Sunday, 30 December 2018

पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघात ४ जानेवारीपासून ४५ दिवस ‘व्हीव्हीपॅट’वर जनजागृती कार्यक्रम

आगामी निवडणुकांमध्ये जिल्ह्यात (व्हीव्हीपॅट) यंत्रांचा प्रथमच वापर होणार

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) या संस्थेतर्फे देखील सर्व मतदारसंघात ‘व्हीव्हीपॅट’बाबत मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. व्हीव्हीपॅट-ईव्हीएम प्रणालीबाबत जागृती करून 'ईव्हीएम यंत्रासोबत छेडछाड होऊच शकत नाही याबाबतही प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात येत आहेत.


आगामी निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनसोबत (ईव्हीएम) व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) यंत्रांचा प्रथमच वापर केला जाणार आहे. त्याची माहिती मतदारांना देण्यासाठी जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघात ४ जानेवारीपासून ४५ दिवस जनजागृती कार्यक्रम राबविला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली. व्हीव्हीपॅट-ईव्हीएम प्रणालीचे प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक शाखेने खासदार, आमदार व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती.उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, निवासी जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, आमदार बाबूराव पाचर्णे, माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांच्यासह राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्राचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. व्हीव्हीपॅट हे मतदानाची पोचपावती देणारे यंत्र असून, त्यामुळे मतदारांचा संभ्रम दूर होणार आहे, असे स्पष्ट करून जिल्हाधिकाऱ्यांनी जनजागृती कार्यक्रमाची माहिती दिली. खडकवासला मतदारसंघातून ईव्हीएम-व्हीव्हीपॅट जनजागृती मोहिमेस प्रारंभ झाला आहे. याशिवाय जिल्हा परिषदेच्या सभागृहात, पंचायत समितीच्या सभांमध्ये आणि न्यायालयाच्या न्यायमूर्तींनाही या यंत्राचे प्रात्यक्षिक दाखविले जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर मोबाइल जनजागृती व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले. ईव्हीएमबाबत राजकीय पक्षांमधील संभ्रम दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गेल्या महिन्यात व्हीव्हीपॅट-ईव्हीएमचे प्रशिक्षण आयोजित केले होते. परंतु, अनेक राजकीय पक्षांनी व नेतेमंडळींनी त्याकडे पाठ फिरवली होती. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने शनिवारी पुन्हा प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. मात्र, अपवाद वगळता बहुतांश आमदार-खासदारांनी केवळ प्रतिनिधी पाठवून प्रशिक्षणाबाबत पुन्हा उदासीनता दर्शवल्याचे दिसून आले. ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रणालीअंतर्गत मतदारासमोर ईव्हीएम युनिट (मतदान यंत्र) आणि व्हीव्हीपॅट यंत्र ठेवलेले असेल. मतदाराने ईव्हीएमवर मतदान केल्यावर 'व्हीव्हीपॅट'वरील पारदर्शी स्क्रीनवर मुद्रित कागदी स्लीप दिसणार आहे. त्यावर अनुक्रमांक, मत दिलेल्या उमेदवाराचे नाव व चिन्ह सात सेकंदांसाठी मतदाराला पाहता येणार आहे. त्यानंतर ही स्लीप व्हीव्हीपॅट यंत्राच्या सीलबंद कप्प्यात पडणार आहे. त्यामुळे मतदाराला मतदानाची खात्री करता येणार आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

=============0===========0==========0==========
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
Click here Pay Now- 
https://imojo.in/prabindia

=============0===========0==========0==========

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.