विरोधी गटाचे अर्ज बाद झाल्याने मोहिते पाटलांना आव्हान देण्याचा प्रयत्न फोल; राखीव गटातील 3 जागा बिनविरोध
सोलापूर जिल्ह्यातील सदाशिवनगर (ता. माळशिरस) येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीतील कौल स्पष्ट होत असून विरोधी गटाचे बहुतांश अर्ज बाद झाल्याने सत्ताधारी मोहिते पाटिल गटाला आव्हान देण्याचा प्रयत्न फोल ठरला आहे. सत्ताधारी मोहिते पाटील गटातील सर्व उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले असून एकूण २१ जागांसाठी २९ जण रिंगणात राहिले आहेत. राखीव गटातील 3 जागा बिनविरोध होणार आहेत याठिकाणी प्रत्येकी 2 उमेदवारांपैकी एक अर्ज बाद झाला आहे. २१ संचालक निवडीसाठी एकूण ४० उमेदवारांचे ४२ अर्ज दाखल झाले होते. बुधवारी छाननीत १२ विरोधी उमेदवारांचे अर्ज बाद झाले. मागच्या पंचवार्षिक निवडणुकीतही सालगुडे पाटील यांनी मोहिते पाटलांना आव्हान दिले होते. त्यानंतर यंदाही त्यांनी ताकदीनिशी लढत देण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचा अर्जच अवैध ठरल्याने बलाढ्य असा विरोधी गट उरलेला नाही अशी स्थिती निर्माण झालेली आहे.
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला असून 25 फेब्रुवारी मतदान होणार असून 26 फेब्रुवारीला निकाल जाहीर केला जाणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत २२ ते २९ जानेवारी यादरम्यान होती. शंकर साखर कारखान्याच्या सन २०२३-२४ ते २०२८-२९ पंचवार्षिक निवडणुकीसाठी ४० उमेदवारांनी ४२ नामनिर्देशन पत्रे दाखल केली होती. बुधवारी निवडणूक निर्णय अधिकारी नामदेव टिळेकर यांनी दाखल अर्जांची छाननी केली. छाननी 30 जानेवारी 2024 रोजी झाली यामध्ये सत्ताधारी मोहिते पाटील गटातील सर्व उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले. तर विरोधी गटाचे नेते भानुदास सालगुडे पाटील यांच्यासह त्यांच्या पत्नी सौ. सालगुडे-पाटील यांच्यासह अन्य यामध्ये लालासाहेब रणनवरे, आप्पा माळी, आनंदा मुळीक, सुभाष सूळ, मधुकर वाघमोडे, रामहरी गोडसे, नारायण वाघमोडे, नागरबाई पालवे, शरद फुले, नारायण वाघमोडे या १२ जणांचे उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आले. त्यामुळे मोहिते पाटलांना विरोधकांचे असणारे आव्हान काहीसे संपुष्टात आल्याचे चित्र आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 14 फेब्रुवारी 2024 ला दुपारी तीन वाजेपर्यंत असून 15 फेब्रुवारी रोजी उमेदवारांना निशाणी किंवा चिन्हाचे वाटप केले जाणार आहे. मतदान 25 फेब्रुवारी असून 26 तारखेला निकाल घोषित केला जाणार आहे. शंकर सहकारी साखर कारखान्याच्या 21 संचालक यांच्या जागे करता ही निवडणूक होत असून पंधरा संचालक हे उत्पादक मतदारसंघ प्रतिनिधी आहेत.
माळशिरस, इस्लामपूर, नातेपुते, फोंडशिरस, बोरगाव या गटातून प्रत्येकी तीन संचालक निवडले जाणार आहेत, संस्था मतदारसंघातून एक, अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रतिनिधी एक, महिला राखीव प्रतिनिधी दोन ,इतर मागासवर्ग प्रतिनिधी एक , भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग एक, अशा 21 जागांकरता निवडणूक होत आहे. एकूण २१ जागांसाठी २९ जण रिंगणात राहिले आहेत. या आठ उमेदवारांपैकी या प्रक्रियेत शेवटपर्यंत किती उमेदवार राहतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे : माळशिरस उत्पादक गट- मिलिंद कुलकर्णी, सुरेश पाटील, महादेव शिंदे, गोपाळ गोरे, इस्लामपूर गट- बाळासाहेब माने, दत्तात्रय रणनवरे, कुमार पाटील, भीमराव दुधाळ, शिवाजी पवार, उत्तम बाबर.
