Saturday 16 December 2023

Pune Lok Sabha By-Election : पुणे लोकसभेची पोटनिवडणूक घेण्याच्या आदेशात उच्च न्यायालयाकडून बदल

पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीची शक्यता मावळली



मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात ताशेरे ओढून पोटनिवडणूक न घेण्याचे प्रमाणपत्र लोकप्रतिनिधी कायद्याचे उल्लंघन करणारे आणि बेकायदा असल्याचे नमूद करून रद्द करून निवडणूक घेण्याबाबत कायदेशीरदृष्ट्या पुढील प्रक्रिया राबविण्याचे आदेश 13 डिसेंबरला दिले होते. सदर आदेशात 15 डिसेंबरला उच्च न्यायालयाकडून दुरुस्ती करून बदल करण्यात आला आहे त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीची शक्यता मावळली आहे. 
मुंबई उच्च न्यायालयाने 13 डिसेंबरच्या आदेशात, संसद सदस्य म्हणून कार्यकाल एक वर्षांपेक्षा जास्त काळ असेल. असे नमूद होते तर काल 15 डिसेंबर च्या आदेशात, संसद सदस्य म्हणून कार्यकाल एक वर्षांपेक्षा जास्त काळ गेला असता. असा महत्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे. 13 डिसेंबरच्या आदेशातील 11 अनुक्रमांकाच्या मचकुरात दुरुस्ती करण्यात आलेली आहे. उच्च न्यायालयाने दुरुस्तीसह सुधारित आदेश देखील काल 15 डिसेंबरला जारी केला आहे. सविस्तरपणे आदेशाची प्रत "प्राब" संस्थेकडे देखील मागणीनुसार उपलब्ध असेल.
  
पोटनिवडणूक टाळण्यासाठी लोकप्रतिनिधी कायद्यातील १५१ (ए) अंतर्गत दोन अपवाद करण्यात आले आहेत. लोकसभा अथवा विधानसभेची मुदत संपण्यास एक वर्षांपेक्षा कमी कालावधी असणे हा पहिला अपवाद आहे. तर कायदा व सुव्यवस्था, नैसर्गिक आपत्ती किंवा रोगराईमुळे सहा महिन्यांच्या मुदतीत पोटनिवडणूक घेणे अशक्य असल्याने केंद्र सरकारशी सल्लामसलत करून निवडणूक आयोगाने प्रमाणित करणे हा दुसरा अपवाद करण्यात आला आहे. पुण्यासाठी लोकप्रतिनिधी कायद्यातील ‘अ’ व ‘ब’ ही दोन्ही उपकलमे लागू पडत नव्हती कारण पुण्याची जागा २९ मार्चला रिक्त झाली होती. विद्यमान १७ व्या लोकसभेची मुदत १७ जून २०२४ रोजी संपत आहे. म्हणजेच जागा रिक्त झाली तेव्हा १५ महिन्यांचा लोकसभेचा कालावधी शिल्लक होता. कायदा व सुव्यवस्था, नैसर्गिक आपत्ती, रोगराई वा अन्य कोणतेही कारण पुण्यासाठी लागू होत नाही तरीही आगामी लोकसभेचा कालावधी अत्यल्प व त्याच्या कामातील व्यस्तता असल्याचे कारण देऊन पोटनिवडणूक न घेण्याचे प्रमाणपत्र जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी जारी केले होते. सदर प्रमाणपत्रच लोकप्रतिनिधी कायद्याचे उल्लंघन करणारे आणि बेकायदा असल्याचे नमूद करून उच्च न्यायालयाने ते रद्द केले.

मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याबाबत कायदेशीरदृष्ट्या पुढील प्रक्रिया राबविण्याचे आदेश 13 डिसेंबरला दिले होते. सदर आदेशात 15 डिसेंबरला उच्च न्यायालयाकडून दुरुस्ती करून बदल करण्यात आला. वास्तविकपणे निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी २ महिन्यांचा कालावधी लागणार असून विद्यमान १७ व्या लोकसभेची मुदत संपण्यास 6 महिन्यांचाच कालावधी उरलेला आहे त्यामुळे रिक्त जागेचा कालावधी 1 वर्षाहून कमी असल्यास पोटनिवडणूक न घेण्याचा नियमातील अपवाद महत्त्वपूर्ण ठरत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आदेशामध्ये पोटनिवडणूक झाली असती तर संसद सदस्य म्हणून कार्यकाल एक वर्षांपेक्षा जास्त काळ असेल, असे नमूद होते मात्र ते सुसंगत नसल्याने संसद सदस्य म्हणून कार्यकाल एक वर्षांपेक्षा जास्त काळ गेला असता, असा महत्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीची शक्यता मावळली आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट सहा विधानसभा मतदारसंघापैकी भाजपचा सुरक्षित व भाजपचा गड मानला जाणारा कसबापेठ विधानसभा मतदारसंघातील पोट निवडणुकीत धक्कादायक पराभव पत्करावा लागला त्यामुळे वरिष्टांकडून या पराभवाची गंभीर दखल घेत रिक्त झालेल्या जागेची पोट निवडणूक टाळण्याच्या रणनीतीचा अवलंब केल्याचे न्यायालयाच्या निकालावरून अधोरेखित झाले. पोटनिवडणूक जाणीवपूर्वक टाळल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे यामध्ये पोटनिवडणूक टाळण्याची आवश्यकताच नव्हती असा सूर भाजप व मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांचा आहे. संभाव्य उमेदवारांमध्ये अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत नावांची चर्चा पुणेकरांना पहावयास मिळाली. पोटनिवडणूक जाणीवपूर्वक टाळल्याचे समोर येत असल्याने आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीबाबत राज्य पातळीवर उत्सुकता निर्माण झाली आहे.

महायुतीमध्ये ही जागा भाजपकडे आहे तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीमध्ये ही जागा काँग्रेस लढवणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे पुण्यामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा सरळ सामना पाहायला मिळेल. भाजपकडून अनेक नावे समोर येत आहेत तसेच काँग्रेसकडून देखील अनेक इच्छुक तयारीला लागल्याचे दिसत आहे. पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर प्रत्यक्षात निवडणूक होणार की नाही याबाबत संभ्रमावस्था असली, तरी पुण्यातील राजकीय पक्षांच्या तयारीला मात्र वेग आला आहे. 

भाजप तर्फे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या सूनबाई स्वरदा बापट यांची नावे सुरुवातीपासून पुणे लोकसभा मतदारसंघासाठी चर्चेत आहेत. भाजपकडून राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांचे नाव चर्चेत आहे. आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी आमदार मेधा कुलकर्णी, संजय काकडे अशी भाजपकडे इच्छुकांची अशी मोठी यादी आहे. मात्र यातून एकाची निवड करणं सोपे नाही. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार गट महायुतीत सामील झाला आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवार गटाची मदत महत्त्वाची ठरणार आहे.

पुणे मनसेचे माजी शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक वसंत मोरे, शहराध्यक्ष साईनाथ बाबर देखील लोकसभेसाठी इच्छुक आहेत. तर पुणे लोकसभेसाठी काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते मोहन जोशी, अरविंद शिंदे आणि रवींद्र धंगेकर या नावांची चर्चा आहे. रवींद्र धंगेकरांना कसबा पोटनिवडणुकीची उमेदवारी मिळवून देण्यात मोहन जोशी यांनी प्रयत्न केले होते. त्यामुळे लोकसभेसाठी ते अधिक प्रयत्नशील आहेत. मोहन जोशी यांचे नाव काँग्रेसकडून आघाडीवर आहे. राष्ट्रवादीकडून माजी महापौर प्रशांत जगताप आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व माजी उपमहापौर दीपक मानकर देखील संधी मिळाल्यास लढण्याची तयारी असल्याचे मत व्यक्त करीत आहेत.

