Saturday, 5 October 2019

पुणे जिल्ह्यात ४४५ उमेदवार; सर्वांधिक अर्ज पुणे कँन्टोंन्मेंट विधानसभा मतदारसंघात

पुणे जिल्ह्यात ४४५ उमेदवार


पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांमध्ये ४४५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, सर्वांधिक उमेदवारी अर्ज पुणे कँन्टोंन्मेंट विधानसभा मतदारसंघात ८५, तर सर्वांत कमी खडकवासला मतदारसंघात नऊ अर्ज आले आहेत. अर्जांची आज (शनिवारी) छाननी होणार असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत आहे. त्यानंतर लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास २७ सप्टेंबरपासून सुरूवात झाली. पुणे शहरातील आठ, पिंपरी - चिंचवडमधील तीन आणि ग्रामीण भागातील दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये ४४५ उमेदवारांनी ५९५ अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दोन दिवसांची मुदत आहे. रविवारी सुटी असल्याने शनिवार आणि सोमवार या दोन दिवसांत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये सर्वांधिक आणि सर्वांत कमी उमेदवार पुणे शहरातील मतदारसंघांमध्ये आहेत. सर्वाधिक उमेदवार पुणे कँन्टोंन्मेंटमध्ये, तर सर्वांत कमी उमेदवार खडकवासला मतदारसंघात आहेत. वडगाव शेरी मतदारसंघात २३, शिवाजीनगरमध्ये १३, कोथरुड मतदार संघामध्ये २५, पर्वतीत १६, हडपसरमध्ये २२ आणि कसबा मतदार संघात १५ उमेदवारांनी अर्ज भरल्याची माहिती जिल्हा निवडणूक शाखेकडून देण्यात आली. पिंपरी-चिंचवड शहरातील तीन मतदार संघांपैकी चिंचवड मतदार संघात १९, पिंपरीमध्ये ३५ आणि भोसरी मतदार संघात २० उमेदवारांचे अर्ज आले आहेत. जिल्ह्यातील मतदारसंघांपैकी जुन्नरमध्ये १३, आंबेगाव १२, खेड-आळंदी १३, शिरूर दहा, दौंड २०, इंदापूर ३१, बारामती १३, पुरंदर १९, भोर १३ आणि मावळमध्ये ११ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

विधानसभा मतदारसंघनिहाय अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची नावे -

कोथरूड विधानसभा मतदारसंघ-

चंद्रकांत पाटील (भाजप), स्वप्नील दुधाने (राष्ट्रवादी), किशोर शिंदे (मनसे), दीपक नारायणराव शमदिरे (वंचित बहुजन आघाडी), अभिजित हिंदुराव मोरे (आप), सोनाली उमेश ससाणे (संभाजी ब्रिगेड)
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ-
रमेश बागवे (काँग्रेस), सुनील कांबळे ( भाजप), लक्ष्मण आरडे (वंचित बहुजन आघाडी), खेमदेव सोनावणे (आप), हिना शफिक मोमीन (एमआयएम), अमित मोरे (अपक्ष)

खडकवासला विधानसभा मतदारसंघ-

भीमराव तापकीर (भाजप), रमेश आनंदराव कोंडे (शिवसेना), सचिन दोडके (राष्ट्रवादी), तात्याबा आखाडे (वंचित बहुजन आघाडी), अरुण नानाभाऊ गायकवाड (बसपा), डॉ. सोमनाथ अर्जुन पोळ (अपक्ष), रमेश आनंदराव कोंडे (अपक्ष),बाळू हनुमंत प्रताप (अपक्ष), बलाडे दीपक बबन (अपक्ष), ऍड. राहुल भगवान बगाडे (अपक्ष)

