Monday 11 May 2020

विधान परिषद निवडणुक 2020 - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल; 9 जागांसाठी 14 उमेदवारांचे अर्ज

विधानपरिषद निवडणुक बिनविरोध होणार

काँग्रेसने एका जागेवरील माघार घेतल्याने विधानपरिषद निवडणुक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे 5 व भाजपचे 4 उमेदवारांचा निवडीची औपचारिकता 14 मे रोजी पूर्ण होऊन निवडणूक आयोगाकडून अधिकृत घोषणा करण्यात येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीचा अर्ज दाखल केला. फॉर्म भरताना उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि सुपुत्र आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते. तसेच महाविकास आघाडीचे अन्य उमेदवार नीलम गोऱ्हे शिवसेना, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, राजेश राठोड यांनी देखील नामनिर्देशनपत्र दाखल केले. यावेळी राष्ट्रवादी व काँग्रेससह शिवसेनेचे नेते उपस्थित होते. विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होणार आहे. उमेदवारी माघार घेण्याची 14 मे तारीख असून त्यानंतर 9 जागांसाठी 9 अर्ज राहिल्यास बिनविरोध निवड झाल्याचे घोषित होऊ शकते. यामध्ये महाविकास आघाडीचे ५ तर भाजपाचे ४ उमेदवार निवडून येणार आहेत. काँग्रेसने या निवडणुकीसाठी दोन उमेदवार दिल्याने तिढा निर्माण झाला होता. मात्र काँग्रेसने माघार घेतल्याने तो सुटला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा आमदार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली खरी, मात्र ते विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांचे सदस्य नव्हते. त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे. 

9 जागांसाठी 14 उमेदवारांचे अर्ज दाखल

9 जागांसाठी 14 उमेदवारांनी अखेरच्या दिवशी अर्ज दाखल केले असून यामध्ये एका अपक्ष उमेदवाराचा समावेश आहे. तर भाजपने 6, राष्ट्रवादीने 4, शिवसेना 2, काँग्रेस 1, अपक्ष 1 असे एकूण 14 उमेदवार निवडणूक रिंगणात असून डमी उमेदवारी अर्ज असल्याचा खुलासा केला जात आहे. उद्या नामनिर्देशनपत्राची छाननी असून यामध्ये काही उमेदवारांच्या अर्जातील त्रुटी व अपूर्ण कागदपत्रांवरून अवैध अर्ज ठरला तर पर्याय म्हणून डमी अर्ज दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. उद्या होणाऱ्या छाननीनंतर वैध अर्जाबाबत स्पष्टीकरण होईल. तर 14 मेला अर्ज माघारीचा अखेरच्या दिवशी विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार अथवा लढतीचे चित्र स्पष्ट होईल.

विधानपरिषद निवडणूक करिता खालील उमेदवारांनी अर्ज दाखल केले

निवडणुकीसाठी हे आहेत उमेदवार-

विधानपरिषद पोट-निवडणूक 2020
अ.क्र.
उमेदवाराचे नाव
पक्ष
1
गोपीचंद कुंडलिक पडळकर
भारतीय जनता पार्टी
2
प्रवीण प्रभाकरराव दटके
भारतीय जनता पार्टी
3
रणजितसिंह विजयसिंह मोहिते-पाटील
भारतीय जनता पार्टी
4
डॉ. अजित माधवराव गोपचेडे
भारतीय जनता पार्टी
5
संदीप सुरेश लेले
भारतीय जनता पार्टी
6
रमेश काशीराम कराड
भारतीय जनता पार्टी
7
शशिकांत जयवंतराव शिंदे
राष्ट्रवादी
8
उद्धव बाळासाहेब ठाकरे
शिवसेना
9
नीलम दिवाकर गोर्हे
शिवसेना
10
अमोल रामकृष्ण मिटकरी
राष्ट्रवादी
11
किरण जगन्नाथ पावसकर
राष्ट्रवादी
12
राजेश धोंडीराम राठोड
कॉंग्रेस
13
शहबाज अलाउद्दीन राठोड
अपक्ष
14
शिवाजीराव यशवंत गर्जे
राष्ट्रवादी

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================
 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.