दरम्यान लोकसभा कालावधी 6 महिन्यांच्या आत कालावधी राहिल्याने देखील पोट निवडणूक होण्याची शक्यता धूसर आहे. मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता असून आदेशातील दुरुस्तीमुळे देखील पुणे लोकसभा पोटनिवडणूक होण्याची शक्यता कमीच आहे.

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

=============================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक घरपोच मिळविण्यासाठी-    

=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 





Monday 20 November 2023

Maratha Reservation in Politics बड्या बंडखोरीनंतर आरक्षणाच्या चळवळीला चालना आणि आरोप-प्रत्यारोपांच्या जुगाराकडे महाराष्ट्राचे राजकारण

जातीय तेढ, स्वजातीय भावना निर्माण करून लोकसभा निवडणुकीच्या मैदानाची मशागत


हाराष्ट्राच्या राजकारणातील सत्तेच्या सारीपाटात आपले राजकीय स्थान व सत्ता टिकवून ठेवण्यासाठी वाट्टेल त्या स्तरावरील डावपेच टाकण्याच्या नादात लोकप्रतिनिधींकडून राजकारणाचा स्तर दिवसेंदिवस खालावत आहे. पक्षीय बंडखोरी आणि त्यानंतर पक्षावरील मालकी यावरून सुरु असलेल्या राजकारणावरून आधीच जनसामान्य मतदार हतबल झालेला असताना राज्यातील प्रमुख दोन बड्या बंडखोरीनंतर सर्वच समाज घटकांमध्ये आरक्षणाच्या चळवळीला चालना मिळाली. जातीय तेढ, स्वजातीय भावना निर्माण करून लोकसभा निवडणुकीच्या मैदानाची मशागत सुरु असून आरोप-प्रत्यारोपांच्या मद्य धुंध, जुगाराकडे महाराष्ट्राच्या राजकारणाची वाटचाल सुरु आहे. 

महाराष्ट्राच्या राजकीय सद्यस्थितीचे अचूकपणे प्राब संस्थेतर्फे विश्लेषण केले आहे.

खालीलप्रमाणे प्रमुख मुद्दे व विश्लेषण 

     लोकप्रतिनिधींकडून राजकारणाचा स्तर खालावला; जनसामान्य मतदार हतबल-

     सर्वच समाज घटकांमध्ये आरक्षणाच्या चळवळीला चालना देण्यामागील राजकारण-

     मराठा समाजाचे ओबीसीकरण त्याचे परिणाम व फायदे-तोटे, 

     धनगर व अन्य समाजाच्या प्रलंबित मागण्या व आंदोलनामागील समाजकारण व राजकारण-   

     आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांचा झंझावात दौरा, आर्थिक गणित व आंदोलनामागील समाजकारण की राजकारण- 

     ओबीसी नेते भुजबळ यांच्या विरोधा मागील समाजकारण की राजकारण-

     जातीय तेढ, स्वजातीय भावना निर्माण करून लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला लाभ होऊ शकतो-

     बंडखोरी व पक्ष फुट पात्र-अपात्रता निकाल व त्याचे परिणाम-

     महायुती-महाविकास आघाडीतील संभाव्य जागावाटप-

     लोकसभा-विधानसभा निवडणुकीपर्यंत राज्यातील राजकारणातील उलथापालथ-

सशुल्क माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा- 




Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

=============================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक घरपोच मिळविण्यासाठी-    

=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 



Thursday 26 October 2023

Gram Panchayat Elections पुरंदर तालुक्यातील वाल्हे, आडाचीवाडी, सुकलवाडी ग्रामपंचायती बिनविरोध

प्रा. डॉ. दिंगबर दुर्गाडे यांच्या पुढाकाराने विकासकामांना प्राधान्य, आदर्श गाव करण्याचा संकल्प


