सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा निवडणूक २०१७ कार्यक्रम जाहीर
१९ नोव्हेंबर २०१७ ला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभेसाठी निवडणूक
नवीन विद्यापीठ कायद्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीचा बिगुल अखेर मंगळवारी वाजला. विद्यापीठ प्रशासनाने पदवीधर व संस्थाचालकांच्या निवडणुकींच्या संभाव्य तारखा जाहीर केल्या असून दि. १९ नोव्हेंबर रोजी निवडणुक होणार आहे. त्यासाठी बुधवार (दि. २५)पासून उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहे.
राज्यात सर्व सार्वजनिक विद्यापीठांच्या अधिसभेच्या निवडणुक प्रक्रियेचे काम नवीन कायद्यानुसार सुरू आहे. अमरावती विद्यापीठाच्या निवडणुकांची संपुर्ण प्रक्रिया नुकतीच पार पडली. तर इतर विद्यापीठांमधील प्रक्रियाही वेगाने सुरू आहे. मात्र, राज्यात शैक्षणिक गुणवत्तेसह सर्वच बाबतीत आघाडीवर असलेल्या पुणे विद्यापीठाची प्रक्रिया मात्र रेंगाळली आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातून मागील काही दिवसांपासून नाराजी व्यक्त केली होती. संस्थाचालक, पदवीधर, प्राचार्य आणि प्राध्यापक या चारही मतदारसंघातील इच्छुक निवडणुक वेळापत्रकाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी विविध घटकांकडून सातत्याने पाठपुरावा केला जात होता. त्यामुळे काही दिवसांपासून निवडणुक घेण्यासाठी प्रशासनाकडून वेगाने हालचारी सुरू होत्या. त्यानुसार मंगळवारी पदवीधर व संस्थाचालकांच्या निवडणुकीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मात्र, प्राध्यापक व प्राचार्य मतदारसंघाच्या निवडणुकांचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.
विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांच्या संस्थाचालकांचे ६ आणि पदवीधर मतदारसंघातून १० प्रतिनिधी निवडून दिले जाणार आहेत. संभाव्य वेळापत्रकानुसार, रविवार दि. १९ नोव्हेंबर रोजी पदवीधर व संस्थाचालक मतदारसंघासाठी मतदान होईल. त्यासाठी दि. २५ आॅक्टोबरपासून अर्ज सादर करता येणार आहे. तर दि. २ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करता येईल. दि. ३ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंबंधी दि. ६ नोव्हेंबर रोजी लेखी कळवावे लागेल. त्यानुसार निवडणुक होऊन दि. २७ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून मतपत्रिकांची छाननी व मतमोजणीचे काम सुरू होईल.
निवडणुकीचे संभाव्य वेळापत्रक
दि. २५ आॅक्टोबर ते दि. २ नोव्हेंबर - उमेदवारी अर्ज सादर करणेदि. ३ नोव्हेंबर - उमेदवारी अर्जाची छाननी
दि. ६ नोव्हेंबर - उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत लेखी कळविणे
दि. १९ नोव्हेंबर - मतदान
दि. २७ नोव्हेंबर - मतपत्रिकांची छाननी व मतमोजणी
प्राचार्य, प्राध्यापक निवडणुकीची प्रतीक्षा
पदवीधर व संस्थाचालक मतदारसंघाचे निवडणुक वेळापत्रक जाहीर झाले असले तरी प्राचार्य व प्राध्यापक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे. विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव अरविंद शाळीग्राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राचार्य व प्राध्यापकांना आॅनलाईन मतदार नोंदणीसाठी २० आॅक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. आता नोंदणी केलेल्यांना २७ तारखेपर्यंत कागदपत्रे सादर करावी लागतील. त्यानंतर अर्जांची छानणी होवून मतदार यादी जाहीर केली जाईल. यादीवर हरकती मागवून नंतर अंतिम यादी प्रसिध्द केली जाईल. त्यानंतर निवडणुक होईल. पदवीधर व संस्थाचालक निवडणुकीसाठीची ही प्रक्रिया मागील महिन्यात पुर्ण झाली होती.
सिनेटसाठी होणार तिरंगी लढत
सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर (सिनेट) पदवीधरांमधून निवडून येणाऱ्या दहा, तर कॉलेज, शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींमधून सहा अशा एकूण १६ जागांसाठी ऑक्टोबरमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी तिरंगी लढत होणार आहे.
विद्यापीठ विकास मंच, एकता पॅनेल यांच्याबरोबरच जयकर ग्रुप परिवर्तन पॅनेल देखील निवडणुकीत उतरले आहे. गुरुवारी त्यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. विद्यापीठाकडून देखील अधिसभा निवडणूकीसाठी पदवीधर मतदारांची अंतिम यादी विद्यापीठाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली आहे. एकूण १६ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. लोकप्रतिनिधी, विद्यार्थी संघटनांच्या मागणीनुसार विद्यापीठाने नोंदणीसाठी मुदतवाढ दिली होती. साधारण साठ हजारांच्या आसपास मतदार नोंदणी झाली आहे. आजपर्यंत दोन पॅनेलमध्ये होणारी लढत यंदा मात्र तिरंगी होणार आहे.
अधिक माहितीसाठी- चंद्रकांत भुजबळ - 9422323533
अध्यक्ष, पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो
Political Research and Analysis Bureau (PRAB)निवडणूक कार्यक्रम
पुणे जिल्ह्यातील मतदान केंद्रे
मतदारयादी करिता लिंक -
This is New voter list of 2017 Election link
http://election.unipune.ac.in/voter_list.html
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.