Friday, 11 December 2020

पुणे जिल्ह्यांतील 748 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर

राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला मतदान


कोरोनाचे संकट आणि लाॅकडाऊन यामुळे रखडलेल्या जिल्ह्यातील तब्बल पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक म्हणजे 748 ग्रामपंचायतींचा निवडणुक रणसंग्राम अखेर जाहीर झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 23 डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात होणार आहे. तर 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यात निम्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्याने संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. यंदा मार्च महिन्यात कोरोनाचे संकट आले. त्यानंतर केंद्र शासनाने लाॅकडाऊन जाहिर केले. यामुळे जिल्ह्यातील एप्रिल ते जून 2020 आणि नंतर जुलै ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 748 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका लांबणीवर पडल्या. यामुळे शासनाने या सर्व ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त केले. राज्यात पदवीधर, शिक्षक आमदारकीचा निवडणुका झाल्यानंतर आता ग्रामपंचायत निवडणुकाचा रणसंग्राम गाजणार आहे.
पुणे जिल्ह्यातील निवडणुका होणा-या तालुकानिहाय ग्रामपंचायती-
खेड - 91, भोर- 73, शिरूर- 71, जुन्नर- 66, पुरंदर- 68, इंदापूर- 60, मावळ - 57, हवेली- 54, बारामती- 52, दौंड - 51, मुळशी - 45, वेल्हा - 31, आंबेगाव- 29, पिंपरी-चिंचवड- 1 , एकूण : 748 

असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम- 

तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करणे :- १५ डिसेंबर
उमेदवारी अर्ज दाखल करणे :- २३ डिसेंबर ते 30 डिसेंबर
उमेदवारी अर्जांची छाननी :- 31 डिसेंबर
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत :- 4 जानेवारी 2021
मतदान :- 15 जानेवारी 2021
मतमोजणी :- 18 जानेवारी

राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान; तर 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली. एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते; परंतु कोविड-19 ची परिस्थिती उद्‌भवल्याने 17 मार्च 2020 रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. यासह डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व  ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे 23 ते 30 डिसेंबर 2020 या कालावधीत स्वीकारली जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी 31 डिसेंबर 2020 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 4 जानेवारी 2021 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 18 जानेवारी 2021 रोजी होईल. गडचिरोली जिल्ह्यात फक्त मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असेल, असे त्यांनी सांगितले. विधानसभा मतदारसंघाची 25 सप्टेंबर 2020 रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 1 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 7 डिसेंबर 2020 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या 14 डिसेंबर 2020 रोजी प्रसिध्द केल्या जाणार आहेत. निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234. 
      दरम्यान एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या/ नवनिर्मित 1 हजार 566; तसेच जुलै ते डिसेंबर 2020 या कालावधित मुदत संपणाऱ्या/ नवनिर्मित 12 हजार 667 अशा एकूण 14 हजार 233 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी या मतदार याद्या तयार केल्या जातील. यातील एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते; परंतु कोवीडची परिस्थिती उद्‌भवल्याने 17 मार्च 2020 रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता; तर 19 नोव्हेंबर 2020 रोजी ही संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच रद्द करण्यात आली. या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 31 जानेवारी 2020 पर्यंत अद्ययावत केलेल्या विधानसभेच्या मतदार याद्यांवरून ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतदार याद्या तयार करण्यात आलेल्या होत्या. विधानसभेच्या या मतदार याद्या 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित होत्या; परंतु भारत निवडणूक आयोगाने आता 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारित अद्ययावत मतदार याद्या 25 सप्टेंबर 2020 रोजी प्रसिद्ध केल्या आहेत. मतदार याद्यांत नाव नोंदविलेल्या सर्वांना मतदान करता यावे किंवा निवडणूक लढविता यावी, हे लोकशाहीचे मुलभूत तत्व आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रमासह 5 फेब्रुवारी 2020 च्या आदेशान्वये तयार केलेल्या मतदार याद्यादेखील रद्द केल्या होत्या. आता निवडणूक प्रक्रिया रद्द झालेल्या ग्रामपंचायतींसह एकूण 14 हजार 233 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदार याद्यांचा कार्यक्रम राबविण्यात आला आहे.

उमेदवारी अर्ज भरताना......

उमेदवारी अर्ज भरताना उमेदवाराला लागणारी माहिती आरक्षण वर्ग, वॉर्ड क्रमांक, जागा क्रमांक, जन्मतारखेचा पुरावा (जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला), जातीचा दाखला झेरॉक्‍स, जात पडताळणी प्रमाणपत्र किंवा जात पडताळणी पोचपावती, पॅन कार्ड, आधार कार्ड, शैक्षणिक अहर्ता, मुलांच्या जन्मतारखा व नाव, गुन्हे दाखल असेल तर याची सविस्तर माहिती, केस नंबर कलम कोर्टात दाखल झालेली तारीख, उमेदवाराची पत्नी/पती, मुले व्यवसाय करीत असेल व इन्कम टॅक्‍स भरत असेल तर त्याची चार वर्षाची रिटर्न फाईल केल्याचा दिनांक व पावती, बचत खाते मुदत ठेवी यांची माहिती (उमेदवार पती/पत्नी मुले), शेअर्स, म्युचअल फंड, कर्जरोखे, पोस्ट एफडी, कंपन्यांमधील गुंतवणूक, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट यातील गुंतवणूक यांचा तपशील द्यावा. एलआयसी पॉलिसी तपशील (उमेदवार पती/पत्नी मुले), दुचाकी, चारचाकी, व्यावसायिक गाड्यांचे नंबर व खरेदी किंमत (उमेदवार पती/पत्नी मुले), सोने, चांदी, हिरे यांची माहिती, शेती, एनए जमीन, घर, कमर्शिअल मालमत्ता यांचे गुंठे, स्क्वेअर फूटामध्ये माहिती (उमेदवार पती/पत्नी मुले), मालमत्ता खरेदीची असेल तर खरेदीचा दिनांक, खरेदीची किंमत, मालमत्ता खरेदी करण्यासाठी चार रकमेचा स्तोत्र उदाहरणार्थ कर्ज सोनेतारण स्वअर्जित (मालमत्ता विकून) भागीदारी, हातउचल इत्यादी, जॉइंट व्हेंचर असेल तर त्याचा तपशील, बक्षीसपत्र मालमत्ता असेल तर त्याची झेरॉक्‍स, कर्ज रक्कम बॅंकेचे नाव कर्जाचा प्रकार (उमेदवार पती-पत्नी मुले) कर्ज शिल्लक रक्कम, देणे रक्कम गृहनिर्माण विभाग पाणीपुरवठा वीजबिल महसूल देणे दूरध्वनी स्थानिक स्वराज्य संस्था कर माहिती, आयकर, संपत्ती कर, सेवा कर, सेल टॅक्‍स जीएसटी इत्यादी कर माहिती, उमेदवार पती-पत्नी मुले यांच्या शासकीय कामाचा ठेका घेतला असेल तर त्याची वर्कऑर्डर झेरॉक्‍स, कंपनी फार्म भागीदार व्यवसाय असेल तर व्यवसायाचे नाव पत्ता व तीन वर्षे करार तपशील, उमेदवाराचे विरुद्ध वसुलीबाबत दिवानी दाव्याचा तपशील (न्यायालय केस नंबर रक्कम सद्यस्थिती), निवडणुकीसाठी नवीन खाते उघडावे लागेल (राष्ट्रीयीकृत बॅंक शेड्युल बॅंक) ही सर्व माहिती उमेदवाराचा ऑनलाइन फॉर्म भरताना लागणार आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================

  

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.