नातेपुते उत्पादक गटातून - मालोजीराव देशमुख, सुधाकर पोळ, प्रफुल्ल कुलकर्णी, फोंडशिरस उत्पादक गट.- सदाशिव वाघमोडे-पाटील, शिवाजी गोरे, रणजीतसिंह मोहिते पाटील, रणजीत पाटील, बोरगाव उत्पादक गट - दत्तात्रय मिसाळ, सचिन लोकरे, बलभीम पाटील सहकारी संस्था : रणजीतसिंह मोहिते पाटील, मधुकर वाघमोडे, अर्जुनसिंह मोहिते पाटील अनुसूचित जाती किंवा जमाती प्रतिनिधी गट- अर्जुन धाईंजे, महिला राखीव प्रतिनिधी- लिलावती देवकर, लिलावती खराडे, यमुनाबाई निंबाळकर इतर मागासवर्गीय जाती प्रतिनिधी गट- रामदास कर्णे भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी गट-सुनील माने यांचा समावेश आहे.
अवैध ठरलेल्या उमेदवारांचे अर्ज : माळशिरस उत्पादक गट- भानुदास सालगुडे-पाटील, इस्लामपूर गट - लालासो रणनवरे, अप्पा माळी. नातेपुते गट - आनंदा मुळीक, सुभाष सुळ, फोंडशिरस उत्पादक गट - रामहरी गोडसे, मधुकर वाघमोडे, नारायण वाघमोडे, महिला राखीव प्रतिनिधी - नीलम सालगुडे पाटील, नागरबाई पालवे. इतर मागास वर्गीय जातीचा प्रतिनिधी : शरद फुले भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी : नारायण वाघमोडे. 21 जागांसाठी 44 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. कारखान्याचे चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील यांनी स्वतःचे तीन अर्ज दाखल केले होते.
गटनिहाय उमेदवार याप्रमाणे-
माळशिरस उत्पादक गट- मिलिंद कुलकर्णी, सुरेश पाटील, महादेव शिंदे, (भानुदास सालगुडे पाटील, अर्ज बाद) गोपाळ गोरे
इस्लामपूर उत्पादक गट- बाळासाहेब माने, दत्तात्रेय रणवरे, कुमार पाटील, (लालासाहेब रणवरे,अर्ज बाद) भीमराव दुधाळ, शिवाजी पवार, उत्तम बाबर, (अप्पा माळी,अर्ज बाद)
नातेपुते उत्पादक गट- मालोजीराव देशमुख, सुधाकर पोळ, प्रफुल्ल कुलकर्णी, (आनंदा मुळीक,अर्ज बाद) (सुभाष सूळ.अर्ज बाद)
फोंडशिरस उत्पादक गट- सदाशिव वाघमोडे, शिवाजी गोरे, (रामहरी गोडसे,अर्ज बाद) (भानुदास वाघमोडे,अर्ज बाद) रणजितसिंह मोहिते पाटील, रणजित पाटील, (नारायण वाघमोडे,अर्ज बाद)
बोरगाव उत्पादक गट- दत्तात्रेय मिसाळ, सचिन लोकरे, बलभीम पाटील
उत्पादक सहकारी संस्था- रणजितसिंह मोहिते-पाटील (दोन अर्ज), गारेख रूपनवर, रामचंद्र पाटील.
अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी गट- अर्जुन धाईंजे
महिला प्रतिनिधी- लीलावती देवकर, लीलावती खराडे, (नीलम सालगुडे पाटील,अर्ज बाद) (नागरबाई पालवे,अर्ज बाद) यमुनाबाई निंबाळकर.
