Friday 1 March 2024

Loksabha Election 2024- मतपत्रिकेवर निवडणूक घेण्यासाठी मराठा संघटनांची रणनीती

प्रत्येक मतदारसंघात बहुसंख्याने उमेदवारी दाखल करण्याची व्यूहरचना


लोकसभा निवडणुकीत एकाच मतदारसंघात हजारो उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करून प्रशासनाला मतपत्रिकेवर निवडणूक घेण्यासाठी मजबूर करण्याची रणनीती मराठा संघटनांकडून जाहीर केली जात आहे. प्रत्येक मतदारसंघात बहुसंख्याने उमेदवारी दाखल करण्याची व्यूहरचना असून प्रत्येक गावातून उमेदवार निवडणूक रिंगणात असावा असे आवाहन देखील मराठा संघटनांकडून केले जात आहे. राज्याच्या राजकारणात पक्षांतर्गत फाटाफूट आणि गट निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण दुषित झाले आहे त्याप्रमाणे मराठा समाजाच्या आरक्षणावरून अभिनव प्रखर आंदोलनांतील एकेरी टीका टिप्पणी, राजकीय व जातीय आरोप-प्रत्यारोपामुळे सामाजिकदृष्ट्या वातावरण देखील दुषित झाले आहे या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकांना राजकीय पक्षांना सामोरे जाताना चक्रव्यूहात अडकल्या सारखे निश्चित भूमिका काय घ्यावी याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. यामध्येच काही मराठा संघटनांकडून आरक्षणाबाबत अन्य मागण्यासाठी आडमुठी भूमिका घेऊन प्रशासनाला अडचणीत आणण्याचा घाट बांधला आहे.
 
सकल मराठा समाजाने लोकसभा निवडणूकीत एक हजार उमेदवार उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने निवडणूक विभाग आणि प्रशासनाची चांगलीच दमछाक होणार आहे. एका कंट्रोल युनिटवर २४ बॅलेट युनिट लावता येतात. १ बॅलेट युनिटवर १६ उमेदवारांच्या चिन्हांची बटणे असतात. एकूण २४ युनिटवर ३८४ उमेदवारांच्या निवडणूक चिन्हांचा समावेश असतो. 'ईव्हीएम' ची क्षमता ३८४ उमेदवार असते. जर ३८४ पेक्षा जास्त उमेदवार झाले तर मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याशिवाय निवडणूक आयोगासमोर पर्याय नसतो. सर्व ४८ मतदारसंघात अशीच प्रशासनाची अडचण करण्याची रणनीती मराठा संघटनांची आहे.  

मराठा आरक्षणावरून शासनाने समाजाची दिशाभूल केल्याचा आरोप मराठा आरक्षण आंदोलकांकडून होत आहे. मनोज जरांगे पाटील यांची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यामुळे आता रस्त्यावरच्या लढाईबरोबर गनिमी कावा करण्याची तयारी मराठा समाजाने चालविली आहे. याच अनुषंगाने आगामी लोकसभा निवडणुकीत नांदेड जिल्हात एक हजार उमेदवार उतरवण्याचा निर्णय सकल मराठा समाजाने घेतला आहे. या बाबत मराठा समाजाकडून बैठका देखील घेतल्या जात आहे, अशी माहिती पंडित कदम, प्रमोद इंगोले, रामकृष्ण कदम यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

मराठा आरक्षण आणि सगेसोयरेच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरूच आहे. त्यांच्या या लढ्याला काही मराठा बांधवाची साथ मिळत आहे. याच मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे रास्ता टोको आंदोलन देखील करण्यात आले. शासनाकडून कुठलीच दखल घेतली जात नाही. उलट जरांगे यांच्या आंदोलनाच्या चौकशीसाठी एसआयटी लावण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यामुळे शासना विरोधात रस्त्यावरील आंदोलना सोबतच गमिनीकावा करण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सकल मराठा समाजाने केली आहे. प्रत्येक गावातून दहा उमेदवार असे ऐकून नांदेड जिल्ह्यात एक हजार उमेदवार निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. या बाबत अर्धापूर तालुक्यात मराठा समाजाची बैठक देखील पार पडली. मराठा समाजाच्या या निर्णयामुळे येणारी निवडणूक सर्वच पक्षांसाठी आव्हानात्मक असणार आहे. प्रत्येक मतदारसंघात बहुसंख्याने उमेदवारी दाखल करण्याची व्यूहरचना आखणी केली जात आहे मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी वास्तविकपणे कितपत होते याबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे. मतपत्रिकेवर निवडणूक घेण्यासाठी रणनीती राबविण्याचा खरा फंडा कोणाचा आहे यावरूनही मतमतांतरे व्यक्त होत आहेत.

---------------------------------

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==============================


     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक घरपोच मिळविण्यासाठी-    

=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 


============================

"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.