Sunday, 27 August 2017

गोवा पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर विजयी

गोवा पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर विजयी

पर्रिकरांनी काँग्रेसच्या गिरीश चोडणकर यांचा 4 हजार 800 मतांनी पराभव 


गोवा येथील दोन मतदारसंघांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीतील मतमोजणीला सोमवारी सकाळी सुरुवात झाली. पणजीतून निवडणूक लढवणारे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे विजयी झाले आहेत.तर वालपोई मतदार संघात भाजपचे विश्वजित राणे हे विजयी झाले. राणेंनी १० हजार मतांनी काँग्रेसच्या रॉय नाईक यांचा पराभव केला.
तीन राज्यांमधील विधानसभेतील चार जागांसाठी पोटनिवडणूक पार पडली. गोव्यातील पणजी, वालपोई,  दिल्लीतील बवाना आणि आंध्रप्रदेशमधील नंद्याल या चार जागांसाठी पोटनिवडणूक झाली. सोमवारी कडेकोट बंदोबस्तात मतमोजणीला सुरुवात झाली. गोव्यातील पोटनिवडणुकीकडे देशभराचे लक्ष लागले आहे. पणजीमध्ये मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर निवडणूक लढवत असून त्यांना काँग्रेसचे गिरीश चोडणकर आणि गोवा सुरक्षा मंचचे आनंद शिरोडकर यांनी आव्हान दिले होते. या निवडणुकीत पर्रिकर यांनी चोडणकर यांचा सुमारे ४,८०० मतांनी पराभव केला. पर्रिकर यांच्या विजयामुळे भाजपला दिलासा मिळाला आहे. पणजी हा मनोहर पर्रिकर यांचा बालेकिल्ला मानला जातो. पणजीत ७० टक्के मतदान झाले होते. या भागातील मतदार भाजपवर नाराज असल्याची चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिल्याचे मतमोजणीतून स्पष्ट झाले.
वालपोईमध्ये आरोग्यमंत्री आणि भाजप उमेदवार विश्वजित राणे हे रिंगणात होते. राणे यांना काँग्रेसच्या रॉय नाईक यांनी आव्हान दिले होते. तर वालपोईत ७९.८० टक्के मतदान झाले होते. वालपोईमध्ये विश्वजित राणे विजयी झाले.
दिल्लीतील बवाना येथे आप, भाजप आणि काँग्रेस या पक्षांमध्ये लढत आहे. महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर ‘आप’साठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे. आंध्रप्रदेशमधील नंद्याल येथे सत्ताधारी तेलगू देसम पक्ष आणि वायएसआर काँग्रेस यांच्यात लढत आहे. पोटनिवडणुकीत या मतदारसंघात तब्बल ७९. १३ टक्के मतदान झाले होते.
“मी लढवय्या आहे. पणजीमधील जनतेसाठी यापुढे देखील उपस्थित राहीन.”, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे पराभूत उमेदवार गिरीश चोडणकर यांनी दिली.

Goa - Valpoi
Result Declared
Scheduled Round:- 4, Entered Round:- 4
Total Electors:- 28874, Total Votes Polled:- 23063
Candidate NameParty NameVotes% of Votes Polled
VISHWAJIT PRATAPSINGH RANEBharatiya Janata Party1618870.19
ROY R. NAIKIndian National Congress610126.45
ROHIDAS SADA GAONKARIndependent3161.37
None of the AboveNone of the Above4581.99
TOTAL23063100.00

-----------------------------------------------------------------------------------------
Goa - Panaji
Result Declared
Scheduled Round:- 3, Entered Round:- 3
Total Electors:- 22196, Total Votes Polled:- 15538
Candidate NameParty NameVotes% of Votes Polled
MANOHAR PARRIKARBharatiya Janata Party986263.47
GIRISH RAYA CHODANKARIndian National Congress505932.56
ANAND PANDURANG SHIRODKARGoa Suraksha Manch2201.42
KENNETH IAN STEWART SILVEIRAIndependent960.62
None of the AboveNone of the Above3011.94
TOTAL15538100.00

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.