Tuesday 31 May 2022

नाशिक महापालिका निवडणूक - 2022 : नाशिकमध्ये 133 जागांपैकी 67 जागांवर महिला आरक्षण

नाशिकमध्ये 133 जागांपैकी 67 जागांवर महिला आरक्षण

नाशिक महापालिकेच्या सातव्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत निघाली. त्यात ​​​​४४ प्रभागातील १३३ पैकी ६७ जागांवर महिला आरक्षण जाहीर झाल्यामुळे बड्या - बड्या प्रस्थापित राजकारण्याची दांडी गुल झाली आहे. त्यामुळे १२२ नगरसेवकांपैकी पंधरा ते वीस प्रमुख नगरसेवकांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. नाशिक महापालिकेसाठीची आरक्षण सोडत महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार, उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. महत्त्वाच्या जागांवर महिला आरक्षण पडल्यामुळे पंचवटी विभागात अरुण पवार, गणेश गीते, उद्धव निमसे, मच्छिंद्र सानप, जगदीश पाटील, रूची कुंभारकर, सरिता सोनवणे, रवींद्र धिवरे, वर्षा भालेराव, संतोष गायकवाड, सुनीता धनगर, पूनम सोनवणे यांची कोंडी झाली आहे. नाशिक रोड विभागात राहुल दिवे, प्रशांत दिवे, सिडकोमध्ये राकेश दोंदे ,भगवान दोंदे, सातपुरमध्ये शशिकांत जाधव, मनसेचे सलीम शेख यांना समोरासमोर लढावे लागणार आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठी यंदा 133 जागांसाठी 67 जागा या महिलांसाठी राखीव आहे. त्याचबरोबर अनुसूचित जातीसाठी 19 जागा राखीव, तर अनुसूचित जमातीसाठी 10 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यानुसार अनुसूचित जातीसाठी 19 पैकी 10 जागा महिलांसाठी राखीव, तर अनुसूचित जमातीसाठी 10 पैकी 5 जागा महिलांसाठी राखीव राहणार आहेत. उर्वरित 52 सर्वसाधारण महिला राखीव आहे. अनुसूचित जाती महिला राखीव गटासाठी चिठ्ठी या सोडतीसाठी टाकण्यात आल्यानंतर महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते एक एक चिठ्ठी काढून अनुसूचित जाती महिलांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यामध्ये प्रभाग क्रमांक 12 अ, 14 अ, 26 अ, 41 अ, 43 अ, 35 अ, 34 अ, 44 अ, 22 अ व 27 अ अशाप्रकारे अनुसूचित जाती महिला राखीवचे आरक्षण काढण्यात आले. अनुसूचित जमाती महिला राखीवसाठी 10 जागांपैकी पाच जागांवर महिलांचे आरक्षण करण्यात आले. यामध्ये प्रभाग क्रमांक 7 ब, 11 ब, 34 ब, 4अ, 2 अ अशाप्रकारे महिला अनुसूचित जमातीच्या जागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. ही आरक्षण सोडत पहिल्या टप्प्यातील असून, उर्वरित टप्प्यातील आरक्षण सोडतीची प्रक्रिया सुरू होती. सर्वसाधारण महिला गटाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यामध्ये 1 ब, 2 ब, 3 ब, 4 ब, 5 अ, 6 अ, 8 अ, 8 ब, 9 अ, 10 अ, 12 ब, 13 अ, 14 ब, 15 ब, 16 अ, 17 अ, 18 अ, 19 अ, 20 ब, 21 अ, 22 ब, 23 ब, 24 ब, 25 ब, 26 ब, 28 ब, 29 अ, 30 अ, 31 अ, 32 अ, 23 अ, 25 ब, 26 अ, 37 अ, 38 अ, 39 ब, 40 अ, 41 ब, 42 ब व 43 ब अशा एकूण 40 सर्वसाधारण महिलांचे आरक्षण काढण्यात आले.

