भाजप उमेदवार स्मितादेवी जाधव आणि राष्ट्रवादीच्या हर्षदा जाधव यांचे मतदान पुण्यात
महायुती व आघाडीतील बिघाडीमुळे पदवीधर व शिक्षक मतदारसंघात मित्र पक्ष आमने-सामने
पुणे पदवीधर व शिक्षक विधानपरिषद मतदारसंघात पक्ष संघटनेतील सक्रिय इछुकांना डावलून उमेदवारी दिल्याने पक्षांतर्गत काही प्रमाणात नाराजीचा सुर आहे. बंडखोरी शमविण्यात अपयश आल्याने बहुतेक मतदारसंघात महायुती व आघाडीतील बिघाडीमुळे पदवीधर व शिक्षक मतदारसंघात मित्र पक्ष उमेदवार आमने-सामने आल्याचे या निवडणुकीत पाहावयास मिळत आहे. पुणे पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाच्या अंतिम मतदार यादीत दुबार मतदारांची संख्या आढळून आलेली असून खुद्द उमेदवाराचेच नाव पदवीधर अंतिम मतदार यादीत दुबार (दोन वेळा) असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. प्रमुख उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातही उमेदवाराचा मतदार तपशील चुकीचा नमूद केलेला असल्याने संभ्रम निर्माण झालेला आहे. विशेषतः प्रतिज्ञापत्रात मुळ मतदार तपशील गावाकडील नमूद केलेला आहे मात्र पदवीधरच्या नोंदणीत प्रमुख पक्षांचे उमेदवारांनी पुण्यातील रहिवाशी दर्शवून पुण्याचे मतदार यादीत नाव नोंदणी केलेली असून पुण्यातील मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत. मतदारसंघातील एकपेक्षा अधिक जिल्ह्यातील स्थानिक उमेदवार आहोत असे भासवून मतदारांना आकर्षित करण्याचा अनोखा फंडा प्रमुख उमेदवारांनी अवलंबविला आहे. त्यामुळे पुणे पदवीधर विधानपरिषद मतदारसंघातील भाजप पक्षाच्या उमेदवार स्मितादेवी जाधव या कोल्हापूर येथील असूनही त्या पुण्यातील सोमवारपेठ येथील मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत तर राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवार हर्षदा जाधव या माण-खटाव सातारा येथील असून त्या पुण्यातील मुकुंदनगर स्वारगेट येथील मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत.
|
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ दृष्टिक्षेप
|
|
जिल्हा
|
पदवीधर मतदार संख्या
|
शिक्षक मतदार संख्या
|
|
कोल्हापूर
|
114562
|
12299
|
|
पुणे
|
88202
|
16882
|
|
सांगली
|
88070
|
9454
|
|
सोलापूर
|
49722
|
15303
|
|
सातारा
|
47463
|
8062
|
|
एकूण मतदार
|
388019
|
62000
|
|
उमेदवार
|
47
|
30
|
|
मतदान केंद्र
|
741
|
310
|
भाजप पक्षाच्या उमेदवार स्मितादेवी जाधव यांनी प्रतिज्ञापत्रातील भाग अ मध्ये माझे नाव २७६-कोल्हापूर उत्तर विधानसभा महाराष्ट्र यादी भाग क्र. ११२ अनुक्रमांक ११०९ मध्ये नोंदविलेले आहे. असे चुकीचे नमूद केलेले असल्याचे मतदारयादी वरुन स्पष्ट होत आहे. कारण त्यांचे नाव २७६-कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात यादी भाग क्र. ११२ अनुक्रमांक ११०९ एवजी ७०७ वर आहे. त्यामुळे अनुक्रमांक चुकीचा नमूद केल्याचे उघड झालेले आहे.