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ-

चंद्रकांत परमेश्वर सावंत (शिवसेना), योगेश तुकाराम मुळीक (भाजप), सुनील विजय टिंगरे (राष्ट्रवादी), बापूसाहेब पाठारे (राष्ट्रवादी), गणेश बाळकृष्ण ढमाले (आप), जगदीश तुकाराम मुळीक (भाजप), डॅनियल रमेश लांडगे (एमआयएम), राजेश दत्तात्रेय बंगाळे (बसपा), विठ्ठल जयराम गुल्हाणे (बळीराजा पार्टी), प्रवीण बापूराव गायकवाड (वंचित बहुजन आघाडी), प्रसाद सुभाष कोद्रे (प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी), प्रकाश रायभान पारखे (संभाजी ब्रिगेड पार्टी), सतीश गजानन मुळीक (अपक्ष), सविता अर्जुन औटी(अपक्ष), शशिकांत धोंडिबा राऊत (अपक्ष), अग्रजीतसेन मुळीक (अपक्ष), भोसले संजय शशिकांत (अपक्ष), हनुमंत पंडागळे (अपक्ष), जितेंद्र अशोक भोसले (अपक्ष), बाळाभाऊ साधू पोटभरे (अपक्ष), दादू भाऊराव रामसिंग (अपक्ष), मोहन सोपान लोणकर (अपक्ष), विशाल बबन गोरे (अपक्ष)

हडपसर विधानसभा मतदारसंघ-

खंडू सतीश लोंढे (काँग्रेस), योगेश कुंडलिक टिळेकर (भाजप), वसंत कृष्णाजी मोरे (मनसे), गंगाधर विठ्ठल बढे (शिवसेना), चेतन विठ्ठल तुपे (राष्ट्रवादी), घनशाम आनंद हाके (वंचित बहुजन आघाडी), जाहीद इब्राहिम शेख (एमआयएम), शशिकांत अशोक गायकवाड (हिंदुस्थान जनता पार्टी), दीपक महादेव जाधव (बसपा), खंडू सतीश लोंढे (अपक्ष), राकेश हरकु वाल्मिकी (अपक्ष), गंगाधर विठ्ठल बढे (अपक्ष), घनशाम आनंद हाके (अपक्ष), अल्ताफ करीम शेख (अपक्ष), अरुण लक्ष्मण शिरसाट (अपक्ष), सुभाष काशिनाथ सरवदे (अपक्ष), अनामिका शिंदे (अपक्ष), नूरजहान चिरगुद्दीन शेख (अपक्ष), विकास राजाराम अष्टुळ (अपक्ष), अंजुम झकेरिया इनामदार (अपक्ष), मोहम्मद जमीर शेख (अपक्ष)

पर्वती विधानसभा मतदारसंघ-

माधुरी सतीश मिसळ (भाजप), अश्विनी नितीन कदम (राष्ट्रवादी), संदीप भाऊशेठ सोनावणे (आप), सत्यु सिद्राम भगाळे (बहुजन मुक्ती पार्टी), ऋषिकेश मनोहर नांगरे पाटील (वंचित बहुजन आघाडी), परमेश्वर दादाराव जाधव (अपक्ष), करमरकर अरविंद प्रभाकर (अपक्ष), रोहित अशोक नारायणपेठ (अपक्ष), राहुल दत्तात्रेय खुडे (अपक्ष), उल्हास वसंतराव बागुल (अपक्ष), नितीन मधुकर कदम (अपक्ष), निखिल सुनील शिंदे (अपक्ष), सुरेश भुराराम चौधरी (अपक्ष), दीपक रामलाल घुबे (अपक्ष)

जुन्नर विधानसभा मतदारसंघ-

शरद सोनवणे (शिवसेना), अतुल बेनके (राष्ट्रवादी काँग्रेस), अशोक बाळसराफ (वंचित बहुजन आघाडी), साहेबराव शिंदे (बहुजन समाज पक्ष), रमेश हांडे (शेतकरी कामगार पक्ष), आशाताई बुचके (अपक्ष), सुखदेव खरात (अपक्ष), विनोद केदारी (अपक्ष), रोहिदास देठे (अपक्ष), आशा तोत्रे (अपक्ष), राजाराम ढोमसे (अपक्ष), तुषार थोरात (अपक्ष), राजेंद्र आल्हाट (अपक्ष)

खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघ-

सुरेश गोरे (शिवसेना), दिलीप मोहिते पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस), रामदास ठाकूर (राष्ट्रवादी काँग्रेस), अनिलबाबा राक्षे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष), नितीन गवई (बहुजन समाज पक्ष), सुबोध वाघमारे (बहुजन मुक्ती पार्टी), हिरामण कांबळे (वंचित बहुजन आघाडी), चेतन पाटील (हमारी आपनी पार्टी), पांडुरंग शितोळे (अपक्ष), रामदास ठाकूर (अपक्ष), अतुल देशमुख (अपक्ष), ज्ञानोबा पाटील (अपक्ष), अनिकेत गोरे (अपक्ष), अनिलबाबा राक्षे (अपक्ष), अनंत काळे (अपक्ष)

