Sunday, 10 May 2020

9 जागांसाठी 10 उमेदवार; उमेदवार मागे घेण्यासाठी काँग्रेसवर दबाव; ...तर निवडणुक न लढवण्याचा मुख्यमंत्र्यांचा गर्भित इशारा

विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर


काँग्रेस पाठोपाठ विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने देखील अपेक्षेप्रमाणे 2 उमेदवारांची नावे जाहीर केल्याने महाविकास आघाडीत तणाव निर्माण होत आहे. 9 जागांसाठी 10 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले जात असल्याने विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होण्यात अडचण निर्माण होऊन निवडणूक अटळ असल्याची राजकीय स्थिती निर्माण आलेली आहे. राज्यात विधान परिषद निवडणुकीवरून राजकीय वातावरण पेटले आहे. काँग्रेसने विधान परिषदेसाठी दुसरा उमेदवार दिल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. 'जर काँग्रेस आडमुठेपणा सोडणार नसेल तर मी विधान परिषद निवडणुक लढवणार नाही', असा इशाराच उद्धव ठाकरें यांनी काँग्रेसला दिल्याचे वृत्त असून उमेदवार मागे घेण्यासाठी काँग्रेसवर दबाव आणण्यात येत आहे. विधान परिषद निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आग्रही आहे. मात्र, तरी देखील काँग्रेसने दुसरा उमेदवार जाहीर केल्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे. विधान परिषद निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी पहिल्यापासून राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रयत्न आहे. यासाठी काँग्रेसने एका जागेवर उमेदवार द्यावा अशी विनंती करण्यात आली होती. परंतु, काँग्रेसकडून दोन उमेदवार उभे करण्यात आले आहे. काँग्रेसकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी राजेश राठोड यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर थोरातांनी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर उर्फ पापा मोदी यांचे नाव जाहीर केले आहे.
       विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अखेर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. शिवसेना, भाजपा आणि काँग्रेसनंतर राष्ट्रवादीने आपल्या उमेदवाराची नावे जाहीर केली आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करून माहिती दिली. त्याचबरोबर दोन्ही उमेवादारांच्या विजयाबद्दल विश्वासही व्यक्त केला. विधान परिषदेच्या ९ जागांसाठी २१ मे रोजी मतदान होत असून, जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची घोषणा केली आहे. शिवसेना, भाजपा, काँग्रेसबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. राष्ट्रवादीकडून विधान परिषदेच्या दोन जागांसाठी साताऱ्याचे शशिकांत शिंदे आणि अकोल्याचे अमोल मिटकरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दोन्ही उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. शशिकांत शिंदे (सातारा) व अमोल मिटकरी (अकोला) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार असतील. हे दोन्ही उमेदवार यशस्वी होऊन विधान परिषदेत उत्तम कामगिरी बजावतील याची मला खात्री आहे, असे ट्विट जयंत पाटील यांनी केले आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील ही निवडणूक बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मत व्यक्त केले होते. उमेदवारी मागे घेण्यास वाव आहे. त्यादृष्टीने काँग्रेसशी चर्चा करू. महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकण्याची परिस्थिती आहे का हेही बघू मात्र आजच्या परिस्थितीत निवडणूक बिनविरोध होणे सगळ्यांच्या हिताचे असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे. त्यामुळे काँग्रेस आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान भाजपकडून विधानपरिषदेसाठी डॉक्टर अजित गोपचडे, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रणजितसिंह मोहिते यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे शिवसेनेने उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांची नावे निश्चित केली आहेत. शिवसेनेने ही दोन्ही नावे निश्चित केली असली, तरी त्यांची अधिकृत घोषणा मात्र अजून झालेली नाही. महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार अखेरच्या दिवस सोमवारी उद्या त्यांचा अर्ज दाखल करणार आहेत. आता महाविकास आघाडी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. दरम्यान, महाविकास आघाडीचे 6 उमेदवार आहेत.