पुरंदर तालुक्यातील ऐतिहासिक गाव वाल्हे आणि पंचक्रोशीतील पाच वर्षांपूर्वी नव्याने स्थापन झालेल्या आडाचीवाडी व सुकलवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या असून राजकीय मतभेद विसरून विकासकामांना प्राधान्य देण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिंगबर दुर्गाडे यांच्या पुढाकाराने आदर्श गाव करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे. राजकीय मतभेद विसरून सामाजिक सलोखा राखण्यासाठी तिन्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध करण्यात त्यांना यश आले आहे. वाल्हे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अतुल गायकवाड यांची तर आडाचीवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुवर्णाताई बजरंग पवार आणि सुकलवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संदेश पवार यांची बिनविरोध निवड झालेली आहे. या तिन्ही ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासह सदस्यांच्या देखील निवडी बिनविरोध झालेल्या असून नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांवर समस्त वाल्हे आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 
      आडाचीवाडी ग्रामपंचायतीच्या ९ सदस्याच्या जागांसाठी ९ अर्ज आले होते व सरपंच पदासाठी १ उमेदवारी अर्ज आल्याने उमेदवारी अर्ज माघार घेण्यापूर्वीच एकमेव ग्रामपंचायत बिनविरोध होण्याचा मान पटकावला होता. तर सुकलवाडी ग्रामपंचायतीच्या ९ सदस्याच्या जागांसाठी २० अर्ज आले होते व सरपंच पदासाठी ५ उमेदवारी अर्ज आले होते आणि वाल्हे ग्रामपंचायतीच्या १३ सदस्याच्या जागांसाठी ३८ अर्ज आले होते व सरपंच पदासाठी ५ उमेदवारी अर्ज आले होते. खासदार व आमदार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिंगबर दुर्गाडे यांच्या पुढाकाराने पुरंदर तालुक्यातील वाल्हे, आडाचीवाडी, सुकलवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झालेल्या आहेत.  
     पुरंदर तालुक्यात 15 ग्रामपंचायतीसाठी सरपंचपद व सदस्यांच्या पदांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली होती त्याप्रमाणे 25 ऑक्टोबरला अर्ज माघार घेण्याच्या दिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. यामध्ये बहुतांश जागांवर निवडणूक बिनविरोध करण्यावर ग्रामस्थांनी भर दिला. गावातील नागरिकांत एकोपा निर्माण व्हावा, टिकावा तसेच निवडणुकीवर होणाऱ्या खर्चामध्ये बचत व्हावी या उद्देशाने पुरंदर-हवेली मतदार संघातील बिनविरोध निवडणूक करणाऱ्या ग्रामपंचायतींना महाविकास आघाडीतील घटक असणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार संजय जगताप यांच्या खासदार व आमदार फंडातून बिनविरोध निवडणूक करणाऱ्या प्रत्येक ग्रामपंचायतीला 25 लाख रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याचे पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी जाहीर केले होते. त्यांच्या आवाहनाला बहुतांश गावकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. यापूर्वी एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या काळात मुदत संपलेल्या 68 ग्रामपंचायतींच्या निवडणूकांवेळीही ग्रामपंचायती बिनविरोध निवडून देण्याबाबत खासदार सुळे आणि आमदार जगताप यांनी आवाहन केले होते. त्यावेळी पुरंदर तालुक्‍यातील 12 ग्रामपंचायतींनी यास प्रतिसाद देत या निवडणूका बिनविरोध केल्या होत्या. 
     गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत बिनविरोध केली. भविष्यकाळात विकास कामांच्या माध्यमातून आडाचीवाडी आदर्श व्हावे गावाच्या विकासकामासाठी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी रायगडचे उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत उद्योजक विक्रम पवार, माजी सरपंच दत्तात्रेय पवार, सूर्यकांत पवार, बजरंग पवार आदी ग्रामस्थांनी सहकार्य केले. आडाचीवाडी प्रभागनिहाय उमेदवार पुढीलप्रमाणे : सरपंचपदासाठी सुवर्णा बजरंग पवार तर सदस्यपदासाठी शकुंतला महादेव पवार, सुजाता विजय पवार, विद्या मच्छिंद्र पवार, लता बाळासाहेब पवार, प्रतिभा राहुल पवार, विकास अशोक पवार, अलका दिलीप पवार, मोहन निवृत्ती पवार, ज्ञानदेव भाऊसाहेब पवार अशी नवनिर्वाचित सदस्यांची नावे आहेत.
    निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणूक अर्जांची छाननी सोमवारी २३ ऑक्टोबरला झाली. बुधवारी २५ ऑक्टोबर दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्यात आले. ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झालेल्या नाहीत त्या ग्रामपंचायतीसाठी मतदान रविवारी ५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. सकाळी ०७:३० ते सायंकाळी ०५:३० या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल. तर सोमवार ०६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. पुरंदर तालुक्यातील  निवडणूक होणाऱ्या 15 ग्रामपंचायतीमध्ये वाल्हे, आडाचीवाडी, सुकलवाडी, वागदरवाडी, माळशिरस, वीर, गुळूंचे, एखतपूर-मुंजवडी, राजुरी, कर्नलवाडी, वनपुरी, उदाचीवाडी, भोसलेवाडी, कोथळे, रानमळा या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. 
अन्य ग्रामपंचायतीसाठी पुढीलप्रमाणे नामनिर्देशनपत्र दाखल झाले होते यामध्ये गुळुंचे ग्रामपंचायतीच्या नऊ सदस्याच्या जागांसाठी ३९ अर्ज आले होते व सरपंच पदासाठी ८ उमेदवारी अर्ज आले होते., कर्नलवाडी ग्रामपंचायतीच्या सात सदस्याच्या जागांसाठी ३३ अर्ज आले होते व सरपंच पदासाठी ६ उमेदवारी अर्ज आले होते., 
   वागदरवाडी ग्रामपंचायतीच्या ९ सदस्याच्या जागांसाठी २० अर्ज आले होते व सरपंच पदासाठी ६ उमेदवारी अर्ज आले होते, वनपुरी ग्रामपंचायतीच्या ७ सदस्याच्या जागांसाठी २६ अर्ज आले होते व सरपंच पदासाठी ३ उमेदवारी अर्ज आले होते, उदाचीवाडी ग्रामपंचायतीच्या ७ सदस्याच्या जागांसाठी १४ अर्ज आले होते व सरपंच पदासाठी ३ उमेदवारी अर्ज आले होते, कोथळे ग्रामपंचायतीच्या ९ सदस्याच्या जागांसाठी ३१ अर्ज आले होते व सरपंच पदासाठी ९ उमेदवारी अर्ज आले होते, रानमळा ग्रामपंचायतीच्या ७ सदस्याच्या जागांसाठी २१ अर्ज आले होते व सरपंच पदासाठी ५ उमेदवारी अर्ज आले होते, भोसलेवाडी ग्रामपंचायतीच्या ७ सदस्याच्या जागांसाठी १४ अर्ज आले होते व सरपंच पदासाठी ५ उमेदवारी अर्ज आले होते, वीर ग्रामपंचायतीच्या १५ सदस्याच्या जागांसाठी ६० अर्ज आले होते व सरपंच पदासाठी ११ उमेदवारी अर्ज आले होते, माळशिरस ग्रामपंचायतीच्या ११ सदस्याच्या जागांसाठी ४७ अर्ज आले होतेव सरपंच पदासाठी ४ उमेदवारी अर्ज आले होते, राजुरी व एखतपुर-मुंजवडी ग्रामपंचायतीच्या ७ सदस्याच्या जागांसाठी १४ अर्ज आले होते व सरपंच पदासाठी २ उमेदवारी अर्ज आले होते. 
    पाच गावच्या प्रत्येकी एक सदस्यांसाठी पोट निवडणूक होणार आहे. नायगाव व पानवडी येथे १ अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाली आहे. पांढे व राख येथे ३ अर्ज आले आहेत. सुपे खुर्द येथील एका जागेसाठी एक ही अर्ज आलेला नाही. १५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत यावेळी सरपंचपदासाठी थेट जनतेतून मतदान होणार आहे. सरपंच पदासाठी तब्बल ७३ अर्ज आल्याने मोठी चुरस निर्माण झाली होती मात्र बहुतांश जागांवर निवडणूक बिनविरोध झालेल्या आहेत.
     एखतपूर मुंजवडीच्या पाच जागा बिनविरोध तर सरपंचपदासाठी शीतल किरण टिळेकर व लक्ष्मी काळूराम धिवार यांच्यामध्ये निवडणूक होणार असून सदस्यांसाठी प्रभाग एक कोमल किरण गद्रे, रेश्‍मा बिलाल मुलाणी, सागर अशोक कुंभार, प्रभाग दोन सुदर्शन दत्तात्रेय भामे, विद्या हनुमंत झुरंगे, यांची बिनविरोध निवड झाली.राजुरी ग्रामपंचायतमध्ये शीतल सचिन भगत, संतोष पांडुरंग भगत, दत्तात्रय शांताराम भगत, यांची बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवड झाली आहे. तर नायगावच्या असणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये बारीकराव नामदेव खेसे यांची तर पानवडीत प्रियंका गणेश भिसे, राख स्मिता दत्तात्रय रणवरे, बिनविरोध निवड झाली आहे. पुरंदर तालुक्‍यातील बहुचर्चित असणाऱ्या माळशिरस ग्रामपंचायतीची निवडणूक दुरंगी पद्धतीने होणार आहे. वागदरवाडीच्या सरपंचपदासाठी निवडणूक जाहीर झाली असून प्रभाग दोन छकुली अजित बर्गे, प्रभाग तीन संतोष मानसिंग पवार, सुनिता सचिन पवार, दिपाली अतुल पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. भोसलेवाडी ग्रामपंचायतीमध्ये तीन जागा बिनविरोध झाले असून प्रभाग दोन अहिल्या लक्ष्मण लवांडे, प्रभाग तीन शिवाजी महादेव भोसले, शीतल यशवंत भोसले, या तीन जागा बिनविरोध झाल्या असून सरपंच पदासाठी दुरंगी लढत होत आहे. कोथळे : मीना राजेंद्र जगताप, समीर दत्तात्रेय भांडवलकर, नेहा वैभव झगडे.

ग्रामपंचायतीच्या बिनविरोध निवडणुकीत नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी सरपंच व सदस्य खालीलप्रमाणे -:

वाल्हे :-अतुल सोमनाथ गायकवाड. प्रभाग एक : तेजस बाळासो दुर्गाडे, मयुरी संदीप भुजबळ. प्रभाग दोन : समृद्धी सचिन लंबाते, अनिल राजाराम भुजबळ. प्रभाग तीन : अमित धनंजय पवार, पूर्वा राजेंद्र राऊत, कविता सतीश पवार. प्रभाग चार : सागर मदनराव भुजबळ, प्रमिला नवनाथ पवार, हरी प्रल्हाद दुबळे. प्रभाग पाच : शीतल दादा मदने, वैशाली दादासो पवार, अमोल शंकर पवार.

आडाचीवाडी :- सुवर्णा बजरंग पवार. प्रभाग एक : शकुंतला महादेव पवार, सुजाता विजय पवार, विद्या मच्छिंद्र पवार. प्रभाग दोन : लता बाळू पवार, प्रतिभा राहुल पवार, विकास अशोक पवार. प्रभाग तीन : अलका दिलीप पवार, मोहन निवृत्ती पवार, ज्ञानदेव भाऊसो पवार.

सुकलवाडी :- सरपंच : संदेश दिलीप पवार. प्रभाग एक : प्रतीक्षा भाऊसाहेब चव्हाण, योगेश मारुती पवार, उर्मिला दिलीप पवार. प्रभाग दोन : नितीन महादेव गावडे, हर्षदा नितीन पवार, वैजयंता दत्तात्रेय दाते. प्रभाग तीन : अमोल अरुण पवार, दत्तात्रेय लक्ष्मण पवार, अश्‍विनी कुंडलिक चव्हाण.

