Wednesday 13 March 2024

loksabha Election 2024; भाजपकडून 20 मतदारसंघात उमेदवार जाहीर; विद्यमान 5 खासदारांना उमेदवारी नाकारली तर अन्य उर्वरित 4 खासदारांचे भवितव्य धोक्यात!

प्राब संस्थेच्या सर्वेक्षणानुसारच भाजपकडून उमेदवारी


लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी उमेदवारांची यादी जाहीर

मतदारसंघ

विद्यमान खासदार

भाजपकडून उमेदवारी

नंदुरबार

हिना गावित (भाजप)

हिना गावित

धुळे

सुभाष भामरे (भाजप)

सुभाष भामरे

जळगाव

उन्मेष पाटील (भाजप)

स्मिता वाघ

रावेर

रक्षा खडसे (भाजप)

रक्षा खडसे

अकोला

संजय धोत्रे (भाजप)

अनुप धोत्रे

वर्धा

रामदास तडस (भाजप)

रामदास तडस

नागपूर

नितीन गडकरी (भाजप)

नितीन गडकरी

चंद्रपूर

कै बाळू धानोरकर (काँग्रेस) रिक्त

सुधीर मुनगुंटीवार

नांदेड

प्रताप पाटील चिखलीकर (भाजप)

प्रताप पाटील चिखलीकर

जालना

रावसाहेब दानवे (भाजप)

रावसाहेब दानवे

दिंडोरी

डॉ. भारती पवार (भाजप)

डॉ. भारती पवार

भिवंडी

कपिल पाटील (भाजप)

कपिल पाटील

मुंबई-उत्तर

गोपाळ शेट्टी (भाजप)

पियुष गोयल

मुंबई ईशान्य (उत्तर पूर्व)

मनोज कोटक (भाजप)

मिहीर कोटेजा

पुणे

कै. गिरीश बापट (भाजप) रिक्त

मुरलीधर मोहोळ

अहमदनगर

सुजय विखे (भाजप)

सुजय विखे

बीड

डॉ. प्रीतम मुंडे (भाजप)

पंकजा मुंडे

लातूर

सुधाकरराव श्रंगारे (भाजप)

सुधाकरराव श्रंगारे

माढा

रणजितसिंह नाईक निंबाळकर (भाजप)

रणजितसिंह नाईक निंबाळकर

सांगली

संजयकाका पाटील (भाजप)

संजयकाका पाटील


हाराष्ट्रात प्रथमच महायुतीच्या प्रमुख पक्ष असलेल्या भाजपकडून 20 मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यात आले. विद्यमान 5 खासदारांना उमेदवारी नाकारली असून अन्य उर्वरित 4 खासदारांना पहिल्या यादीत स्थान मिळाले नाही त्यामुळे त्यांचे भवितव्य देखील धोक्यात आले आहे. मागील 2019 च्या लोकसभा निवडणूकीत भाजपकडून 24 मतदारसंघात खासदार निवडून आले होते यामधील विद्यमान 20 मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आले तर उर्वरित 4 मतदारसंघातील उमेदवारी जाहीर केलेली नाही. 

नव्याने उमेदवारी दिलेल्यांमध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे, विद्यमान मंत्री सुधीर मुनगुंटीवार, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासह जळगाव मधून स्मिता वाघ, पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना तर मिहीर कोटेजा यांच्या नावाचा समावेश आहे. दरम्यान गोपाळ शेट्टी, मनोज कोटक, डॉ. प्रीतम मुंडे, उन्मेष पाटील या विद्यमान खासदारांना भाजपने उमेदवारी नाकारली असून प्रकृतीच्या कारणामुळे खासदार संजय धोत्रे त्यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. राज्याच्या राजकारणातून पंकजा मुंडे, सुधीर मुनगुंटीवार यांची बढती होऊन त्यांना केंद्राच्या राजकारणात पाठवले आहे.

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेच्या सर्वेक्षणावर शिक्कामोर्तब झाले असून त्यानुसारच भाजपकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून अनेक इच्छुकांनी उमेदवारीसाठी भाजपकडे मागणी केलेली होती. निवडून येण्याच्या शक्यतेवर उमेदवारी निवडीचा मनोदय भाजप वरिष्टांकडून व्यक्त केला होता. प्राब संस्थेच्या सर्वेक्षणात माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना पुणेकरांनी सर्वाधिक पसंती दर्शवलेली होती. त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी मिळणार हे निश्चित झाले होते त्यावर आज अधिकृतपणे उमेदवारी यादी जाहीर केल्यावर शिक्कामोर्तब झाले. 

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची दुसरी यादी आलेली आहे. महाराष्ट्रातील २० उमेदरावांसह देशभरातील ७२ उमेदवार भाजपने जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील महायुतीतील जागा वाटपाचे सूत्र निश्चित होण्याआधीच भाजपने उमेदवारांची घोषणा केलेली आहे. अपेक्षेप्रमाणे नागपूरमधून नितीन गडकरी, जालन्यातून रावसाहेब दानवे, भिवंडीमधून कपील पाटील तर पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे मोठ्या वनवासानंतर पंकजा मुंडे यांना बीडमधून तिकीट देण्यात आले आहे. 

भाजपने महाराष्ट्रातील दिग्गजांची नावे जाहीर केली असली तरी अनेक बड्या चेहऱ्यांची तिकीटे कापली आहेत. यात प्रामुख्याने बीडच्या खासदार प्रीतम मुंडे, भाजपचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी, जळगावचे खासदार उन्मेष पाटील, मुंबई उत्तर पूर्वचे खासदार मनोज कोटक आणि अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांची तिकीटे कापलेली आहेत. प्रीतम मुंडे यांच्याजागी पंकजा  मुंडे, उन्मेष पाटील यांच्या जागी स्मिता वाघ, गोपाळ शेट्टी यांच्या जागी पियूष गोयल तर संजय धोत्रे यांच्याजागी त्यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी ७२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. दादरा नगर हवेली आणि दमण दीवची उमेदवारी ठाकरे गटाच्या खासदार कलाबेन डेलकर यांना जाहीर करण्यात आलेली आहे. कलाबेन डेलकर दादरा आणि नगर हवेली लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या 'अखंड' शिवसेनेकडून विजयी झाल्या होत्या. कलाबेन डेलकर यांचे पती खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईतील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. त्यानंतर रिक्त झालेल्या जागेवरील पोटनिवडणुकीत शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली होती. पोटनिवडणुकीत कलाबेन विजयी झाल्या होत्या. शिवसेनेत फूट पडल्यानंतरही त्या ठाकरेंसोबत राहिल्या होत्या. मात्र अचानक भाजपने त्यांना तिकीट देत धक्का दिला आहे. कलाबेन डेलकर यांनी डिसेंबर २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. केंद्रातील भाजप सरकारने आणलेल्या नारी शक्ती वंदना म्हणजेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महिलांसाठीच्या आरक्षणाचं विधेयक मंजूर केल्यानंतर कलाबेन डेलकर यांनी त्याचं स्वागत केले होते.

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

=============================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक घरपोच मिळविण्यासाठी-    

=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.