तसेच पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ अंतिम मतदार यादीत भाजप पक्षाच्या उमेदवार स्मितादेवी जाधव यांचे नाव यादी भाग क्र. १५७ मध्ये अनुक्रमांक ४१६ वर नोंदविलेले आहे. सदरील मतदार नोंदणीचा रहिवासी पत्ता मतदार यादीत पी. एल. क्रमांक १७ सुयोजना सोसायटी, कोरेगाव उद्यान, पुणे शहर ४११००१ असा नमूद केलेला आहे. त्यांचे मतदार केंद्र पुणे येथील सोमवारपेठ आहे. आता उमेदवारांच्या या संभ्रमित माहिती तपशीलमुळे मतदारांमध्ये देखील गोंधळाच्या स्थितीने अनेक प्रश्न निर्माण होतात.
राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवार हर्षदा जाधव यांनी प्रतिज्ञापत्रातील भाग अ मध्ये माझे नाव २५८-माण विधानसभा महाराष्ट्र यादी भाग क्र. १८४ अनुक्रमांक १७२ मध्ये नोंदविलेले आहे. तर पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ अंतिम मतदार यादीत राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवार हर्षदा जाधव यांचे नाव दुबार (दोनवेळा) समाविष्ट असल्याचे आढळून येत आहे. एक नाव यादी भाग क्र. १४७ मध्ये अनुक्रमांक १५ वर नोंदविलेले आहे. तर दुबार दुसऱ्यांदा नाव यादी भाग क्र. १४७ मध्ये अनुक्रमांक ९९ वर नोंदविलेले आहे. सदरील मतदार नोंदणीचा रहिवासी पत्ता मतदार यादीत रो हाऊस क्र. ९ झांबरे पॅलेसच्या मागे, मुकुंदनगर, पुणे ४११०३७ असा नमूद केलेला आहे. त्यांचे मतदार केंद्र पुणे येथील मुकुंदनगर स्वारगेट आहे. आता उमेदवारांच्या या संभ्रमित माहिती तपशीलमुळे मतदारांमध्ये देखील गोंधळाच्या स्थितीने अनेक प्रश्न निर्माण होतात.
प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या बाबत दुबार नावे व दिशभुलकारक विसंगत माहितीमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सध्या देशभरात एसआयआर मतदार यादीवरुन रणकंद माजले असून दुबार नावांवरुन संशय निर्माण केला जात असताना पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ अंतिम मतदार यादीत देखील दुबार नावांच्या त्रुटीमुळे पुन्हा विषय चर्चिला जात आहे.
पुणे विभागीय पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पुणे जिल्ह्यातील मतदारसंख्या शहरापेक्षा ग्रामीण भागातील मतदारसंख्या तुलनेने ६०-६५ टक्के आहे तर शहरात ४० टक्के मतदारसंख्या आहे. यासंदर्भातील तपशील दर्शविणारा तक्ता खालीलप्रमाणे नमूद करण्यात आलेला आहे. प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या तुलनेत पदवीधर मतदार नोंदणीत राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवार हर्षदा जाधव यांनी अन्य उमेदवारांच्या तुलनेत सर्वाधिक नोंदणी केलेली असून त्यांच्या सक्रियेतचा लाभ त्यांना होईल असा कयास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना वाटतो. पुणे व सातारा जिल्हयावर सर्वाधिक मदार असून रयत शिक्षण संस्था, विद्या प्रतिष्ठान व पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या मोठ्या शिक्षण संस्थांच्या सहभागावर विजयाचे व बहुमताचे गणित अवलंबून आहे. सौ. हर्षदा जाधव या माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या कन्या असून ट्रीनिटी शिक्षण संस्था चालक व व्यावसायिक श्री. कल्याण जाधव यांच्या सून आहेत.
