राष्ट्रवादीतील पक्षांतर्गत संशयकल्लोळामुळे मित्र पक्षांना राजकीय लाभ
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकांमुळे लांबणीवर पडलेल्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक आज जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जून रोजी मतदान तर 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. सोलापूर, अहमदनगर, ठाणे, जळगाव, नांदेड, सांगली-सातारा, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, नाशिक, अमरावतीच्या स्थानिक संस्थेच्या विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच राज्यात न झाल्याने या मतदारसंघामध्ये पूर्वी निवडून आलेल्या आमदारांचा कार्यकाळ संपुष्टात येऊनही निवडणूक होऊ शकली नाही. अशात, गेल्या दोन अडीच वर्षांपासून आमदारकीच्या जागा रिक्त आहेत. काही जिल्ह्यांमधील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका अद्यापही प्रलंबित असूनही या निवडणुका जाहीर केलेल्या असल्याने भावी सदस्यांच्या मतदानाअभावी या निवडणुका पार पडणार आहेत. मतदारांची संख्या अत्यल्प असणार असून केवल त्या क्षेत्रातील महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद सदस्यांच्या संख्येवर मतदान होणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण मतदार संख्येच्या 75 टक्के मतदार संख्या असेल तर विधान परिषदेची निवडणूक घेता येते. एकूण 17 जागांवर निवडणूक होणार, ज्यातील एका ठिकाणी पोटनिवडणूक होणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे आमदार राहिलेल्या विधान परिषदेच्या नागपूर मतदारसंघासाठी देखील पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या एकूण 78 सदस्य संख्येपैकी 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडून जात असतात.
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकांची घोषणा करण्यात आली असून १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या सर्व १६ जागा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातील असून या जागांसाठी १८ जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत २५ मे ते १ जून असणार आहे, तर अर्जांची छानणी २ जून रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्याने या मतदारांतून होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकाही लांबल्या होत्या. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसांपूर्वी पार पडल्याने विधानपरिषदेच्या या १६ जागांसाठीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोणकोणत्या मतदारसंघांसाठी होणार निवडणूक?
सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर-जालना.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच विधानसभा सदस्यांच्या मतदानावर होणाऱ्या विधानपरिषदेच्या ९ जागांवरील निवडणूक पार पडली. विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवड झालेले नऊ आणि पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या एक अशा दहा सदस्यांचा शपथविधी गुरुवारी सकाळी विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात पार पडला. परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी या सदस्यांना शपथ दिली. या वेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार उपस्थित होते. बिनविरोध निवड झालेल्या सदस्यांमध्ये भाजपचे प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे, संजय भेंडे. शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे, बच्चू कडू, शिवसेना उबाठा पक्षाचे अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दीकींचा समावेश आहे. प्रज्ञा सातव यांनी काँग्रेस पक्षातून राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक घेतली होती. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सातव यांनाच ती जागा देण्यात आली.
आदर्श आचारसंहिता लागू- निवडणूक आयोगाच्या या घोषणेसोबतच संबंधित मतदारसंघांच्या कार्यक्षेत्रात ‘आदर्श निवडणूक आचारसंहिता’ (Model Code of Conduct) तातडीने लागू करण्यात आली आहे. स्थानिक पातळीवरील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य यांच्या संख्याबळावर या जागांचे भवितव्य ठरणार असल्याने, आता महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये स्थानिक पातळीवर जोरदार मोर्चेबांधणी आणि राजकीय गणितांना सुरुवात झाली आहे.
निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक
अधिकृत अधिसूचना जारी करणे : २५ मे २०२६ (सोमवार)
उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत: ०१ जून २०२६ (सोमवार)
उमेदवारी अर्जांची छाननी : ०२ जून २०२६ (मंगळवार)
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस: ०४ जून २०२६ (गुरुवार)
मतदानाचा दिनांक : १८ जून २०२६ (गुरुवार)
मतदानाचा वेळ: सकाळी ०८:०० ते दुपारी ०४:०० पर्यंत
मतमोजणी आणि निकाल : २२ जून २०२६ (सोमवार)
सदस्यांचा कार्यकाळ संपलेल्यांची नावे
सोलापूर: प्रशांत प्रभाकर परिचारक
अहमदनगर: अरुणकाका बालभीमराव जगताप
ठाणे: फाटक रवींद्र सदानंद
जळगाव: चंदूभाई व्ही. पटेल
सांगली-सातारा: कदम मोहनराव श्रीपती
नांदेड: अमरनाथ अनंतराव राजूरकर
यवतमाळ: दुष्यंत सतीश चतुर्वेदी
पुणे: अनिल शिवाजीराव भोसले
भंडारा-गोंदिया: डॉ. परिणय रमेश फुके
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग: अनिकेत सुनील तटकरे
नाशिक: नरेंद्र भिकाजी दराडे
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली: रामदास भगवानजी आबिटकर
अमरावती: प्रवीण रामचंद्र पोते
उस्मानाबाद-लातूर-बीड: सुरेश धस
परभणी-हिंगोली: विप्लव गोपीकिसन बजोरिया
औरंगाबाद-जालना: अंबादास दानवे
राष्ट्रवादीतील पक्षांतर्गत संशयकल्लोळामुळे मित्र पक्षांना राजकीय लाभ
राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षांतर्गत संशयकल्लोळ वातावरण निर्माण करण्यात विरोधकांना यश आल्याचे दिसून येत असून आमदार रोहित पवार यांची भूमिका देखील कारणीभूत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात झडत आहे. पक्षाचे सर्वेसर्वा अजित दादांच्या निधनामुळे पोरके झालेला पक्ष अजूनही धक्क्यातून सावरताना दिसून येत नाही. नेतृत्वावरुन पक्षांतर्गत संघर्ष धुपसत असून जेष्ठ व नवख्या पदाधिकाऱ्यांमध्ये विचारांची दरी निर्माण करण्यास काही प्रमाणात यश मिळताना दिसून येत आहे. दादांच्या अपघात दुर्घटना चौकशीची मागणी करुन त्रुटी दर्शवून घातपाताचा संशय निर्माण करणाऱ्या आमदार रोहित पवार यांची भूमिका देखील कारणीभूत असल्याची चर्चा आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असे देखील राजकीय वातावरण निर्माण केले जात आहे. विधानपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या परिस्थितीचा लाभ विरोधकांना नव्हे तर मित्र पक्षांना लाभ मिळणार आहे.
महाराष्ट्रातील उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित असून त्या भागात झालेल्या पालिका, नगरपरिषद निवडणुकांमध्ये सत्तेतील भाजप प्रमुख पक्ष असून त्यांच्या सर्वाधिक सदस्य आहेत त्यामुळे काही जिल्ह्यामध्ये मित्र पक्षांच्या मतदार संख्या प्रभावी आहे मात्र राजकीय नेतृत्वहीन कुशलते अभावी विधानपरिषद निवडणुकांच्या जागांना मुकावे लागणार आहे याचा राजकीय लाभ मित्र पक्षांना होणार आहे हे मात्र निश्चित आहे.
राष्ट्रीय अध्यक्षांच्या सहीचे दोनदा वेगवेगळे बदल करून निवडणूक आयोगाला देण्यात आलेले पत्र ग्राह्य धरायचे की राष्ट्रीय कार्यकारिणीतील प्रक्रिया ग्राह्य धरायची याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यामुळे पत्रांचा घोळ पदांचा गोंधळ सुरू आहे. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या दोन महिन्यात बदललेल्या भूमिकेवरून देखील पक्षात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सध्याचा निवडणूक आयोगासोबत सुरू असलेला पत्र प्रपंच पार्थ पवार करत आहे. म्हणजेच सुनेत्रा वहिनींची सही पार्थ पवारांची शाई हे करताना सुनेत्रा पवार त्यांना रोखू शकत नसल्यामुळे आणि प्रफुल पटेल सुनील तटकरे पक्षासोबत नसतील तर आगामी काळातील पक्षाचे एकंदरीत भविष्यच अडचणीचे असल्याचे आमदारामधे चर्चा आहे. सध्या भाजपने त्यांच्या पक्षात कोणत्याही प्रकारे राष्ट्रवादीतून इनकमिंग केले जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता पक्षातील बिघडणारी घडी सावरायची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनीच पुढाकार घ्यावा अशी काहींची धारणा आहे.
Mr. Chandrakant Bhujbal
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
================================================
New Book
"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक
================================================
"महाराष्ट्रातील राजकारण"
"महाराष्ट्रातील राजकारण"
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/coopebook
==================================================
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.


No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.