Friday, 8 September 2023

NCP - अजित पवारांना पाठींबा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या 31 आमदारांच्या विरोधात शरद पवार गटाकडून अपात्रतेची याचिका

राष्ट्रवादीतील फुटीवर शिक्कामोर्तब; अजितदादा गटाकडे 39 तर शरद पवार गटाकडे 13 आमदार असल्याचे स्पष्ट


अजित पवारांना पाठींबा देणाऱ्या आमदारांची आमदारकी रद्द करण्यासाठी शरद पवार गटाकडून याचिका दाखल करण्यात आलेली आहे. राष्ट्रवादी पक्षातील कायदेशीररीत्या संघर्ष वाढीस लागला असून खरा पक्ष कोणाचा याबाबत दोन्ही गटांकडून लढाई सुरु आहे. राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी पक्षात फुट पडलेली नसून पक्ष एकसंध असल्याचे वारंवार स्पष्ट करून वेगळा विचार केलेले सत्तेत सहभागी झालेत त्यांच्या विरुद्ध कारवाई पक्षाकडून केली आहे असे सांगितले होते मात्र फुटीर आमदारांच्या निश्चित संख्येबाबत दोन्ही गटाकडून मौन बाळगले होते. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी पक्षातील संघर्ष सुरु असून अजित पवार गटाने केलेले दावे शरद पवार गटाकडून प्रतिउत्तरादाखल फेटाळून लावले आहेत. तर वारंवार ज्या आमदारांनी बैठकांकडे पाठ फिरवली आहे त्यांच्या विरोधात अपात्रतेची कारवाईची बडगा शरद पवार गटाकडून उगारला आहे. 9 मंत्र्यासोबत 31 आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली असून यामध्ये विधानपरिषदेचे 4 आमदारांच्या नावांचा समावेश असल्याची माहिती समोर आलेली आहे.
        राष्ट्रवादी पक्षाचे विधानपरिषदेत 9 सदस्य असून त्यापैकी 4 आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली आहे. तर विधानसभेत राष्ट्रवादी पक्षाचे 53 सदस्य असून 9 मंत्र्यांसोबत 27 आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली आहे. शरद पवार गटाकडे 13 आमदार असल्याचे स्पष्ट झाले असून दोन्ही गटाकडे दावा करणारे 5 आमदारांच्या विरोधात शरद पवार गटाकडून अपात्रतेची कारवाई करण्यात आलेली नाही. गेल्या काही दिवसांपुर्वी अजित पवार यांच्यासह पक्षातील ८ नेत्यांनी राज्यातील शिवसेना- भाजप सरकारला पाठिंबा दिला आणि मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये फुट पडली. पक्षात दोन गट निर्माण झाले. शरद पवारांनी आपली भुमिका अजित पवारांच्या विरोधी असल्याचे जाहीर केले होते. आता दोन महिन्यानंतर यासंदर्भातील उत्तर निवडणूक आयोगासमोर शरद पवार गटाने सादर केले आहे.शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाने निवडणूक आयोगाकडे दिलेल्या उत्तरामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट स्पष्ट झाली आहे. 
      शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह व पक्षाचं नाव जाणार या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. जयंत पाटील यांना देखील अजित पवार गटाकडून ऑफर होती मात्र त्यांनी शरद पवारांना साथ देण्याची भूमिका कायम ठेवली असून योग्य वेळ आल्यावर अशा शब्दावर अजित पवार गटाला त्यांनी खिळवून ठेवले असल्याची देखील चर्चा झडत आहे. ईडीच्या कारवाईला घाबरत नसून कोणत्याही परीस्थितीला सामोरे जाण्याची तयारी असल्याचे जयंत पाटील हे निकटवर्तीयांना स्पष्ट करीत असल्याने त्यांच्या विषयी पक्षात वेगवेगळी मतेमतांतर व्यक्त केली जात आहेत. शरद पवार यांनी अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या ४० आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी याचिका दाखल केल्याने अजितदादांसह त्यांच्या सहकारी आमदारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होताना निवडणूक आयोगात याचिका दाखल केली होती. यावेळी त्यांनी याचिकेत आपणच पक्षाचे प्रमुख आहोत. अजित पवार गटाने याबाबतचे प्रतित्रापत्रही निवडणूक आयोगात दाखल केले होते. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने राष्ट्रवादी काँग्रेसबाबत अजित पवार गटाकडून करण्यात आलेले दावे फेटाळून लावले आहेत.  

राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार गटातील विद्यमान आमदार

1

48 – काटोल

अनिल देशमुख

2

100 – घनसावंगी

राजेशभैय्या टोपे

3

129 – विक्रमगड

भुसारा सुनील चंद्रकांत

4

149 – मुंब्रा-कळवा

आव्हाड जितेंद्र सतीश

5

198 – शिरुर

अशोक रावसाहेब पवार

6

223 –राहुरी

प्राजक्त प्रसादराव तनपुरे

7

227 – कर्जत जामखेड 

रोहित पवार

8

230 – बीड

संदीप रवींद्र क्षीरसागर

9

259 – कराड उत्तर

बाळासाहेब उर्फ ​​शामराव पाटील

10

283 – इस्लामपूर

जयंत राजाराम पाटील

11

284 – शिराळा

मानसिंग फत्तेसिंगराव नाईक

12

287 – तासगाव

सुमन पाटील

महायुती सरकारमध्ये सहभागी राष्ट्रवादीतील मंत्री

क्र.

मतदारसंघ

विद्यमान आमदार

1

201 – बारामती 

अजित पवार

2

119 – येवला

छगन भुजबळ

3

196 – आंबेगाव

दिलीप वळसे पाटील

4

273 – कागल

हसन मुश्रीफ

5

233 – परळी

धनंजय मुंडे

6

237 – उदगीर

संजय बनसोडे

7

15 – अमळनेर

अनिल पाटील

8

69 – अहेरी

धरमरावबाबा आत्राम

9

193 – श्रीवर्धन

आदिती सुनील तटकरे

राष्ट्रवादी पक्षाचे अजितदादा गटातील विद्यमान आमदार

10

24 – सिंदखेडराजा

डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे

11

60 – तुमसर

कारेमोरे राजू माणिकराव

12

63 – अर्जुनी मोरगाव

चंद्रिकापुरे मनोहर गोवर्धन

13

81 – पुसद

नाईक इंद्रनील मनोहर

14

92 – बसमत

चंद्रकांत उर्फ ​​राजुभैय्या नवघरे

15

117 – कळवण

नितीन अर्जुन (ए.टी.) पवार

16

120 – सिन्नर 

अ‍ॅड. कोकाटे माणिकराव

17

121 – निफाड

बनकर दिलीपराव शंकरराव

18

122 – दिंडोरी

झिरवाळ नरहरी सीताराम

19

126 – देओली

सरोज बाबुलाल अहिरे

20

135 – शहापूर

दौलत भिका दरोडा

21

195 – जुन्नर

अतुल वल्लभ बेनके

22

197 – खेड आळंदी

दिलीप दत्तात्रय मोहिते

23

200 – इंदापूर

दत्तात्रय विठोबा भरणे

24

204 – मावळ

सुनील शंकरराव शेळके

25

206 – पिपरी

अण्णा दादू बनसोडे

26

208 – वडगाव शेरी

सुनील विजय टिंगरे

27

213 – हडपसर

चेतन विठ्ठल तुपे

28

216 – अकोले

डॉ.किरण यमाजी लहामते

29

219 – कोपरगाव

आशुतोष अशोकराव काळे

30

224 – पारनेर

निलेश ज्ञानदेव लंके

31

225 – अहमदनगर शहर

संग्राम अरुणकाका जगताप

32

229 – माजलगाव

प्रकाश (दादा) सुंदरराव सोळंके

33

231 – आष्टी

आजबे बाळासाहेब भाऊसाहेब

34

236 – अहमदपूर

बाबासाहेब मोहनराव पाटील

35

245 – माढा

शिंदे बबनराव विठ्ठलराव

36

247 – मोहोळ

माने यशवंत विठ्ठल

37

255 – फलटण

दिपक प्रल्हाद चव्हाण

38

256 – वाई

मकरंद लक्ष्मणराव जाधव (पाटील)

39

265 – चिपळूण

शेखर गोविंदराव निकम

40

271 – चंदगड

राजेश नरसिंगराव पाटील

भूमिका अस्पष्ट

1

172 – अनुशक्ती नगर

नवाब मलिक

राष्ट्रवादी पक्षाचे विधानपरिषदेत 9 सदस्य खालीलप्रमाणे- 

राष्ट्रवादी पक्षाचे विद्यमान विधानपरिषद आमदार

क्र.

विद्यमान विधानपरिषद सदस्य

1

रामराजे नाईक निंबाळकर

2

अमोल मिटकरी

3

अरुण लाड (पुणे)

4

एकनाथ खडसे

5

शशिकांत शिंदे

6

बाबाजानी दुराणी

7

अनिकेत तटकरे (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग)

8

सतिश चव्हाण (औरंगाबाद)

9

विक्रम काळे (औरंगाबाद)


Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

=============================
"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तकाच्या प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी-

पुस्तक किंमत-1000/-रु.
प्रकाशनपूर्व सवलतीची किंमत-750/-रु.
=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.