Saturday 16 March 2024

Lok Sabha Elections 2024 Schedule : लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान, ४ जून रोजी निकाल

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर 











देशात १८ व्या लोकसभेसाठी निवडणुकीची बहुप्रतीक्षित घोषणा निवडणूक आयोगाने अखेर शनिवारी केली. ९७.६ कोटी नोंदणीकृत मतदार १९ एप्रिल ते १ जून अशा ४४ दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीत सात टप्प्यांमध्ये मतदानाचा हक्क बजावतील, अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्रामध्ये १९ एप्रिल ते २० मे या कालावधीत ५ टप्प्यांमध्ये मतदान होईल. ४ जून रोजी मतमोजणी होईल. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी विज्ञान भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यावेळी नवनियुक्त आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीरसिंह संधू हेही उपस्थित होते. देशात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून केंद्रीय निवडणूक आयोगाने सात टप्प्यातील निवडणूक कार्यक्रम आज जाहीर केला. त्यानुसार १९ एप्रिलपासून देशात लोकसभा निवडणूक होणार असून ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. तर, महाराष्ट्रातही ५ टप्प्यांत निवडणूक होणार आहे. यंदा १८ व्या लोकसभेसाठी निवडणूक होत आहे. २०१९ साली स्थापन झालेल्या मोदी सरकारचा कार्यकाळ ६ जून रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे देशात लोकसभेच्या निवडणुका घेण्यात येत आहे. त्यानुसार, १९ एप्रिलपासून लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होणार असून २ जून रोजी सात टप्पे संपणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार म्हणाले, देशात लोकसभा निवडणूक ५४३ जागांवर निवडणूक होणार आहे. सात टप्प्यात ही निवडणूक होणार असून पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी पार पडणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीसह देशातील काही राज्यात विधानसभेच्याही निवडणुका होणार आहेत. त्यानुसार, सिक्कीमच्या ३२ जागांवर आणि अरुणाचल प्रदेशच्या ६० जागांवर १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर, आंध्र प्रदेशच्या १७५ जागांसाठी १३ मे रोजी मतदान होईल. लोकसभा निवणुकीसोबतच चार राज्याच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या चार राज्यांपैकी ओडिसात दोन टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान होईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यांसाठी २० मे रोजी मतदान होईल. यानंतर ४ जून २०२४ रोजी मतमोजणी पार पडेल. देशात १९ एप्रिलपासून लोकसभा निवडणूक सुरू होणार आहे. यामध्ये संपूर्ण देशात सात आणि महाराष्ट्रात पाच टप्प्यांत निवडणूक होणार आहे. दरम्यान, यावेळी लोकसभेला जवळपास देशात ९६ कोटी मतदार असणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. तसेच यामध्ये १.८ कोटी नवमतदार हे पहिल्यांदा मतदान करणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, मणिपूरमधील दोन मतदारसंघांपैकी एका मतदारसंघात दोन टप्प्यांत मतदान होणार आहे, ज्यामुळे लोकसभेच्या एकूण जागांची संख्या ५४४ वर पोहोचली. मणिपूरमधील लोकसभेच्या दोन जागांसाठी १९ आणि २६ एप्रिल रोजी दोन टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. अंतर्गत मणिपूर आणि बाह्य मणिपूरच्या काही भागात १९ एप्रिलला पहिल्या टप्प्यात आणि २६ एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात मतदान होईल. बाहेरील मणिपूरमध्ये पुन्हा मतदान होईल. गेल्या वर्षी ३ मे रोजी दोन समुदायांमधील वांशिक संघर्ष सुरू झाल्यापासून वारंवार होणाऱ्या हिंसाचाराने ग्रासलेल्या राज्यातील विस्थापनामुळे एका जागेवर दोनदा मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीत ९६ कोटींहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यास पात्र आहेत, त्यापैकी ४९.७२ कोटी पुरुष आणि ४७.१ कोटी महिला मतदार आहेत. प्रथमच मतदान करणारे १.८२ कोटी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपला ३७० जागा आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ४०० हून अधिक जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला असून चार दशकांतील उच्चांक गाठण्याचे लक्ष्य त्यांनी ठेवले आहे.

