Tuesday 31 May 2022

पुणे महापालिका निवडणूक-2022 करीता आरक्षण जाहीर; 29 प्रभागांमध्ये महिलाराज

16 प्रभागांमध्ये प्रत्येकी 2 जागांवर सर्वसाधारण खुला प्रवर्गामुळे पुरुषांची मक्तेदारी



पुणे महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर प्रभागनिहाय ओबीसी आरक्षणाशिवाय अन्य आरक्षीत जागांसाठी सोडत काढण्यात आली. यामध्ये 16 प्रभागांमध्ये प्रत्येकी 2 जागांवर (32) सर्वसाधारण खुला प्रवर्गामुळे पुरुषांची मक्तेदारी तर 29 प्रभागांमध्ये प्रत्येकी 2 जागांवर (58) निवडणुकीनंतर महिलाराज पहावयास मिळणार आहे. ५८ प्रभागांत १७३ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महिला आरक्षणाच्या ८७, अनुसूचित जातींसाठीच्या २३ आणि अनुसूचित जमातींसाठीच्या दोन जागांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. या सोडतीनंतरच ५८ पैकी ५७ प्रभागांतील आगामी लढतीचे स्वरूप स्पष्ट झाले आहे. महापालिकेतील ५८ प्रभागांत किमान एक महिला आरक्षण आहे याशिवाय उर्वरित २९ जागांसाठी ५७ प्रभागांमध्ये सोडत काढण्यात आली. दोन सदस्यांच्या प्रभागाचा महिला आरक्षणाच्या सोडतीमध्ये विचार केला नाही. त्यामुळे तीन सदस्यांच्या ५७ प्रभागांपैकी २९ ठिकाणी महिला आरक्षणाची सोडत काढण्यात आली. या व्यतिरिक्त अनुसूचित जातींसाठी २३ आणि अनुसूचित जमातींसाठी दोन जागांचे आरक्षण आहे. आरक्षणाच्या सोडतीनंतर पुरुष उमेदवारांचे भवितव्य कुठल्या प्रभागांमध्ये ठरणार, किती पुरुष माजी नगरसेवकांना पुन्हा एकदा 'माजी'च राहावे लागणार हे स्पष्ट होत आहे. अनुसूचित जातींसाठी २३ ठिकाणी आरक्षण आहे. यामधील १२ जागा या महिलांसाठी राखीव असणार आहे; तसेच अनुसूचित जमातींसाठी दोन जागा आरक्षित असून, त्यापैकी एक जागेवर महिलेला आरक्षण मिळणार आहे. महिलांसाठी एकूण ८७ जागांवर आरक्षण आहे. त्यापैकी १३ जागा अनुसूचित जाती आणि जमातींसाठी आरक्षित आहेत. अनसूचित जमातींसाठी दोन जागा आरक्षित असून, त्यामध्ये प्रभाग क्रमांक एक (धानोरी-विश्रांतवाडी) आणि प्रभाग क्रमांक १४मध्ये (पाषाण-बावधन बुद्रूक) हे आरक्षण असणार आहे. प्रभाग क्रमांक एक (धानोरी-विश्रांतवाडी) या प्रभागात अनुसूचित जाती आणि जमातींसाठी दोन आरक्षणे आहेत. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत 'ओबीसीं'साठी ४७ जागा राखीव ठेवल्या जाणार होत्या. या ४७ जागांपैकी २४ जागा 'ओबीसी' महिलांसाठी आरक्षित होत्या. हे आरक्षण रद्द झाल्याने या जागा सर्व वर्गांसाठी खुल्या झाल्या आहेत. आगामी महापालिकेत 'ओबीसीं'ना या ४७ जागांवर फटका बसणार आहे. त्यामुळे 'ओबीसीं'साठीच्या जागांवर त्यांना प्रतिनिधित्व देण्याची जबाबदारी सर्वच राजकीय पक्षांवर आली आहे. महाविकास आघाडी, तसेच भारतीय जनता पक्षाने ओबीसांनी पुरेसे प्रतिनिधीत्व देण्याची घोषणा केली असली तरी प्रत्येक प्रभागात 'ओबीसी'विरोधात 'ओबीसी'च उमेदवार असेलच असे नाही. त्यामुळे ओबीसींना पुरेसे प्रतिनिधीत्व देण्याची राजकीय पक्षांची घोषणा कितपत यशस्वी होईल याबाबत शंका उपस्थित होते आहे.

पुणे महापालिका असे आहे आरक्षण?
एकूण जागा : १७३
महिला आरक्षण (५० टक्के) : ८७
अनुसूचित जाती : २३
अनुसूचित जमाती : २

