Thursday 8 February 2024

ईव्हीएम मशीनच्या चोरी प्रकरणामुळे स्थानिक प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर; 5 अधिकाऱ्यांवर गडांतर

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारवाईने खळबळ


पुरंदर तालुक्याचे मुख्यालय असलेल्या सासवड तहसील कार्यालयाच्या आवारातील गोदामातून ईव्हीएम मशीन चोरीच्या प्रकरणामुळे स्थानिक प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारवाईने प्रशासनात खळबळ माजली आहे. ईव्हीएम मशीन चोरी प्रकरणी 5 अधिकाऱ्यांवर गडांतर आले आहे तर आणखीन दोषींवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान चोरट्यांकडून दारूच्या नशेत चोरी झाल्याचे कारण समोर येत असून चोरी केलेले ईव्हीएम मशीन व कागदपत्रे जेजुरीतून हस्तगत केलेली आहेत २ संशयित आरोपींना अटक केली असून अन्य संशयितांचा शोध सुरु आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याप्रकरणी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि डीवायएसपी यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. 
सासवड शहरातील तहसील कार्यालयातील स्ट्रॉंगरूममध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या आहेत. शनिवार आणि रविवारी अशी दोन दिवस तहसील कार्यालयास सुट्टी होती. सोमवारी सकाळी आकरा वाजता तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना स्ट्रॉंग रूमचं कुलूप तोडण्यात आलेले आढळून आले. या ठिकाणी असलेल्या 40 पैकी 1 ईव्हीएम डेमो मशीन चोरीला गेल्याचे उघडकीस आल्याने खळबळ माजली होती.
 सासवड, जि.पुणे येथील तहसील कार्यालयात जनजागृतीसाठी ठेवलेल्या आणि चोरीस गेलेले ईव्हीएम कंट्रोल युनिट पोलिसांना सापडले आहे. याप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती अपर मुख्य सचिव तथा राज्याचे निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी, पुणे आणि पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्याकडून प्राप्त अहवालानुसार ३ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या सायंकाळी सहा ते ५ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या सकाळी १० वाजेदरम्यान जनजागृतीसाठी ठेवलेल्या ईव्हीएमपैकी एक कंट्रोल युनिट (BCUEL४१६०१) चोरीला गेल्याचे निदर्शनास आले होते. या अनुषंगाने निवासी नायब तहसीलदार, पुरंदर यांनी सासवड पोलिस स्टेशनमध्ये ५ फेब्रुवारी २०२४ रोजी तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिस स्टेशनकडून गुन्हा दाखल करुन तपास कामाला सुरवात करण्यात आली असून जिल्हाधिकारी, पुणे यांनी दि. ७ फेब्रवारी २०२४ रोजी सादर केलेल्या अहवालानुसार चोरीस गेलेले एक कंट्रोल युनिट पुणे ग्रामीण पोलिसांनी चोरट्यांकडून हस्तगत केले आहे. दोन संशयित भय्या ऊर्फ शिवाजी रामदास बंडगर, वय २१ व  अजिंक्य राजू साळुंखे, वय २१ रा. माळशिरस ता.पुरंदर, जिल्हा पुणे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून १ कंट्रोल युनिट, ५ पेपर रीम आणि स्टेशनरी हस्तगत करण्यात आली आहे.
भारत निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेतली असून, सुरक्षा व्यवस्थेतील कमतरता विचारात घेऊन, पुणे जिल्हयातील उपविभागीय अधिकारी, पुरंदर, तहसीलदार, पुरंदर तसेच संबंधित उपविभागीय पोलिस अधिकारी यांना तत्काळ निलंबित करुन पुढील चौकशी करण्याचे आदेश ६ फेब्रुवारी २०२४ रोजी दिले आहेत. तसेच या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याचे सुध्दा निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे कार्यवाही सुरु असल्याची माहिती श्री. देशपांडे यांनी दिली.
भारत निवडणूक आयोगाच्या दि. १४.११.२०२३ रोजीच्या पत्रातील निर्देशांनुसार राज्यात दि.१०.१२.२०२३ ते दि.२८.०२.२०२४ या कालावधीत ईव्हीएम जनजागृती व प्रसिध्दीचा कार्यक्रम सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. या प्रयोजनार्थ जिल्ह्यातील एकूण मतदान केंद्रांच्या १० टक्के इतक्या संख्येत ईव्हीएम व व्हीव्हीपॅट केवळ या कार्यक्रमासाठी जिल्हास्तरावरील मुख्य सुरक्षा कक्षातून (Strong room) बाहेर काढण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील विविध मतदारसंघांमध्ये जनजागृती तसेच प्रसिध्दीसाठी वापरावयाच्या ईव्हीएम त्या मतदारसंघातील उपविभागीय अधिकारी यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी सुरक्षा कक्षात योग्य त्या सुरक्षेसह ठेवण्यात येतात. दिवसभरात प्रचार प्रसिध्दी झाल्यानंतर त्या पुन्हा सुरक्षा कक्षात आणण्यात येतात. त्यासाठी स्थानिक पोलिस स्टेशनकडून बंदोबस्त पुरविण्यात येतो.
या घटनेबाबत राज्यस्तरावर मुख्य निवडणूक अधिकारी तसेच जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांनी सर्व मान्यता प्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक 6 फेब्रुवारी 2024  रोजी घेऊन सुरु असलेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली. त्याचप्रमाणे भारत निवडणूक आयोगाला याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्यात आला असल्याचे श्री.देशपांडे यांनी यावेळी सांगितले.
सासवड येथील तहसील कार्यालयाच्या स्ट्रॉंगरूम मधून तीन चोरट्यांनी ईव्हीएम मशीन लंपास केली होती. यावेळी सहायक फौजदार डी. एल. माने आणि होमगार्ड जवान राहुल जरांडे हे ड्यूटीवर होते. सोमवारी सर्व जण कामावर आले असता, त्यांना स्ट्रॉंग रूमचा दरवाजा उघडा दिसला. दरम्यान, ईव्हीएम चोरल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. तहसीलदार विक्रम राजपूत यांनी देखील पाहणी करून ईव्हीएम चोरीबाबत प्रांताधिकारी वर्षा लांडगे यांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. मतदान करण्याच्या डेमो (प्रात्यक्षिक) मशिनसह काही कागदपत्रांची चोरी झाल्याचे उघड झाले.
पोलिसांनी याची गंभीर दखल घेत सहायक फौजदार डी. एल. माने आणि होमगार्ड जवान राहुल जरांडे यांना मंगळवारी निलंबित केले होते. मात्र, या घटनेची दाखल थेट केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली. त्यांनी या प्रकरणी पुरंदर प्रांताधिकारी- वर्षा लांडगे -खत्री, तहसीलदार विक्रम राजपूत, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बर्डे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहे. तसेच पोलिस आधीक्षकांनी १२ फेब्रुवारी दुपारी ३ पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे. 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब

============================

"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

==============================


     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक घरपोच मिळविण्यासाठी-    

=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 


============================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.