पुणे जिल्हा परिषद सदस्या जंगम यांचे जात प्रमाणपत्र रद्द
पुणे जिल्हा परिषदेतील हवेली तालुक्यातील गट क्र 35 - देहू-लोहगाव अनुसूचित जाती राखीव जागेवर निवडून आलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेसच्या श्रीमती जंगम मंगल नितीन यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र फेटाळले गेले आहे.
त्यांचा विरुद्ध शैला राजू खंडागळे यांनी तक्रार केली होती , खंडागळे यांची बाजू समिती समोर ऍड. अनिरुद्ध कांबळे यांनी मांडली.
------------------------------------------------
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
जिल्हा परिषदेचे १३ सदस्य जातपडताळणीच्या चक्रात
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत कुणबी जातीच्या प्रमाणपत्रावर निवडून आलेल्या सदस्यांना जात पडताळणीच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. यात बोगस जात प्रमाणपत्र जोडणार्या सदस्यांना थेट अपात्रतेच्या संकटाला सामोरे जावे लागण्याची भीती आहे. अशा जिल्हा परिषद सदस्यांची संख्या 13 इतकी असून पंचायत समिती सदस्यांची संख्या तब्बल 40 इतकी आहे.जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये इतर मागासवर्गीय (ओबीसी) जागेवर कुणबी जात प्रमाणपत्राच्या आधारे निवडून आलेल्या सदस्यांची संख्या मोठी आहे. मात्र कुणबी जातीचे प्रमाणपत्र सादर करून निवडून आलेल्या सदस्यांच्या जात प्रमाणपत्रावर पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते मृणाल ढोले पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच या प्रमाणपत्राच्या विरोधात विभागीय जात पडताळणी समितीकडे तक्रारी दाखल केल्या आहेत.जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत कुणबी जात प्रमाणपत्रावर निवडून आलेल्या सर्वच सदस्यांना आता विभागीय जात पडताळणीच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. त्यात ज्या सदस्यांचे प्रमाणपत्र बोगस असल्याचे आढळून येईल त्यांना थेट सदस्यपद गमवावे लागणार आहे.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.