मार्केट, रजानगर, नांदेड. 9890012253 एआयएमआयएम
29-चौफाळा-अ कोकुलवार लक्ष्मीबाई तुळशीराम विणकर कॉलनी, चौफाळा, नांदेड. 9422514444 काँग्रेस
29-चौफाळा-ब राखेवार सतिश शेषप्पा चौफाळा, पोलिस चौकीसमोर, नांदेड. 9403067968 काँग्रेस
30-मंडई-ब चाऊस हसीनाबेगम साबेर घर क्र. 8-1-178, मंडई, नांदेड. 9970933040 काँग्रेस
31-नावघाट-अ अ.लतीफ अ.मजीद घर क्र. 9-1-151, गनीमपुरा, करबला रोड, नांदेड. 9405824343 काँग्रेस
31-नावघाट-ब जकीय बेगम स.मुख्तार 9-1-101,गनीमपुरा, नई मस्जिद, नांदेड. 9890818773 एआयएमआयएम
32-होळी-अ गुरुखुदे सुंदरलाल किशनलाल 6-1-52, कुंभार टेकडी, नांदेड. 9,049,992,345 शिवसेना
32-होळी-ब खोमणे सुदर्शना महेश रुक्मीणी प्लाझा, कलाल गल्ली होळी, सराफा, नांदेड. 9011785555 शिवसेना
33-फत्तेबुरुज-अ बावजीर शे.हबीब शेख अब्दुल्ला घर क्र. 5-3-26, अरब गल्ली, नांदेड. 9823374021 एआयएमआयएम
33-फत्तेबुरुज-ब लतीफाबेगम बु-हान खान घर क्र. 5-1-120, आयना महल टेकडी, किल्ला रोड, नांदेड. 9923154202 एआयएमआयएम
34-गाडीपुरा-अ रावत दिपकसिंह काशीनाथसिंह यश अपार्टमेंट, शास्त्रीमार्केट, एमजीरोड, नांदेड. 9422189200 शिवसेना
34-गाडीपुरा-ब अन्नपुर्णाबाई जम्मुसिंह ठाकुर घर क्र. 4-4-108, गाडीपुरा, नांदेड. 9890915845 काँग्रेस
35-दिलीपसिंग कॉलनी-अ किशोर यादव यादव भवन, वजिराबाद, नांदेड. 9422173836 काँग्रेस
35-दिलीपसिंग कॉलनी-ब सोडी गुरुप्रीतकौर दिलीपसिंघ सोडी निवास, नगीनाघाट रोड, नांदेड. 9923631313 भाजपा
36-वसरणी-अ गायकवाड वैजयंता भिमराव प्लॉट नं.एन.एच.1/4,एनडी 42, सिडको, नांदेड. 9923796124 काँग्रेस
36-वसरणी-ब मोरे संजय गंगाधरराव मु.वसरणी, पो.सिडको, ता.जि.नांदेड. 9823124512 काँग्रेस
37-कौठा-अ अभिषेक सौदे विरभद्रनगर, जुना कौठा, नांदेड. 9764899000 भाजपा
37-कौठा-ब काकडे सिंधु पांडुरंग साईसदन, रविनगर, जुनाकौठा, नांदेड. 9422173650 राष्ट्रवादी काँग्रेस
38-सिडको-अ देशमुख मंगला गजानन कृषीकृपा, वसंतनगर, नांदेड. 9923429111 काँग्रेस
38-सिडको-ब चिखलीकर संदीप सुभाषराव एन.डी. 1, शिवाजी चौक, सिडको, नांदेड. 9773649999 राष्ट्रवादी काँग्रेस
39-सिडको / हडको-अ सौ. ललिता मुकुंदराव बोकारे आशिर्वाद, प्लॉट नं.91-बी, कल्याणनगर, नांदेड. 9860463352 काँग्रेस
39-सिडको / हडको-ब विनय विश्वांबरराव पाटील 127, किसाननगर, मनपा मातृसेवा केंद्रासमोर, सिडको, नांदेड. 9823011144 काँग्रेस
40-वाघाळा-अ जमदाडे करुणा भिमराव एन.डी.116, 27/2, हडको, नवीन नांदेड. 9860165207 काँग्रेस
40-वाघाळा-ब घोगरे इंदुबाई शिवाजी मु.वाघाळा, पो.सिडको, ता.जि.नांदेड. 9158651616 राष्ट्रवादी काँग्रेस
0-स्विकृत सदस्य-- येवनकर विजय हिराचंद शिवाजीनगर, नांदेड. 9404069609 काँग्रेस
0-स्विकृत सदस्य-- कदम विश्वास बालाजी आनंद नगर, नांदेड. 9422414882 काँग्रेस
0-स्विकृत सदस्य-- बन श्याम वामनराव अशोक नगर, नांदेड. 9421296094 शिवसेना
0-स्विकृत सदस्य-- अल केसरी हसन बिन उबेद अरबगल्ली, नांदेड. 9890936583 एआयएमआयएम
0-स्विकृत सदस्य-- काबरा रामनारायण रामदेव वजिराबाद, नांदेड. 9404668924 राष्ट्रवादी काँग्रेस


Political Research and Analysis Bureau (PRAB)
------------------------------------------------------------

                   


                      प्रारुप मतदार यादी प्रसिध्दी संदर्भात जाहिर सुचना