विधान परिषदेचे उमेदवार (9 जागांसाठी 10 उमेदवार)

उद्धव ठाकरे - शिवसेना
निलम गोऱ्हे - शिवसेना
शशिकांत शिंदे - राष्ट्रवादी
अमोल मिटकरी - राष्ट्रवादी
राजेश राठोड - काँग्रेस
राजकिशोर मोदी - काँग्रेस
रणजितसिंह मोहिते पाटील - भाजप
गोपीचंद पडळकर - भाजप
प्रवीण दटके - भाजप
डॉ. अजित गोपछेडे - भाजप
६ उमेदवार निवडून आणण्यासाठी आघाडीकडे १७४ आमदार पाहिजेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचे संख्याबळ १५४ आहे. विश्वासदर्शक प्रस्तावात ठाकरे सरकारला १६९ मते मिळाली होती. स्वाभिमानी पक्ष, समाजवादी, प्रहार जनशक्ती, शेतकरी क्रांतिकारी पक्ष, बविआ आणि शेकापच्या १० आमदारांनी सरकारला पाठिंबा दिला होता. विधानसभेत १३ अपक्ष, तर छोट्या पक्षांचे १५ आमदार आहेत. या २८ आमदारांवर काँग्रेसची मदार आहे. भाजपला त्यांच्या कोट्यानूसार चौथ्या उमेदवाराला निवडूण आणण्यासाठी फक्त अधिकच्या चार मतांची गरज आहे. ती मते ते सहजपणे मिळवू शकतात असा भाजपचा दावा आहे. या निवडणुकीत उमेदवारांना निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची २९ मते (मतांचे मूल्य २८८१) मिळवावी लागणार आहेत. राज्य विधानसभेत २८८ आमदार, तर एक अँग्लो इंडियन सदस्य असतो. एका आमदाराच्या मताचे मूल्य १०० असते. त्यामुळे २८८ गुणिले १०० झाले २८८००. त्यात अधिक १ मिसळायचा म्हणजे एकूण मते झाली २८८०१. सध्या ९ रिक्त जागांची निवडणूक होत आहे. त्यात अधिक १ मिसळायचा म्हणजे झाले १०. २८८०१ याला १० ने भागायचे, ती संख्या येते २८८०.१ म्हणजे कोटा झाला २८.८ मतांचा. याचा अर्थ पहिल्या पसंतीची २९ आमदारांनी मते दिलेला उमेदवार विजयी होणार आहे. लोकसभा आणि आमदारांच्या मतांचे मूल्य निश्चित असते. लोकसभेसाठी प्रत्येक खासदाराच्या मताचे मूल्य हे ७०८ आहे. हे ७०८ मूल्य कशा प्रकारे निश्चित करण्यात आले ते असे. देशातील एकूण ४१२० विधानसभा सदस्यांचे एकूण मतांचे मूल्य हे ५,४९,४७४ आहे. लोकसभेचे ५४३ अधिक राज्यसभेचे २३३ असे एकूण ७७६ सदस्य होतात. आमदारांचे एकूण मतांचे मूल्य ५ लाख ४९ हजार ४७४ भागीले ७७६ अशा पद्धतीने खासदारांच्या मतांचे मूल्य हे ७०८ हे निश्चित झाले आहे. एका आमदाराच्या मताचे मूल्य १०० पकडले जाते. एका उमेदवारास विजयासाठी २९०० मते हवीत. निवडून येण्यासाठी प्रत्येकाला आवश्यक असेल  {२८८/(९+१) = २८.८} म्हणजेच २९ मते. सध्या ज्या जागा रिक्त झाल्यात त्यात भाजपच्या ३, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३, काँग्रेसच्या २ आणि शिवसेनेची १ अशा एकूण ९ जागांचा समावेश आहे. संख्याबळाचा विचार केल्यास महाविकास आघाडीच्या ५ आणि भाजपच्या ३ जागा सहज निवडून येतील. पक्षीय बलाबल लक्षात घेता भाजपकडे १०५, शिवसेनेकडे ५६, राष्ट्रवादी काँग्रेसकडे ५४, काँग्रेसचे ४४, बहुजन विकास आघाडी ३, समाजवादी पार्टी २, एमआयएम २, प्रहार जनशक्ती २, मनसे १, माकप १, शेतकरी कामगार पक्ष १, स्वाभिमानी पक्ष १, राष्ट्रीय समाज पक्ष १, जनसुराज्य पक्ष १, क्रांतिकारी शेतकरी पक्ष १, अपक्ष १३ आमदारांचा समावेश आहे. त्यातून निवडून येण्यासाठी एका जागेसाठी २९ मतांची गरज आहे. त्यामुळे या निवडणुकीत एका जागेवरून चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या सोमवारी अखेरचा दिवस आहे तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी 14 मे पर्यंत असल्याने महाविकास आघाडीतील निर्माण तणाव दूर करण्यासाठी 4 दिवसांचा पुरेसा वेळ आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक बिनविरोध करणे सर्वांना अपेक्षित आहे. काँग्रेस माघार घेऊ शकेल अशी शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================
 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.