Tuesday 3 October 2023

Gram Panchayat Elections पुणे जिल्ह्यातील 231 ग्रामपंचायतींसह राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींसाठी 5 नोव्हेंबरला मतदान

पुणे जिल्ह्यातील 157 ग्रामपंचायतींच्या रिक्त 233 जागांवर पोटनिवडणूक


पुणे जिल्ह्यातील 231 ग्रामपंचायतींसह राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींसाठी तसेच 2 हजार 950 सदस्यपदाच्या; तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी 5 नोव्हेंबरला मतदान घेण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील 157 ग्रामपंचायचतींच्या रिक्त 233 जागांवर देखील पोटनिवडणूक होणार आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रतीक्षा केली जात असताना राज्यातील किमान ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर करून राजकीय पक्षांना दिलासा दिला आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केला कार्यक्रम जाहीर केला असून संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.
     ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे १६ ते २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी २३ ऑक्टोबर रोजी होईल. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. राज्यभरातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि २ हजार ९५० सदस्यपदाच्या; तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी ५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज केली. 
       संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. नामनिर्देशनपत्रे १६ ते २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी २३ ऑक्टोबर रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे २५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. मात्र गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. तेथे ७ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. अनेक जिल्ह्यांतील ग्रामपंचायतीची मुदत संपली आहे. तर काही ठिकाणी पोटनिवडणूक प्रस्तावित आहे. त्यामुळे राज्यात दिवाळीआधीच राजकीय फटाके फुटणार आहेत. जानेवारी ते डिसेंबर दरम्यान सदस्यांची मुदत संपणाऱ्या आणि जिल्ह्यात नव्याने स्थापन झालेल्या सुमारे 231 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक आणि 157 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका होत असलेल्या 388 ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक भोर, खेड तालुक्यातील प्रत्येकी 46 ग्रामपंचायती आहेत. त्या पाठोपाठ आंबेगाव, जुन्नर, मुळशी तालुक्यातील ग्रामपंचायतींची संख्या आहे. आंबेगाव तालुक्यात 44, जुन्नरमध्ये 41, बारामतीमधील 32 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. दौंड, शिरूर मधील प्रत्येकी 16, इंदापूर आणि हवेलीतील प्रत्येकी 14, वेल्हे आणि मावळमधील प्रत्येक 31, पुरंदरमधील 22, मुळशीतील 37 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.

तालुकानिहाय ग्रामपंचायती (कंसात पोटनिवडणूक)

आंबेगाव 30 (14), बारामती 32, भोर 27 (19), दौंड 11 (5), हवेली 4 (10), इंदापूर 6 (8), जुन्नर 26 (15), खेड 25 (21), मावळ 20 (11), मुळशी 23 (14), पुरंदर 15 (7), शिरूर 8 (8) आणि वेल्हे 6 (25) अशा एकूण 231 (157) ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

जुन्नर तालुक्‍यातील 26 ग्रामपंचायतींच्या सरपंच तसेच सदस्यपदासाठी निवडणूक

26 ग्रामपंचायतींमध्ये सांगणोरे, आंबेगव्हाण, डुंबरवाडी, वडगांव आनंद, पिंपळवंडी, निमगिरी, खटकाळे, खामगांव, धालेवाडी तर्फे मिन्हेर, राळेगण, सुकाळवेढे, पाडळी, बुचकेवाडी, पारुंडे, कांदळी, नारायणगांव, शिरोली तर्फे आळे, गुंजाळवाडी, बांगरवाडी, गुळुंचवाडी, बेल्हे, रानमळा, पिंपरी कावळ, उंब्रज नं. 1, पांगरी तर्फे मढ, तांबेवाडी या गावांचा समावेश आहे. जुन्नरला या 26 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी निवडणुका होत आहेत. दरम्यान या 26 ग्रामपंचायतींसोबत वानेवाडी येथे सरपंच आणि सदस्य पदासाठी पोट निवडणूक जाहीर झाली आहे. तर काले, भिवाडे बुद्रुक, अहिनवेवाडी, खिल्लारवाडी, मढ, हातविज, उंडेखडक, अंजनावळे, माणिकडोह, खानापूर, पिंपळगांव तर्फे नारायणगाव, आंबोली, उच्छिल व सोमतवाडी या 15 गावांमध्ये सदस्यांच्या रिक्त पदांसाठी निवडणूका होत आहे.

दौंडमधील ११ ग्रामपंचायतींच्या निवडणुका

दौंड तालुक्यातील केडगाव, कुरकुंभ व पारगाव या मोठ्या ग्रामपंचायतींसह एकूण अकरा ग्रामपंचायतींसाठीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. दौंड तालुक्यातील केडगाव, कुरकुंभ, पारगाव, मलठण, खोपोडी, वाटलूज, पांढरेवाडी, वाखारी, पानवली, वडगाव बांडे व नायगाव या अकरा ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे. 