आंबेगाव विधानसभा मतदारसंघ-

दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस), मंगलदास बांदल (राष्ट्रवादी काँग्रेस), अरुण गिरे (शिवसेना), राजाराम बाणखेले (शिवसेना), अॅड. डॉ. लक्ष्मण डामसे (वंचित बहुजन आघाडी), नथू शेवाळे (जनता दल धर्मनिरपेक्ष), संजय पडवळ (भारतीय नवजवान सेना), रवींद्र चव्हाण (बहुजन समाज पक्ष), विशाल ढोकळे (राईट टू रिकॉल पार्टी), अशोक काळे पाटील (अपक्ष), अनिता गभाले (अपक्ष), वैभव बाणखेले (मनसे)

शिरुर विधानसभा मतदारसंघ-

बाबूराव पाचर्णे (भाजप), रोहिदास उंड्रे (भाजप), नितीन पाचर्णे (भाजप), अशोक पवार (राष्ट्रवादी काँग्रेस), सुजाता अशोक पवार (राष्ट्रवादी काँग्रेस), कमलाकर लोंढे (बहुजन मुक्ती पार्टी), रघुनाथ भवार (बहुजन समाज पार्टी), कैलास नरके (मनसे), चंदन सोंडेकर (वंचित बहुजन आघाडी), चंद्रशेखर घाडगे (संभाजी ब्रिगेड पार्टी), प्रदीप कंद (अपक्ष), मंगलदास बांदल (अपक्ष), सुधीर पुंगलिया (अपक्ष), नितीन पवार (अपक्ष), भारत गदादे (अपक्ष), नरेंद्र वाघमारे (अपक्ष), चंद्रकांत कोलते (अपक्ष)

दौंड विधानसभा मतदारसंघ-

राहुल कुल (भाजप), कांचन राहुल कुल (भाजप), रमेश थोरात (राष्ट्रवादी काँग्रेस), आनंदराव थोरात (राष्ट्रवादी काँग्रेस), रवींद्र जाधव (प्रहार जनशक्ती पार्टी), रमेश शितोळे (प्रहार जनशक्ती पार्टी), अशोक होले (बहुजन मुक्ती पार्टी), किसन हंदल (बहुजन समाज पक्ष), नितीन डाळिंबे (बहुजन समाज पक्ष), प्रकाश देशमुख (बहुजन समाज पक्ष), तात्यासाहेब ताम्हणे (वंचित बहुजन आघाडी), आनंदराव थोरात (अपक्ष), रवींद्र जाधव (अपक्ष), महंमद शेख (अपक्ष), राजाराम कदम (अपक्ष), लक्ष्मण अंकुश (अपक्ष), प्रकाश देशमुख (अपक्ष), उमेश म्हेत्रे (अपक्ष), प्रल्हाद महाडिक (अपक्ष), प्रतीक धानोकर (अपक्ष), रमेश थोरात (अपक्ष), विलास रासकर (अपक्ष), संजय कांबळे (अपक्ष)

इंदापूर विधानसभा मतदारसंघ-

हर्षवर्धन पाटील (भाजप), दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी काँग्रेस), सविता कडाळे (हिंदुस्थान जनता पार्टी), श्रीपती चव्हाण (बहुजन समाज पक्ष), कांतीलाल ठोकळे (बहुजन समाज पक्ष), बाबासाहेब भोंग (बहुजन समाज पक्ष), अंकुश काळे (बहुजन वंचित आघाडी), सचिन जोरे (वंचित बहुजन आघाडी), अमोल मारकड (बहुजन मुक्ती पार्टी), गिरीश पाटील (अपक्ष), सूरज वनसाळे (अपक्ष), वैभव जाधव (अपक्ष), सागाजी कांबळे (अपक्ष), संतोष शिंदे (अपक्ष), सुधीर पोळ (अपक्ष), कमलाकांत तोरणे (अपक्ष), बाळासाहेब सरवदे (अपक्ष), रवी भाले (अपक्ष), संदीप चौधरी (अपक्ष), अमित मोहिते (अपक्ष), हनुमंत वीर (अपक्ष), गणेश कोकाटे (अपक्ष), दत्तात्रय आरडे (अपक्ष), भाऊराव झेंडे (अपक्ष), जाविद शेख (अपक्ष), महादेव मोहिते (अपक्ष), बाळासाहेब कोकाटे (अपक्ष), संजय कुचेकर (अपक्ष), आप्पासाहेब जगदाळे (अपक्ष), शिवाजी आरडे (अपक्ष), संभाजी चव्हाण (अपक्ष)