|
पुणे जिल्ह्यातील भागानुसार मतदार विभागणी
|
|
तालुका
|
पदवीधर मतदार संख्या
|
शिक्षक मतदार संख्या
|
|
हवेली
|
1337
|
506
|
|
भोर-मुळशी
|
2074
|
800
|
|
खेड
|
2462
|
630
|
|
आंबेगाव
|
3621
|
689
|
|
जुन्नर
|
4238
|
1420
|
|
शिरुर
|
4560
|
616
|
|
पुरंदर
|
5139
|
581
|
|
मावळ
|
5185
|
820
|
|
इंदापूर
|
6196
|
1116
|
|
दौंड
|
7030
|
629
|
|
पिंपरी चिंचवड
|
7281
|
2094
|
|
बारामती
|
10600
|
1266
|
|
पुणे
|
28479
|
5655
|
|
पुणे एकूण मतदार
|
88202
|
16822
|
भाजप पक्षाच्या उमेदवार स्मितादेवी योगेश जाधव यांचा जनसंपर्क संपूर्ण मतदारसंघातील जिल्ह्यांमध्ये असला तरी पक्ष संघटनेची मिळणारी साथ व नातेसंबंधातील शिक्षण संस्था चालक यांचा प्रचारातील सहभागावर विजयाचे व बहुमताचे गणित अवलंबून आहे. निवडणूक लढविण्याची तयारी व मतदार नोंदणीमधील सक्रियता अन्य उमेदवारांच्या तुलनेने कमी आढळून येते. त्यांची सांगली व कोल्हापूर जिल्हयावर सर्वाधिक मदार असून डि वाय पाटील शिक्षण संस्थांच्या सहभागावर आणि भाजपच्या संघटनात्मक पदाधिकाऱ्यांच्या सक्रियेतेवर मतांचे गणित अवलंबून आहे. कोल्हापूर येथील ८ उमेदवार निवडणूक रिंगणात असून शिवसेना (उबाठा) पक्षाचे सुनिल मोदी देखील कोल्हापूर येथील उमेदवार असल्याने येथील मतांचे विभाजनाचा फटका कोणाला बसेल यावर देखील मताधिक्य अवलंबून आहे. भाजप पक्षाच्या उमेदवार स्मितादेवी योगेश जाधव या पुढारी वृत्तपत्र समूहाच्या संचालिका व प्रमुख भागधारक असून डि वाय पाटील घराण्यातील नातेसंबंध आहेत.
दरम्यान पदवीधर विधान परिषद निवडणुकीत ईव्हीएम मशीनचा वापर केला जात नसतो, मतपत्रिका वर पसंती क्रमांक नमूद करावा लागतो. उमेदवारांची संख्या खूप असल्याने आकाराने मोठी मतपत्रिका असते व पसंती क्रमांक लिहिताना मतदारांकडून नकळत चुका होत असतात. त्यामुळे मताधिक्यवर थेट विपरीत परिणाम होतो. म्हणून मतदारांचे प्रत्यक्ष भेटून प्रबोधन करणे आवश्यक असते सदरील प्रबोधन करुन जास्तीत जास्त अचूक मतदान करुन घेण्याचे कार्य करणारी यंत्रणा कोणत्या राजकीय पक्ष उमेदवार राबवितो यावर मतदानाचे प्रमाण अवलंबून राहील. तर मतमोजणीचे नियम हे प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या पसंती क्रमांक च्या मूल्यांकनावर आधारित मतांची गणना केली जाते. त्यामुळे मतपत्रिकावर पसंती क्रमांक १ व्यतिरिक्त पसंती क्रमांक २ व ३ ला देखील महत्व मागील निवडणुकांना अधोरेखित झालेले आहे. बहुमतासाठी विरोधकांना मानणाऱ्या मतदारांचे किमान पसंती क्र. २ चे मत मिळविणे देखील आवश्यक असते. याकरिता जास्तीत जास्त अचूक मतदान करुन घेण्याचे कार्य प्रणाली राबविणे यशाचे गमक ठरते त्यामुळे यामध्ये कोणता उमेदवार सक्रियेतेने प्रचारार्थ कार्य करेल त्याच्या विजयाचा मार्ग सुकर होईल असे प्राब संस्थेच्या पाहणीत आढळून आले आहे.