इंदापुरात १४ गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक

इंदापूर तालुक्यातील ६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुक होत आहे. इंदापूर तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या कार्यकारी मंडळाचे मुदत जुलै महिन्यात संपली होती. तेव्हापासून येथे प्रशासकामार्फत कामकाज सुरु होते. या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीबरोबरच इतर आठ ग्रामपंचायतींमध्येही नऊ सदस्यांची पदे रिक्त आहेत. या पदांसाठी ही पोटनिवडणूक होणार आहे. सार्वत्रिक निवडणूक असलेली गावे पुढीलप्रमाणे- बावडा, लाकडी, काझड, शिंदेवाडी, शेळगाव, वकील वस्ती. पोटनिवडणूक कार्यक्रम असलेल्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे व कंसात जागा- भिगवण (१), कौठळी (१), उद्धट (१), कचरवाडी (१), चांडगाव (१), व्याहाळी (१), सराफवाडी (१), पिठेवाडी (२) या गावांचा समावेश आहे.

भोरमध्ये ४६ ग्रामपंचायतींसाठी निवडणुक

भोर तालुक्यातील १५६ ग्रामपंचायतींपैकी ४६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, त्यामध्ये २७ सार्वत्रिक ग्रामपंचायतींचा आणि १९ ग्रामपंचायतींमधील पोटनिवडणुकींचा समावेश आहे. सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती- शिळींब, आशिंपी, वारवंड, शिरगाव, पऱ्हर खुर्द, पऱ्हर बुद्रुक, दापकेघर, रायरी, साळव, शिरवली हि.मा., कोंढरी, हिर्डोशी, टिटेघर, वडतुंबी, नांदगाव, आंबवडे, वरोडी डायमुख, वरोडी बुद्रुक, पळसोशी, वरोडी खुर्द, नाटंबी, करंजे, महुडे खुर्द, जयतपाड, कुरुंजी, कांबरे बुद्रुक आणि माळेगाव. तसेच पोटनिवडूक होणाऱ्या ग्रामपंचायती- आळंदे, राजापूर, उत्रौली, कुंबळे, मळे, कोर्ले, म्हाकोशी, कासुर्डी गुमा, तेलवडी, सांगवी हि.मा., भूतोंडे, वाढाणे, आंबेघर, बसरापूर, करंदी खुर्द, कोळवडी, सांगवी भिडे, माझगाव आणि शिरवलीतर्फे भोर या गावांचा समावेश आहे.

बारामतीत ३२ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका

बारामती तालुक्यातील जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नव्याने स्थापित व सन २०२२ मध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे निवडणुका न होऊ शकलेल्या ३२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. शिर्सुफळ, साबळेवाडी, गाडीखेल, वंजारवाडी, सायंबाचीवाडी, सुपे, दंडवाडी, कुतवळवाडी, भोंडवेवाडी, चांदगुडेवाडी, पानसरेवाडी, काळखैरेवाडी, मेडद, कऱ्हावागज, पवईमाळ, धुमाळवाडी, आंबी बुद्रुक, कोऱ्हाळे खुर्द, पारवाडी, करंजेपूल, करंजे, मगरवाडी, चौधरवाडी, निंबोडी, मुढाळे, उंडवडी क. प., जराडवाडी, काटेवाडी, गुणवडी, डोर्लेवाडी, म्हसोबानगर, मानाप्पावस्ती या ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे.

मुळशीत २३ ठिकाणी ग्रामपंचायत निवडणूक

गेल्या दहा महिन्यांपासून प्रशासक असलेल्या मुळशी तालुक्यातील तेवीस ग्रामपंचायतीसाठी निवडणुक होत आहे. त्याचप्रमाणे चौदा ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकी देखील होणार आहेत. मुळशी तालुक्यातील 92 पैकी 23 ग्रामपंचायतीच्या लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्याने याठिकाणी प्रशासक आहेत. त्यातील जातेडे, डावजे, शेडाणी, वांद्रे, वडगाव, भांबर्डे, आंबवणे, भादस, खुबवली, कोंढावळे, वातुंडे, वेगरे या बारा ग्रामपंचायतींच्या लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ जानेवारी महिन्यात संपला. परंतु, निवडणूक कार्यक्रमच न लागल्याने याठिकाणी गेली दहा महिन्यांपासून प्रशासक कार्यरत आहेत. बेलावडे, धामणओव्होळ, जामगाव, मुगाव या चार ग्रामपंचायतींचा कार्यकाल फेब्रुवारीमध्ये संपला. तर मे महिन्यात टेमघर, ताम्हिणी, वळणे, माले, संभवे, वारक या सहा ग्रामपंचायतींचा कार्यकाल संपुष्टात आला. आणि मुळशी खुर्द ग्रामपंचायतीचा कार्यकालही ऑगस्टमध्ये संपला. या सर्व ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्याचप्रमाणे पाथरशेत, भोईणी, मोसे खुर्द, कोळावडे, माळेगाव, कुंभेरी, वांजळे, पौड, भोडे, लव्हार्डे, कोळवण, भरे, आंबेगाव, कासारआंबोली या चौदा ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका होणार आहेत.

