पिंपरी बु गण पोट निवडणुकीत शिवसेनेचा विजय
Political Research and Analysis Bureau (PRAB)
----------------------------------------------------------
सत्तेपेक्षा रोजीरोटी महत्त्वाची मानून एका महिलेने पंचायत समिती सदस्यत्व सोडल्याची घटना खेड तालुक्यात घडली. नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या धोंडाबाई साहेबराव खंडागळे यांनी आपली नोकरी वाचविण्यासाठी पंचायत समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला. फेब्रुवारीत झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत, अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या पिंपरी बुद्रूक गणातून त्या भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. त्यामुळे जागा रिक्त झाली होती.
धोंडाबाई खंडागळे यांच्या राजीनाम्यामुळे खेड पंचायत समितीत एक पद रिक्त झाले त्या जागेसाठी आता निवडणूक होणार आहे. पंचायत समितीत शिवसेना ही कॉंग्रेसच्या एका सदस्याच्या पाठिंब्यावर सत्तेत आहे. या निवडणुकीत विजय मिळवून पूर्ण बहुमत मिळविण्याचा शिवसेना प्रयत्न करेल; तर भाजप आपली जागा राखण्याचा प्रयत्न करेल. त्यादृष्टीने भाजपने रामदास मेंगळे या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा भाजप प्रवेश करून घेतला आहे. मेंगळे यांच्या पत्नी बायजाबाई यांनीच राष्ट्रवादीच्या तिकिटावर धोंडाबाई खंडागळे यांच्याविरोधात निवडणूक लढविली होती.
------------------------------
राजीनामा का दिला?
धोंडाबाई खंडागळे या कोये गावाच्या भिसांबा- ठाकरवाडी या वस्तीवर अंगणवाडी सेविका आहेत. पंचायत समिती सदस्य झाल्यानंतर नियमानुसार त्यांना अंगणवाडी सेविकापदाचा राजीनामा द्यावा लागणार होता. निवडून आल्यानंतर सत्कार समारंभाचे आणि मानपानाचे नव्याचे नऊ दिवस संपले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आणि नियमित मिळणारे पाच हजार रुपये मानधन दोन महिने न मिळाल्याने, त्यांना चणचण जाणवली. त्यावरून त्यांनी भविष्यातील धोका ओळखला. सत्तेच्या पदापेक्षा रोजीरोटी महत्त्वाची असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला होता . आपला राजीनामा त्यांनी सभापती सुभद्रा शिंदे यांच्याकडे दिला होता. त्यावर साक्षीदार म्हणून पंचायत समिती सदस्य भगवान पोखरकर आणि अंकुश राक्षे यांच्या स्वाक्षऱ्या होत्या. पंचायत समिती सदस्य आणि अंगणवाडी सेविका अशा दोन्ही ठिकाणी कार्यरत राहणे नियमानुसार शक्य नसल्याने आपण पंचायत समिती सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत, असे त्यांनी राजीनामापत्रात म्हटले होते;
---------------------------
खेड (राजगुरुनगर) पंचायत समितीच्या चौदा गणांपैकी तीन सर्वसाधारण, चार सर्वसाधारण स्त्री, दोन नागरिकांचा मागास प्रवर्ग, दोन नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, एक अनुसूचित जाती, एक अनुसूचित जमाती व एक अनुसूचित जमाती स्त्री वर्गासाठी राखीव आहेत.

No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.