महाराष्ट्रात खालीलप्रमाणे होणार मतदान :-

पहिला टप्पत- १९ एप्रिलला मतदान
गडचिरोली, भंडारा-गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, रामटेक (५)
दुसरा टप्पा-२६ एप्रिलला मतदान
बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी (८)
तिसरा टप्पा-७ मे रोजी मतदान
रायगड, बारामती, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, माढा, सातारा, सांगली, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले (११)
चौथा टप्पा-१३ मे रोजी मतदान
नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, शिर्डी, बीड, नगर (११)
पाचवा टप्पा- २० मे रोजी मतदान
धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईचे सहा (१३)
लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान, ४ जून रोजी निकाल

किती टप्प्यांत किती राज्ये?
* एका टप्प्यात : अरुणाचल प्रदेश, अंदमान-निकोबार, आंध्र प्रदेश, चंडीगड, दादरा-नगर हवेली, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरियाणा, केरळ, लक्षद्वीप, लडाख, मिझोराम, मेघालय, नागालँड, पुदुच्चेरी, सिक्कीम, तमिळनाडू, पंजाब, तेलंगणा, उत्तराखंड.
* दोन टप्प्यांत: कर्नाटक, राजस्थान, त्रिपुरा, मणिपूर.
* तीन टप्प्यांत: छत्तीसगड, आसाम.
* चार टप्प्यात: ओडिशा, मध्य प्रदेश, झारखंड.
* पाच टप्प्यात: महाराष्ट्र, जम्मू आणि काश्मीर
* सात टप्प्यांत: उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल
-------------------------------
महाराष्ट्र पाच टप्प्यांत मतदान
* टप्पा १ : १९ एप्रिल : रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर.
* टप्पा २ : २६ एप्रिल :  बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, िहगोली,  नांदेड, परभणी.
* टप्पा ३ : ७ मे : रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले.
* टप्पा ४ : १३ मे :  नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, मावळ, अहमदनगर, पुणे, शिरूर, शिर्डी, बीड, छत्रपती संभाजीनगर,
* टप्पा ५ : २० मे : धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सर्वच्या सर्व सहा मतदारसंघ.
-------------------------------
राज्यातील निवडणुकीचा कार्यक्रम
* अधिसूचना : २० मार्च, २८ मार्च, १२ एप्रिल, १८ एप्रिल, २६ एप्रिल
* अर्ज भरण्याची अंतिम तारीख : २७ मार्च, ४ एप्रिल, १९ एप्रिल, २५ एप्रिल, ३ मे
* अर्जाची छाननी : २८ मार्च, ५ एप्रिल, २० एप्रिल, २६ एप्रिल, ४ मे
* अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : ३० मार्च ८ एप्रिल २२ एप्रिल २९ एप्रिल ६ मे
-------------------------------
यंदाच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य काय?
देशात ९६ कोटी मतदार आहेत.
५ लाख मतदान केंद्र आहेत, १.५ कोटी निवडणूक कर्मचारी
५० लाख ईव्हीएम आहेत.
आत्तापर्यंत ४०० विधानसभा निवडणूका झालेल्या आहेत. १६ राष्ट्रपती, उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूका झाल्या आहेत. गेल्या वर्षभरात ११ विधानसभा निवडणूका झाल्या आहेत.
१.८ कोटी नवमतदार आहेत जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत.
८२ लाख मतदार ज्यांचे वय ८५ वर्षांपेक्षा जास्त आहे.
२ लाख मतदार आहेत ज्यांचे वय १०० वर्षांपेक्षा जास्त आहे
१८ हजार ट्रान्सजेंडर मतदान
ज्यांचे वय ८५ वर्षापेक्षा जास्त असेल, दिव्यांगांमध्ये ज्यांची श्रेणी ४० टक्क्यांपेक्षा जास्त असेल आणि त्यांनी फॉर्म १२ डी च्या माध्यामातून नोंदणी केली तर घरी जाऊन त्यांचे मतदान घेतले जाईल.
-------------------------------
कुठल्या जिल्ह्यात कधी मतदान
पहिल्या टप्प्यातील जागा - १९ -०४-२०२४
१) रामटेक
२) नागपूर
३) भंडारा- गोंदिया
४) गडचिरोली- चिमुर
५) चंद्रपूर
-------------------------------
दुसऱ्या फेजसाठीच्या जागा - २६ एप्रिल २०२४
६) बुलढाणा
७) अकोला
८) अमरावती
९) वर्धा
१०) यवतमाळ - वाशिम
११) हिंगोली
१२) नांदेड
१३) परभणी
-------------------------------
तिसऱ्या फेजसाठी जागा - ७ मे २०२४
१४) रायगड
१५) बारामती
१६) उस्मानाबाद
१७) लातूर
१८) सोलापूर
१९) माढा
२०) सांगली
२१) सातारा
२२) रत्नागिरी- सिंधूदुर्ग
२३) कोल्हापूर
२४) हातकणंगले
-------------------------------
चौथ्या फेजसाठीच्या जागा - १३ -०५-२०२४
२५) नंदूरबार
२६) जळगाव
२७) रावेर
२८) जालना
२९) औरंगाबाद
३०) मावळ
३१) पुणे
३२) शिरूर
३३) अहमदनगर
२४) शिर्डी
२५ बीड
-------------------------------
पाचव्या फेजमधील जागा - २०-०५-२०२४
३६) धुळे
३७) दिंडोरी
३८) नाशिक
३९) पालघर
४०) भिवंडी
४१) कल्याण
४२) ठाणे
४३) मुंबई नॉर्थ
४४) मुंबई नॉर्थ- वेस्ट
४५) मुंबई नॉर्थ - इस्ट
४६) मुंबई नॉर्थ - सेंट्रल
४७) मुंबई साउथ - सेंट्रल
४८) मुंबई साउथ
-------------------------------