आंबेगावात ३० ग्रामपंचायतींसाठी निवडणुक

आंबेगाव तालुक्यात मुदत संपणाऱ्या ३० ग्रामपंचायतींसाठी व १४ ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांवरील पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. आंबेगाव तालुक्यातील लोणी, फलादे, कुशिरे बुद्रुक, कोलतावडे, कानसे, गोहे बुद्रुक, तळेकरवाडी, चांडोली खुर्द, अवसरी बुद्रुक, निरगुडसर, पहाडदरा, पारगावतर्फे अवसरी बुद्रुक, जारकरवाडी, चास, ठाकरवाडी, वाळुंजनगर, पाटण, टाव्हरेवाडी, चपटेवाडी, सुपेधर, फुलवडे, डिंभे बुद्रुक, टाकेवाडी, तांबडेमळा, पिंपरगणे, म्हाळुंगेतर्फे घोडा, मांदळेवाडी, नांदूर, बोरघर, जाधववाडी या जानेवारी ते डिसेंबर २०२३ या कालावधीत ३० मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती आहे. तर, रिक्त जागांच्या २० सदस्यपदासाठी पंचाळे बुद्रुक, आहुपे, चिखली, पोखरी, गोहे खुर्द, भागडी, असाणे, आंबेदरा, राजेवाडी, खडकवाडी, गंगापूर बुद्रुक, धोंडमाळ, शिंदेवाडी, साल या १३ ग्रामपंचायती आहेत. लोकनियुक्त सरपंचपदासाठी ग्रामपंचायत पोंदेवाडी आहे, अशा एकूण १४ ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे.

मावळ तालुक्यातील 29 ग्रामपंचायतींसाठी निवडणुक

मावळ तालुक्यातील 19 गावांच्या सार्वत्रिक आणि 10 गावांच्या पोटनिवडणूकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीरमावळ तालुक्यातील वाकसई ही ग्रामपंचायत वगळून मावळ तालुक्यातील एकूण 29 गावांच्या सार्वत्रिक निवडणूका व पोटनिवडणूकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मावळ तालुक्यातील 29 गावांपैकी सार्वत्रिक निवडणूका असलेली गावे 19 आहेत यामध्ये जांबवडे, सदुंबरे, सुदवडी, साळुंब्रे, बेबडओहोळ, लोहगड, शिळींब, कोंडीवडे (आं.मा.), कल्हाट, आंबळे, भाजे, सांगिसे, मुंढावरे, उदेवाडी, मळवंडी ढोरे, दिवड, ओवळे, डोणे, आढले बुद्रुक या गावांचा समावेश आहे. पोटनिवडणूका असलेली गावे ही 10 आहेत. पोटनिवडणूका असलेली गावांमध्ये चिखलसे, शिवणे, नवलाख उंब्रे, कुसगाव बुद्रुक, पुसाणे, शिरगाव, दारुंब्रे, तुंग, खांडशी, कान्हे या गावांचा समावेश आहे. मावळ तालुक्यातील या गावांच्या सार्वत्रिक निवडणूका आणि पोटनिवडणूकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

