Tuesday 27 February 2024

SANMITRA SAHAKARI BANK CO OP ELECTION 2024- सन्मित्र सहकारी बँक निवडणुकीत एकहाती पुन्हा सत्ता; सभासदांच्या विश्वासाचा विजय - मा.बाळासाहेब शिवरकर

सन्मित्र प्रगती पॅनलचे निर्विवाद वर्चस्व; सर्वच उमेदवार विजयी


सन्मित्र सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची सन 2024-2029 करीता पंचवार्षिक निवडणूकीत पुन्हा सत्ताधारी संचालकांचे सन्मित्र प्रगती पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळवले असून सर्वच उमेदवार भरघोस मताने विजयी झाले आहेत. यामध्ये विद्यमान चेअरमन सुनिल गायकवाड यांचा देखील समावेश आहे. दरम्यान सन्मित्र सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर आणि माजी आमदार जगन्नाथ शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखालील सन्मित्र प्रगती पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे. सभासदांनी दाखवलेल्या विश्वासाचा हा विजय असल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब शिवरकर यांनी व्यक्त केली.

सन्मित्र सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी रविवारी 25 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9 ते 5 या वेळेत 11 मतदान केंद्रावर मतदान झाले होते. 13 हजार 640 मतदारांपैकी झालेल्या मतदानात सर्वाधिक मते सन्मित्र प्रगती पॅनलच्या उमेदवारांना प्राप्त झाली. सन्मित्र सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या एकूण 17 जागांवर सन्मित्र प्रगती पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. बँकेच्या चेअरमन पदावर पुन्हा प्रबळ दावेदारी विद्यमान चेअरमन सुनिल गायकवाड यांची असल्याने अन्य संचालकांना चेअरमन पदाची संधी देतील का याबाबत माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 
 
सन्मित्र सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर आणि माजी आमदार जगन्नाथ शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखालील सन्मित्र प्रगती पॅनलने निर्विवाद वर्चस्व स्थापन केले. या पॅनलचे सर्व १७ उमेदवार विजयी झाले आहेत. सोमवारी महर्षी नगर कटारे हायस्कूल येथे मतमोजणी पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे यांनी कामकाज पाहिले.

सन्मित्र प्रगतीचे विजयी झालेले उमेदवार व कंसात मिळालेली मते सर्वसाधारण मतदारसंघातून विजय रामचंद्र कोद्रे -(३३१९), हेमंत दामोदर गाढवे -(३२४१), सुनील रामचंद्र गायकवाड -(३२७४), योगेश जयसिंग गोंधळे-(३३०९), दिलीप रामदास टकले -(३२२०), प्रशांत वसंतराव तुपे-(३१७५), अमोल भरतलाल धर्मावत-(३२२७), विजय कृष्णाजी राऊत -(३२८४), अभिजीत चंद्रकांत शिवरकर -(३२८५), संजय जयवंतराव शेवाळे-(३२२९), चंद्रकांत अर्जुन ससाणे -(३२७५), यशवंत शिवराम साळुंखे-(३२१८),तसेच महिला राखीव गटातून सविता दिनेश गिरमे-(३१६९), रेश्मा दत्तात्रेय हिंगणे-(३०५७), अनुसूचित जाती-जमाती विभागातून रमेश बाबुराव काकडे-(३४३३), इतर मागासवर्गीय विभागातून गणेश सुदाम फुलारे -(३४१७), भटक्या विमुक्त राखीव विभागातून विशाल संभाजी हाके-(३४१६) असे सन्मित्र प्रगती पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.

प्रगती पॅनल च्या विरोधात एकूण सहा उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. प्रतिस्पर्धी उमेदवारांना अवघ्या ३६५ मतांवर समाधान मानावे लागले. सन्मित्र सहकारी बँकेच्या निवडणुकीत अॅड. प्रभाकर शेवाळे, शिवाजी केदारी, बाळासाहेब कोद्रे, दामोदर राऊत, सुनिल बनकर, योगेश ससाणे, सोपान गोंधळे, मुनीर सय्यद, उत्तमराव रायकर यांचा सिहांचा वाटा असल्याचे बँकेचे मार्गदर्शक बाळासाहेब शिवरकर यांनी सांगितले. सभासद मतदारांनी सन्मित्र प्रगती पॅनलच्या उमेदवारांना सुमारे साडेतीन हजार मतांचे मताधिक्य देवून जो विश्वास दाखवला आहे. तो यापुढेही अधिक सक्षमपणे काम करण्याची प्रेरणा देणारा आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.


Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब

============================

"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

==============================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक घरपोच मिळविण्यासाठी-    

=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 


============================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.