पुणे विभागीय पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात अनुक्रमे आता ४७ आणि तीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पुणे विभागीय पदवीधर व शिक्षक मतदारसंघात पुणे, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूरअसे पाच जिल्हयांचा समावेश आहे. या दोन्ही मतदारसंघातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रवार, ९ ऑक्टोबरपर्यंत होती. पदवीधर मतदारसंघात ७५ उमेदवारांनी ८७ अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ६९ उमेदवारांचे ८१ उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी २२ उमेदवारांनी माघार घेतली. आता पदवीधर मतदारसंघात ४७ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. एकूण मतदान तीन लाख ८८ हजार ०१९ इतके आहे. एकूण ७४१ मतदान केंद्रावर मतदानाची सोय करण्यात आलेली आहे. पदवीधर मतदारसंघात सर्वाधिक मतदार कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारांची संख्या एक लाख १४ हजार ५६२ इतकी आहे. त्या पाठोपाठ पुणे जिल्ह्यातील मतदार संख्या ८८,२०२ इतकी आहे. सांगली जिल्ह्यातील पदवीधर मतदारसंख्या ८८,०७० आहे. सोलापूर जिल्ह्यात ४९,७२२ तर सातारा जिल्ह्यात ४७४६३ मतदार आहेत.
पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघात ४९ उमेदवारांनी ६७ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ४८ उमेदवारांचे ६५ अर्ज वैध ठरले. १८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. शिक्षक मतदारसंघात एकूण तीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिक्षक मतदारसंघातील एकूण मतदार ६२ हजार आहेत. ३१० मतदान केंद्रे आहेत. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान करता येणार आहे. पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघात एकूण शिक्षक मतदारांची संख्या ६२ हजार आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १६,८८२ इतके सर्वाधिक मतदार आहेत. सोलापूर जिल्ह्यात १५,३०३ मतदार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात १२,२९९ मतदार आहेत. सांगली जिल्ह्यातील मतदारसंख्या ९४५४ इतकी आहे.तर सातारा जिल्ह्यातील शिक्षक मतदार संख्या ८०६२ आहे.
दरम्यान पुणे शिक्षक मतदारसंघामध्ये शिवसेनेने बंडखोर उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा जाहीर केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच ही माहिती दिली. काही ठिकाणी अपवाद आहेत, असं सांगत एकनाथ शिंदे यांनी सचिन सानपांना पाठिंबा दिला आहे. पुणे शिक्षक मतदारसंघामध्ये महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे हे रिंगणात आहेत. त्या आधी एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मंगेश चिवटे यांनी माघार घेतली होती. मात्र अमरावतीमध्ये मात्र शिवसेनेच्या उमेदवारासमोर भाजपच्या बंडखोरांचं आव्हान आहे. त्याचे पडसाद आता पुण्यात पडत असून शिंदेंच्या शिवसेनेने बंडखोर सचिन सानप यांना पाठिंबा दिला आहे. मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या संपूर्ण विभागातील शैक्षणिक संस्था आणि प्राध्यापक वर्गाशी त्यांचा थेट संपर्क आहे. कौस्तुभ गावडे, जयंत आसगावकर आणि सचिन सानप यांच्यातील ही तिरंगी लढत आता अत्यंत चुरशीची बनली आहे. अपक्ष मैदानात उतरलेले सचिन सानप महायुती आणि महाविकास आघाडीच्या गणितांचा कसा खेळ बिघडवतात, हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. कौस्तुभ गावडे यांची विवेकानंद शिक्षण संस्था शिवाय संपूर्ण मदार भाजप पक्ष संघटनेवर आहे.
|
पुणे विभाग पदवीधर मतदार संघातील निवडणूक रिंगणातील
उमेदवार
|
|
क्र.
|
उमेदवार नाव
|
पक्ष
|
|
1
|
सुनील जबरचंद
मोदी
|
शिवसेना
(यूबीटी)
|
|
2
|
स्मितादेवी
योगेश जाधव
|
भारतीय जनता
पक्ष
|
|
3
|
हर्षदा विनोद
जाधव
|
राष्ट्रवादी
काँग्रेस पक्ष (एसपी)
|
|
4
|
प्रो. आनंद
जेठे
|
नेताजी
काँग्रेस सेना
|
|
5
|
ईश्वर महादेव
यमगर
|
भारतीय
लोकशक्ती पक्ष
|
|
6
|
प्रवीण धनंजय
कासार
|
निर्भय
महाराष्ट्र पक्ष
|
|
7
|
नाना लिंगप्पा
गावडे
|
न्यू राष्ट्रीय
समाज पक्ष
|
|
8
|
प्रा.