अ गट

ब गट

क गट

सर्वसाधारण (महीला) 34

सर्वसाधारण (महीला) 40

सर्वसाधारण 57

अनुसूचित जाती (महिला) 12

अनुसूचित जमाती महिला 1

अनुसूचित जमाती 1

सर्वसाधारण 17

अनुसूचित जाती 11

एकूण-  58

एकूण-  58

एकूण-  57

एकूण जागा- 173

असे आहे आरक्षण?
प्रभाग क्र. 1 धानोरी-विश्रांतवाडी
अ-अनु. जाती 
ब-अनु. जमाती महिला
क -सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 2 टिंगरेनगर-संजय पार्क
अ -सर्वसाधारण महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 3 लोहगाव- विमाननगर
अ -अनु. जाती महिला
ब -सर्वसाधारण 
क -सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 4 खराडी-वाघोली
अ -अनु. जाती महिला
ब -सर्वसाधारण 
क -सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 5 खराडी-वडगाव शेरी
अ -सर्वसाधारण महिला
ब -सर्वसाधारण 
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. 6 वडगाव शेरी-रामवाडी
अ -सर्वसाधारण महिला
ब -सर्वसाधारण 
क -सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 7  कल्याणी नगर -नागपूर चाळ
अ -अनु. जाती 
ब -सर्वसाधारण 
क -सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 8 कळस-फुलेनगर
अ -अनु. जाती 
ब -सर्वसाधारण
क -सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 9 येरवडा
अ -अनु. जाती महिला
ब -सर्वसाधारण
क -सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 10  शिवाजीनगर गावठाण-संगमवाडी
अ -अनु. जाती महिला
ब -सर्वसाधारण 
क -सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 11  बोपोडी-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
अ -अनु. जाती 
ब -सर्वसाधारण 
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. 12 औंध-बालेवाडी
अ -अनु. जाती 
ब -सर्वसाधारण 
क -सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 13 बाणेर-सुस-म्हाळुंगे
अ- सर्वसाधारण महिला
ब- सर्वसाधारण
प्रभाग क्र. 14  पाषाण-बावधन बु
अ -सर्वसाधारण 
ब -अनु. जमाती
क -सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 15 गोखलेनगर- वडारवाडी
अ -सर्वसाधारण महिला
ब -सर्वसाधारण
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. 16  फर्गसन कॉलेज-एरंडवणे
अ -सर्वसाधारण महिला
ब -सर्वसाधारण 
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. 17 शनिवार पेठ-नवी पेठ
अ -सर्वसाधारण महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. 18  शनिवारवाडा-कसबा पेठ
अ -सर्वसाधारण महिला
ब -सर्वसाधारण 
क -सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 19  छ. शिवाजी म. स्टेडियम-रास्ता पेठ
अ -अनु. जाती 
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. 20 पुणे स्टेशन-मा. रमाबाई आंबेडकर रोड
अ- अनु. जाती महिला
ब -सर्वसाधारण 
क -सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 21 कोरेगाव पार्क-मुंढवा
अ -अनु. जाती महिला
ब -सर्वसाधारण 
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. 22 मांजरी बु.-शेवाळेवाडी
अ -अनु. जाती 
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. 23 साडेसतरा नळी-आकाशवाणी
अ -सर्वसाधारण महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. 24 मगरपट्टा-साधना विद्यालय
अ -सर्वसाधारण महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 25 हडपसर गावठाण-सातववाडी
अ -सर्वसाधारण महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 26 वानवडी गावठाण-वैदूवाडी
अ -अनु. जाती महिला
ब -सर्वसाधारण
क -सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 27 कासेवाडी-लोहियानगर
अ -अनु. जाती 
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 28  महात्मा फुले स्मारक-भवानी पेठ
अ -सर्वसाधारण महिला
ब -सर्वसाधारण 
क -सर्वसाधारण 

प्रभाग क्र. 29 घोरपडे उद्यान-महात्मा फुले मंडई
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 30 जय भवानी नगर-केळेवाडी
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 31 कोथरूड गावठाण-शिवतीर्थनगर
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण 
क - सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 32 भुसारी कॉलनी-बावधन खु.
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 33 आयडियल कॉलनी- महात्मा सोसायटी
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण 
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 34 वारजे-कोंढवे धावडे
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण 
क - सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 35 रामनगर-उत्तमनगर
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 36 कर्वेनगर
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 37 जनता वसाहत-दत्तवाडी
अ - अनु. जाती 
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 38 शिवदर्शन-पद्मावती
अ - अनु. जाती 
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 39 मार्केटयार्ड-महर्षीनगर
अ - अनु. जाती महिला
ब - सर्वसाधारण
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 40  बिबवेवाडी-गंगाधम
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 41 कोंढवा खु.-मिठानगर
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण
क - सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 42 रामटेकडी-सय्यदनगर
अ - अनु. जाती महिला
ब - सर्वसाधारण
क - सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 43 वानवडी-कौसरबाग
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 44 काळे बोराटेनगर-ससाणेनगर
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण
क - सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 45 फुरसुंगी
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण
क - सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 46 मोहमंदवाडी-उरुळी देवाची
अ - अनु. जाती महिला
ब - सर्वसाधारण
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 47 कोंढवा बु.-येवलेवाडी
अ - अनु. जाती महिला
ब - सर्वसाधारण
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 48 अप्पर सुपर इंदिरानगर
अ - अनु. जाती महिला
ब - सर्वसाधारण 
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 49 बालाजी नगर-शंकर महाराजमठ
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 50  सहकारनगर-तळजाई
अ - अनु. जाती
ब - सर्वसाधारण 
क - सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 51 वडगाव बु.- माणिकबाग
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण 
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 52 नांदेड सिटी-सनसिटी
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 53 खडकवासला-नर्हे
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 54 धायरी-आंबेगाव
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 55 धनकवडी-आंबेगाव पठार
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 56 चैतन्यनगर-भारती विद्यापीठ
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 57 सुखसागरनगर-राजीव गांधीनगर
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 58 कात्रज-गोकुळनगर
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण
क - सर्वसाधारण 

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.