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

=============================
"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तकाच्या प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी-

पुस्तक किंमत-1000/-रु.
प्रकाशनपूर्व सवलतीची किंमत-750/-रु.
=============================
निवडणुकांसाठी उपयुक्त नवीन पुस्तक 
‘महाराष्ट्रातील रणसंग्राम’
पुस्तक मिळविण्यासाठी व अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा-
==========================
"महाराष्ट्रातील राजकारण" 

Monday 9 October 2023

Assembly Election 2023- पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर; 3 डिसेंबरला मतमोजणी

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर


ध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर झाला. मध्यप्रदेशमध्ये 17 नोव्हेंबर, छत्तीसगडमध्ये 7 आणि 17, नोव्हेंबर, राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबर, मिझोरममध्ये 7 नोव्हेंबर आणि तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. पाचही राज्यांची  मतमोजणी 3 डिसेंबरला रोजी होणार आहे. पाच राज्यात सोळा कोटीपेक्षा अधिक मतदार आहे. पाच राज्यात 679 जागांवर मतदान होणार आहे. 60 लाख युवा मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहे. मतदानासाठी नोंदणी  करणाऱ्यांमध्ये  महिलांची संख्या जास्त आहे. आदिवासी भागात PVTG मतदान केंद्राची सोय करण्यात  आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना व्होट फ्रॉम होम करता येणार आहे. या पाच राज्यात आचारसंहिता लागू करण्यात येणार आहे. मिझोरममध्ये साडे आठ लाख, छत्तीगडमध्ये 2.03 कोटी, मध्य प्रदेशमध्ये 5.6 कोटी, राजस्थानमध्ये 5.25 कोटी आणि तेलंगणामध्ये 3.17 कोटी मतदार मतदान करणार आहेत. 

कोणत्या राज्यात कधी मतदान- 
मिझोरम - 7 नोव्हेंबर रोजी मतदान
छत्तीसगड - 7  आणि 17 नोव्हेंबर रोजी मतदान
मध्यप्रदेश - 17 नोव्हेंबर रोजी मतदान
राजस्थान - 23 नोव्हेंबर रोजी मतदान
तेलंगाणा -  30 नोव्हेंबर रोजी मतदान
पाच राज्यांचा निकाल - 3 डिसेंबर रोजी

   पाच राज्यांमध्ये एकूण १.७७ लाख मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडेल. या पाच राज्यांमधील निवडणुकांच्या निमित्ताने सत्ताधारी भाजप आणि विरोधातील इंडिया आघाडी यांच्यात पहिल्यांदाच थेट लढत होईल. त्यामुळे दोन्ही बाजूंसाठी या निवडणुका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रतिष्ठेच्या ठरणार आहेत. या पाचही राज्यांच्या निवडणुकीत मोदी फॅक्टर अजूनही कितपत प्रभावी आहे, याची चाचपणी होईल. जातीनिहाय जनगणना, शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई आणि अँटी-इन्कम्बन्सी हे घटकही पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे भवितव्य ठरवतील. सलग तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकण्याचा मनसुबा असलेल्या भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी या पाच राज्यातील विधानसभा निवडणूक एकप्रकारे आगामी लोकसभा निवडणुकीची लिटमस टेस्ट ठरणार आहे.
     मध्य प्रदेशमध्ये मतदान १७ नोव्हेंबरला होणार आहे. सर्व राज्यांचे निवडणुकीचे निकाल ३ डिसेंबरला लागतील. निवडणूक आयोगानुसार, एकाच टप्प्यात मिझोरममध्ये ७ नोव्हेंबरला आणि तेलंगणात ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. पाचही राज्यांचे निकाल ३ डिसेंबरला लागणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, या राज्यांमध्ये एकूण 16.14 कोटी मतदार आहेत. यामध्ये ८.२ कोटी पुरुष आणि ७.८ कोटी महिला मतदार असतील. यावेळी 60.2 लाख नवीन मतदार प्रथमच मतदान करणार आहेत.
    पाच राज्यांतील 679 विधानसभा जागांसाठी 1.77 लाख मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. 60.2 लाख नवीन मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. त्यांचे वय १८ ते १९ या दरम्यान आहे. 15.39 लाख मतदार असे आहेत ज्यांना 18 वर्षे पूर्ण होत आहेत. 17734 मॉडेल बूथ आणि 621 मतदान केंद्रे दिव्यांग कर्मचाऱ्यांद्वारे व्यवस्थापित केली जातील. 8192 मतदान केंद्रांवर महिला कमान सांभाळतील. 1.01 लाख मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग होणार आहे. आदिवासींसाठी खास बूथ असतील. दोन किलोमीटर परिसरात मतदान केंद्रे असतील. छत्तीसगड-ओडिशा सीमेवरील चांदमेता आणि जगदलपूर बस्तरमधील तुलसी डोंगरी हिल भागात पहिल्यांदाच मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. पूर्वी गावकऱ्यांना मतदानासाठी आठ किमी पायपीट करून बूथपर्यंत जावे लागत होते. राजस्थानमधील माझोली बारमेरमध्ये बूथ 5 किमी अंतरावर होते. 2023 च्या निवडणुकीसाठी 49 मतदारांसाठी नवीन बूथ बांधण्यात आले आहे. सी व्हिजिल अॅपच्या माध्यमातून निवडणुकीच्या कामांवर लक्ष ठेवले जाणार आहे. अॅपच्या माध्यमातून लोकांना तक्रार करता येणार आहे. यावेळी कोणत्या राज्यात किती मतदार- मध्य प्रदेश - 5.6 कोटी, राजस्थान - 5.25 कोटी, तेलंगणा - 3.17 कोटी, छत्तीसगड - 2.03 कोटी, मिझोरम - 8.52 लाख इतकी आहे.
     दरम्यान राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये आप काँग्रेसविरोधात निवडणूक लढवत आहे. भाजपच्या विरोधात स्थापन झालेल्या भारताच्या विरोधी आघाडीमध्ये काँग्रेस आणि आप या दोन्ही पक्षांचा समावेश आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत दोघेही एकमेकांविरुद्ध लढत आहेत. 2018 मध्ये, आम आदमी पार्टीने छत्तीसगडमध्ये 85 जागा (0.85 मत टक्के), मध्य प्रदेशात 208 (0.66 मत टक्के), राजस्थानमध्ये 142 (0.38 मत टक्के), तेलंगणात 41 (0.06 मत टक्के) जागा लढवल्या पण कुठेही विजय मिळवला नाही. आढळले. मागील कामगिरीचा विचार करता या राज्यांमध्ये काँग्रेसला आपकडून कोणतेही नुकसान होण्याची शक्यता नाही.
मध्य प्रदेश- 2018 मध्ये कमलनाथ 15 महिने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते, राजीनामा दिल्यानंतर शिवराज मुख्यमंत्री झाले. मध्य प्रदेशात गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर बरेच राजकीय नाट्य रंगले होते. निवडणूक निकालात काँग्रेसला भाजपपेक्षा पाच जागा जास्त मिळाल्या होत्या. काँग्रेसला 114 तर भाजपला 109 जागा मिळाल्या होत्या. बसपाने दोन तर सपाने एक जागा जिंकली. युती करून काँग्रेसने बहुमताचा 116 आकडा गाठला आणि कमलनाथ राज्याचे मुख्यमंत्री झाले. काँग्रेसचे सरकार केवळ 15 महिने टिकू शकले. प्रत्यक्षात काँग्रेसच्या २२ आमदारांनी राजीनामा दिला. यात सहा मंत्र्यांचा सहभाग होता. सभापतींनी मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारले. राजीनाम्यामुळे कमलनाथ सरकार अल्पमतात आले. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले, न्यायालयाने कमलनाथ सरकारला फ्लोअर टेस्ट करण्याचे आदेश दिले. पण फ्लोर टेस्टपूर्वी कमलनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. नंतर भाजपने बंडखोर आमदारांचा समावेश करून 127 आमदारांची संख्या वाढवली आणि सरकार स्थापन केले. शिवराजसिंह चौहान चौथ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले.
राजस्थान- राजस्थानमध्ये विधानसभेच्या एकूण 200 जागा आहेत. राजस्थानमध्ये 25 वर्षांपासून प्रत्येक वेळी सरकार बदलते. 2018 मध्ये येथे विधानसभेच्या 199 जागांसाठी निवडणूक झाली होती. अलवरच्या रामगढ मतदारसंघातील बसपाचे उमेदवार लक्ष्मण सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यामुळे एका जागेवरील निवडणूक पुढे ढकलण्यात आली. १९९ जागांवर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला ९९ जागा मिळाल्या होत्या. एक जागा मिळालेल्या काँग्रेसला येथे आरएलडीने पाठिंबा दिला. अशा प्रकारे काँग्रेसने 100 जागा मिळवून सरकार स्थापन केले. नंतर, 2019 मध्ये झालेल्या रामगढ जागेच्या निवडणुकीतही काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आणि काँग्रेसला 101 जागांवर नेले. काँग्रेसने अशोक गेहलोत यांना राज्याचे मुख्यमंत्री केले.
छत्तीसगड- छत्तीसगडमध्ये 2018 च्या विधानसभा निवडणुकीत 15 वर्षांनी काँग्रेस पुन्हा सत्तेत आली. 90 जागांवर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसला दोन तृतीयांश बहुमत मिळाले. भाजपला केवळ 15 तर काँग्रेसला 68 जागा मिळाल्या. नंतर काही आमदारांनी पक्ष बदलला. सध्या छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे ७१ आमदार आहेत, भाजपचे १३ आमदार आहेत, बसपाकडे दोन, जनता काँग्रेस छत्तीसगड पक्षाचे तीन आमदार आहेत आणि एक जागा रिक्त आहे. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री भूपेश बघेल आहेत.
तेलंगणा- तेलंगणात 2018 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला केवळ एक जागा मिळाली होती. सध्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या पक्ष टीआरएस TRS (पक्षाचे नाव तेलंगणा राष्ट्र समिती वरून बदलून 2022 मध्ये भारत राष्ट्र समिती असे करण्यात आले) यांना सर्वाधिक 88 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला १९ जागा मिळाल्या. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये आप काँग्रेसविरोधात निवडणूक लढवत आहे. भाजपच्या विरोधात स्थापन झालेल्या भारताच्या विरोधी आघाडीमध्ये काँग्रेस आणि आप या दोन्ही पक्षांचा समावेश आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत दोघेही एकमेकांविरुद्ध लढत आहेत. 2018 मध्ये, आम आदमी पार्टीने छत्तीसगडमध्ये 85 जागा (0.85 मत टक्के), मध्य प्रदेशात 208 (0.66 मत टक्के), राजस्थानमध्ये 142 (0.38 मत टक्के), तेलंगणात 41 (0.06 मत टक्के) जागा लढवल्या पण कुठेही विजय मिळवला नाही. आढळले. मागील कामगिरीचा विचार करता या राज्यांमध्ये काँग्रेसला आपकडून कोणतेही नुकसान होण्याची शक्यता नाही. सध्या विधानसभेच्या 119 जागांपैकी 101 आमदार आहेत. असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्ष एआयएमआयएमकडे 7 आमदार आहेत, तर काँग्रेसकडे पाच, भाजपकडे तीन, एआयएफबीकडे एक, एक नामनिर्देशित आणि एक अपक्ष आमदार आहे.
मिझोराम- मिझोराममध्ये 2018 च्या विधानसभा निवडणुकीत मिझो नॅशनल फ्रंट (MNF) 10 वर्षांनी परतले. एकूण 40 जागांवर झालेल्या निवडणुकीत एमएनएफला 26 तर काँग्रेसला पाच जागा मिळाल्या. याशिवाय झोराम पीपल्स मुव्हमेंटला आठ जागा मिळाल्या असून एक जागा भाजपच्या वाट्याला गेली आहे. सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट पक्षाने झोरमथांगा यांना मुख्यमंत्री केले. मिझो नॅशनल फ्रंटकडे सध्या २८ आमदार आहेत. काँग्रेसचे पाच, झोराम पीपल्स मूव्हमेंटचे एक, भाजपचे एक आणि पाच अपक्ष आहेत.

