Tuesday, 5 May 2026

Assembly Election Results 2026: पाच राज्यांच्या निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर; भाजपला घवघवीत यश, ममता बॅनर्जींच्या तृणमूलच बंगालमध्ये पानिपत

ममता बॅनर्जींच्या तृणमूलच बंगालमध्ये पानिपत; तामिळनाडूत द्रमुकला सर्वात मोठा धक्का, मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन पराभूत



पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि केरळ या पाचही राज्यांमध्ये सोमवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. यामध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजपला (BJP) घवघवीत यश मिळाले. तर आसामध्येही भाजपने पुन्हा एकदा सत्ता राखण्यात यश मिळवले. तर केरळमध्ये डाव्यांचा शेवटचा गड पडला असून याठिकाणी काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता आहे. तर तामिळनाडूमध्ये विजय थलपति याच्या टीव्हीके पक्षाने मुसंडी मारत द्रमुक आणि अण्णाद्रमुकला मागे टाकले. तर पुद्दुचेरीमध्येही भाजपने यश मिळवले आहे.

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीतील सर्वाधिक धक्कादायक निकाल लागला आहे. द्रमुक नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचा पराभव झाला आहे. अभिनेता विजयच्या टीव्हीके पक्षाच्या त्सुनामीमध्ये द्रमुकचा मोठा पराभव झाला आहे.  तामिळनाडूच्या विधानसभेची सदस्यसंख्या 234 इतकी आहे. या नुसार बहुमताची आकडेवारी 118 इतकी होते. जो पक्ष 118 जागा जिंकेल तामिळनाडूत सत्ता स्थापन करता येऊ शकते. अभिनेता विजय याच्या टीव्हीके पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी ते बहुमताच्या मॅजिक फिगरपासून दूर आहेत. मात्र, सर्वात मोठा पक्ष म्हणून टीव्हीके पक्षाला तामिळनाडूत सत्ता स्थापन करता येऊ शकते. दरम्यान, अभिनेता विजय याचा टीव्हीके सर्वात मोठा पक्ष ठरल्याचं समोर येताच मोठ्या घडामोडी सुरु झाल्या आहेत. अभिनेता विजयचे वडील एस.ए. चंद्रशेखर यांनी काँग्रेसनं टीव्हीकेसोबत आघाडी करावी, यासाठी ऑफर दिली आहे. मात्र, राष्ट्रीय राजकारणातील द्रमुक सोबतची आघाडी टिकवण्यासाठी काँग्रेस काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल
भाजप-207
तृणमूल काँग्रेस- 80
काँग्रेस -02
डावे पक्ष- 02
इतर-02
एकूण जागा-293
Tamilnadu Election Result 2026: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा निकाल
द्रमुक- 74
अण्णाद्रमुक-53
टीव्हीके-107
इतर-00
एकूण जागा-234
Kerla Election Result 2026: केरळ विधानसभा निवडणुकीचा निकाल
काँग्रेस यूडीएफ आघाडी-102
डावी आघाडी -35
इतर-03
एकूण जागा-140
Assam Election Result 2026: आसाम विधानसभा निवडणुकीचा निकाल
भाजप-102
काँग्रेस- 19
इतर-05
एकूण जागा-126
Puducherry Election Result 2026: पुद्दुचेरी  विधानसभा निवडणुकीचा निकाल
भाजप- 18
काँग्रेस-06
इतर-06
एकूण जागा-30

Rahuri Bypoll Election 2026: राहुरीत अक्षय कर्डिलेंचा मोठा विजय

112587 मतांनी अक्षय कर्डीले विजयी. येथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना 27,506 मते मिळाली असून वंचित बहुजन आघाडीच्या संतोष चोळकेंना 5690 मतं पडली आहेत. याशिवाय, अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे यांना 7299 मतं मिळाली असून लाखांच्या फरकाने अक्षय कर्डिले आमदार बनले आहेत.

Baramati byelection Result 2026: सुनेत्रा पवारांना देशात सर्वाधिक मताधिक्य, पोटनिवडणुकीत इतिहास रचला

बारामती पोटनिवडणुकीच्या २४ व्या फेरीअखेर मिळालेल्या आकडेवारीनुसार, सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय झाला आहे. सुनेत्रा पवार २ लाख १८ हजार ९३० इतक्या विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. देशात सगळ्यात जास्त मताने निवडून येण्याचा विक्रम सुनेत्रा पवारांच्या नावाने आज झाला आहे

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक

================================================

"महाराष्ट्रातील राजकारण" 

================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook

==================================================

निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता Election Preparation and Code of Conduct E-Book
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.