बारामती विधानसभा मतदारसंघ-

अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस), गोपीचंद पडळकर (भाजप), अविनाश गोफणे (वंचित बहुजन आघाडी), अशोक माने (बहुजन समाज पार्टी), दादा थोरात (बहुजन समाज पार्टी), विनोद जगताप (संभाजी ब्रिगेड पार्टी), विनोद चांदगुडे (राष्ट्रीय जनक्रांती पार्टी), शिवाजी कोकरे (अपक्ष), बापू भिसे (अपक्ष) राहुल थोरात (अपक्ष), सचिन आगवणे (अपक्ष), मधुकर मोरे (अपक्ष), विनोद चांदगुडे (अपक्ष), योगेश निंबाळकर (अपक्ष)

पुरंदर विधानसभा मतदारसंघ-

विजय शिवतारे (शिवसेना), गिरीश जगताप (भाजप), गणपत दगडे (भाजप), संजय जगताप (काँग्रेस), किरण सोनवणे (बहुजन समाज पार्टी), मनोहर शेवाळे (संभाजी ब्रिगेड पार्टी), अतुल नागरे (वंचित बहुजन आघाडी), नवनाथ माळवे (बहुजन मुक्ती पार्टी), प्रमोद दिवेकर (लोक भारती), उमेश जगताप (मनसे),  डॉ. उदयकुमार जगताप (अपक्ष), चंदन मेमाणे (अपक्ष), महादेव खेंगरे (अपक्ष), व्हिनस शिवतारे (अपक्ष), रमेश उरवणे (अपक्ष), सुरेश वीर (अपक्ष), बाळासाहेब झिंजुर्के (अपक्ष), ज्ञानेश्वर कटके (अपक्ष), गणपत दगडे (अपक्ष)

भोर विधानसभा मतदारसंघ-

संग्राम थोपटे (काँग्रेस), स्वरुपा संग्राम थोपटे (काँग्रेस), आत्माराम कलाटे (शिवसेना), कुलदीप कोंडे (शिवसेना), किरण दगडे (भाजप), अनिल मातेरे (मनसे), भाऊ मरगळे (वंचित बहुजन आघाडी), पंढरीनाथ सोंडकर (संभाजी ब्रिगेड पार्टी), सिद्धराम वाघमारे (बहुजन समाज पार्टी), मानसी शिंदे (अपक्ष), सुनील गायकवाड (अपक्ष), दत्तात्रय टेमघरे (अपक्ष), डॉ. यशराज पारखी (अपक्ष)

मावळ विधानसभा मतदारसंघ-

संजय तथा बाळा भेगडे (भाजप), गुलाबराव म्हाळसकर (भाजप), सुनील शेळके (राष्ट्रवादी काँग्रेस), सारिका सुनील शेळके (राष्ट्रवादी काँग्रेस), मंदाकिनी भोसले (बहुजन समाज पार्टी), रमेश ओव्हाळ (वंचित बहुजन आघाडी), रवींद्र भेगडे (अपक्ष), धर्मपाल तंतरपाळे (अपक्ष), खंडू तिकोणे (अपक्ष), सुनील शेळके (अपक्ष), मुकेश आगरवाल (अपक्ष), दीपक लोहार (अपक्ष)

आमदार माधुरी मिसाळ यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार


पर्वती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांनी निवडणूक कार्यालयाच्या परिसरात सभा घेतली. हे आचारसंहितेचे उल्लंघन असल्याने त्यावर आम आदमी पार्टीकडून आक्षेप घेण्यात आला आहे. आपकडून माधुरी मिसाळ यांच्याविरोधात आचारसंहितेचा भंगाची लेखी तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेच्या नियमानुसार, निवडणूक कार्यालयाच्या १०० मीटरच्या आतमध्ये कोणत्याही स्वरुपाची राजकीय सभा घेता येत नाही. मात्र, तरी देखील आमदार माधुरी मिसाळ यांनी निवडणूक कार्यालयाच्या परिसरात कार्यालयापासून १०० मीटरच्या आतमध्ये सभा घेतली. त्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा आरोप करीत आपचे कार्यकर्ते चंद्रशेखर पानसे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. पानसे यांनी आपल्या लेखी तक्रारीत म्हटले की ३ ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार माधुरी मिसाळ यांचा उमेदवारी अर्ज भरतेवेळी त्यांची संबंधित निवडणूक कार्यालयाच्या १०० मीटरच्या आतमध्ये सभा सुरु होती. या सभेमध्ये खासदार गिरीश बापट, योगेश गोगावले, माधुरी मिसाळ यांनी भाषणे केली. निवडणूक आचारसंहितेचा हा भंग आहे. तरी याची दखल घेऊन कारवाई करावी. दरम्यान, हा तक्रार अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी स्विकारला असून या अर्जावर कार्यालयातील लिपिकाचा शिक्का आणि सही देखील आहे.