पुरंदर तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका

पुरंदर तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक, तर ९ ग्रामपंचायतींच्या १३ जागांसाठी पोट निवडणुका जाहीर झाल्या आहेत. पुरंदर तालुक्यातील गुळुंचे, कर्नलवाडी, वाल्हा, बागदरवाडी, आडाचीवाडी, सुकलवाडी, वनपुरी, उदाचीवाडी, कोथळे, रानमळा, भोसलेवाडी, वीर, माळशिरस, राजुरी व एखतपूर-मुंजवडी या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निडवणुका आणि ओबीसी आरक्षणावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर होणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. राज्यात काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन वर्षांपासून झाल्याच नाहीत. देशातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकाही रखडल्या आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रशासक नेमण्यात आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ओबीसी आरक्षणावर येत्या 28 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे गेल्या दीड वर्षात सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर एकदाही सुनावणी झाली नाही. आताही सुनावणी होण्यापूर्वीच ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. त्यात मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, नाशिक महापालिकांसह अनेक जिल्हा परिषदा आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश आहे. म्हणजे राज्यातील 92 नगरपालिकांमधील ओबीसी आरक्षण तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांबाबतची ही सुनावणी आहे. या प्रकरणावर 20 सप्टेंबर रोजीच सुनावणी होणाीर होती. पण त्यावेळी ही सुनावणी होऊ शकली नाही. आता तर थेट या प्रकरणावर दिवाळीनंतर सुनावणी होणार आहे. मुंबई-पुण्यासह राज्यभरातील एकूण ११ महापालिकांची मुदत गेल्या वर्षी १५ मार्चलाच संपली. तसंच पाच महापालिकांची मुदत संपून दोन वर्षांहून अधिक काळ झाला आहे. राज्यातील महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहे. या शिवाय दोन डझनहून अधिक जिल्हापरिषदांचा कारभार सध्या प्रशासकांच्या हाती आहे. ऑगस्ट 2022 पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संपूर्ण प्रकरणाची उत्सुकता महाराष्ट्राला आहे. या एका याचिकेवर 23 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा आणि 207 नगरपालिका, पंचायत समित्यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. याव्यतिरिक्त 92 नगरपरिषदांमधल्या ओबीसी राजकीय आरक्षणाचाही मुद्दा अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्या ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची आहे.

नामनिर्देशनपत्रासोबत जोडावी लागणारी कागदपत्रे-:

1.विहित नमुन्यातील अर्ज- उमेदवाराच्या Online भरलेल्या form ची प्रत : आवश्यक त्या सर्व ठिकाणी स्वाक्षरीसह.
2.मत्ता व दायित्व घोषणापत्र (विहीत नमुन्यातील.)
3.दिनांक १२/०९/२००१ नंतरच्या ह्यात अपत्यांची संख्या दोनपेक्षा अधिक नसल्याबाबतचे उमेदवाराचे स्वघोषणापत्र.
4.ओळखपत्र - आधारकार्ड, पॅनकार्ड, आणि मतदान कार्ड इत्यादी
5.किमान सातवी उत्तीर्ण असावा. (1 जानेवारी 1995 रोजी किंवा त्यानंतर जन्मल्यास 7 वी पास अनिवार्य)
6.ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत उमेदवाराचे नाव ज्या पानावर आहे, त्या पानाची सत्यप्रत. किंवा मतदार यादीत ज्या पानांवर उमेदवाराचे नाव आहे त्या पानाची झेराक्स प्रत
7.अनामत रक्कम पावती : राखीव प्रवर्ग :- १०० रु. व सर्वसाधारण उमेदवारासाठी :- ५०० रु.
8.राष्ट्रीयकृत बँकेत निवडणुकीसाठी नवीन बँक उघडून त्या खात्याची पासबुकची छायाप्रत.
9.गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेबाबतचे विहीत नमुन्यातील प्रमाणपत्र.
10.राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी जात वैधता प्रमाणपत्र प्रत./प्रत नसल्यास जात प्रमाणपत्र समितीकडे सादर केलेल्या प्रस्तावाची पोहोच.
11.सदर पोहोचसोबत जात वैधता प्रमाणपत्र निवडून आल्यानंतर १२ महिन्यांच्या आत सादर करण्याचे हमीपत्र.
12.दैनिक खर्च व एकूण केलेला निवडणूक खर्च विहीत मुदतीत सादर करण्याबाबतचे हमीपत्र.
13. उमेदवार २१ वर्षे पूर्ण होत असल्याबाबतचा पुरावा.
14.ग्रामपंचायतकडून उमेदवारांनी खालील प्रमाणपत्रे घेऊन अर्जासोबत जोडावीत- अ)ग्रामपंचायत बे-बाकी/थकबाकीदार नसल्याबाबतचे प्रमाणपत्र. ब)ग्रामपंचायतीचा ठेकेदार नसल्याचे प्रमाणपत्र. क)शौचालय असल्याचे प्रमाणपत्र. (शौचालय वापरत असल्याबाबत विशेष ग्रामसभेतील मंजूर ठरावाची प्रत. अपवादात्मक परिस्थितीत विशेष ग्रामसभा आयोजीत होऊ शकली नाही तर सहाय्यक गटविकास अधिकारी यांजकडील ग्रामसेवकाच्या शिफारसीवरून देण्यात आलेले शौचालय वापराबाबतचे प्रमाणपत्र)

अधिक माहितीसाठी- पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

=============================
"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तकाच्या प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी-

पुस्तक किंमत-1000/-रु.
प्रकाशनपूर्व सवलतीची किंमत-750/-रु.
=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 

  

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.