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

=============================
"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तकाच्या प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी-

पुस्तक किंमत-1000/-रु.
प्रकाशनपूर्व सवलतीची किंमत-750/-रु.
=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 

Tuesday 3 October 2023

Gram Panchayat Elections पुणे जिल्ह्यातील 231 ग्रामपंचायतींसह राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींसाठी 5 नोव्हेंबरला मतदान

पुणे जिल्ह्यातील 157 ग्रामपंचायतींच्या रिक्त 233 जागांवर पोटनिवडणूक


पुणे जिल्ह्यातील 231 ग्रामपंचायतींसह राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींसाठी तसेच 2 हजार 950 सदस्यपदाच्या; तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी 5 नोव्हेंबरला मतदान घेण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील 157 ग्रामपंचायचतींच्या रिक्त 233 जागांवर देखील पोटनिवडणूक होणार आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रतीक्षा केली जात असताना राज्यातील किमान ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर करून राजकीय पक्षांना दिलासा दिला आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केला कार्यक्रम जाहीर केला असून संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.
     ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे १६ ते २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी २३ ऑक्टोबर रोजी होईल. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. राज्यभरातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि २ हजार ९५० सदस्यपदाच्या; तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी ५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज केली. 
       संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. नामनिर्देशनपत्रे १६ ते २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी २३ ऑक्टोबर रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे २५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. मात्र गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. तेथे ७ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. अनेक जिल्ह्यांतील ग्रामपंचायतीची मुदत संपली आहे. तर काही ठिकाणी पोटनिवडणूक प्रस्तावित आहे. त्यामुळे राज्यात दिवाळीआधीच राजकीय फटाके फुटणार आहेत. जानेवारी ते डिसेंबर दरम्यान सदस्यांची मुदत संपणाऱ्या आणि जिल्ह्यात नव्याने स्थापन झालेल्या सुमारे 231 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक आणि 157 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका होत असलेल्या 388 ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक भोर, खेड तालुक्यातील प्रत्येकी 46 ग्रामपंचायती आहेत. त्या पाठोपाठ आंबेगाव, जुन्नर, मुळशी तालुक्यातील ग्रामपंचायतींची संख्या आहे. आंबेगाव तालुक्यात 44, जुन्नरमध्ये 41, बारामतीमधील 32 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. दौंड, शिरूर मधील प्रत्येकी 16, इंदापूर आणि हवेलीतील प्रत्येकी 14, वेल्हे आणि मावळमधील प्रत्येक 31, पुरंदरमधील 22, मुळशीतील 37 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.

तालुकानिहाय ग्रामपंचायती (कंसात पोटनिवडणूक)

आंबेगाव 30 (14), बारामती 32, भोर 27 (19), दौंड 11 (5), हवेली 4 (10), इंदापूर 6 (8), जुन्नर 26 (15), खेड 25 (21), मावळ 20 (11), मुळशी 23 (14), पुरंदर 15 (7), शिरूर 8 (8) आणि वेल्हे 6 (25) अशा एकूण 231 (157) ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

जुन्नर तालुक्‍यातील 26 ग्रामपंचायतींच्या सरपंच तसेच सदस्यपदासाठी निवडणूक

26 ग्रामपंचायतींमध्ये सांगणोरे, आंबेगव्हाण, डुंबरवाडी, वडगांव आनंद, पिंपळवंडी, निमगिरी, खटकाळे, खामगांव, धालेवाडी तर्फे मिन्हेर, राळेगण, सुकाळवेढे, पाडळी, बुचकेवाडी, पारुंडे, कांदळी, नारायणगांव, शिरोली तर्फे आळे, गुंजाळवाडी, बांगरवाडी, गुळुंचवाडी, बेल्हे, रानमळा, पिंपरी कावळ, उंब्रज नं. 1, पांगरी तर्फे मढ, तांबेवाडी या गावांचा समावेश आहे. जुन्नरला या 26 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी निवडणुका होत आहेत. दरम्यान या 26 ग्रामपंचायतींसोबत वानेवाडी येथे सरपंच आणि सदस्य पदासाठी पोट निवडणूक जाहीर झाली आहे. तर काले, भिवाडे बुद्रुक, अहिनवेवाडी, खिल्लारवाडी, मढ, हातविज, उंडेखडक, अंजनावळे, माणिकडोह, खानापूर, पिंपळगांव तर्फे नारायणगाव, आंबोली, उच्छिल व सोमतवाडी या 15 गावांमध्ये सदस्यांच्या रिक्त पदांसाठी निवडणूका होत आहे.

