Tuesday 22 August 2017

114 ग्रामपंचायतींसाठी 23 सप्टेंबरला मतदान; जनतेतून थेटपणे निवड होणारे जिल्ह्यातील पहिले सरपंच ठरणार

114 ग्रामपंचायतींसाठी 23 सप्टेंबरला मतदान

पुणे जिल्ह्यात एका ग्रामपंचायतींसाठी 23 सप्टेंबरला मतदान;
जनतेतून थेटपणे निवड होणारे जिल्ह्यातील पहिले सरपंच ठरणार


ऑक्टोबर 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या 13 जिल्ह्यांतील 114 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 23 सप्टेंबर 2017 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी  केली.
संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात अचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकांसाठी 4 ते 8 सप्टेंबर 2017 या कालावधीत सुट्टीचा दिवस वगळून नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. 13 सप्टेंबर 2017 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल. 23 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. गडचिरोली जिल्ह्यात मात्र दुपारी 3.00 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. सर्व ठिकाणी 25 सप्टेंबर 2017 रोजी मतमोजणी होणार आहे
निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या अशी: पालघर- 8, नाशिक- 22, नंदुरबार- 1, अहमदनगर- 8, पुणे- 1, औरंगाबाद- 4, नांदेड- 4, उस्मानाबाद- 1, जालना- 40, हिंगोली- 13, यवतमाळ- 7, चंद्रपूर- 4 आणि गडचिरोली- 1. एकूण- 114.




Political Research and Analysis Bureau (PRAB)

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.