इतर मागास प्रवर्ग- रामदास कणो, (शरद फुले,अर्ज बाद)
भटक्या जाती-जमाती गट- सुनील माने, (नारायण वाघमोडे,अर्ज बाद)
उत्पादक सहकारी संस्था- मधुकर वाघमोडे, अर्जुनसिंह मोहिते-पाटील
श्री शंकर सहकारी साखर कारखाना सध्या आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या ताब्यात असून त्यांनी मागील निवडणुकीत हा कारखाना ताब्यात घेतला आहे. विस्तीर्ण कार्यक्षेत्र असणाऱ्या या कारखान्याची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. यंदाही विरोधक आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या गटासमोर आव्हान उभे करणार हे निश्चित होते मात्र अर्ज सुध्दा योग्य पद्धतीने दाखल करता आले नाहीत त्यामुळे विरोधकांचे आव्हान फोल ठरले आहे. शंकर कारखाना सुस्थितीत यावा, यासाठी आमदार मोहिते पाटील यांनी मागील पाच वर्षात अनेक प्रयत्न केले असून केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मदत मिळवली आहे. रणजितसिंह यांनी गेल्या तीन वर्षांत कारखान्याला पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर मुदत संपल्याने आता पुन्हा कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे.
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याची पार्श्वभूमी पाहिल्यास सहकारमहर्षी शंकरराव मोहिते यांनी स्वतःची जमीन गहाण ठेवून शंकर कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा केला होता. चितळेंचा खासगी साखर कारखाना ३७ लाख ५० हजार रुपयांत शंकरराव मोहिते यांनी खरेदी केला होता. अनंत अडचणींचा सामना करत कारखान्याने ४८ वर्षे शेतकरी, कामगारांचे हित जोपासले आहे. या कारखाना सुरू झाल्यामुळे सदाशिवनगर, नातेपुते, शिंदेवाडी, धर्मपुरी, फोंडशिरस, माळशिरस आणि माण तालुक्यातही आर्थिक उलाढालीला चालना मिळत आहे. केंद्र सरकारकडून ‘एनसीडीसी’च्या माध्यमातून मंजूर झालेल्या ११३ कोटी रुपयांच्या निधीतून कारखाना पूर्ववत करण्याचा पर्यंत सुरु आहे.
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मागील निवडणूक होऊनगत संचालक मंडळ दि. 10/12/2018 रोजी अस्तित्वात आलेले होते. एकूण 21 संचालक होते त्यापैकी 12 संचालक कार्यरत होते. सात संचालक हे दि. 14/03/2020 च्या महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 78 (अ)(१)(b) अंतर्गत च्या आदेशाअन्वये अपात्र ठरविण्यात आले होते तेव्हापासून सदर पदे रिक्त होती. 2 संचालक मयत झाले होते. मागील निवडणुकीला पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याने संचालक मंडळाची निवडणूक सर्व जागांवर होत आहे.
उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था यामधून रणजितसिंह मोहिते पाटील, अर्जुनसिंह मोहिते पाटील, मधुकर पाटील तीन अर्ज वैध झालेले आहेत. एकूण मतदान 38 आहे. त्यापैकी तीन संस्थांचे ठराव अप्राप्त असल्याने 35 मतदानामध्ये निवडणूक होणार आहे.