प्रवर्गनिहाय महिला व सर्वसाधारण आरक्षण-

१) प्रभाग क्रमांक १
अ - अनुसूचित जमाती
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
२) प्रभाग क्रमांक २
अ - अनुसूचित जमाती(महिला)
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
३) प्रभाग क्रमांक ३
अ- अनुसूचित जाती ( खुला)
ब. - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
४) प्रभाग क्रमांक ४
अ - अनुसूचित जमाती (महिला)
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
५) प्रभाग क्रमांक ५
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
६) प्रभाग क्रमांक ६
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण
क - सर्वसाधारण
७) प्रभाग क्रमांक ७
अ - अनुसूचित जाती
ब - अनुसूचित जमाती (महिला)
क - सर्वसाधारण
८) प्रभाग क्रमांक ८
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
ड - सर्वसाधारण
९) प्रभाग क्रमांक ९
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण
क - सर्वसाधारण
१०) प्रभाग क्रमांक १०
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
११) प्रभाग क्रमांक ११
अ- अनुसूचित जाती
ब- अनुसूचित जमाती(महिला)
क- सर्वसाधारण
१२) प्रभाग क्रमांक १२
अ - अनुसूचित जाती ( महिला)
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
१३) प्रभाग क्रमांक १३
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण
क - सर्वसाधारण
१४) प्रभाग क्रमांक १४
अ - अनुसूचित जाती( महिला)
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
१५) प्रभाग क्रमांक १५
अ - अनुसूचित जाती
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
१६) प्रभाग क्रमांक १६
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
१७) प्रभाग क्रमांक १७
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण
क - सर्वसाधारण
१८) प्रभाग क्रमांक १८
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
१९) प्रभाग क्रमांक १९
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण
क - सर्वसाधारण
२०) प्रभाग क्रमांक २०
अ - अनुसूचित जाती ( खुला)
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण महिला
२१) प्रभाग क्रमांक २१
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
२२) प्रभाग क्रमांक २२
अ - अनुसूचित जाती(महिला)
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
२३) प्रभाग क्रमांक २३
अ. अनुसूचित जाती
ब. सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
२४) प्रभाग क्रमांक २४
अ - अनुसूचित जाती
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
२५) प्रभाग क्रमांक २५
अ - अनुसूचित जाती
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
२६) प्रभाग क्रमांक २६
अ - अनुसूचित जाती ( महिला)
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
२७) प्रभाग क्रमांक २७
अ - अनु जाती (महिला)
ब - अनु जमाती
क - सर्वसाधारण
२८) प्रभाग क्रमांक २८
अ - अनु जमाती
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
२९) प्रभाग क्रमांक २९
अ. सर्वसाधारण महिला
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण
३०) प्रभाग क्रमांक ३०
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
३१) प्रभाग क्रमांक ३१
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
३२) प्रभाग क्रमांक ३२
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
३३) प्रभाग क्रमांक ३३
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
३४) प्रभाग क्रमांक ३४
अ - अनुसूचित जाती (महिला)
ब - अनुसूचित जमाती(महिला)
क - खुला
३५) प्रभाग क्रमांक ३५
अ - अनुसूचित जाती (महिला)
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
३६) प्रभाग क्रमांक ३६
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
३७) प्रभाग क्रमांक ३७
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
३८) प्रभाग क्रमांक ३८
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण
क - सर्वसाधारण
३९) प्रभाग क्रमांक ३९
अ - अनुसूचित जाती
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
४०) प्रभाग क्रमांक ४०
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण
क - सर्वसाधारण
४१) प्रभाग क्रमांक ४१
अ -  अनुसूचित जाती (महिला)
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
४२) प्रभाग क्रमांक ४२
अ - अनुसूचित जाती
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
४३) प्रभाग क्रमांक ४३
अ - अनु जाती( महिला)
ब - सर्वसाधारणमहिला
क - सर्वसाधारण
४४) प्रभाग क्रमांक ४४
अ - अनु जाती. ( महिला)
ब - अनु जमाती
क - सर्वसाधारण

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.