भाजप-ताराराणी आघाडीच्या जयश्री जाधव यांचा 41 विरुद्ध 33 मतांनी पराभव तर भाजपचे कमलाकर भोपळे पराभूत
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
कोल्हापूर महापौर आणि उपमहापौर निवडणुकीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने सोमवारी वर्चस्व कायम ठेवले. राष्ट्रवादीच्या सरिता मोरे यांनी महापौरपदाच्या, तर काँग्रेसचे भूपाल शेटे यांनी उपमहापौरपदाच्या निवडणुकीत प्रत्येकी ४१ मतांनी बाजी मारत विजय मिळविला. कोल्हापूर महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरिता मोरे यांनी भाजप-ताराराणी आघाडीच्या जयश्री जाधव यांचा 41 विरुद्ध 33 मतांनी पराभव केला. कोल्हापूर महापालिका महापौरपदा पाठोपाठ उपमहापौरपदाच्या निवडीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने बाजी मारली. उपमहापौरपदाच्या निवडीत काँग्रेसचे भूपाल शेटे यांनी ४१ मतांनी सोमवारी बाजी मारली. भाजपचे कमलाकर भोपळे पराभूत झाले. त्यांना ३३ मते मिळाली.महापौरपदाच्या निवडीनंतर उपमहापौर निवडीची प्रक्रिया दुपारी पावणेबाराच्या सुमारास सुरू झाली. महापौरपदावर काँग्रेस-राष्ट्रवादीने विजय मिळविल्याने उपमहापौरपदाच्या निवडीत देखील त्याची पुनर्रावृत्ती होणार असल्याचे चित्र होते.त्यानुसार उपमहापौरपदाच्या निवडणुकीत ४१ मतांसह काँग्रेसच्या भूपाल शेटे हे विजयी झाले. विजयानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि भूपाल शेटे यांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केला. कोल्हापूर महापौर आणि उपमहापौर निवडणुकीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने सोमवारी वर्चस्व कायम ठेवले. राष्ट्रवादीच्या सरिता मोरे यांनी महापौरपदाच्या, तर काँग्रेसचे भूपाल शेटे यांनी उपमहापौरपदाच्या निवडणुकीत प्रत्येकी ४१ मतांनी बाजी मारत विजय मिळविला. महापौर आणि उपमहापौर निवडणुकीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने सोमवारी वर्चस्व कायम ठेवले. राष्ट्रवादीच्या सरिता मोरे यांनी महापौरपदाच्या, तर काँग्रेसचे भूपाल शेटे यांनी उपमहापौरपदाच्या निवडणुकीत प्रत्येकी ४१ मतांनी बाजी मारत विजय मिळविला. महापौर, उपमहापौरपद हे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे कायम राखत आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना धक्का दिला. गेल्या दोन दिवसांपासून या दोघांनी एकमेकांवर आरोप करून निवडणुकीतील चुरस स्पष्ट केली. अल्पमतात असलेल्या भाजप-ताराराणी आघाडीने सत्तारुढ काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला धक्का देत त्यांच्या नगरसेवकांची पदे रद्द करण्याचा डाव रचल्यामुळे या निवडणुकीने वेगळे वळण घेतले.सोमवारी सकाळी सभागृहात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे ४१, तर भाजप-ताराराणी आघाडीचे ३३ इतके बलाबल राहिले. शिवसेनेचे चार नगरसेवक अनुपस्थित राहिले. त्यामुळे महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे वर्चस्व कायम राहिले.महापालिकेच्या २०१५मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सत्तेवर आली. आघाडी स्थापन करताना सत्तेचा फॉर्म्यूला निश्चित झाला. काठावरील बहुमत असल्याने चार अपक्षांसह शिवसेनेच्या चार सदस्यांची मदत घेतली. त्यानुसार महापौर, उपमहापौर आणि इतर समित्यांच्या सभापतिपदाची विभागणी झाली. गेल्यावर्षीच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडीचा अपवाद वगळता ठरल्याप्रमाणे इतर निवडी पार पडल्या. त्याच पद्धतीने महापौर, उपमहापौर निवड पार पाडण्याची तयारी काँग्रेस-राष्ट्रवादीने केली होती.POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.