काँग्रेसचे अभिजित पाटील यांचा पराभव
धुळे-नंदुरबार विधान परिषद पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. भाजपचे उमेदवार अमरीश पटेल यांनी काँग्रेसचे उमेदवार अभिजित पाटील यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. दरम्यान पटेल यांच्या विजयाची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्या स्थानिक निवडणुकीला सामोरे जात असून पहिल्याच निवडणुकीत पराभवाला सामोरे जात आहे. धुळे आणि नंदुरबार स्थानिक स्वराज संस्थेच्या विधान परिषद पोट निवडणुकीची मतमोजणी पार पडली आहे. भाजप उमेदवार अमरीश पटेल यांना 332 मते तर महाविकास आघाडीच्या उमेदवार अभिजीत पाटील यांना 98 मते पडली आहे. मतमोजणीत 4 मते बाद करण्यात आली आहेत. अमरीश पटेल यांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचा 30 सप्टेंबर 2019 या दिवशी राजीनामा दिला होता. त्यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कालावधी 14 डिसेंबर 2021 या दिवशी पूर्ण होत होता. मात्र तत्पूर्वीच त्यांनी राजीनामा दिल्याने केवळ 12 महिन्यांचा कालावधी निवडून आलेल्या उमेदवाराला मिळणार आहे. काँग्रेसला अलविदा म्हणत भाजपमध्ये आलेल्या अमरीश पटेल यांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. 12 मार्च 2020 हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. 13 मार्च 2020 ला अर्जाची छाननी झाली. 16 मार्च 2020 या दिवशी निवडणूक अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. या जागेसाठी 30 मार्च 2020 ला मतदान प्रक्रिया तर 31मार्चला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार होता . मात्र, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ही निवडणूक दोन महिने पुढे ढकलण्यात आली होती. धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेले 412 तर स्वीकृत 28 सदस्य असे एकूण 440 सदस्य मतदानासाठी पात्र होते. मात्र, धुळे महानगरपालिकेतील लोकसंग्राम पक्षाच्या सदस्या हेमा अनिल गोटे ,तसेच शिंदखेडा नगरपरिषदेतील भाजपचे स्वीकृत सदस्य राजेंद्र भामरे यांनी राजीनामा दिला होता तर धुळे महानगरपालिकेतील भाजपचे स्वीकृत सदस्य सोनल शिंदे यांना विभागीय आयुक्तांनी निवडणूक खर्च सादर न केल्याने अपात्र ठरविले होते त्यामुळे विधान परिषदेसाठी मतदान करणार्या सदस्यांची संख्या 437 होती. धुळे-नंदुरबार विधान परिषद मतदार संघात भाजपचे 199 काँग्रेसचे 157,राष्ट्रवादी काँग्रेसचे 36, शिवसेनेचे 20, एमआयएमचे 9, समाजवादी पक्षाचे 4, बसपा , मनसेचा प्रत्येकी एक, अपक्ष 10 सदस्य मतदार होते. 437 मतदारांपैकी 434 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता म्हणजेच 99 टक्के मतदान झाले होते.
विधानपरिषदेच्या 3 पदवीधर, 2 शिक्षक मतदारसंघ निवडणुकांची मतमोजणी सुरू
राज्यातील विधानपरिषदेच्या 3 पदवीधर, 2 शिक्षक मतदारसंघासाठी आणि एका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी 1 डिसेंबरला मतदान झाले होते. पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतरादरसंघासाठीचे मतदान झाले. आज या निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतरादरसंघातील निकाल जाहीर झालेला असून इतर मतरादरसंघाची मतमोजणी सुरू आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्या नंतर ही पहिली मोठी निवडणूक होती. महाविकास आघाडीने म्हणजेच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने मिळून उमेदवार दिला होता. यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपने ताकद पणाला लावली होती. विधानपरिषदेच्या निकालाचा महाराष्ट्रातील आगामी राजकारणावर परिणाम दिसेल. तसेच काय निकाल लागतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मतदारसंघनिहाय औरंगाबाद पदवीधर 61.08 टक्के, पुणे पदवीधर 50.30 टक्के, नागपूर पदवीधर 54.76 टक्के, अमरावती शिक्षक मतदारसंघ 82.91 टक्के, पुणे शिक्षक मतदारसंघ 70.44 टक्के तर धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात सुमारे 99.31 टक्के मतदान झाले आहे.POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
==========================================================================================================
पदवीधर मतदारसंघ;
==========================================================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये
CLICK HERE -
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
============================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.