पुण्यासह तीन मतदार संघात १८ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरणार

पुणे जिल्ह्यात यंदा दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यात बारामती मतदारसंघाची तर दुसऱ्या टप्प्यात पुणे, मावळ आणि शिरूर मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. बारामती लोकसभेसाठी १२ एप्रिलपासून तर पुणे, मावळ आणि शिरूर मतदारसंघासाठी १८ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी रविवारी दिली.
-------------------------------
१) बारामती मतदारसंघ वेळापत्रक
- उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात - १२ एप्रिल
- उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत -१९ एप्रिल
- उमेदवारी अर्जांची छाननी - २० एप्रिल
- उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत - २२ एप्रिल
- मतदान - ७ मे
- मतमोजणी - ४ जून
-------------------------------
मतदारांची संख्या
विधानसभा मतदारसंघाचे नाव - मतदारांची संख्या
दौंड---- २,९९,२६०
इंदापूर ----- ३,१८,९२४
बारामती ----- ३,६४,०४०
पुरंदर - ४,१४,६९०
भोर- ३,९७,८४५
खडकवासला - ५,२१,२०९
एकूण - २३,१५,९६८
-------------------------------
२) पुणे, शिरूर, मावळ लोकसभा मतदारसंघ वेळापत्रक
- उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात - १८ एप्रिल
- उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत - २५ एप्रिल
- उमेदवारी अर्जांची छाननी - २६ एप्रिल
- उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत - २९ एप्रिल
- मतदान - १३ मे
- मतमोजणी - ४ जून
-------------------------------
पुणे मतदार संख्या
वडगावशेरी - ४५२६२८
शिवाजीनगर - २७२७९८
कोथरूड - ४०१४१९
पर्वती - ३३४१३६
पुणे कॅन्टोमेन्ट- २६९५८८
कसबा पेठ - २७२७४७
एकूण मतदार संख्या - २०,०३,३१६
-------------------------------
शिरूर मतदारांची संख्या
विधानसभा मतदारसंघाचे नाव - मतदारांची संख्या
जुन्नर -३,०८,४३९
आंबेगाव - २,९८,५९८
खेड- ३,४५,०३५
शिरूर- ४,२९,८१८
भोसरी- ५,३५,६६६
हडपसर-५,६२,१८६
एकूण - २४,७९,७४२
-------------------------------
मावळ मतदारांची संख्या
विधानसभा मतदारसंघाचे नाव - मतदारांची संख्या
मावळ- ३,६७,७७९
चिंचवड- ५,९५,४०८
पिंपरी- ३,६४,८०६
पनवेल (जि. रायगड)- ५,६३,९१५
कर्जत (जि. रायगड)- ३,०४,५२३
उरण (जि. रायगड)- ३.०९,२७५
एकूण - २५,०९,४६१
-------------------------------
पुणे जिल्ह्यातील दृष्टिक्षेप
- पुणे जिल्ह्यातील चारही मतदार संघातील एकूण मतदार संख्या---- ८२ लाख, २४ हजार ४३३ (जानेवारीअखेर)
- पुरुष मतदारांची संख्या-४२ लाख, महिला मतदार संख्या -३९ लाख
- १८ ते १९ वयोगटातील मतदारांची संख्या- ३५ हजार २३२
- २० ते २९ वयोगटातील मतदारसंख्या--१३ लाख ४२ हजार
- ८५ वर्षांपेक्षा अधिक वयोमान असलेल्या मतदारांची संख्या--१ लाख २४ हजार२८९
- शंभर पेक्षा अधिक वयोमान असलेल्या मतदारांची संख्या ---५ हजार ५१७
- एकूण मतदान केंद्रांची संख्या- ८ हजार ३८२
- निवडणुकीसाठी लागणारा कर्मचारी वर्ग- ७४ हजार
- मतदानासाठी लागणाऱ्या यंत्रांची संख्या- ४४ हजार
- पुणे-बारामतीची मतमोजणी- कोरेगाव येथील शासकीय गोदामात
- मावळ मतदार संघाची मतमोजणी बालेवाडी स्टेडीयम
- शिरूर मतदार संघाची मतमोजणी रांजणगाव येथील गोदामात
-------------------------------

