Monday, 11 March 2024

कर्तृत्ववान महिलांचा इतिहास समाजासाठी सदैव प्रेरणादायी- ह.भ.प. सौ. राजश्री माझिरे

अॅड. संध्या भुजबळ यांना राजमाता जिजाऊ रणरागिणी गौरव पुरस्कार प्रदान



पुणे- कर्तृत्ववान महिलांचा इतिहास समाजासाठी सदैव प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन महिला कीर्तनकार ह.भ.प. सौ. राजश्री माझिरे यांनी केले. आम्ही महाराष्ट्रीयन फाऊन्डेशनच्या वतीने जागतिक महीला दिनानिमित्ताने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील महिलांचा राजमाता जिजाऊ रणरागिणी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले याप्रसंगी त्या बोलत होत्या.

महीलांसाठी उल्लेखनीय सामाजिक कार्य केल्याबद्दल क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन ट्रस्टच्या अध्यक्षा अॅड. संध्या भुजबळ यांच्यासह मान्यवरांना राजमाता जिजाऊ रणरागिणी गौरव पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास समाजसेविका सौ कल्याणी कदम, सौ. स्मिता पवार, सौ. जयश्री अशोक जाधव, सौ. प्राजक्ता मेढेकर, सौ. प्रभा फाटक, सौ. विद्या चौधरी, सौ. अलका कोकाटे, सौ. वैशाली संजय सातव, पत्रकार विठ्ठल जाधव, चंद्रकांत भुजबळ, फाऊन्डेशनचे प्रदेश अध्यक्ष शामराव दौंडकर, अंबिका कला केंद्राचे प्रमुख अशोक जाधव, समिर फाटक आदी मान्यवर उपस्थित होते.   

पुढे राजश्री माझिरे म्हणाल्या की, महीला कायमच समाजात अग्रस्थानी राहिल्या असून त्यांना संतांनी देखील प्रथम स्थान दिले आहे. संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा संदर्भ देत त्या म्हणाल्या की, !!कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरएक वाटे देवा, धन्य माता पिता तयाचिया!! प्रथम कन्या आणि माता संबोधले असून महीलांना प्रथम स्थान साडेतीनशे वर्षापूर्वीच संतांनी अधोरेखित केले असून आता आपण लेडीज फस्ट असे म्हणतो. आपला इतिहास सांगतो की महिलांनी खूप कर्तृत्ववान कार्य केलेले आहेत ते आजही समाजाची प्रेरणादायी आहे. महीला त्यांच्या माहेर व सासरच्या अशा दोन्ही ठिकाणच्या 42 कुळांचा उद्धार करीत असतात म्हणूनच महिलांना समाजात अग्रस्थानी मानले असल्याचे सांगून उपस्थित कर्तृत्ववान महीलांचे त्यांनी यावेळी कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पुणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ साविताताई दगडे यांनी या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, प्रत्येकाने न्यायाच्या बाजूने उभे राहिल्यास समाजात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन त्यांनी केले. याप्रसंगी त्या पुढे म्हणाल्या की, महिलांनी कोणत्याही क्षेत्रात काम करीत असताना आपले कुटुंब पहा मग अन्य कार्यात अग्रेसर रहा यश हमखास मिळते असे सांगून त्या पुढे म्हणाल्या की, मी प्रथम शिक्षिका होते त्यानंतर सर्वांच्या आग्रहामुळे राजकारणात प्रवेश करून यशस्वी झाले. त्याचे कारण म्हणजे कुटुंब आणि राजकीय सामाजिक कार्यात कधीही गल्लत केली नाही. आपण नेहमीच जमिनीवर पाय ठेवून मार्गक्रम केले पाहिजे असे सांगून समाजाने महिलांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन चांगला ठेवला पाहिजे तरच महिलांवरील अत्याचार कमी होतील. मुलांना चांगले संस्कार देणे हे पालकांच्या हातात आहे ते मुलांना योग्य मार्ग दाखवला तर आदर्श समाज उभा राहायला वेळ लागणार नाही असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. 

वाघोलीच्या माजी सरपंच सौ. जयश्रीताई सातव या प्रसंगी म्हणाल्या की, महिलांचा कर्तृत्ववान इतिहास पाहिल्यास आजच्या युवा महिलांनी प्रथम आपले कुटुंब सुखी व समाधानी ठेवले तरच आपल्या कलागुणांना योग्य न्याय देणे शक्य होते असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. आजकालच्या युवा महीला केवळ आपण पाश्चिमात्य कपडे परिधान केले म्हणजे आपण पुढारलेलो आहोत असे समजतात हे अयोग्य असून खरे कर्तुत्व अंगीकारले पाहिजे असेही त्यांनी सांगून ज्या महिलांनी समाजापुढे आदर्शवत कार्य केले आहे त्यांचा आदर्श आपण घ्यावा असे आवाहन सौ. जयश्रीताई सातव यांनी यावेळी केले.

तसेच महीला कोणत्याही क्षेत्रात आज मागे नाहीत. पायलट पासून पंतप्रधान पदापर्यंतच्या व्यासपीठावर गेल्या आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये सर्वाधिक सहनशक्ती असते एकाचवेळी अनेक कामांवर त्यांचे लक्ष असते. संकटावर मात करण्याचे कौशल्य त्यांच्यात उपजत आहे, कोणत्याही प्रसंगाला न डगमगता सामोरे जाते हे महिलांचे वैशिष्ट आहे असे मत सौ. पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ जयश्रीताई पोकळे यांनी यावेळी व्यक्त केले.

आम्ही महाराष्ट्रीयन फाऊन्डेशनचे प्रदेश अध्यक्ष शामराव दौंडकर यांनी संस्थेच्या सामाजिक उपक्रमाची माहिती देऊन पुरस्काराने सन्मानित केलेल्या महीलांचे कर्तुत्व प्रास्ताविक भाषणात विषद केले. आम्ही महाराष्ट्रीयन फाऊन्डेशनच्या वतीने जागतिक महीला दिनानिमित्ताने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील महिलांचा राजमाता जिजाऊ रणरागिणी गौरव पुरस्काराने सन्मान केला यामध्ये लावणी कलाकार ते पोलीस उपनिरीक्षक पदी मजल मारणाऱ्या सुरेखा कोरडे, कारगिल युद्धात शहीद भागवत बागडे यांच्या वीरपत्नी श्रीमती अजिता बागडे, रस्त्यावर फिरस्ती मनोरुग्णांची सेवा करणाऱ्या स्वाती डिंबळे, समाजसेविका सौ. निलम खंडागळे, सर्वसामान्य कुटुंबातील सदस्य ते क्लास वन अधिकारी झालेल्या कोमल शिंदे, विधी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अॅड. संध्या भुजबळ, माजी सरपंच वैशाली संजय सातव, अनाथ मुलांना मोफत शिक्षण देणाऱ्या हेमलता मराठे, शिक्षण घेता-घेता गायांचा गोठा सांभाळणाऱ्या रिद्धी लेंडे, समाजसेविका स्वाती काळे व विद्या काळे यांचा समावेश आहे.

Adv Sandhya Bhujbal | अ‍ॅड. संध्या भुजबळ यांना राजमाता जिजाऊ रणरागिणी गौरव पुरस्कार प्रदान



Adv Sandhya Bhujbal | अॅड. संध्या भुजबळ यांना राजमाता जिजाऊ रणरागिनी गौरव पुरस्कार जाहीर 

अॅड. संध्या भुजबळ यांना राजमाता जिजाऊ रणरागिनी गौरव पुरस्कार जाहीर



POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब

============================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.