दौंडमधील ११ ग्रामपंचायतींच्या निवडणुका

दौंड तालुक्यातील केडगाव, कुरकुंभ व पारगाव या मोठ्या ग्रामपंचायतींसह एकूण अकरा ग्रामपंचायतींसाठीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. दौंड तालुक्यातील केडगाव, कुरकुंभ, पारगाव, मलठण, खोपोडी, वाटलूज, पांढरेवाडी, वाखारी, पानवली, वडगाव बांडे व नायगाव या अकरा ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे. 

इंदापुरात १४ गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक

इंदापूर तालुक्यातील ६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुक होत आहे. इंदापूर तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या कार्यकारी मंडळाचे मुदत जुलै महिन्यात संपली होती. तेव्हापासून येथे प्रशासकामार्फत कामकाज सुरु होते. या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीबरोबरच इतर आठ ग्रामपंचायतींमध्येही नऊ सदस्यांची पदे रिक्त आहेत. या पदांसाठी ही पोटनिवडणूक होणार आहे. सार्वत्रिक निवडणूक असलेली गावे पुढीलप्रमाणे- बावडा, लाकडी, काझड, शिंदेवाडी, शेळगाव, वकील वस्ती. पोटनिवडणूक कार्यक्रम असलेल्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे व कंसात जागा- भिगवण (१), कौठळी (१), उद्धट (१), कचरवाडी (१), चांडगाव (१), व्याहाळी (१), सराफवाडी (१), पिठेवाडी (२) या गावांचा समावेश आहे.

भोरमध्ये ४६ ग्रामपंचायतींसाठी निवडणुक

भोर तालुक्यातील १५६ ग्रामपंचायतींपैकी ४६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, त्यामध्ये २७ सार्वत्रिक ग्रामपंचायतींचा आणि १९ ग्रामपंचायतींमधील पोटनिवडणुकींचा समावेश आहे. सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती- शिळींब, आशिंपी, वारवंड, शिरगाव, पऱ्हर खुर्द, पऱ्हर बुद्रुक, दापकेघर, रायरी, साळव, शिरवली हि.मा., कोंढरी, हिर्डोशी, टिटेघर, वडतुंबी, नांदगाव, आंबवडे, वरोडी डायमुख, वरोडी बुद्रुक, पळसोशी, वरोडी खुर्द, नाटंबी, करंजे, महुडे खुर्द, जयतपाड, कुरुंजी, कांबरे बुद्रुक आणि माळेगाव. तसेच पोटनिवडूक होणाऱ्या ग्रामपंचायती- आळंदे, राजापूर, उत्रौली, कुंबळे, मळे, कोर्ले, म्हाकोशी, कासुर्डी गुमा, तेलवडी, सांगवी हि.मा., भूतोंडे, वाढाणे, आंबेघर, बसरापूर, करंदी खुर्द, कोळवडी, सांगवी भिडे, माझगाव आणि शिरवलीतर्फे भोर या गावांचा समावेश आहे.

बारामतीत ३२ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका

बारामती तालुक्यातील जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नव्याने स्थापित व सन २०२२ मध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे निवडणुका न होऊ शकलेल्या ३२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. शिर्सुफळ, साबळेवाडी, गाडीखेल, वंजारवाडी, सायंबाचीवाडी, सुपे, दंडवाडी, कुतवळवाडी, भोंडवेवाडी, चांदगुडेवाडी, पानसरेवाडी, काळखैरेवाडी, मेडद, कऱ्हावागज, पवईमाळ, धुमाळवाडी, आंबी बुद्रुक, कोऱ्हाळे खुर्द, पारवाडी, करंजेपूल, करंजे, मगरवाडी, चौधरवाडी, निंबोडी, मुढाळे, उंडवडी क. प., जराडवाडी, काटेवाडी, गुणवडी, डोर्लेवाडी, म्हसोबानगर, मानाप्पावस्ती या ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे.

मुळशीत २३ ठिकाणी ग्रामपंचायत निवडणूक

गेल्या दहा महिन्यांपासून प्रशासक असलेल्या मुळशी तालुक्यातील तेवीस ग्रामपंचायतीसाठी निवडणुक होत आहे. त्याचप्रमाणे चौदा ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकी देखील होणार आहेत. मुळशी तालुक्यातील 92 पैकी 23 ग्रामपंचायतीच्या लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्याने याठिकाणी प्रशासक आहेत. त्यातील जातेडे, डावजे, शेडाणी, वांद्रे, वडगाव, भांबर्डे, आंबवणे, भादस, खुबवली, कोंढावळे, वातुंडे, वेगरे या बारा ग्रामपंचायतींच्या लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ जानेवारी महिन्यात संपला. परंतु, निवडणूक कार्यक्रमच न लागल्याने याठिकाणी गेली दहा महिन्यांपासून प्रशासक कार्यरत आहेत. बेलावडे, धामणओव्होळ, जामगाव, मुगाव या चार ग्रामपंचायतींचा कार्यकाल फेब्रुवारीमध्ये संपला. तर मे महिन्यात टेमघर, ताम्हिणी, वळणे, माले, संभवे, वारक या सहा ग्रामपंचायतींचा कार्यकाल संपुष्टात आला. आणि मुळशी खुर्द ग्रामपंचायतीचा कार्यकालही ऑगस्टमध्ये संपला. या सर्व ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्याचप्रमाणे पाथरशेत, भोईणी, मोसे खुर्द, कोळावडे, माळेगाव, कुंभेरी, वांजळे, पौड, भोडे, लव्हार्डे, कोळवण, भरे, आंबेगाव, कासारआंबोली या चौदा ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका होणार आहेत.

आंबेगावात ३० ग्रामपंचायतींसाठी निवडणुक

आंबेगाव तालुक्यात मुदत संपणाऱ्या ३० ग्रामपंचायतींसाठी व १४ ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांवरील पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. आंबेगाव तालुक्यातील लोणी, फलादे, कुशिरे बुद्रुक, कोलतावडे, कानसे, गोहे बुद्रुक, तळेकरवाडी, चांडोली खुर्द, अवसरी बुद्रुक, निरगुडसर, पहाडदरा, पारगावतर्फे अवसरी बुद्रुक, जारकरवाडी, चास, ठाकरवाडी, वाळुंजनगर, पाटण, टाव्हरेवाडी, चपटेवाडी, सुपेधर, फुलवडे, डिंभे बुद्रुक, टाकेवाडी, तांबडेमळा, पिंपरगणे, म्हाळुंगेतर्फे घोडा, मांदळेवाडी, नांदूर, बोरघर, जाधववाडी या जानेवारी ते डिसेंबर २०२३ या कालावधीत ३० मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती आहे. तर, रिक्त जागांच्या २० सदस्यपदासाठी पंचाळे बुद्रुक, आहुपे, चिखली, पोखरी, गोहे खुर्द, भागडी, असाणे, आंबेदरा, राजेवाडी, खडकवाडी, गंगापूर बुद्रुक, धोंडमाळ, शिंदेवाडी, साल या १३ ग्रामपंचायती आहेत. लोकनियुक्त सरपंचपदासाठी ग्रामपंचायत पोंदेवाडी आहे, अशा एकूण १४ ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे.