प्रमुख पक्षातील बंडखोर उमेदवार

कसबा : कमल व्यवहारे (काँग्रेस), विशाल धनवडे (शिवसेना)

कँटोन्मेंट : सदानंद शेट्टी (काँग्रेस), भरत वैरागे (भाजप), पल्लवी जावळे (शिवसेना)

खडकवासला : रमेश कोंडे (शिवसेना)

पर्वती : आबा बागूल (काँग्रेस)

वडगाव शेरी : संजय भोसले (शिवसेना)

हडपसर : गंगाधर बधे (शिवसेना), अंजुम इनामदार (एमआयएम)

पुणे जिल्ह्यातील मतदार ७७ लाखांवर

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक शाखेने पुरवणी मतदारयादी प्रसिद्ध केली असून, या पुरवणी यादीत सुमारे ४० हजार मतदार वाढले आहेत. पुणे शहर आणि जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांतील मतदारांची संख्या सुमारे ७७ लाख २६ हजारांवर पोहोचली आहे. अंतिम मतदारयादीमध्ये मतदारांची संख्या ७६ लाख ८६ हजार ६३६ झाली होती. त्यामध्ये पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये ३० लाख ८२ हजार २१ मतदार होते. उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी दहा दिवस अगोदर म्हणजे २४ सप्टेंबरपर्यंत आलेल्या अर्जांची छाननी करून पुरवणी मतदारयादी तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये सुमारे ४० हजार मतदार वाढले आहेत. या मतदारांना या विधानसभा निवडणुकीत मतदान करता येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक शाखेकडून देण्यात आली. पुरवणी यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी ४६,५७१ अर्ज आले होते. त्यातील पहिल्या टप्प्यात २८,९८९ अर्ज मंजूर करण्यात आले होते; तर ३३२६ अर्ज नामंजूर झाले होते. उर्वरित १७,५८२ अर्जांपैकी बहुतांश अर्ज मंजूर झाले असल्याने मतदारांची संख्या सुमारे ४० हजारांनी वाढल्याचे जिल्हा निवडणूक शाखेकडून स्पष्ट करण्यात आले. मतदार यादीबाबत कोणतीही तक्रार किंवा शंका असल्यास १९५० या हेल्पलाइनवर किंवा उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांच्याशी ९९२३२०७७६७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक शाखेकडून करण्यात आले आहे.

मतदार यादीत नाव पाहण्याची सुविधा

* मतदार यादीत आपले नाव आहे का, हे तपासण्यासाठी www.nvsp.in ही वेबसाइट आहे. त्यावरून नाव शोधता येणार आहे.

* https://ceo.maharashtra.gov.in या वेबसाइवरही ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

* Voter Helpline हा अॅप डाउनलोड करून मतदारांना मोबाइलवर नाव शोधण्याची सुविधा आहे.


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

===================================================================================================================

Maharashtra Assembly Election 2019 Opinion Poll PRAB; प्राब संस्थेचा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकपूर्व जनमत चाचणी सर्वेक्षण (ओपिनियन पोल) अहवाल उपलब्ध

VIDHAN SABHA 2019 ; महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मतदानपूर्व अंदाज

भाजप व शिवसेना युती न झाल्यास मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण व विश्लेषण

युती झाल्यावर संभाव्य जागा; आघाडीला मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण  व विधानसभा मतदारसंघनिहाय  कल

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेचा सर्वेक्षण अहवाल खालील लिंकवर उपलब्ध - 

(A survey report of the Political Research and Analysis Bureau (PREB) organization is available at the following link)
https://www.instamojo.com/bhujbalchandrakant/maharashtra-assembly-election-2019-opinion-p/?ref=store

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.