Thursday 3 August 2017

राज्यसभेत भाजप सर्वांत मोठा पक्ष

राज्यसभेत भाजप सर्वांत मोठा पक्ष


भाजप राज्यसभेत काँग्रेसला मागे टाकत सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. ज्येष्ठांच्या या सभागृहात आता भाजपचे ५८ खासदार तर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या खासदारांची संख्या ही ५७ इतकी झाली आहे.
मध्य प्रदेशमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीनंतर राज्यसभेत भाजपचे नूतन खासदार संपतिया उइके यांनी गुरूवारी शपथ घेतली. केंद्रीय मंत्री अनिल दवे यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली होती. उइके हे बिनविरोध निवडून आले आहेत.


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

नरेंद्र मोदी सरकार मे २०१४ मध्ये सत्तेवर आल्यापासून राज्यसभेत सर्वाधिक भाजपचे खासदार असण्याची ही पहिलीच वेळ आहे. परंतु, भाजपच्या नेतृत्वाखाली असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे (एनडीए) या वरिष्ठ सभागृहात निर्णायक बहुमत नाही. पण संयूक्त जनता दल (जेडीयू) बरोबर आल्याने त्यांची ताकद मात्र वाढली आहे. पुढील वर्षीपर्यंत म्हणजे २०१८ पर्यंत राज्यसभेत काँग्रेस पक्षच सर्वांत मोठा पक्ष राहिला असता. पण त्यांच्या दोन सदस्यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या खासदारांची संख्या कमी झाली आहे. अनिल दवे यांचे याचव”र्वाी मे महिन्यात निधन झाले होते.
माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, तामिळनाडूमधील सत्ताधारी अण्णा द्रमूक पक्षही एनडीएमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात असे झाले तर राज्यसभेत भाजपची स्थिती मजबूत होईल. सध्याही अनेक महत्वाच्या विधेयकांच्या वेळी अण्णा द्रमूकने भाजपला साथ दिलेली आहे. परंतु, ते अधिकृतरित्या एनडीएचे सदस्य झालेले नाहीत. अण्णा द्रमूकचे राज्यसभेत १२ खासदार आहेत.
राज्यसभेत बहुमत नसल्याने मोदी सरकारचे अनेक महत्वपूर्ण विधेयक लटकले आहेत. राज्यसभेत विधेयक संमत करताना भाजपला आपल्या सहकारी पक्षांशिवाय इतर पक्षांच्या मदतीची गरज भासत असते. दरम्यान, पुढील वर्षी उत्तर प्रदेशमध्ये राज्यसभेच्या ९ जागांसाठी निवडणुका होणार आहेत. यातील ९ पैकी ८ जागांवर भाजपचा उमेदवार निवडणूक येऊ शकतो, असे मानले जाते.भाजपच्या नेतृत्वाखाली असलेल्या एनडीएकडे या सभागृहात निर्णायक बहुमत नाही. मात्र जेडीयू सोबत आल्याने त्यांची ताकद वाढली आहे. पुढील वर्षीपर्यंत म्हणजे 2018 पर्यंत राज्यसभेत काँग्रेसच सर्वात मोठा पक्ष राहिला असता. पण त्यांच्या दोन सदस्यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या खासदारांची संख्या कमी झाली.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.