मावळ तालुक्यातील 29 ग्रामपंचायतींसाठी निवडणुक

मावळ तालुक्यातील 19 गावांच्या सार्वत्रिक आणि 10 गावांच्या पोटनिवडणूकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीरमावळ तालुक्यातील वाकसई ही ग्रामपंचायत वगळून मावळ तालुक्यातील एकूण 29 गावांच्या सार्वत्रिक निवडणूका व पोटनिवडणूकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मावळ तालुक्यातील 29 गावांपैकी सार्वत्रिक निवडणूका असलेली गावे 19 आहेत यामध्ये जांबवडे, सदुंबरे, सुदवडी, साळुंब्रे, बेबडओहोळ, लोहगड, शिळींब, कोंडीवडे (आं.मा.), कल्हाट, आंबळे, भाजे, सांगिसे, मुंढावरे, उदेवाडी, मळवंडी ढोरे, दिवड, ओवळे, डोणे, आढले बुद्रुक या गावांचा समावेश आहे. पोटनिवडणूका असलेली गावे ही 10 आहेत. पोटनिवडणूका असलेली गावांमध्ये चिखलसे, शिवणे, नवलाख उंब्रे, कुसगाव बुद्रुक, पुसाणे, शिरगाव, दारुंब्रे, तुंग, खांडशी, कान्हे या गावांचा समावेश आहे. मावळ तालुक्यातील या गावांच्या सार्वत्रिक निवडणूका आणि पोटनिवडणूकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

पुरंदर तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका

पुरंदर तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक, तर ९ ग्रामपंचायतींच्या १३ जागांसाठी पोट निवडणुका जाहीर झाल्या आहेत. पुरंदर तालुक्यातील गुळुंचे, कर्नलवाडी, वाल्हा, बागदरवाडी, आडाचीवाडी, सुकलवाडी, वनपुरी, उदाचीवाडी, कोथळे, रानमळा, भोसलेवाडी, वीर, माळशिरस, राजुरी व एखतपूर-मुंजवडी या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निडवणुका आणि ओबीसी आरक्षणावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर होणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. राज्यात काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन वर्षांपासून झाल्याच नाहीत. देशातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकाही रखडल्या आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रशासक नेमण्यात आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ओबीसी आरक्षणावर येत्या 28 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे गेल्या दीड वर्षात सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर एकदाही सुनावणी झाली नाही. आताही सुनावणी होण्यापूर्वीच ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. त्यात मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, नाशिक महापालिकांसह अनेक जिल्हा परिषदा आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश आहे. म्हणजे राज्यातील 92 नगरपालिकांमधील ओबीसी आरक्षण तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांबाबतची ही सुनावणी आहे. या प्रकरणावर 20 सप्टेंबर रोजीच सुनावणी होणाीर होती. पण त्यावेळी ही सुनावणी होऊ शकली नाही. आता तर थेट या प्रकरणावर दिवाळीनंतर सुनावणी होणार आहे. मुंबई-पुण्यासह राज्यभरातील एकूण ११ महापालिकांची मुदत गेल्या वर्षी १५ मार्चलाच संपली. तसंच पाच महापालिकांची मुदत संपून दोन वर्षांहून अधिक काळ झाला आहे. राज्यातील महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहे. या शिवाय दोन डझनहून अधिक जिल्हापरिषदांचा कारभार सध्या प्रशासकांच्या हाती आहे. ऑगस्ट 2022 पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संपूर्ण प्रकरणाची उत्सुकता महाराष्ट्राला आहे. या एका याचिकेवर 23 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा आणि 207 नगरपालिका, पंचायत समित्यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. याव्यतिरिक्त 92 नगरपरिषदांमधल्या ओबीसी राजकीय आरक्षणाचाही मुद्दा अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्या ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची आहे.

नामनिर्देशनपत्रासोबत जोडावी लागणारी कागदपत्रे-:

1.विहित नमुन्यातील अर्ज- उमेदवाराच्या Online भरलेल्या form ची प्रत : आवश्यक त्या सर्व ठिकाणी स्वाक्षरीसह.
2.मत्ता व दायित्व घोषणापत्र (विहीत नमुन्यातील.)
3.दिनांक १२/०९/२००१ नंतरच्या ह्यात अपत्यांची संख्या दोनपेक्षा अधिक नसल्याबाबतचे उमेदवाराचे स्वघोषणापत्र.
4.ओळखपत्र - आधारकार्ड, पॅनकार्ड, आणि मतदान कार्ड इत्यादी
5.किमान सातवी उत्तीर्ण असावा. (1 जानेवारी 1995 रोजी किंवा त्यानंतर जन्मल्यास 7 वी पास अनिवार्य)
6.ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत उमेदवाराचे नाव ज्या पानावर आहे, त्या पानाची सत्यप्रत. किंवा मतदार यादीत ज्या पानांवर उमेदवाराचे नाव आहे त्या पानाची झेराक्स प्रत
7.अनामत रक्कम पावती : राखीव प्रवर्ग :- १०० रु. व सर्वसाधारण उमेदवारासाठी :- ५०० रु.
8.राष्ट्रीयकृत बँकेत निवडणुकीसाठी नवीन बँक उघडून त्या खात्याची पासबुकची छायाप्रत.
9.गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेबाबतचे विहीत नमुन्यातील प्रमाणपत्र.
10.राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी जात वैधता प्रमाणपत्र प्रत./प्रत नसल्यास जात प्रमाणपत्र समितीकडे सादर केलेल्या प्रस्तावाची पोहोच.
11.सदर पोहोचसोबत जात वैधता प्रमाणपत्र निवडून आल्यानंतर १२ महिन्यांच्या आत सादर करण्याचे हमीपत्र.
12.दैनिक खर्च व एकूण केलेला निवडणूक खर्च विहीत मुदतीत सादर करण्याबाबतचे हमीपत्र.
13. उमेदवार २१ वर्षे पूर्ण होत असल्याबाबतचा पुरावा.
14.ग्रामपंचायतकडून उमेदवारांनी खालील प्रमाणपत्रे घेऊन अर्जासोबत जोडावीत- अ)ग्रामपंचायत बे-बाकी/थकबाकीदार नसल्याबाबतचे प्रमाणपत्र. ब)ग्रामपंचायतीचा ठेकेदार नसल्याचे प्रमाणपत्र. क)शौचालय असल्याचे प्रमाणपत्र. (शौचालय वापरत असल्याबाबत विशेष ग्रामसभेतील मंजूर ठरावाची प्रत. अपवादात्मक परिस्थितीत विशेष ग्रामसभा आयोजीत होऊ शकली नाही तर सहाय्यक गटविकास अधिकारी यांजकडील ग्रामसेवकाच्या शिफारसीवरून देण्यात आलेले शौचालय वापराबाबतचे प्रमाणपत्र)

अधिक माहितीसाठी- पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

=============================
"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तकाच्या प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी-

पुस्तक किंमत-1000/-रु.
प्रकाशनपूर्व सवलतीची किंमत-750/-रु.
=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 

  

Friday 8 September 2023

NCP - अजित पवारांना पाठींबा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या 31 आमदारांच्या विरोधात शरद पवार गटाकडून अपात्रतेची याचिका

राष्ट्रवादीतील फुटीवर शिक्कामोर्तब; अजितदादा गटाकडे 39 तर शरद पवार गटाकडे 13 आमदार असल्याचे स्पष्ट