संस्था आणि संस्थेमधून ठरावाने मतदानाचा प्रतिनिधी-
१. अध्यक्ष, शिक्षण प्रसारक मंडळ कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यार्थी वस्तीगृह जाधव वसंत पांडुरंग
२. अध्यक्ष, बाबासो पाटील स्थानिक स्कूल कमिटी खराडे पाटील हर्षवर्धन दीपकराव
३. रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटील कृषी प्रत माने तुकाराम श्रीमंत
४. ट्रस्टी, आण्णासो गाडगीळ श्रीरामदेव संस्थान गोंदवले बु. परांजपे जयंत रघुनाथ
५. अध्यक्ष, जीवन शिक्षण मंदिर ठराव अप्राप्त
६. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ सदाशिवनगर ठराव अप्राप्त
७. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील प्रतिष्ठान (टणू) ठराव अप्राप्त
८. पळसमंडळ वि. का. स. (विकास) सो. लि. चव्हाण नामदेवराव विश्वनाथ
९. पुरंदावडे वि. का. स. (विकास) सो. लि. ढोपे देविदास महादेव
१०. गुरसाळे वि. का. स. (विकास) सो. लि. गायकवाड गुलाब मारुती
११. कोथळे वि. का. स. (विकास) सो. लि. जाधव विजय सोपान
१२. दहिवडी वि. का. स. (विकास) सो. लि. जाधव संजय दिनकर
१३. श्री शंकर सहकारी साखर कारखाना सेवकांची पतसंस्था कदम कैलास पोपट
१४. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना मोहिते पाटील विजयसिंह शंकरराव
१५. फोंडशिरस वि. का. स. (विकास) सो. लि. मोहिते पाटील रणजितसिंह विजयसिंह
१६. मांडवे वि. का. स. (विकास) सो. लि. मोहिते पाटील अर्जुनसिंह मदनसिंह
१७. लोणंद वि. का. स. (विकास) सो. लि. मोहिते पोपट भगवान
१८. प्रतापसिंह मोहिते पाटील वि. का. सं. म. मिसाळ माणिकराव ज्ञानोबा
१९. वाघोली वि. का. स. (विकास) सो. लि. वाघोली मिसाळ बिभीषण जनार्दन
२०. गिरझणी वि. का. स. (विकास) सो. लि. गिरझणी मोहिते पाटील धवलसिंह प्रतापसिंह
२१. नारळाचीवाडी वि. का. स. (विकास) सो. लि. मगर चंद्रकांत विश्वनाथ
२२. मे. शेतकरी स. ख. वि. संघ लि. निंबाळकर नितीन रावसो
२३. इस्लामपूर (श्री संभाजी बाबा) वि. का. स. (विकास) सो. लि. पवार लक्ष्मण आगतराव
२४. अहिल्यादेवी वि. का. स. (विकास) सो. लि. पाटील संदीप शामदत्त
२५. नातेपुते वि. का. स. (विकास) सो. लि. पाटील अतुल राजेंद्र
२६. कारुंडे वि. का. स. (विकास) सो. लि. पाटील तानाजी सायाप्पा
२७. दहिगाव वि. का. स. (विकास) सो. लि. पाटील रामचंद्र दशरथ
२८. बोरगाव वि. का. स. (विकास) सो. लि. पाटील धीरज प्रकाशराव
२९. माळेवाडी (विजयकुमार उर्फ बाबासाहेब पाटील) वि. का. स. (विकास) सो. लि. पाटील राजकुमार विजयकुमार
३०. माणकी वि. का. स. (विकास) सो. लि. रणनवरे यशवंत भानुदास
३१. यशवंत वि. का. स. (विकास) सो. लि. रणवरे नंदकुमार सूर्यकांत
३२. एकशीव वि. का. स. (विकास) सो. लि. रुपनवर गोरख नामदेव
३३. कुरबावी वि. का. स. (विकास) सो. लि. रूपनवर संभाजी तुकाराम
३४. मोरोची वि. का. स. (विकास) सो. लि. साळुंखे सुधीर भिमराव
३५. माळखांबी वि. का. स. (विकास) सो. लि. शेळके मनोज भिमराव
३६. भांबुर्डी वि. का. स. (विकास) सो. लि. वाघमोडे शंकर यशवंत
३७. कळंबोली वि. का. स. (विकास) सो. लि. वाघमोडे संजय भीमराव
३८. शेंडेवाडी वि. का. स. (विकास) सो. लि. वाघमोडे मधुकर भानुदास असे 35 मतदार आहेत.
Mr. Chandrakant Bhujbal
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब
============================
============================
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
==============================
New Book
"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक घरपोच मिळविण्यासाठी-
============================="महाराष्ट्रातील राजकारण"
============================
=============================
"महाराष्ट्रातील राजकारण"
============================
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/coopebook
=============================
=============================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.