नामदेवराव जाधव
|
सनय छत्रपती
शासन
|
|
9
|
राजेश कराडे
|
भीमसेना
|
|
10
|
रुपाली
राजेंद्र बोचखेरी
|
भारतीय
जनसम्राट पक्ष
|
|
11
|
सोमनाथ जनार्दन
साळुंखे
|
वंचित बहुजन
आघाडी
|
|
12
|
संजय भिकाजी
माघाडे
|
लोकराज्य जनता
पक्ष
|
|
13
|
अभिजीत वामनराव
आवाडे बिचुकले
|
अपक्ष
|
|
14
|
अभिमन्यू
भानुदास आठवले
|
अपक्ष
|
|
15
|
अमोल दामोधर
लोंढे
|
अपक्ष
|
|
16
|
अरुणराव व्यंकट
जाधव
|
अपक्ष
|
|
17
|
अर्जुन गोपाळ
करपे
|
अपक्ष
|
|
18
|
अशोक बाबुराव
गायकवाड
|
अपक्ष
|
|
19
|
भाऊसाहेब
रावसाहेब आंधळकर
|
अपक्ष
|
|
20
|
उत्तम रंगा
सकटे
|
अपक्ष
|
|
21
|
उन्मेष गणपतराव
देशमुख
|
अपक्ष
|
|
22
|
रुपेश शिवाजी
उंबरकर
|
अपक्ष
|
|
23
|
कपिलदेव शंकर
कोळी
|
अपक्ष
|
|
24
|
किशोर गजानन
गुरसाळे
|
अपक्ष
|
|
25
|
सतीश शहाजी
कुलाल
|
अपक्ष
|
|
26
|
निखिल विलास
खंदारे
|
अपक्ष
|
|
27
|
गणेश विलास
सावंत
|
अपक्ष
|
|
28
|
गणेश शिवराम
लालगुडे
|
अपक्ष
|
|
29
|
चिन्मय विजय
नरके
|
अपक्ष
|
|
30
|
चंद्रकांत
परमेश्वर सावंत
|
अपक्ष
|
|
31
|
हेमंत विजय
जगताप
|
अपक्ष
|
|
32
|
जैनुद्दीन
दस्तगीर शेख
|
अपक्ष
|
|
33
|
तोहीद रफिकहमाद
मुजावर
|
अपक्ष
|
|
34
|
दिपाली अशोक
वाघमोडे
|
अपक्ष
|
|
35
|
मारुतराव
धोंडीसाहेब देशमुख
|
अपक्ष
|
|
36
|
नाथाजी
दत्तात्रय चौगुले
|
अपक्ष
|
|
37
|
निवृत्ती केरू
शिंदे
|
अपक्ष
|
|
38
|
संजय मनोहर
बनसोडे
|
अपक्ष
|
|
39
|
बाबासाहेब
नामदेव जगताप
|
अपक्ष
|
|
40
|
महारुद्र कडाजी
टिकुंडे
|
अपक्ष
|
|
41
|
संदीप औदुंबर
मांडवे
|
अपक्ष
|
|
42
|
राणी सुजित
खुर्द
|
अपक्ष
|
|
43
|
रोहित अनिल
राऊत
|
अपक्ष
|
|
44
|
लक्ष्मण
साहेबराव हरणावळ
|
अपक्ष
|
|
45
|
शिवानंद
तोतप्पा बिराजदार
|
अपक्ष
|
|
46
|
सचिन मधुकर
बांगर
|
अपक्ष
|
|
47
|
सुमित दशरथ
शिवणकर
|
अपक्ष
|
पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ मतदार यादीत नाव शोधणे
पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ मतदार यादीत नाव शोधणे
खालील लिंकवर नाव शोधा
पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ मतदार यादी पहा
पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ मतदार यादी पहा
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2026
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक मतदार यादीत नाव कसे शोधावे?
Chandrakant bhujbal
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
================================================
New Book
"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक
================================================
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
==================================================
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-