देशभरात खालीलप्रमाणे होणार मतदान-:

टप्पा १:- १९ एप्रिल २०२४ (१०२ जागा)
टप्पा २:- २६ एप्रिल २०२४ (८९ जागा)
टप्पा ३:- ०७ मे २०२४ (९४ जागा)
टप्पा ४:- १३ मे २०२४ (९६ जागा)
टप्पा ५:- २० मे २०२४ (४९जागा)
टप्पा ६:- २५ मे २०२४ (५७ जागा)
टप्पा ७:- १ जून २०२४ (५७ जागा)
मतमोजणी/निकाल - ४ जून २०२४

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर 

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे जागा रिक्त झाली होती. अकोला पश्चिम विधानसभा निवडणूक घोषित करण्यात आली आहे. ही पोटनिवडणूक आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे घेण्यात येत आहे. ही निवडणूक लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात होणार आहे. याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे. निवडणूक शुक्रवार 26 एप्रिल रोजी होणार आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत अकोला पश्चिमची पोटनिवडणूक होणार असून, याचा निकाल 4 जूनला लागणार आहे. अकोला लोकसभा आणि अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी २८ मार्चला अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार असून त्याच दिवसापासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्‍यास सुरुवात होईल. ४ एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करता येतील. ५ ला छाननी, तर ८ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येतील. २६ एप्रिलला मतदान होणार असून ४ जूनला मतमोजणी केली जाणार आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात १८ लाख ७५ हजार ६३७ मतदार असून त्यामध्ये नऊ लाख ७० हजार ६६३ पुरुष, नऊ लाख ०४ हजार ९२४ स्त्री व ५० इतर मतदारांचा समावेश आहे. ४ एप्रिलपर्यंत पात्र मतदारांची नोंदणी सुरू राहणार आहे. निवडणूक आयोगाकडून पात्र तरुण व नवमतदारांच्‍या नाव नोंदणीवर विशेष भर देण्‍यात येत असून मतदारयादीमध्‍ये सद्यस्थितीत १८ ते १९ वर्षे वयोगटातील मतदारांची संख्या २५ हजार ९६३ आहे. त्यामध्ये १५ हजार ६२३ पुरुष, १० हजार ३३९ स्त्री व एक इतर मतदार आहे. अकोला पश्चिम विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी तीन लाख २८ हजार ०७६ मतदार राहणार आहेत. अकोला पश्चिममध्‍ये एकुण ३०७ मतदान केंद्रे असून ते सर्व शहरी भागात आहेत. अकोला लोकसभा मतदारसंघामध्‍ये एकूण दोन हजार ०५६ मतदान केंद्र राहणार आहेत. यामध्ये अकोट ३३६, बाळापूर ३४०, अकोला पश्चिम ३०७, अकोला पूर्व ३५१, मूर्तिजापूर ३८५ व रिसोड मतदारसंघात ३३७ मतदान केंद्र राहणार आहेत. सर्वच मतदान केंद्रांवर आवश्‍यक त्‍या सुविधा उपलब्‍ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. भारत निवडणूक आयोगानिर्देशानुसार उमेदवाराला लोकसभा निवडणुकीसाठी खर्च मर्यादा ९५ लाख रुपये करण्यात आली आहे. मागील निवडणुकीत ही मर्यादा ७० लाख होती. विधानसभा निवडणुकीसाठी खर्च मर्यादा ४० लाख रुपये करण्यात आली असून पूर्वी ती २८ लाख रुपये होती.

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

=============================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक घरपोच मिळविण्यासाठी-    

=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 















No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.