अजित पवारांना पाठींबा देणाऱ्या आमदारांची आमदारकी रद्द करण्यासाठी शरद पवार गटाकडून याचिका दाखल करण्यात आलेली आहे. राष्ट्रवादी पक्षातील कायदेशीररीत्या संघर्ष वाढीस लागला असून खरा पक्ष कोणाचा याबाबत दोन्ही गटांकडून लढाई सुरु आहे. राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी पक्षात फुट पडलेली नसून पक्ष एकसंध असल्याचे वारंवार स्पष्ट करून वेगळा विचार केलेले सत्तेत सहभागी झालेत त्यांच्या विरुद्ध कारवाई पक्षाकडून केली आहे असे सांगितले होते मात्र फुटीर आमदारांच्या निश्चित संख्येबाबत दोन्ही गटाकडून मौन बाळगले होते. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी पक्षातील संघर्ष सुरु असून अजित पवार गटाने केलेले दावे शरद पवार गटाकडून प्रतिउत्तरादाखल फेटाळून लावले आहेत. तर वारंवार ज्या आमदारांनी बैठकांकडे पाठ फिरवली आहे त्यांच्या विरोधात अपात्रतेची कारवाईची बडगा शरद पवार गटाकडून उगारला आहे. 9 मंत्र्यासोबत 31 आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली असून यामध्ये विधानपरिषदेचे 4 आमदारांच्या नावांचा समावेश असल्याची माहिती समोर आलेली आहे.
        राष्ट्रवादी पक्षाचे विधानपरिषदेत 9 सदस्य असून त्यापैकी 4 आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली आहे. तर विधानसभेत राष्ट्रवादी पक्षाचे 53 सदस्य असून 9 मंत्र्यांसोबत 27 आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली आहे. शरद पवार गटाकडे 13 आमदार असल्याचे स्पष्ट झाले असून दोन्ही गटाकडे दावा करणारे 5 आमदारांच्या विरोधात शरद पवार गटाकडून अपात्रतेची कारवाई करण्यात आलेली नाही. गेल्या काही दिवसांपुर्वी अजित पवार यांच्यासह पक्षातील ८ नेत्यांनी राज्यातील शिवसेना- भाजप सरकारला पाठिंबा दिला आणि मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये फुट पडली. पक्षात दोन गट निर्माण झाले. शरद पवारांनी आपली भुमिका अजित पवारांच्या विरोधी असल्याचे जाहीर केले होते. आता दोन महिन्यानंतर यासंदर्भातील उत्तर निवडणूक आयोगासमोर शरद पवार गटाने सादर केले आहे.शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाने निवडणूक आयोगाकडे दिलेल्या उत्तरामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट स्पष्ट झाली आहे. 
      शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह व पक्षाचं नाव जाणार या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. जयंत पाटील यांना देखील अजित पवार गटाकडून ऑफर होती मात्र त्यांनी शरद पवारांना साथ देण्याची भूमिका कायम ठेवली असून योग्य वेळ आल्यावर अशा शब्दावर अजित पवार गटाला त्यांनी खिळवून ठेवले असल्याची देखील चर्चा झडत आहे. ईडीच्या कारवाईला घाबरत नसून कोणत्याही परीस्थितीला सामोरे जाण्याची तयारी असल्याचे जयंत पाटील हे निकटवर्तीयांना स्पष्ट करीत असल्याने त्यांच्या विषयी पक्षात वेगवेगळी मतेमतांतर व्यक्त केली जात आहेत. शरद पवार यांनी अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या ४० आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी याचिका दाखल केल्याने अजितदादांसह त्यांच्या सहकारी आमदारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होताना निवडणूक आयोगात याचिका दाखल केली होती. यावेळी त्यांनी याचिकेत आपणच पक्षाचे प्रमुख आहोत. अजित पवार गटाने याबाबतचे प्रतित्रापत्रही निवडणूक आयोगात दाखल केले होते. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने राष्ट्रवादी काँग्रेसबाबत अजित पवार गटाकडून करण्यात आलेले दावे फेटाळून लावले आहेत.  

राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार गटातील विद्यमान आमदार

1

48 – काटोल

अनिल देशमुख

2

100 – घनसावंगी

राजेशभैय्या टोपे

3

129 – विक्रमगड

भुसारा सुनील चंद्रकांत

4

149 – मुंब्रा-कळवा

आव्हाड जितेंद्र सतीश

5

198 – शिरुर

अशोक रावसाहेब पवार

6

223 –राहुरी

प्राजक्त प्रसादराव तनपुरे

7

227 – कर्जत जामखेड 

रोहित पवार

8

230 – बीड

संदीप रवींद्र क्षीरसागर

9

259 – कराड उत्तर

बाळासाहेब उर्फ ​​शामराव पाटील

10

283 – इस्लामपूर

जयंत राजाराम पाटील

11

284 – शिराळा

मानसिंग फत्तेसिंगराव नाईक

12

287 – तासगाव

सुमन पाटील

महायुती सरकारमध्ये सहभागी राष्ट्रवादीतील मंत्री

क्र.

मतदारसंघ

विद्यमान आमदार

1

201 – बारामती 

अजित पवार

2

119 – येवला

छगन भुजबळ

3

196 – आंबेगाव

दिलीप वळसे पाटील

4

273 – कागल

हसन मुश्रीफ

5

233 – परळी

धनंजय मुंडे

6

237 – उदगीर

संजय बनसोडे

7

15 – अमळनेर

अनिल पाटील

8

69 – अहेरी

धरमरावबाबा आत्राम

9

193 – श्रीवर्धन

आदिती सुनील तटकरे

राष्ट्रवादी पक्षाचे अजितदादा गटातील विद्यमान आमदार

10

24 – सिंदखेडराजा

डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे

11

60 – तुमसर

कारेमोरे राजू माणिकराव

12

63 – अर्जुनी मोरगाव

चंद्रिकापुरे मनोहर गोवर्धन

13

81 – पुसद

नाईक इंद्रनील मनोहर

14

92 – बसमत

चंद्रकांत उर्फ ​​राजुभैय्या नवघरे

15

117 – कळवण

नितीन अर्जुन (ए.टी.) पवार

16

120 – सिन्नर 

अ‍ॅड. कोकाटे माणिकराव

17

121 – निफाड

बनकर दिलीपराव शंकरराव

18

122 – दिंडोरी

झिरवाळ नरहरी सीताराम

19

126 – देओली

सरोज बाबुलाल अहिरे

20

135 – शहापूर

दौलत भिका दरोडा

21

195 – जुन्नर

अतुल वल्लभ बेनके

22

197 – खेड आळंदी

दिलीप दत्तात्रय मोहिते

23

200 – इंदापूर

दत्तात्रय विठोबा भरणे

24

204 – मावळ

सुनील शंकरराव शेळके

25

206 – पिपरी

अण्णा दादू बनसोडे

26

208 – वडगाव शेरी

सुनील विजय टिंगरे

27

213 – हडपसर

चेतन विठ्ठल तुपे

28

216 – अकोले

डॉ.किरण यमाजी लहामते

29

219 – कोपरगाव

आशुतोष अशोकराव काळे

30

224 – पारनेर

निलेश ज्ञानदेव लंके

31

225 – अहमदनगर शहर

संग्राम अरुणकाका जगताप

32

229 – माजलगाव

प्रकाश (दादा) सुंदरराव सोळंके

33

231 – आष्टी

आजबे बाळासाहेब भाऊसाहेब

34

236 – अहमदपूर

बाबासाहेब मोहनराव पाटील

35

245 – माढा

शिंदे बबनराव विठ्ठलराव

36

247 – मोहोळ

माने यशवंत विठ्ठल

37

255 – फलटण

दिपक प्रल्हाद चव्हाण

38

256 – वाई

मकरंद लक्ष्मणराव जाधव (पाटील)

39

265 – चिपळूण

शेखर गोविंदराव निकम

40

271 – चंदगड

राजेश नरसिंगराव पाटील

भूमिका अस्पष्ट

1

172 – अनुशक्ती नगर

नवाब मलिक

राष्ट्रवादी पक्षाचे विधानपरिषदेत 9 सदस्य खालीलप्रमाणे- 

राष्ट्रवादी पक्षाचे विद्यमान विधानपरिषद आमदार

क्र.

विद्यमान विधानपरिषद सदस्य

1

रामराजे नाईक निंबाळकर

2

अमोल मिटकरी

3

अरुण लाड (पुणे)

4

एकनाथ खडसे

5

शशिकांत शिंदे

6

बाबाजानी दुराणी

7

अनिकेत तटकरे (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग)

8

सतिश चव्हाण (औरंगाबाद)

9

विक्रम काळे (औरंगाबाद)


Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

=============================
"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तकाच्या प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी-

पुस्तक किंमत-1000/-रु.
प्रकाशनपूर्व सवलतीची किंमत-750/-रु.
=============================
"महाराष्ट्रातील राजकारण"