Thursday 14 May 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह 9 जणांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड; 18 मे रोजी सदस्यपद शपथग्रहण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह 9 जणांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतर आठही उमेदवार विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले आहेत. सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची माहिती आज, गुरुवारी अधिकाऱ्यांनी दिली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आज दुपारी तीन वाजेपर्यंत होती. त्यानंतर अधिकृत निकालाची घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह 9 रिक्त जागांची निवडणूक बिनविरोध झालेली असून या सर्वांचा शपथग्रहण आता सोमवारी 18 मे रोजी होणार आहे. सर्व नवनिर्वाचित आमदार 18 मे रोजी दुपारी 1 वाजता विधानपरिषद सभापतींच्या उपस्थितीत विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतील. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतील. विधानपरिषद निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे सर्व 9 उमेदवारांचा शपथविधी सोमवारी विधानपरिषदेत सभापतींच्या उपस्थित पार पडणार आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने संख्याबळानुसार उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. त्यानुसार शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचे 2 आणि काँग्रेसचा 1 तर भाजपचे 4 असे एकूण 9 उमेदवार बिनविरोध निवडले गेले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या कालवधीच्या आत ते आमदार म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांच्या सोबतच महाविकास आघाडी आणि भाजपचे बिनविरोध निवडून आलेले उमेदवारही शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 1 वाजता विधान परिषद सभापतींच्या उपस्थितीत विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेणार आहे. विधान परिषदेवर शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर राष्ट्रवादीकडून अमोल मिटकरी आणि शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेवर सदस्य म्हणून निवड झाली आहे. तर काँग्रेसकडून राजेश राठोड यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांचीही निवड झाली आहे. भाजपकडून यावेळी चार सदस्य असणार आहे. भाजपकडून विधानपरिषदेसाठी यावेळी ज्येष्ठ नेत्यांनी तिकीट डावलण्यात आली आहे. त्यांच्या जागी नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. रमेश कराड, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रणजितसिंह मोहिते यांची विधान परिषद सदस्य म्हणून निवड झाली आहे. डॉक्टर अजित गोपचडे यांनी अर्ज दाखल केला होता परंतु, ऐनवेळी त्यांनी माघारी घेतली त्यामुळे रमेश कराड यांची निवड झाली. उद्धव ठाकरे यांच्यासहित इतर आठ जणही बिनविरोध निवडून आले आहेत. यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनीही उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन केलं असून छत्रपती शंभू राजांच्या जयंतीदिनी उद्धव ठाकरेंची बिनविरोध निवड झाल्याचा आनंद असल्याचं म्हटलं आहे. “आमदार म्हणून विधान परिषदेवर उद्धव ठाकरे यांची बिनविरोध निवड झाल्याबाबत अभिनंदन ! छत्रपती शंभू राजांच्या जयंतीदिनी ही सुखद वार्ता मिळाली याबाबत आनंद होतोय. महाराष्ट्र सरकार रयतेच्या कल्याणासाठी सदैव तत्पर राहणार याचा मला विश्वास आहे,” असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. विधानसभा सदस्यांद्वारे निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या एकूण ९ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. त्यासाठी दाखल १४ उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्रांपैकी एका उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले होते. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा आजचा अखेरचा दिनांक होता. १३ उमेदवारांपैकी डॉ. अजित माधवराव गोपछडे (भारतीय जनता पार्टी), श्री. संदीप सुरेश लेले (भारतीय जनता पार्टी), श्री. किरण जगन्नाथ पावसकर (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), श्री. शिवाजीराव यशवंत गर्जे (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी) या चार उमेदवारांनी दि.१२ रोजी आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतले.

पक्षनिहाय उमेदवार

शिवसेना – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नीलम गोऱ्हे
राष्ट्रवादी – शशिकांत शिंदे व अमोल मिटकरी
भाजप – प्रवीण दटके , रमेश कराड, रणजितसिंह मोहिते-पाटील, गोपीचंद पडाळकर
काँग्रेस – राजेश राठोड

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================
 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.